Wednesday, 30 August 2023

मृद व जलसंधारणाची प्रलंबित कामेतातडीने पूर्ण करावीत

 मृद व जलसंधारणाची प्रलंबित कामेतातडीने पूर्ण करावीत


- मंत्री संजय राठोड


          मुंबई, दि. २९ :- मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रदान केलेल्या प्रशासकीय मान्यता दिलेली मात्र प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे व उर्वरित कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.


           मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील 600 हेक्टरपर्यंतच्या सिंचन मर्यादेतील लघु पाटबंधारे योजनांच्या प्रगतीपथावरील कामांची आढावा बैठक मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे, नागपूर प्रादेशिक मंडळाचे अपर आयुक्त तथा मुख्य अभियंता विजय देवराज, सहसचिव व ठाणे मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुनील काळे उपस्थित होते.


          मंत्री श्री. राठोड यांनी क्षेत्रीयस्तरावर शासन निधीतून व जलसंधारण महामंडळ निधीतून सुरु असलेल्या जलसंधारण कामांचा आढावा घेतला. राज्यातील पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नाशिक मंडळांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची प्रगती, माजी मालगुजारी तलाव दुरूस्ती कार्यक्रम, वाल्मी प्रशिक्षण संस्थेची नूतनीकरणाची कामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.


           यावेळी नागपूर मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी नितीन दुसाने, पुणे मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, नाशिक मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, औरंगाबाद मंडळातील जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे, अमरावती मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे, विभागाच्या उपसचिव मृदुला देशपांडे, अवर सचिव प्रकाश पाटील, अवर सचिव राजेश बागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.


००००


दत्तात्रय कोकरे/विसंअ/

नवीन रोपवाटिका कायदा करणार

 नवीन रोपवाटिका कायदा करणार


- मंत्री संदिपान भुमरे


          मुंबई, दि. २९ : शासन शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्णय घेत आहे. राज्यात इतर राज्यातून अवैधरित्या फळांचे रोप येत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याने रोपवाटिका अधिनियमात सुधारणा करून नवीन रोपवाटिका कायदा आणण्याचे विचाराधीन असल्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.


            मंत्री श्री.भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली फलोत्पादन विभागाची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली. या बैठकीस कृषी व फलोत्पादन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.अनुपकुमार यादव, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते, सहसंचालक डॉ. अशोक किरनळी, सहसंचालक अमरावती के. एस. मुळे, सहसंचालक नागपूर राजेंद्र साबळे, रोहयो विभागाच्या उपसचिव रंजना खोपडे, पुणे फलोत्पादन विभागाच्या प्रकल्प व्यवस्थापक पल्लवी देवरे, बियाणे मंडळाचे मुख्य कार्य अधिकारी रामनाथ कार्ले आदी उपस्थित होते.


            मंत्री श्री भुमरे म्हणाले की, राज्यात उमरखेड, धिवरवाडी, तळेगाव, इसारवाडी, मासोद या पाच ठिकाणी सीट्रस इस्टेटची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सीट्रस इस्टेट उभारण्याबाबत आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करुन द्यावे. या कामाला गती देऊन कालमर्यादेत हे काम पूर्ण करावे. तसेच इस्राईल येथील शेती अभ्यासदौऱ्याचे नियोजन करावे. बदलत्या वातावरणाचा फळपिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे फळगळतीचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.


             बांबू लागवडीसंदर्भात कृषी व वनविभागाचे वेगवेगळे निकष आहेत. त्याचे सुसूत्रीकरण करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. भुमरे यांनी दिल्या.


            भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2022 -23 व 2023 -24 प्रगतीचा अहवाल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाची प्रगती, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, समूह फळ पीक विकास कार्यक्रम, राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत करण्यात आलेली कार्यवाही अशा विविध योजनांचा मंत्री श्री. भुमरे यांनी आढावा घेतला.


0


 


 


 

कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी 524 कोटींचा आराखडा तत्काळ सादर करावा

 कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकतावाढवण्यासाठी 524 कोटींचा आराखडा तत्काळ सादर करावा


- कृषीमंत्री धनंजय मुंडे

          मुंबई दि. २९ : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


          राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन 2022-23 ते सन 2024-25 या तीन वर्षांच्या कालावधीत 1 हजार कोटींची विशेष कृती योजना राबवण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीस कृषी आयुक्त सुनील चव्हाण संचालक विकास पाटील, कसबे डिग्रज, सांगली येथील सोयाबीन पैदास संशोधन केंद्राचे डॉ. मिलिंद देशमुख, जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दीपक दहात, कृषी उपसंचालक शिवकुमार सदाफुले, डॉ. भरत वाघमोडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.


          या योजनेअंतर्गत पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणी, बियाणे साखळी बळकटीकरण तसेच मूल्य साखळी विकास या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये भुईमूग, करडई, जवस, तीळ, मोहरी, सूर्यफूल, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे समूह तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, कार्यशाळा घेणे, विद्यापीठस्तरावरील संशोधन व बियाणे साखळी बळकटीकरण व आदर्श प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करणे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून बळकटीकरण करणे, त्यासाठी पायाभूत सुविधा पुरविणे बीज प्रक्रिया युनिट निर्माण करणे, शेतकरी उत्पादक गट/कंपन्यांना ड्रोन खरेदी व ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान/ अर्थसहाय्य देणे, शेतकऱ्यांच्या बांधांवर जैविक निविष्ठा निर्मिती करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना कमोडिटी मार्केटशी जोडण्याकरिता अर्थसहाय्य अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.


          कापूस सोयाबीन आणि इतर गळित धान्य उत्पादनात आघाडीवर असलेले जिल्हे निवडून त्या जिल्ह्यांमध्ये हे सर्व कार्यक्रम युद्ध पातळीने राबवावेत. तसेच या कार्यक्रमांवर खर्च करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 524.19 कोटी इतक्या निधीचा आराखडा तत्काळ सादर करावा, असेही कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.


0000


दत्तात्र

य कोकरे/विसंअ/ 


अशासकीय बालगृह, बालकाश्रमातील कर्मचाऱ्यांनानिश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार

 अशासकीय बालगृहबालकाश्रमातील कर्मचाऱ्यांनानिश्चित मानधन देण्याबाबत समिती नेमणार

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 29 : अशासकीय बालगृहबालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार राजेश राठोडमहिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादवमहिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरेउपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

              मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या बालगृहाप्रमाणे राज्यात असलेली  अशासकीय बालगृहबालकाश्रमात काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना इतर सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधनाबाबत तसेच बांधकामाचे क्षेत्रफळ तीनपट वाढीव मिळावे या आश्वासनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/


 


Maharashtra Governor felicitates 11 Rural Entrepreneurs at Raj Bhavan

 Maharashtra Governor felicitates 11 Rural Entrepreneurs at Raj Bhavan

      Maharashtra Governor Ramesh Bais presented the 'Gramodyog Bharari Samman Puraskar' to rural entrepreneurs from Maharashtra at Raj Bhavan Mumbai. The awards instituted by the Maharashtra State Khadi and Village Industries Board in association with the 'Meghashrey Foundation' were presented to 11 rural entrepreneurs who provided employment to many others. The Governor released the publication 'Gramodyog' on the occasion.


      Minister of Industries Uday Samant, Chairman of Maharashtra State Khadi and Village Industries Board Ravindra Sathe, Principal Secretary Industries Dr. Harshdeep Kamble, CEO of MSKVIB R Vimala, Dy CEO Bipin Jagtap, Founder of 'Meghashrey Foundation' Seema Singh and others were pres

ent.


खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्ता व प्रमाणीकरणावर लक्ष्य द्यावे

 खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्ता व प्रमाणीकरणावर लक्ष्य द्यावे


- राज्यपाल रमेश बैस


राज्यपालांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग मंडळाचे 'ग्रामोद्योग भरारी सन्मान' प्रदान

L

            मुंबई, दि. 29 : खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना आज चांगली मागणी आहे. या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. ग्रामविकासातून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगताना खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्तेवर तसेच प्रमाणिकरणावर विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.


            राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते राज्यातील ११ ग्रामीण उद्योजकांना 'ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार' राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.


            महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच 'मेघाश्रेय फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.


            खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रोत्साहनाने सातारा जिल्ह्यात 'मधाचे गाव' विकसित केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करुन राज्यात मधुमक्षी पालनाला चालना देऊन अधिक मधाची गावे निर्माण करावीत, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चांगल्या फुलांची शेती केली, तर त्यातून चांगले मध मिळेल व चांगले मध मिळाले, तर त्याला चांगले मूल्य मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.


            खादीवर आधारित स्टार्टअप सुरु करावे, मुंबई येथे खादीवर आधारित 'फॅशन शो' चे आयोजन करावे, खादी ग्रामोद्योग उत्पादनांसाठी ई - व्यासपीठ सुरु करावे, तसेच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा.


            खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. तसेच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती योजना आखावी, अशी सूचना त्यांनी मंडळाला केली. 


            आपल्या वाटचालीत खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मोठे योगदान आहे. आपण सलग तीन वर्षे खादी यात्रा काढली व खादीचा प्रचार प्रसार केला, अशी आठवण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव असले पाहिजे. त्यातून रोजगार निर्माण होतील, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढील वर्षीपासून आपले स्वतंत्र पुरस्कार सुरु करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.


            खादी हा देशाचा आत्मा आहे. खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी 'हर घर खादी' या उपक्रमाची सुरुवात करीत असून प्रत्येकाने किमान एक तरी खादीची वस्तू घेतली, तर लोकांना रोजगार मिळेल, असे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.


            खादी म्हणजे केवळ खादीचे वस्त्र नसून, ग्रामोद्योगातून तयार झालेल्या साबणापासून शाम्पू तेल व चपलेपर्यंत खादीची व्याप्ती आहे, असे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळ सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे व त्यातून लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे असे त्यांनी सांगितले.    


            राज्यपालांच्या हस्ते यावेळी उद्योजक एकनाथ जाधव (यवतमाळ), अशोक साळवी (रत्नागिरी), अक्षय कोळप (सांगली), बाळोजी माळी (उस्मानाबाद), क्षमा धुरी (सावंतवाडी), अशोक गडे (जळगाव), हर्षदा वाहने (भंडारा), जितेंद्र परदेशी, मंगेश चिवटे, सिद्धेश चौधरी व जितेंद्र हरियान यांचा 'ग्रामोद्योग भरारी पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला.


            राज्यपालांच्या हस्ते यावेळी मंडळाच्या 'ग्रामोद्योग' मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.


            कार्यक्रमाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, 'मेघाश्रेय फाउंडेशन'च्या अध्यक्षा सीमा सिंह प्रामु

ख्याने उपस्थित होते.


००००


लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला

 ⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫


*डॉ.अभिधा धुमटकर..*

लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या डॉ. धुमटकर या साठ्ये कॉलजमधील इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत..!*

*कोकणी, मराठी या घरच्याच भाषांखेरीज संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली,उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक ह्या भाषांचा सुद्धा दांडगा अभ्यास असणाऱ्या अभिधा यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेऊया ’लक्षवेधी’ या सदरातून...,*

*"अभिधा" शब्दाचा अर्थ धारण करणारी पहिली शक्ती..!*

*ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच वेगळेपणा जपणारी 'अभिधा धुमटकर' हिची.!*

*अभिधा आपल्या पार्ल्यातल्या... शालेय शिक्षण प्रार्थना समाज शाळेत घेतल्यानंतर तिने पार्ले कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली.!*

*पुढे पी.एच.डी.पर्यंत मजल मारली.!*

*सध्या साठ्ये कॉलेजमध्ये इतिहास या विषयाची ती हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत.!*

*ही सगळी कथा तुमच्यासमोर मांडायचं कारण, ती हे सुंदर जग पाहू शकत नाही.!*

*ती जन्मतःच दृष्टीहीन आहे.!*

*या सगळ्यावर मात करुन आज ह्या पदापर्यंत तिची वाटचाल कशी झाली त्याचीच ही लक्षवेधी कहाणी.!*

*अभिधा आणि तिच्या मावसबहिणी मध्ये अवघ्या 17 दिवसांचा फरक.!*

*ती हाक मारल्यानंतर आवाजाच्या दिशेने पहायची.!*

*ही मात्र डोळे फिरवायची.!*

*त्यावरुन आईने डॉक्टरांना हे सांगितले. तपासल्यावर कळलं की हिला अजिबात दिसत नाही.!*

*खरी कहाणी इथूनच सुरू होते.!*

*या कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता तिच्या आईने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे.!*

*त्यांनी अभिधाच्या बाबतीत घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे तिला अंधशाळेमध्ये न घालता सर्वसामान्य शाळेत घातलं.!*

*त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना समाजात वावरायचं असल्याने सर्वसामान्य शाळेतच त्यांची प्रगती होणार हे आईला पक्कं ठाऊक होतं.!*

*बऱ्याच शाळेतून त्यांना प्रवेशासाठी नकारघंटा येत होती.!*

*एका प्रख्यात शाळेतला अनुभव तर मानसिक खच्चीकरण करणारा होता.!*

*मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला दिली होती.!*

*पण ह्या अनुभवाच्या पाठोपाठच जगात चांगली माणसं असतात ह्याचासुद्धा त्यांना प्रत्यय आला.!*

*बोरीवलीच्या सुविद्यालयाने तिला आपल्यात सामावून घेतले.! प्रवेश तर मिळाला पण प्रत्येक टप्प्यावर मात्र खूप संघर्ष होताच.!*

*जिद्दी असलेली अभिधा होमवर्क लिहिण्यासाठी हट्ट करायची.! 'कमळ' शब्द लिहिताना आईला खोडरबर घेऊन स्वतः लिहिलेली एकावर एक येणारी अक्षरे खोडून पुन्हा पुन्हा नीट येईतो न थकणाऱ्या 4 वर्षाच्या अभिधाची चिकाटी पाहून थक्क व्हायला होते..! शांत डोक्याने विचार करुन, कल्पकतेने तिच्या आईने पोळपाट घेऊन गोलाची संकल्पना तिच्यासमोर मांडली आणि लाटणे मध्ये घातल्यावर त्या गोल पोळपाटाचा 'ब' कसा होतो ते सांगितले.! इथूनच त्यांच्यामधल्या शिक्षिकेचा कस लागला.!*

*अभिधा वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ या सगळ्यातच हुशार होती.! आत्मविश्वास तर तिच्यात ठासून भरला होता.! शाळेत खेळाच्या तासाला सरांनी लंगडी खेळू नको, पडशील असं सांगितल्यावर अभिधा निडरपणे म्हणाली, "पडले तरी चालेल सर, माझी आई नाही विचारायला येणार.!*

*पण मला खेळू द्या.!' यात मुख्य प्रश्न होता पेपर लिहिण्याचा.. तिच्या आईने पहिल्यापासूनच रायटर ठेवला होता..!*

*आठवीपासून काही विषय जसं कार्यानुभव, सायन्सचे प्रयोग, गणित हे साध्या शाळेत जमणार नाहीत त्यामुळे शाळेतून काढून टाकण्याचं संकट उभ ठाकलं.! पण आईने त्या सगळ्यातून धैर्याने मार्ग काढत त्याला परतावून लावलं.!*

*अभिधा दहावीला अंधांमधून पहिली आली.! गणितात पैकीच्या पैकी मार्क... आईच्या ह्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं.!*

*नववीत असताना नलिनीताई कर्वे यांनी खूप प्रेमाने रिडिंगच काम केलं.! त्या वाचून दाखवायच्या आणि आई ते सर्व रेकॉर्ड करुन ठेवायची.! नंतर अनेक लोकांनी अतिशय प्रेमाने रिडरचं काम केलं.!*

*अभिधाला पहिल्यापासून भाषेची खूप चांगली समज होती.!*

*संस्कृत,मराठी,इंग्रजी यांचं व्याकरण तर अतिशय उत्तम.!*

*याशिवाय इतिहास शिकवणाऱ्या सिक्वेरा सरांमुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाकडे वळली.! पुढच्या सगळ्या पदव्या तिने इतिहास विषयातच घेतल्या.!*

*1883 सालीसुद्धा विज्ञान प्रदर्शन भरवणारे बाळाजी प्रभाकर मोडक यांची पुस्तकं तिच्या वाचनात आली.!*

*सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांमुळे HISTORY OF SCIENCE IN MAHARASHTRA बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि तिचा पी.एच.डी चा विषय पक्का झाला.!*

*हे सगळं शिकत असताना अभिधाने संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवले.. शिवाय कोकणी, मराठी येतातच. ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित येतात.! एम.ए.,बी.एड.,सेट,नेट पूर्ण झालेलं एम.फील.चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.!*

*पण अंध म्हणून नकार मिळत होते.! ती खूप खचून जायची.!*

*पुढे तिने घरी संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला सुरुवात केली.!*

*नंतर चाटे क्लास मध्ये फ्रेंच शिकवायला सुरुवात केली.!*

*ग्रँटरोडपासून अंधेरीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर जाऊन अभिधा शिकवत असे.!*

*रीडर नसल्यामुळे पी.एच.डी. पूर्ण होईल की नाही ही शंका तिला वाटत होती.! पण गाईड डॉ. मरीयम डोसल आणि प्रो.जे.व्ही.नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे अभिधाला पी.एच.डी. मिळाली.!*

*पुढे 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीसुद्धा मिळाली.! 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी स्वीकारली.!*

*श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी आमंत्रण तसेच लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्ट तर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळणं तिच्या यशात मानाचे तुरे खोचत गेलं.!*

*फेलोशिपसाठी लंडनला जायचं तर इथून रीडर नेण खूपच खर्चिक होणार होतं.! त्यामुळे तिथल्या रीडरची गरज होती.! अगदी जायच्या दिवसापर्यंत रीडरची सोय झाली नव्हती.!*

*पण अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे ते सुकर झालं.!*

*लंडनमधील रीडरना मेल पाठवणं, त्यांची नावं, वेळ एक्सेल शीटमध्ये घालणं, सगळ्यांचा व्हॉट्स App गृप करुन त्यांच्या संपर्कात राहाणं आणि अभिधाच्या बॅग्ज भरुन देण्यापर्यंतची महत्त्वाची कामं तिच्या धाकट्या बहिणीनं समिधाने केली.! सांगायची गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच दृष्टीहीन आहे.!*

*ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते.!*

*सकाळी सगळा स्वयंपाक करुन चर्चगेटला लोकलने जाते. तिचेही कौतुक करावे तितके थोडेच आहे.!*

*दोन दृष्टीहीन मुली पदरात असताना, जोडीदार अकाली सोडून गेला तरीसुद्धा न डगमगता अतिशय हुशारीने, धैर्याने अभिधाच्या आईने ह्या दोन मुलींना समर्थपणे आयुष्यात उभं केलं.! त्यांच्या ह्या जिद्दीला आदरयुक्त प्रणाम.!*

*आभिधाचे 14 रिसर्च पेपर "इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली", "इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ सायन्स", "इंडियन कॉग्रेस हिस्ट्री प्रोसिडिंग", "इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रॉरिकल रिसर्च" अशा नावाजलेल्या पेपरमध्ये आणि संस्थांमध्ये वाचले गेले.!*

*लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती हा मान मिळवणाऱ्या अभिधाला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा..!*

         

*संध्या ओक*

Featured post

Lakshvedhi