Thursday, 10 August 2023

अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा

 अल्पसंख्याक विकास आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव तयार करावा

- मंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, दि. ९ : अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या योजना अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अल्पसंख्याक विकास आयुक्तालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करावा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.


            आज मंत्रालयात मंत्री श्री. सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विकास विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव मो.बा. ताशिलदार उपस्थित होते.


                मंत्री श्री. सत्तार म्हणाले, अल्पसंख्याक समाज विकास योजनांसाठी असणारा निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व विभागातील रिक्त जागा भरण्यासंदर्भात आढावा घेवून पदे तत्काळ भरण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश संबंधितांना मंत्री श्री. सत्तार यांनी दिले.

शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय

 शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी

६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय


- मंत्री हसन मुश्रीफ


            मुंबई, दि. ९ : कोल्हापूरच्या शेंडा पार्क येथील ११०० खाटा रुग्णालयाऐवजी ६०० खाटांचे सामान्य रुग्णालय तर २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.


            छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थेतील विविध सुविधांच्या उपाययोजना करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.


            यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, शिक्षण व औषध द्रव्य विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची प्रमुख उपस्थिती होती.


            छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर रुग्णालयातील इमारतींना रंगकाम, रस्ते दुरुस्ती, खिडक्या दुरुस्ती, दरवाजे दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती इत्यादी कामे करण्यासाठी 48.45 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन ती कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या


            वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील ऑडिटोरियम हॉलमधील नूतनीकरण करण्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली असून ऑडिटोरियम हॉलमध्ये आवश्यक कामे करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्याही सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या.


0000


  राजू धोत्रे

मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर आता दररोज शिवविचारांचा जागर

 मंत्रालयीन सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर

आता दररोज शिवविचारांचा जागर


            मुंबई, दि. ९ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे स्मरण करणारी २ ते ३ मिनिटांची उद्घोषणा वर्षभरासाठी मंत्रालयात कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आज या उद्घोषणा प्रणालीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.


            मंत्रालय हा प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. मंत्रालयातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी विविध उद्घोषणा सतत होत असतात. मात्र, याच सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन आता दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.


            छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, विचार, पराक्रमाची माहिती व्हावी, दररोज मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी –कर्मचारी यांना या शिवरायांच्या विचारातून उर्जा, चैतन्य, स्फूर्ती मिळावी, दिवसाची सुरुवात चैतन्याने व्हावी, अशी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांची संकल्पना होती. त्यांच्या या संकल्पनेस मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्रालयाच्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवरुन या शिवविचारांच्या जागरास सुरुवात झाली.


            गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


००००

Aushyaman Bharat card आजच काढा

 आपापल्या गावातील गृपवर टाका.म्हणजे सर्व कुटुंबांना कळेल.व त्यांनी गावातील आशा सेविकांना भेटुन कार्ड विषयी माहिती घ्या.व लवकरात लवकर कार्ड तयार करून घेण्यास सांगा.


रून घेण्य

 शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारण्याचाप्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

-  पणन मंत्री अब्दुल सत्तार

 

            मुंबई, दि. ९ : शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारची अनिश्चितता असते. डोंगराळ व शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये शेतकरी हितासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

            कृषी प्रक्रिया सहकारी संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येणारे भाग भांडवल कर्ज व शासकीय भाग भांडवल याबाबत पणन विभागामार्फत राज्यातील संस्थांना विशेष अर्थसहाय्य योजना राबविणे आणि योजनेचे स्वरूप निश्चित करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

            यावेळी वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. महाजन, पणन विभागाचे उपसचिव सुग्रीव धपाटेपणन मंडळाचे संजय कदमपणन मंडळाचे सहसंचालक मधुकांत गरड संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. सत्तार म्हणालेशेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे. शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर शेतमालाला अधिक दर मिळण्यास मदत होईल. शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वंकष प्रस्ताव तयार करावाअशा सूचना पणन महामंडळाला या बैठकीत  दिल्या.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा

 अमृत महोत्सव सांगतेनिमित्त राज्यपालांची पंचप्रण प्रतिज्ञा

 

            मुंबईदि. ९ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  पंचप्रण’ प्रतिज्ञा दिली. 

            सन 2047 पर्यंत देशाला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची व गुलामगिरीची मानसिकता दूर करण्याचीदेशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याचीदेशाची एकता मजबूत राखण्याची तसेच नागरिक म्हणून आपले कर्तव्यपालन करण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी  यावेळी सर्व उपस्थितांना दिली.

0000

 

Maharashtra Governor gives Panch Pran Pledge to

Raj Bhavan staff, officers

 

 

            Mumbai, 9th Aug : Maharashtra Governor Ramesh Bais gave the 'Panch Pran' Pledge to the officers and staff of Raj Bhavan Mumbai as part of the nation wide “Meri Mati Mera Desh” Campaign today.

            The Governor gave the Panch Pran Pledge wherein all those present resolved to make India a developed nation by 2047, eliminate the mentality of slavery, take pride of India's rich heritage, uphold unity and solidarity, fulfil duties as citizens, and respect those who protect the nation. 

            The Campaign is the concluding event of the 'Azadi ka Amrit Mahotsav,' which began on 12th March , 2021.

0000

 


रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

 रायगड जिल्ह्यातील बस स्थानकांमधील विकासकामे सुरू करा

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

 

            मुंबईदि. 9 रायगड जिल्ह्यातील तळेश्रीवर्धनरोहामांडगांवम्हसाळा आदी बस स्थानकांमध्ये रस्त्यांचीइमारतींची कामे करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यामधील बस स्थानकांमधील रस्त्यांचे क्राँक्रीटीकरण व इमारतींच्या कामांसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून  निधीची तरतूद करता येईल, असे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज सांगितले.

              यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. बैठकीला राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. बामणेमध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक श्री. चवरेविभाग नियंत्रक दिपक गोडे आदी उपस्थित होते.

             मंत्री कु. तटकरे पुढे म्हणाल्या कीगोवा महामार्गावर पेणजवळ एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी जागा दिलेल्या हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय होत नाही. त्यामुळे पेणजवळील अशा हॉटेल्सवर एसटी डेपोनिहाय गाड्यांचे नियोजन करावे. जेणकरून हॉटेल व्यावसायिकांना उत्पन्न मिळून महामंडळालासुद्धा उत्पन्न येईल. त्यानुसार एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल व्यावसायिकांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावाअशाही सूचना त्यांनी दिल्या.  यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi