Wednesday, 2 August 2023

हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

 *हाडांच्या विकासाकरिता नाचणीचे फायदे*

*वजन कमी करण्यासाठी. नाचणी उपयुक्त*




रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी

लहान मुलांसाठी उपयुक्त.

त्वचेसाठी ठरते फायदेशीर

स्तनपानासाठी अधिक उपयुक्त

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जाणेही गरजेचे आहे. धान्याचे सेवन आपल्याला पोषण देण्यासह अनेक आजारांपासून आपले रक्षण करे. जेव्हा आपण धान्याचे नाव घेतो, तेव्हा नाचणी आणि नाचणीचे सत्व आपण नक्कीच महत्त्वाचे मानतो. नाचणीचे फायदे अनेक आहेत. नाचणीचे शरीरासाठी विविध फायदे होतात. हेच फायदे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रागी अर्थात नाचणी म्हणजे काय हे जाणणे महत्त्वाचे आहे. रागी अर्थात नाचणी हे भारतासह आफ्रिकेच्याही विविध भागात उगवणारे एक धान्य आहे. भारतात कर्नाटक राज्यात याचे सर्वाधिक उत्पादन होते. यामध्ये अनेक पोषक तत्वे आपल्याला आढळतात. फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, जिंक, लोह आणि कॅल्शियम ही शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे रागी अर्थात नाचणीमधून शरीराला मिळतात.


 प्रमोद पाठक.


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*



_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/L5vopHeBNMLCK3kdueJtyT

अल्सर... पोटातले व्रणः*

 *अल्सर... पोटातले व्रणः*



 अतिचिंता, खुप मसालेदार जेवण, अतिशोक, जागरण, जेवण वेळेवर न घेणे, चमचमित आहार घेणे. या गोष्टि वारंवार होत राहिल्यास कि मग आधि आम्लपित्त व त्याचि विक्रुत अवस्था म्हणजेच... अल्सर...

 उपायः

१) सकाळि कोकम सरबत घ्या. नाश्यात साळिच्या लाह्या दूधात कालवून खा. नंतर दोन चमचे मध नुसतेच खा. कारण हे अल्सरचे जंतू नष्ट करतात.

२) ज्येष्ठमध चूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून सकाळि एक कप भात शिजवून त्यासोबत खावे. अल्सर वेगाने बरा होतो.

३) मेथिचे दाणे भिजवून नंतर उकळवा. व थोडे मध मिसळून खा.

४) शहाळ्याचे पाणि दिवसातून दोनदा घ्या. ओले खोबरे खा.

५) केळ हे एक उत्तम अल्सर लवकर बरे करण्याचे फळ आहे. दोनदा खावे दिवसातून.

६) पानकोबित लँक्टिक अँसिड असते. ज्यामूळे अमिनो अँसिड बनून पोटाला कवच मिळतं व अल्सर होत नाही. थोडि पानकोबि व गाजर याचा रस एकत्रित करून सकाळि घ्यावा. व रात्रि झोपण्याच्या आधि घ्यावा.

७) रोज जेवणानंतर दाडिमावलेह

 दोन चमचे, कामदूधा वटी, प्रवाळ पंचाम्रुत घ्यावे. रोज एक मोठा चमचा भरून गुलकंद खावा.

८) मुख्य म्हणजे आंबट, खारट, विशेषतः चिंच, टोमँटो, अननस टाळा.

 आंबवलेले पदार्थ. इडलि, दोसा, ढोकळा, दहि, खाउ नका.

  यासर्व उपायाने व पथ्याने अल्सरचा त्रास होणार नाही....



*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




Tuesday, 1 August 2023

भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात

 


कांदिवली पूर्व विधानसभेत लोखंडवाला येथे भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या अण्णा भाऊ साठे भित्ती शिल्पाचे उदघाटन मंगळवारी आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


लोखंडवाला येथील अण्णा भाऊ साठे उद्यानात हे भित्ती शिल्प उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या लोकसांसाठी झगडण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हि व्यक्तिमत्वे आमच्यासाठी राजकारणाचे विषय नाहीत. ही व्यक्तिमत्वेच इतकी मोठी आहेत कि त्यांनी समाजाला, देशाला नाही तर उभ्या जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार भातखळकर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले

.


सोपी भाषेत गणित शिकवा मुलाना



सोपी भाषेत गणित 

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तविधानभवनात आदरांजली


            मुंबई, दि. 1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.


            याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, सह सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, उप सभापती यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, सुरेश मोगल व संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


00000

काय पण वेळ आली


 आणखी काय मोटिवेशन हवंय तुम्हाला श्रावण पाळण्यासाठी? 😱😃🫣.....✌️

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


            पुणे दि-1: लोकशाहीर अणणाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


               यावेळी आमदार सुनील कांबळे, पुणे जिल्हा मातंग संघाचे अध्यक्ष भीमराव साठे, सहदेव ढवरे आदी उपस्थित होते.


              यावेळी पुणे जिल्हा मातंग समाज व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णभाऊ साठे जयंती समितीच्यावतीने आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या दुर्मिळ चित्र प्रदर्शनास भेट दिली. जिल्हा मातंग संघाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.


            तत्पूर्वी शासकीय विश्रामगृह येथेही मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


0000

Featured post

Lakshvedhi