Friday, 28 July 2023

सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्रासाठीशासन सकारत्मक निर्णय घेईल

 सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्रासाठीशासन सकारत्मक निर्णय घेईल


- कृषीमंत्री धनंजय मुंडे


            मुंबई, दि. 27 : राज्यात सद्य:स्थितीत जळगाव व नांदेड येथे केळी संशोधन केंद्र अस्तित्वात आहे. केळी विकास महामंडळाच्या येणाऱ्या धोरणात सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी संशोधन करण्यासाठी कृषी विभाग सकारात्मक निर्णय घेईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


                मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेलगाव येथील कोरडवाहू संशोधन केंद्राची जागा केळी संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. या जागेवर १९४१ मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कोरडवाहू संशोधन केंद्राची स्थापना झाली आहे. त्यामुळे ती जागा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी केळी संशोधन करता येईल का, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय शिंदे, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.


****

भविष्यनिर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध

 भविष्यनिर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध


मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचा-यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक विवरण महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. पोर्टलवरील https://sevaarth.mahakosh.gov.in ह्या लिंक वर उपलब्ध मार्गदर्शिका पुस्तिकेत कर्मचारी त्यांचे वार्षिक विवरण पाहू शकतात, व प्रिंट करु शकतात.


लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.) नागपूर कार्यालयामधे भविष्यनिर्वाह निधी लेखे ठेवलेल्या कर्मचा-यांनी सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी काही मुद्द्यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे नोंद न झालेले क्रेडिट व अग्रिमांचे समायोजन करणे शक्य होईल.


            महाराष्ट्र शासनाच्या १७ मे २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे मोबाइल क्रमांक महालेखाकार, नागपूर या कार्यालयात नोंदणीकृत करुन घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्व कर्मचारी यांना प्रत्येक महिन्यात त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यामधे जमा अभिदान तसेच त्यांना दिलेल्या अग्रीम राशी व भविष्यनिर्वाह निधी अंतिम आहरणच्या आवेदनाची प्राप्ती तसेच त्याच्या प्राधिकृत होण्यासंबंधीचा संदेश पाठवता येऊ शकेल. अद्याप मोबाईल क्रमांक नोंदणीकृत न करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक fm.mh2.ae@cag.gov.in ह्या ई-मेलवर किंवा पत्राद्वारे अधिकारी यांना पूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठवावा असे आवाहन प्रधान महालेखाकार, नागपूर यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून करण्यात आले आहे.


सर्व कर्मचाऱ्यांनी नाव व जन्म तारीख भविष्यनिर्वाह निधी विवरण पत्र तसेच सेवार्थ प्रणालीत तपासून घ्यावे. तफावत असल्यास नाव व जन्म तारीख सेवार्थ प्रणालीमधे सुधारित करून संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचेमार्फत अचूक नाव व जन्मतारीख कर्मचाऱ्याच्या सेवार्थ आयडीसहgpftakrarngp@gmail.com वर ईमेल करावा किंवा फॅक्स क्रमांक 0712- 2560484 वर सूचित करावे.


भविष्य निर्वाह निधी अनुसूचीमध्ये अभिदात्याचे लेखा क्रमांक, विभागाशी संबंधित सिरीज, पूर्ण नाव बरोबर असल्याची खात्री करावी. मासिक अभिदानाची राशी किंवा घेतलेले अग्रीमची भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातून कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांक, अनुसूची, प्रमाणकाची राशी अनुसूचीच्या प्रती बरोबर पाठवावी.  

सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या अनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार

 सन २००१ पूर्वीच्या कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्याअनुदानाबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


            मुंबई, दि. 27 : नक्षलग्रस्त भागातील उर्वरित महिला महाविद्यालय तसेच अल्पसंख्यांक, भूकंपग्रस्त, आदिवासी, डोंगराळ, सीमावर्ती भागातील महाविद्यालयांना सन २००१ पूर्वी कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आलेल्या कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, विद्या शाखा यांना अनुदान मंजूर करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य राजेश टोपे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2001 पूर्वीच्या 78 महाविद्यालयाबाबत सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला होता. त्यात काही त्रुटी आहेत असे वित्त विभागाने कळविले आहे. या त्रुटींची विभागाकडून तातडीने पूर्तता करून वित्त मंत्री यांच्याशी चर्चा करून या महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


            नक्षलग्रस्त भागातील पात्र 14 महिला महाविद्यालयांना विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अकृषी विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयातील ज्या तालुक्यात एकही अनुदानित महाविद्यालय अथवा विद्या शाखा नाही, अशा प्रत्येक तालुक्यामध्ये एका महाविद्यालयास किंवा विद्याशाखेस 100 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.


००००


काशीबाई थोरात/विसंअ/

जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*

 *जिरे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे.*


जिऱ्यामध्ये अँटी 🛡️ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील🧍🏻‍♂️ विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात. याशिवाय जिऱ्यामध्ये अनेक व्हिटॅमीन्स असतात. जाणून घेऊया जिरं खाण्याचे फायदे.


*त्वचेसाठी*

जिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी 💧 रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॕक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं 🫳🏻 कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन पासूनही रक्षण होतं. त्याशिवाय जिऱ्याचा उपयोग हा सोरायसिस 🦠 आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठीही केला जातो. तुम्ही हवं असल्यास जिरा पावडरच्या वापर फेसपॅकमध्येही घालूनही करू शकता.


*केसांसाठी* 

त्वचेला सुंदर 👌🏻 करण्यासाठी जसे जिऱ्याचे फायदे आहेत. तसंच केसांसाठीही आहेत. केसांसाठी बाजारात जिऱ्याचाच वेगळा प्रकार असलेलं काळ जिरं मिळतं. या जिऱ्याचं तेल केसांना लावल्यास केस गळणं कमी होतं. रोज काळ्या जिऱ्याचं सेवन केल्यास केस दाट, काळे आणि मजबूत 💪 होतात. याशिवाय ज्यांना कोड्यांची समस्या असेल त्यांच्यासाठीही काळं जिरं फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी तेलासोबत जिरं गरम करून घ्या. या कोमट ♨️ तेलाने केसांना मसाज करा. 2 ते 3 वेळा हे तेल लावल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होईल.


*ताप*

तापामुळे जेव्हा शरीर दूखू 😣 लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ 🍮 मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा ❄️ अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.


*सर्दी*

थंडीच्या दिवसात नाक 👃🏻बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून 🔥 घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका 🤧 येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल.


*पोटदुखी*

पोटात कधीही दुखू 😖 शकतं. जेव्हा पोटात असह्य दुखत असेल तेव्हा एकदा हा घरगुती उपाय नक्की करून पाहा. पोटात जेव्हा दुखेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात 🥄मिक्स करा. हे मिश्रण चावून चावून खा. चावल्यामुळे जिऱ्यातून जो रस निघतो, त्या रसाने लगेच फायदा होतो.       



*सांधेदुखी*

मेथी, ओवा, जिर आणि बडीशोप सम प्रमाणात मिसळून वाटून घ्या. हे मिश्रण एक चमचा 🥄 रोज खाल्ल्याने डायबिटीज, सांधेदुखी आणि पोटाचे विकार होत नाहीत. तसंच गॅसची 💨 समस्येवरही याचा फायदा होतो.


*कॉलेस्ट्रॉल*

आजकाल कॉलेस्ट्रॉल वाढल्याचा 📈 त्रास बऱ्याच जणांना होतो. बरेच जणांच्या खाण्यापिण्यावर यामुळे मर्यादा येतात. जिऱ्याचं सेवन 🤌🏻 केल्यास तुमच्या कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते.


( *संकलन:* आर्या देव) 

🤗 *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.*)


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देश' अभीयान राबविण्यात येणार

 09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देशअभीयान राबविण्यात येणार

 

            नवी दिल्ली दि. 27 : 'आझादी का अमृत महोत्सव' 'मेरी माटी मेरा देशचा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदनशिलाफलकम (स्मारक) यांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

            ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली अलीकडेच बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

            युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत करण्यात येणार असून देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. वसुधा वंदन’ कार्यक्रमाची दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत.

            ग्रामविकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी 'वसुधा वंदनआणि 'शिलाफलकम'चे महत्त्व सांगतप्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वीमातेचे संवर्धन करतील. तसेच 'वसुधा वंदनकार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळाग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल.

            देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

0000

पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ

 पनवेलमधील वीज वाहिन्या भूमिगतकरण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 27 : समुद्रकिनार पट्टीजवळील शहरांच्या विद्युत वाहिन्यांबाबत जागतिक बँकेच्या मदतीने एक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यात 'ओव्हरहेड वायर्स' भूमीगत करण्यात येणार आहेत यामध्ये पनवेल शहराचाही समावेश करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


             सदस्य प्रशांत ठाकूर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पनवेल शहर विभागाअंतर्गत पनवेल शहराच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या उच्च व लघुदाब वाहिन्यांपैकी संयुक्तिक वाहिन्यांचा एकूण लांबी 7.55 किलोमीटर असून त्यापैकी 0.5 कि. मी. चे विलगीकरण करण्यात आले असून उर्वरित 7.05 किलोमीटरचे विलगीकरण क्षेत्र (RDSS) योजनेअंतर्गत समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. या शहराचे झपाट्याने वाढणारे नागरिकरण लक्षात घेऊन कालबद्ध पद्धतीने हे काम पूर्ण करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मित्र असावा तर असा


 

Featured post

Lakshvedhi