Thursday, 27 July 2023

गौण खनिजांबाबत लवकरच धोरण

 गौण खनिजांबाबत लवकरच धोरण


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


                  मुंबई, दि. 27 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


                 सदस्य महेश बालदी यांनी पनवेल - उरण तालुक्यात झिरो रॉयल्टी पासेसचा गैरवापर करून गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाईबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.


                मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येईल. याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. अधिवेशन संपल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व सिडकोचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल.


              यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्सया आजारांचा समावेश करणार

 महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्सया आजारांचा समावेश करणार


- सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत


            मुंबई, दि. 27 : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.


            सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येईल असेही मंत्री श्री.सावंत यांनी सांगितले.


*****


शैलजा पाटील/विसंअ/

पिलीव येथील यात्रेसाठी योग्य नियोजन करण्याचे

 पिलीव येथील यात्रेसाठी योग्य नियोजन करण्याचेसोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 27 : “माळशिरस परिसरातील पिलीव येथे महालक्ष्मी यात्रा दरवर्षी भरते. यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देण्यात येतील”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.


             पिलीव येथील महालक्ष्मी देवस्थान येथे दरवर्षी भरणाऱ्यात येणाऱ्या यात्रेत मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना सदस्य राम सातपुते यांनी मांडली होती. 


            मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच देवस्थानच्या जमिनीसंदर्भात माहिती घेऊन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.


*****

आईच्या स्तनात दूध येण्यासाठी ,दूध वाढण्यासाठी.*

 *आईच्या स्तनात दूध येण्यासाठी ,दूध वाढण्यासाठी.*


१)गुळवेलीच्या मुळ्यांचा काढा घेणे.

२)भाजलेले जीरे व खडीसाखर एक एक चमचा घेणे दूधा बरोबर

३)रोज नियमितपणे पपई खाणे.

४)तिळ रोज कुटून साफ करून दोन वेळा दोन चमचे घेणे दुधाबरोबर.

५)स्तनांना हलकेच एरंडेल तेलाची माँलीश करणे रोज पण बाळास दुध पाजण्यापुर्वी साफ करणे ओल्या फडक्याने.

६)रोज बीट खाणे

७)कडुलिंबाच्या झाडाची साल कुटून काढा महीनाभर घेणे

८)उस अथवा उसाचा रस घेणे

९)गाजराचा रस रोज पिणे

१०)रोज कांदा, लसूण आहारात घेणे अथवा एक एक चमचा रस मधात घेणे.


होमिओपॅथी-

१)आर्टीका युरेन्स मुलार्क(मदर टिंचर)चे दहा थेंब दिवसात तीन वेळा पाव कप पाण्यात हे होमिओपॅथी दुकानात मिळेल.

वरील उपाययोजना मुळे आईच्या स्तनात दूध निर्मिती होऊन बाळाची दुधाची गरज पुर्ण होते.


वैद्य गजानन


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




अनाथ बालकांच्या मनातशासन आपले पालक असल्याची भावना निर्माण करणार

 अनाथ बालकांच्या मनातशासन आपले पालक असल्याची भावना निर्माण कर            - महिला व बालविकास मंत्री अदिती तटकर

            मुंबई, दि. 27 : अनाथालयामधून बाहेर पडल्यानंतर अनाथ बालकांचे चांगले संगोपन व्हावे यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. या अनुषंगाने त्यांच्या मनात शासन आपले पालक असल्याची भावना निर्माण करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले.

       सदस्य श्रीकांत भारतीय यांनी अनाथ बालकांना 18 वर्षे वयानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्यासाठी शासनाच्या धोरणाबाबत नियम 97 अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्रीमती तटकरे यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

            श्रीमती तटकरे म्हणाल्या की, अनाथ बालकांसाठी वयाच्या 18 व्या वर्षानंतर अनाथालयातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय ? हा अतिशय संवेदनशील विषय आहे. या मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून एकूण प्राप्त 6391 अर्जांमधील 5574 मुलांना अनाथ प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. उर्वरित प्रमाणपत्रे येत्या दोन महिन्यात देण्यात येतील. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी बाल न्याय निधीमधून खर्च करण्यात येतो. त्यांच्यासाठी नोकरीत एक टक्का आरक्षण ठेवण्यात आले असून 96 जणांचा नोकरीत समावेश करून घेण्यात येत आहे. 500 मुलांना पिवळी शिधापत्रिका देण्यात आली असून त्यांना महात्मा फुले आरोग्य सुविधेचा लाभ मिळू शकणार आहे. अनाथ मुलांसाठी सात अनुरक्षणगृहे असून यातील एक मुलींसाठी आहे. यांची क्षमता 650 असून त्यापैकी 450 जागा रिक्त आहेत. अनाथालयात बालकांचे समुपदेशन करण्यात येते. त्याचप्रमाणे 18 वर्ष वयानंतर देखील त्यांना मोफत समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.




       या विषयाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी याबाबत सूचना केल्या. कौशल्य विकास, रोजगार, उच्च शिक्षण, सामाजिक न्याय या विभागांसमवेत बैठक आयोजित करून महिला व बालविकास विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. सहा विभागीयस्तरावर देखील बैठका आयोजित करून त्या भागातील मुलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात माहेर केंद्र उभारावे, असेही त्यांनी सांगितले.




       या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, ॲड.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.




00000






 

गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिका यांना डिजीटल पद्धतीने जोडणार

 गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी

महारेरा आणि महापालिका यांना डिजीटल पद्धतीने जोडणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 27 : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तरादरम्यान दिली.


            सदस्य संजय पोतनीस यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, काही जणांकडून चुकीची अथवा खोटी कागदपत्रे दाखल करुन तसेच गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित शासकीय यंत्रणांची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करुन नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. याशिवाय, बांधकाम क्षेत्रातील काही जणांकडून महारेरा प्रमाणित असे सांगून गृहप्रकल्पाच्या जाहिराती केल्या जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गृहप्रकल्प हा मान्यताप्राप्त असल्याची खात्री करुनच घर खरेदीचा निर्णय घ्यावा, असेही सांगितले.


            महारेरा आणि मुंबई महानगरपालिका सध्या डिजीटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुणे, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथेही अशा प्रकारे डिजीटली जोडले जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.


            दरम्यान, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत बनावट बांधकाम परवानगी घेऊन महारेराचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र जोडून सदनिकांची विक्री करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. या महापालिका हद्दीत 655 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले होते.


            गृहविभागाच्या मार्फत हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे दिले असून या एका गुन्ह्यात 42 तर अन्य गुन्ह्यात 66 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री श्री. सावे यांनी दिली.


            सदस्य अजय चौधरी, अतुल भातखळकर, डॉ. जितेंद्र आव्हाड, रवींद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभू, लहू कानडे आदींनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला. 


0000

भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*

 *भारतीय वारसा आणि वैज्ञानिक श्रद्धास्थाने.*


भारतीय संस्कृती आणि परंपरा समजून घेत असताना, त्यात नकळत वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता, यावर असलेले हे चिंतन मला आवडले. 

आपल्या साठी पाठवत आहे.


१) *गोमय* (सारवणे): पूर्वीच्या काळी घराच्या भिंती आतून व बाहेरून ह्या गाईच्या शेणाने सारावल्या जायच्या कारण गाईचे शेण हे प्रतिजैविक तसेच खनिजे युक्त असल्यामुळे वेगवेगळ्या आजारांपासून आणि आजार पसरवणाऱ्या जिवाणू पासून प्रतिबंध करतो.


२) *गाभारा*: हिंदू मंदिरांची स्थापना वैज्ञानिक दृष्ट्या झाली आहे. मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते त्या भागाला “गाभारा” म्हटले जाते. हा गाभारा अश्या ठिकाणी असतो जिथे पृथ्वीतून येणाऱ्या चुंबकीय किरणांचे प्रमाण जास्त असते आणि ते उपासना करणाऱ्याला लाभदायक असतात.


३) *वेद मंत्र*: हिंदू प्राचीन काळात वेद मंत्रांचे पठण करण्यात येई. वेद मंत्रांचे उच्चार केल्याने शरीराचे आजार बरे करण्यास मदत होते जसे की रक्तदाब.


४) *तोरण*: आंबा, लिंबू तसेच अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या दरवाज्याला बांधून पूर्वी घर सजविण्यात यायचे. हि पाने वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करतात.


५) *प्राणायाम*: जर तुम्हाला रोजच्या ताणतणावातून आराम हवा असेल तर योगासने आणि प्राणायाम या पेक्षा चांगला उपाय नाही.


६) *बैठका*: पूर्वी वरिष्ट लोक देणारी शिक्षा म्हणजे कान पकडून बैठका काढणे, जे खर तर मन तेज बनविण्यास मदत करते तसेच आत्मकेंद्रित पणाला, ऐकण्यात त्रास असल्यास मदत करते.


७) *हळद*: हळदीत प्रतिजैविक, प्रतिऑक्सिडीकारक, विरोधी दाहक असे गुण असल्यामुळे हळद मिसळलेले पाणी सकाळ संध्याकाळ घर भोवती शिंपडले जाते.


८) *कान टोचणे*: लहान बाळाचे कान टोचणे हे एक आयुर्वेदिक उपचारातील भाग आहे. कानाचा जो भाग टोचला जातो तो दमा सारख्या आजरापासून बचाव करण्यास मदत होते.


९) *हनुमान चाळीसा*: नासा च्या संशोधनानुसार हनुमान चाळीसा म्हणजे सूर्य व पृथ्वी मधील अंतराची अचूक गणना आहे.


१०) *तुळस*: प्रत्येक हिंदूंच्या घराबाहेर तुळशीचं रोप असत. तुळशीचं पाने खाल्याने शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजाराला प्रतिबंध घालते.


११) *केळीचे किंव्हा पळसाचे पान*: हिंदू संस्कृती मधे केळीच्या किंव्हा पळसाच्या पानावर जेवण वाढतात कारण हे एक पर्यावरणपूरक साधन असून ते साफ करण्यासाठी कोणत्याही रासायनिक साबणाची गरज नाही तसेच पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता त्यांचा नायनाट करता येतो.


१२) *शंख पुकार*: शंख पुकारातून जी ध्वनी निर्माण होतो त्याने बरेच हानिकारक जीवजंतू चा नाश होतो. डासांची पैदास देखील शंख ध्वनीने प्रभावित होते ज्यामुळे मलेरिया सारख्या आजार पसरण्यात आळा बसतो.


१३) *दिवा*: तेलाचा किंव्हा तुपाचा दिवा घरात तसेच मंदिरात तेवत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.


१४) *कडूलिंब व केळ्याचे झाड*: सकाळी कडूलिंब किंव्हा केळीच्या झाडाजवळ बसून उपासना करावी असे सल्ले दिले जातात, कारण ह्या झाडाजवळची हवा शुद्ध मानली जाते जी शरीरासाठी लाभदायी ठरते.


१५) *ॐकार*: ॐ चा सतत उच्चार हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवते. त्याच बरोबर शरीराला आराम देतो.


१६) *वाकून पाय पडणे*: वरिष्ठाच्या वाकून पाय पडल्याने पाठीचा कणा नीट ठेवण्यास मदत होते तसेच मेंदूला रक्त पुरवठा होण्यास मदत होते.


*आपल्या जवळ अजून खूप काही असेल, तर जरूर सांगा ‌.*


🙏🏻🙏🏻

Featured post

Lakshvedhi