Thursday, 27 July 2023

खडीसाखर, अनेक विकारांवर बहुपयोगी.....*

 *खडीसाखर, अनेक विकारांवर बहुपयोगी.....*


खडीसाखर औषधी गुणाची आणि उपयोगी आहे. खडीसाखर आणि लवंग चघळत राहिल्याने खोकला कमी होतो. उसाच्या रसावर अग्निसंस्कार करून खडीसाखर बनवली जाते. ती खाल्ल्यावर लगेच पचते, रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते. 


खडीसाखर गोड, वीर्यवर्धक, थंड, पौष्टिक, डोळ्यांना हितकारक, जुलाबावर गुणकारी, हलकी, बलकारक आणि उलटीवर उपयुक्त आहे.


चरक, सुश्रुत या आयुर्वेद ग्रंथकारांनी खडीसाखर तहान भागवणारी, पुष्टीकारक, बलकारक, वीर्यवर्धक आणि वरचेवर होणारी उलटी थांबवणारी आहे, असे प्रतिपादन केलेले आहे.


खडीसाखर पाण्यात मिसळून घेतली असता तहान भागते.


खडीसाखर आणि तूप मिसळलेले दूध प्याले असता दाह, मूत्ररोग आदि विकार बरे होतात.


खडीसाखर १ भाग आणि धने ३ भाग एकत्र करून ते उकळत्या पाण्यात तासभर तसेच ठेवावे त्यानंतर कापडाने गाळून बाटलीत भरून ठेवावे. त्याचे २/२ थेंब सकाळ/संध्याकाळ डोळ्यात टाकल्यास डोळे दुखायचे थांबतात. डोळ्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.


सर्दी-पडसे यावरील आयुर्वेदीय औषध सीतोपलादी चूर्ण हे खडीसाखरेपासून बनवतात. खडीसाखरेलाच ‘सीतोपला’ म्हणतात. त्या चूर्णात खडीसाखर अधिक असल्याने चूर्णाला सीतोपलादी चूर्ण म्हणतात.


सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा मधासह चाटवल्याने सर्दी, पडसे, अंगदुखी, ताप कमी होतो.


डॉ. प्रमोद ढेरे,


*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*




पर्यटन स्थळी द्या मृत्यू ला हाली

 


दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीरायगडाचा घेरा,अवघे या

 *अवघे अवघे या..🚩*


दुर्गदुर्गेश्वर किल्ले श्रीरायगडाचा घेरा आणि माणगाव तालुक्यातील अपरिचीत ऐतिहासिक स्थळांच्या अभ्यासपुर्ण माहीतीवर मुंबई-दादर महानगरीत पहिले व्याख्यान शिवभुषण श्री रामजी कदम सर यांच्या वाणीतुन ऐकण्याची सुवर्ण संधी सोडु नका...

आपल्या विभागातील शिवव्याख्येते सुपुत्राचे मुंबई पहिले व्याख्यान होणार आहे त्यासाठी मुंबईत वास्तव्यास आसणार्या आपल्या विभागातील सर्व समाजबांधवानी वेळात वेळ काढुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवावी......


*जय शिवराय ..🙏


🚩*

निसर्गाच्या सानिध्ा हवे आहे मग सहवास पण तितकाच रोमांचकारी, घेवून तर पहा, अनुभव कळवा

 


Wednesday, 26 July 2023

कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

 कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्तेआसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

       मुंबई, दि. 26 : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली.


    देशाचे वीर जवान प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी काम करणे नागरिकांचे कर्तव्य असते असे सांगून राज्यपालांनी अथर्व फाऊंडेशनचे अभिनंदन केले. अथर्व फाऊंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील हुतात्मा जवानांच्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.


       कार्यक्रमाला अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष, आमदार सुनील राणे, निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, कर्नल एस. चॅटर्जी, डॉ. बालाजी शिंदे व आसाम रायफलचे अधिकारी व जवान उपस्थित होते.


००००

Kargil Vijay Diwas : Maha Governor presents Ambulances to Assam and Arunachal Pradesh Sainik Boards

    Maharashtra Governor Ramesh Bais handed over the keys of 2 Ambulances to the representatives of Assam and Arunachal Pradesh State Sainik Welfare Boards on the occasion of Kargil Vijay Diwas at Raj Bhavan Mumbai on Wed (26 July).




    The Ambulances to be used for the service of ex-servicemen and their families and families of martyrs from the armed forces were gifted by the Atharva Foundation.


    Speaking on the occasion, the Governor applauded the work of Atharva Foundation in the area of educating the children of the martyrs and ex servicemen from the armed forces.


    President of the Atharva Foundation and Borivali MLA Sunil Rane briefed the Governor about the work of the Foundation during the last 15 years. Convenor of the Foundation Col. (retd.) Sudhir Raje, Col. S. Chatterjee, Dr Balaji Shinde and officers and jawans of Assam Rifl

e were present.


0000




पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्याआस्थापनेवर समायोजन करणार

 पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्याआस्थापनेवर समायोजन करणार


- मंत्री उदय सामंत


            मुंबई दि. 26 : अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.


          अकोला महानगरपालिका हद्दवाढीतील तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर समायोजन करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केला होता.


         मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अकोला महानगरपालिकेने एकूण 89 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दस्ताऐवजांची पडताळणी केली असता विभागीय समितीने 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची मूळ नियुक्ती प्रचलित नियमानुसार आहे की नाही याबाबत दिनांक 24 मे 2021 रोजी पुर्नतपासणी केली.


            या 31 पात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांपैकी 5 कर्मचाऱ्यांच्या दस्तऐवजांमध्ये त्रुटी आढळून आल्याने प्राथमिक स्तरावर 26 कर्मचारी पात्र दर्शविण्यात आले आहेत. अपात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे दाखल केलेल्या रिट पीटिशन क्र.1889/2021 मध्ये मा. न्यायालयाने दिनांक 28 जून 2021 रोजी स्थगिती आदेश दिले होते. सदर आदेश दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी उठविण्यात आले आहेत. अकोला महानगरपालिकेच्या 1509 पदांच्या आकृतिबंधास मंजूरी देण्यात आली असून, सेवाप्रवेश नियम अंतिम करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.


          या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.


0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचाविभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील पूरपरिस्थितीचाविभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत आढावा


 


            मुंबई, दि 26 :- अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी नियमाचा बाऊ न करता, वेळ पडली तर प्रसंगी, ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काम करावे लागले, तर त्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घ्यावा. जनहिताच्या प्रत्येक कार्यात शासन तुमच्यासोबत आहे. आपत्ती निवारण, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यस्तरीय विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत दिली. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीबाबत सतर्क राहून काम करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.


            राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती व अवर्षण परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडुन दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य मुख्य सचिव नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज, आपत्ती नियंत्रण कक्षाचे उपसचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल आमदार संजय कुटे उपस्थित होते.


आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार


            पूरामुळे गावात घरात, रस्त्यावर गाळ साचला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद मदत निधी’ तसेच जिल्हा परिषदेतील निधीचा उपयोग करावा. प्रत्येक जिल्ह्याला दिलेला ३० लक्ष रुपयांचा आगाऊ निधी वापरावा. निधी कमी पडल्यास तातडीने निधीची मागणी करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.


नदी,नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरु राहण्यासाठी नदी,नाल्यांमधील अतिक्रमण काढावे


            उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, राज्यात अनेक भागात नदी, नाले, ओढ्यात अतिक्रमण झाले आहे. नदी, नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी नदी, नाल्यातील अतिक्रमण काढण्याचे काम प्राधान्याने व कठोर भूमिका घेऊन पार पडावे. नदी, नाल्यातील गाळ काढण्याचे काम करण्यासाठी कंत्राटदारांची यंत्रसामुग्री व प्रशासनाकडून डिझेलची व्यवस्था करावी. १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करावी. तसेच गाळ काढल्यानंतर तो पुन्हा नदी, नाल्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी.


दरडप्रवण भागातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करुन


पुनर्वसनासाठी ठोस आराखडा सादर करावा


            दरडप्रवण भागात ईरशाळवाडी, तळीये सारख्या घटना घडू नयेत, यासाठी अशा डोंगरी-दुर्गम भागातील दरडप्रवण आदिवासी तांडे, पाडे यांचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा धोकादायक गावांची माहिती सर्वेक्षणाद्वारे एकत्रित करावी. पुनर्वसन करण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था, गावकऱ्यांची उपजिविका या सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार करण्याच्या सूचना सुध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.


अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


            पूर परिस्थितीवेळी धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत. खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा तयार करावा, तसेच दुबार पेरणी करण्याची गरज असल्यास त्याचा आराखडा करावा, बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने त्याच दिवशी होईल याकरिता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा. ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले असेल त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी. रोगराई पसरु नये, याकरिता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात. गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी. पूरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे, त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे, आदी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना दिल्या.


            यावेळी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.


*****

Featured post

Lakshvedhi