Wednesday, 19 July 2023

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्टगावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार

 पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्टगावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार


- मंत्री उदय सामंत


 


            मुंबई, दि. 18 : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


             तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.


             या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


००००

भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही

 भुसावळ बस पोर्टबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही


- मंत्री दादाजी भुसे


            मुंबई, दि. 18 : भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन असून याठिकाणी असणाऱ्या बस स्थानकावरही प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने याठिकाणी बस पोर्ट उभारण्याबाबत वस्तुस्थिती तपासून कार्यवाही केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


            सदस्य संजय सावकारे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते.


            राज्यात सध्या एकूण 598 बसस्थानके आहेत. त्यापैकी 109 बसस्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. सध्या 63 कामे सुरु असून 97 कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. बसस्थानके चांगली करणे आणि त्याठिकाणी आवश्यक सोयीसुविधा देण्यावर राज्य शासनाचा भर आहे. भुसावळ येथेही बस पोर्ट उभारण्याबाबत यापूर्वी काही कार्यवाही झाली असेल तर ती वस्तुस्थिती तपासून त्याप्रमाणे निर्णय घेतला जाईल.


            राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रीक बसेस दाखल होतील. त्यातील काही बसेस भुसावळ येथे उपलब्ध करुन देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु, असे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य बळवंत वानखेडे यांनीही सहभाग घेतला. 

मुंबई महानगरपालिकेच्यारुग्णालयांचे फायर ऑडिट करणार

 मुंबई महानगरपालिकेच्यारुग्णालयांचे फायर ऑडिट करणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


             मुंबई, दि. 18 : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयांचे लवकरच फायर ऑडिट करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


             मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याने धोका निर्माण झाल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सर्वश्री सुनील राऊत, अमित देशमुख, सुनील प्रभू, अमिन पटेल, आशिष शेलार, राम कदम, राजेश टोपे, अजय चौधरी, रवी राणा यांनी उपस्थित केला होता.


               मंत्री श्री. सामंत म्हणाले, मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट राहिले आहे. किंवा काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या लवकर पूर्ण करून अग्नि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आणि फायर ऑडिट प्रक्रिया ९० दिवसात करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.


0000

अंधेरीतील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार

 अंधेरीतील मोगरा नाल्यावरील

अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार

मंत्री उदय सामंत

            मुंबईदि. 18 : अंधेरी (पश्चिम) 'केप्रभागातील मोगरा नाल्यावर अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

            मुंबईतील अंधेरी (पश्चिम) 'केप्रभागातील मोगरा नाल्यावरील अनधिकृत बांधकामाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री रणजित कांबळेअशोक चव्हाणयोगेश सागरअमित साटमनाना पटोलेसुनील प्रभूडॉ.भारती लव्हेकरआशिष शेलारराम कदमवर्षा गायकवाडयांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री श्री. सामंत म्हणाले कीमोगरा नाल्यावर झालेल्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून या परिसरात पाणी साचणार नाही. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील.

0

कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

 कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या

राज्यपालांच्या सूचना

 

            मुंबई, दि. 18 : कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे दिल्या. 

            राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राज्यातील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे संपन्न झालीत्यावेळी ते बोलत होते. 

            बैठकीला  कृषी  विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमारवित्त विभागाचे (व्यय) अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्तामहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

            विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठांमध्ये बांधकाम करण्यासाठी तसेच यंत्रसामग्री खरेदीसाठी ठरवून दिलेली निधीची कमाल मर्यादा फार पूर्वी ठरविण्यात आली असून कुलगुरुंचे वित्तीय अधिकार वाढवून देण्यासाठी शासन स्तरावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना राज्यपालांनी या बैठकीत केल्या. राज्यपालांनी सर्व कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या अध्यापक तसेच बिगर शिक्षकांच्या पदांचा आढावा घेतला व रिक्त जागा भरण्याबाबत विद्यापीठ तसेच शासनातर्फे केल्या जात असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.  

कृषी विद्यापीठांच्या जमीन वापराबाबत लवकरच धोरण – अनुप कुमार

            राज्यातील कृषी विद्यापीठांकडे उपलब्ध असलेल्या जमिनींसंदर्भात विविध घटकांकडून मागणी होत असते. यासंदर्भात एक समग्र 'जमीन वापर धोरणतयार करण्याबाबत शासन विचार करीत असल्याची माहिती कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार यांनी बैठकीत दिली.  जागतिक हवामान बदलांमुळे राज्यात अतिवृष्टी व अनावृष्टीची वारंवारता वाढली आहे असे नमूद करून कृषी विद्यापीठांनी या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी लागवडीबाबत मार्गदर्शक प्रणाली तयार करावी अशी सूचना त्यांनी केली.    

            बैठकीत उच्च कृषी शिक्षण कायद्याची अंमलबजावणी करणेकृषी वैज्ञानिक व विद्यार्थ्यांना विदेश दौऱ्यावर पाठविण्यासाठी कुलगुरूंना प्राधिकृत करणेनोकरीत असलेल्या उमेदवारांना अध्ययन रजा देण्याबाबत अधिकार कुलगुरुंना देणेखासगी कृषी महाविद्यालयांचे व्यवस्थापन सुधारणेविद्यापीठांचा आकस्मिकता निधी वाढवणेइत्यादी विषयांवर चर्चा झाली. 

            महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी जी पाटीलडॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाखवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणि व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय भावे यांनी बैठकीत आपापल्या विद्यापीठांच्या समस्या मांडल्या.

००००


 

Maharashtra Governor presides over meeting of Agri Universities

      Maharashtra Governor Ramesh Bais presided over a meeting of vice chancellors of agricultural universities in the State at Raj Bhavan Mumbai on Tue (18 July).

      The meeting discussed the issues of increasing financial powers of vice chancellors, filling of vacant teaching and non teaching posts in universities, implementation of Model Act for Higher Agricultural Education in India, Empowerment of Vice Chancellors to depute scientists to proceed on foreign tours, restoring Contingency Grants to universities and others.

      Additional Chief Secretary Agriculture Anoop Kumar, Additional Chief Secretary Finance (Expenditure) O.P. Gupta, DG, MCAER Raosaheb Bhagde and officials were present.

      Vice Chancellor of Dr Panjabrao Deshmukh Krishi Vidyapith Dr Sharad Gadakh, Vice Chancellor of Vasantrao Naik Marathwada Agricultural University Dr Indra Mani, Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Dr P G Patil and Vice Chancellor of Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dr Sanjay Bhave raised the issues concerning their universities.

००००


 

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई गावाच्या जमिनीवरीलअतिक्रमणसंदर्भात

 महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्यातील झाई गावाच्या जमिनीवरीलअतिक्रमणसंदर्भात पुढच्या आठवड्यात संबंधितांची बैठक घेणार


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


            मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई, ता. तलासरी, जि. पालघर येथील गावातील स्थानिक प्रश्नांसोबतच मोजे वेवजी ता. तलासरी जि. पालघर व मोजे सोलसुंभा, ता. उंबरगाव, जि. बलसाड, गुजरात यांच्या सीमाहद्दीनिश्चिती कामासंदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितले.


            विधानसभा सदस्य विनोद निकोले यांनी विधानसभेत यासंदर्भातील उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. विखे पाटिल बोलत होते. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले.


            बोर्डी फाटा, बोरीगाव नारायण, ठाणे ते रा.मा ७३ रस्ता प्र.जि.मा.३ कि.मी. ०/०० ते १४/३०० या लांबीत सा.क्र.९/८६० ते १०/२९० अशी ४३.०० मी. लांबी ही गुजरात हद्दीमध्ये येत असून या रस्त्याच्या साखळी क्रमांकात सार्वजनिक बांधकाम विभाग, तलासरी यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात येत नाही, परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता हा महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आहे व सार्वजिनक बांधकाम विभाग, तलासरी यांच्यामार्फत हद्द दर्शवणारे फलक वेळोवेळी स्थलांतरित करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी महाराष्ट्र गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्दनिशानी निश्चिती होण्यासाठी जिल्हाधिकारी, पालघर कार्यालयाने दि. ७ जानेवारी २०२१ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी बलसाड, गुजरात यांना मौजे वेवजी, ता. तलसारी, जि. पालघर महाराष्ट्र राज्य व सोलसुंभा, ता. उंबरगाव, जि. बलसाड, गुजरात राज्य यांच्यातील सोमेची हद्द निशानी निश्चित करण्याच्या कामासंदर्भात संयुक्त मोजणी करण्यासाठी कळविले होते.


            त्यानुसार, मौजे बेवजी ता. तलासरी, जि. पालघर व मोजे- सोलसुंभा, ता. उंबरगांव, जि. वलसाड येथील महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमे लगतचे सव्हें नंबर 203,204, 205, 206, 207, 279 व 280 चे स्थानिक उपसरपंच, स्थानिक नागरिक, ग्रामसेवक, तलाठी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांनी दाखविलेल्या कब्जे वहीवाटीप्रमाणे ई.टी.एस. मशिनच्या साह्याने उप अधीक्षक भूमी अभिलेख, तलासरी, जि. पालघर यांनी दिनांक 3.3.2022 ते दिनांक 4.3.2022 रोजी मोजणी काम केले आहे. मोजणीअंती गावनकाशा. गट बुक, पोटहिस्सा मोजणी आलेख व यापुर्वी झालेल्या मोजण्यांच्या आधारे उप अधीक्षक भूमी अभिलेख, तलासरी, जि. पालघर यांनी नकाशा तयार केला आहे.


            मौजे वेवजी ता. तलासरी, जि. पालघर व मोजे- सोलसुंभा, ता. उंबरगांव, जि वलसाड येथील महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमेची हद्द निश्चित करणेकरीता उप अधिक्षक, भूमी अभिलेख, तलासरी, तलाठी व इत कर्मचारी दिनांक 26.5.2022 रोजी जागेवर गेले असता गुजरात राज्यातील उंबरगांव तालुक्याचे तहसिलदा तालुका विकास अधिकारी, उंबरगांव, सरपंच सोलसुंभा व गुजरात राज्यातील असंख्य स्थानिक नागरीक महाराष्ट्र व गुजरात राज्य यांचेतील सीमा हद्द निश्चिती करण्यास तीव्र विरोध केला. याबाबत जिल्हाधिकारी, पालघर यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, वलसाड यांचेशी चर्चा करून हद्द निश्चितीच्या अनुषंगाने समन्वय साधण्याबाबत कळविण्यात आले आहे.


०००

दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या


संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांची मुलाखत


             मुंबई, दि. 18 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.


            राज्यातील उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि कोल्हापूर याठिकाणी केंद्र सुरू आहेत. तेथे प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाचे स्वरूप, निवड प्रक्रिया अशा महत्वपूर्ण विषयांवर राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.19 आणि गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

Featured post

Lakshvedhi