Wednesday, 19 July 2023

कथित व्हिडीओ प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरूनसखोल चौकशी करणार

 कथित व्हिडीओ प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरूनसखोल चौकशी करणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 18 : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.


            विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी श्री. सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोणत्याही महिलेचा छळ झाला असेल, तर ते योग्य नाही. याबाबत सदस्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच महिलेची ओळख जाहीर न करता चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव -बिबट संघर्ष टाळणार

 अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव -बिबट संघर्ष टाळणार


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            मुंबई, दि. 18 : राज्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत असताना वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार असून बिबट्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तातडीच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. तसेच वन अधिकाऱ्यांना विविध सूचना देत कार्यवाहीचे आदेश दिले.


            विधानभवनात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यासह राज्यातील काही गावांमध्ये बिबट्या व इतर वन्य प्राण्यांचा वाढलेला वावर या विषयावर समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मागील अधिवेशनात यासंदर्भात आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी समिती गठित करण्याचे जाहीर केले होते. या समितीचा निष्कर्ष व त्यांनी सुचविलेल्या उपायांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


            या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री जयंत पाटील, सुनील प्रभू, अनिल बाबर, अतुल बेनके, आशिष जयस्वाल, मानसिंग नाईक, अशोक पवार, दिलीपराव बनकर, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, बिबट्या पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पिंजरा लावण्यात येईल. शहर किंवा गावात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी परवानगी लागते त्याला विलंब होवू नये म्हणून ऑनलाईन परवानगीची व्यवस्था करण्यात येईल. पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून ते अत्याधुनिक असतील.


            वन्यजीव संवर्धन करतांना वन्यप्राणी आणि मानवी संघर्षाचा प्रश्न हा प्रमुख अडथळा ठरतो. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसान भरपाईची रक्कम तीस दिवसाच्या आत देण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल. बिबट्यांची प्रजननक्षमता कमी करण्यासाठी देशांत प्रयोग झाले असल्यास त्याचा अभ्यास करण्यात येईल. बिबट्यांची नसबंदी कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.


            याच बैठकीच्या अनुषंगाने राज्यातील वाढती वाघांची व बिबट्यांची संख्या लक्षात घेता इतर राज्यांत प्राणीसंग्रहालयात वाघ, बिबट्या मागणीनुसार स्थानांतरित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

वनविभागाच्या जमिनी वनेतर वापरासाठी देण्यासंदर्भातकेंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कार्यवाही

 वनविभागाच्या जमिनी वनेतर वापरासाठी देण्यासंदर्भातकेंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच कार्यवाही


- वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार


 


            मुंबई, दि. 18 : राज्यातील झुडपी वने व राखीव वनक्षेत्राच्या बाबत केंद्र सरकारच्या व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. या क्षेत्रावर शेतीसाठी कोणत्याही प्रकारची बंधने नाही. या क्षेत्रात कृषी उत्पादने संबंधित शेतकरी घेऊ शकतात. मात्र या क्षेत्राचा अन्य वापर करता येत नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


            विधानसभेत सदस्य ॲड.राहुल कुल यांनी ग्रोमोअर व इतर विविध योजनेअंतर्गत झुडपी वने व राखीव वनक्षेत्रे यांच्या प्रस्तावासाठी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री श्री.मुनगुंटीवार बोलत होते.


            मंत्री श्री.मुनगुंटीवार यांनी सांगितले की, या संदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव प्राप्त झाले तर वनविभागामार्फत संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले जातील. या संदर्भात केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार वनजमिनीचा वापर वनेतर कामासाठी करावयाचा असल्यास त्याकामांसाठी त्या जमीनीशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही हे सिद्ध करावे लागते. त्यामुळे वनजमिनी म्हणून घोषीत केलेल्या जमीनीचा वनेतर वापर करता येत नाही.


            या चर्चेत सदस्य संजय गायकवाड, देवराव होडी यांनी चर्चेत सहभाग घेतला.


००००

अधिक मास* अधिक पुण्य देणारा महिना आहे

 अधिक मास* अधिक पुण्य देणारा महिना आहे. *अथर्ववेदात* या मासाला *भगवान महाविष्णूंचे* घर म्हटले आहे. *'त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।'*


 या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता, कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते.


या मास मध्ये व्रत-वैकल्यांना इतर वेळी केलेल्या व्रतांपेक्षा १० पट अधिक फळ मिळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना अतिशय फलदायी आहे. या मास कोणतीही उपासना मनोभावे केली, तरी कुंडलीतील दोष दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते. 


*अधिक मासात काय करावे -*


*या महिन्यात श्रीमद्भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, भागवत गिता, किंवा श्रीमद् भागवत, श्री रामकथेचे पठण, *श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण,*आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे*


अधिक मासात सर्वार्थसिद्धी योग, द्विपुष्कर योग, अमृतसिद्धी योग जुळून आले आहेत. दान-धर्म करून या योगांचा लाभ घ्यावा. अधिक महिन्यात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. 

तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते,

अन्नदान करावे, गोपूजन करावे, गोग्रास घालावा, अपूपदान (अनारशांचे


दान) करावे.

आयुष्य हे गुळपोहे

 महीला मंडळ आवश्य वाचा                                 


🌸 *प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....*🌸


मी म्हणते बिनधास्त जग 

चिंता नको करू 

कुणा बद्दल मना मध्ये 

राग नको धरू ll


 जे काय वाईट घडलं 

त्याला लाव काडी 

वर्तमानात जग जरा 

मजा घे थोडी ll


संकट येत राहतील 

घाबरून नको जाऊ 

कोणत्याच गोष्टीचा 

करू नको बाऊ ll


भिऊ भिऊ रोजच जगतेस 

जरा मोकळा श्वास घे 

मित्र-मैत्रिणी जवळ कर 

आणि थोडी मजा घे ll


चौकटीत राहून राहून 

कंटाळा येणारच 

चार चौघात बसल्यावर 

दुःख पळून जाणारच ll


स्त्री झाली म्हणून काय 

तिला मन नसतं का ?

गुलाबी , लाल रंगाचं 

तिचं वाकडं असतं का ?

शेजारणींनी , मैत्रिणींनी 

एकत्र आलं पाहिजे 

रंग खेळून मन कसं 

चिंब झालं पाहिजे ll


मोठं झाल्या नंतर सुद्धा 

लहान होता येतं

मुखवटा न घालता 

आयुष्य जगता येतं ll


गप्पा मार , जोक सांग 

खळखळून हास 

अर्धी भाकरी जास्त घे 

म्हणू नको बास ll 


मन मोकळं जगल्यानं

ब्लडप्रेशर होतं कमी 

अटॅक बिटॅक येणार नाही 

याची अगदी नक्की हमी ll


गप्पातल्या lnsulin ने 

Sugar कमी होते 

हृदयाच्या ठोक्यांची 

गती धीमी होते 

धुळवड साजरी करणं म्हणजे 

वाया जाणं नसतं 

गडगडाटी हंसणं म्हणजे 

खरं Tonic असतं 

एक दिवस पत्ते खेळल्यानं 

जुगारी थोडंच होतं 

टेन्शन कमी झालं की 

जगणं सोपं होतं ll


कितीही चांगलं वागलं तरी 

जग वाईटच म्हणणार आहे 

तुझा कोण भव्य - दिव्य 

पुतळा वगैरे उभारणार आहे ? ll


म्हणून म्हणते आता तरी

मनावरचं ओझं झुगारून दे

मोकळेपणाने श्वास घेऊन बघ

आणि.....थोडं जगून घे ।।


🙏Dedicated to all my beautiful......... आई, सासु, भावजयी, नणंदा, मावशी,बहिणी,मुलगी,भाच्या, पुतण्या,सुना,विहीनी या सर्वांसाठी..आणि माझ्या जिवलग मैत्रीणींसाठी🙏

💝💝💝💝💝💝💝💝

तिन्हीसांजा


 

अधिक मास* अधिक पुण्य देणारा महिना आहे. *

 अधिक मास* अधिक पुण्य देणारा महिना आहे. *अथर्ववेदात* या मासाला *भगवान महाविष्णूंचे* घर म्हटले आहे. *'त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।'*


 या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता, कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते.


या मास मध्ये व्रत-वैकल्यांना इतर वेळी केलेल्या व्रतांपेक्षा १० पट अधिक फळ मिळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना अतिशय फलदायी आहे. या मास कोणतीही उपासना मनोभावे केली, तरी कुंडलीतील दोष दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते. 


*अधिक मासात काय करावे -*


*या महिन्यात श्रीमद्भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महामात्य, भागवत गिता, किंवा श्रीमद् भागवत, श्री रामकथेचे पठण, *श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्राचे पठण,*आणि पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे*


अधिक मासात सर्वार्थसिद्धी योग, द्विपुष्कर योग, अमृतसिद्धी योग जुळून आले आहेत. दान-धर्म करून या योगांचा लाभ घ्यावा. अधिक महिन्यात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने दीपदान करावे. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. 

तांबूलदान (विडा-दक्षिणा) करावे महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती होते,

अन्नदान करावे, गोपूजन करावे, गोग्रास घालावा, अपूपदान (अनारशांचे दान) करावे.

Featured post

Lakshvedhi