Wednesday, 19 July 2023

पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा

 पोलीस भरतीची २३ जुलै रोजी लेखी परीक्षा


              मुंबई, दि. १८ : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर येण्याकरीता गोरेगाव रेल्वे स्टेशन येथून बस क्रमांक ४५२ असून स्टॉपचे नाव मयूर नगर बस स्टॉप आहे. या लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होईल. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.


              या लेखी परीक्षेसाठी येताना उमेदवारांनी महाआयटीने ई-मेलद्वारे पुरविलेले शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन त्याची कलर प्रिंट आणि आवेदन अर्जावरील दोन कलर पासपोर्ट साईज छायाचित्र, तसेच या कार्यालयाकडून मैदानी चाचणी करीता पुरविण्यात आलेले ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोबाईल फोन, डिजीटल घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर तत्सम वस्तू तसेच शक्यतो कोणत्याही प्रकारच्या बॅगा आणू नयेत. जर उमेदवारांनी बॅगा आणल्यास त्या परीक्षा केंद्राच्या बाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवण्यात याव्यात. या बॅगा व त्यातील मौल्यवान व इतर वस्तू गहाळ किंवा चोरीस गेल्यास त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


            परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, काळा पेन तसेच पॅड बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही लेखी परीक्षा नि:पक्षपातीपणे व पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये. तसेच ही बाब निदर्शनास आल्यास तत्काळ भरती प्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 चे समादेशक प्रणय अशोक यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.


००००

Tuesday, 18 July 2023

Online खेला रम्मी, मग होईल तुमची ममी

 

मी 

सद्यस्थितीत राज्यात H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही

 सद्यस्थितीत राज्यात H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही


— अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे


            मुंबई, दि. 18 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही असे अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


            अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


            राज्यामध्ये बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव प्रथम सन २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर येथे झाला होता. त्यावेळी या विषाणूचा स्ट्रेन हा H5N1 हा होता. त्यानंतर २०२१ आणि २०२२ मध्ये राज्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लू रोग प्रादुर्भावातही विषाणूचा स्ट्रेन H5N1 होता. सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव झालेला नाही.


             केंद्र शासनाच्या बर्ड फ्लूच्या कृती आराखड्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांकडून बर्ड फ्लू सर्वेक्षणाकरिता नमुने प्रामुख्याने परसातील कुक्कुट पक्षी, व्यापारीतत्वावर पाळण्यात येणारे पक्षी, पक्षाचे बाजार, स्थलांतरित पक्षांचे मार्ग, पानवठ्याच्या जागा जिथे स्थलांतरित पक्षी पाणी पिण्यासाठी एकत्रित येतात, प्राणीसंग्रहालये, जंगल याही ठिकाणाहून पक्ष्यांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. गतवर्षी राज्यामध्ये एकूण २३,३९३ इतके नमुने यादृच्छिक (Randorm); पद्धतीने गोळा करून त्याची तपासणी केलेली आहे. ज्यामध्ये एकाही पक्ष्याचे नमुने H5N1 विषाणूसाठी होकारार्थी आढळून आलेले नाहीत.


            बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियमान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि. १२.०१.२०२1 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षामध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येतात.


            राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १९६२ किंवा १८००२३३०४१८ ह्या टोल फ्री क्रमांकावर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.


            प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ च्या कलम ४(५) अन्वये राज्यातील प्रत्येक पशुपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा- या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळविणे बंधनकारक आहे.


००००

महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक

 महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

# आमदार निकोले यांच्या लक्षवेधी वर महसूल मंत्र्यांचे उत्तर


मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र - गुजरात सीमेच्या संदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या लक्षवेधी वर उत्तर देताना सांगितले आहे.


यावेळी आमदार निकोले म्हणाले की, महाराष्ट्र - गुजरात सीमावाद प्रश्न गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला आहे. गुजरात राज्यातील उमरगाव तालुका आणि महाराष्ट्र राज्यातील डहाणू व तलासरी या सिमेवर हा वाद निर्माण झालेला आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील सीमेवर ज्या - ज्या ग्रामपंचायत त्या वेवजी, गिरगाव, हिमानिया, झाई, सांभा, आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. गुजरात राज्यातील उमरगाव गोवाडे, सूलसुंभा सध्या उमरगाव तालुक्यातील ज्या सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायत मध्ये जवळ जवळ 500 मीटर जागेवर अतिक्रमण केलेले आहे. मागच्या वर्षी गुजरात राज्यातील उमरगाव तालुक्यातील गोवाडे ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील झाई गावातील काही रहिवाश्यांना नोटीस बजावली होती की, तुमची घर ही आमच्या गोवाडे गुजरात राज्याच्या हद्दीत आहेत. खरे म्हणजे वेवजी ग्रामपंचायत ही आपल्या महाराष्ट्र राज्याची आहे. येथील सर्व्हे क्र. 204 यांचा फेरफार क्र. 144 असा पडलेला आहे ती जागा साधारणपणे 05 एकर 30 गुंठे जागा आहे. ही जागा आजही गुजरात च्या सूलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते. खर म्हणजे हा 7/12 आपला महाराष्ट्रातील तलासरी तील वेवजी ग्रामपंचायातचा आहे. हे अतिक्रमण झालेलं आहे. वेळोवेळी वेवजी ग्रामपंचायतने नोटीसा बाजावेलेल्या आहेत की, ही जी जागा आहे तुमच्या हद्दीमध्ये ही ती आमची जागा आहे. आज हा वाद वाढत चाललेला आहे. 15 दिवसापूर्वी झाई गावातील ग्रामस्थ हे माझ्या कडे एकत्र होऊन आले होते त्यांनी सांगितले की, हा वाद अति तीव्र होत चालेला आहे इथे राहणारा समाज दोन्ही गावात बऱ्यापैकी आदिवासी समाज आहे. त्यामुळे मंत्र्यांनी लवकरात लवकर हा सीमावाद आहे त्यांचे सीमांकन निश्चित झालेले नाही. त्याअनुषगाने लवकरात लवकर हा विषय मिटवावा. तसेच, गुजरात राज्याने कोणतेही पुरावे सादर केलेले नाही. त्याचप्रमाणे या सीमेवर जो रेल्वे पूल होत हा सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या वेवजी ग्रामपंचायत मध्ये 20 मीटर आत मध्ये आलेला आहे. अश्या प्रकारचे अतिक्रमण हे उमरगाव तालुक्यातील सुलसुंबा या प्रकारच्या ग्रामपंचायत चे अतिक्रमण दिसेन दिवस वाढत चालेल आहे. हा एक कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सोडविणार आहात का ? असा माझ्या प्रश्न आहे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विचारणा केली असता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावाला भेट दिलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये जिल्ह्याधिकारी, विभागीय आयुक्त यांना त्या ठिकाणी पाठवू. आणि उक्त प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, त्या अनुषगाने लवकर बैठक घेण्यात येईल असे मंत्री विखे-पाटील म्हणाले

.


वनवा सलग दहा ते पंधरा वर्षे नाही लागला तर🔥*

 *🔥वनवा सलग दहा ते पंधरा वर्षे नाही लागला तर🔥*

*💦पाण्याबद्दल एक महत्व पूर्ण लेख💦*


🌳🌴🏞️🌄🌅


*डोंगर आणि झाडाशिवाय जमीनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 


1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते.माञ भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही.या उलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 


2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठले जाते. *एक मृत साठ्याचे पाणी*

*दुसरे जिवंत साठ्याचे पाणी* 


       मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० व त्यापेक्षा अधिक पाळीवर आढळते.

       जेेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा नदी नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते.जे कि एकदा उपसले कि संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 


       तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंञणा हवी असते. 


3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्याठी एक वर्षाचा कालावधी लागतो.म्हणजेच दहा फुटावर जाण्याठी दहा वर्ष लागतात. 


4) एक झाड एका दिवसाला ५० फुटावर दहा लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. कारण झाडं हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात.म्हणून झाडं हे निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 


5) एक कडूनिंबाचे झाडं दहा हजार लिटर पाणी एकुण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते.याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांबळ, अंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 


6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाडं एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 


      एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 


      *म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.* 


         आपण एक बोअरवेलसाठी एक लाख खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख खर्च करतो.पण पाण्याचा कुठलीच शाश्वती नाही'. 


           कारण आपली नियत ही धुर्त असते, डोंगर संपुष्टात आणण्याची,डोंगारावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची म्हणून पाणी तरी कुठून येणार? 


6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानव निर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही.खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 


           हवा ही ऊर्जा आहे.

           पाणी हे अमृत आहे

          तर माती ही जननी आहे.

        तर झाडं हे जीवनदायी आहेत. 


झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

         

7) झाडांचं मूल्य समजून घ्या... आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात नाहीत तर माळरानावर,डोंगरावर कुठे ही जगविण्याची जबाबदारी घ्या.... 


       या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साध काम करा. 


          झाडं मानसाचं मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 


8) एक सदैव लक्षात असु द्या. झाडांची पाणी पाठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या 

वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

विभाग स्तरावरील कार्यक्रम, संदर्भसमृद्ध प्रकाशने, माहितीपट निर्मिती

 विभाग स्तरावरील कार्यक्रम, संदर्भसमृद्ध प्रकाशने, माहितीपट निर्मिती


याद्वारे साजरा होणार महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव


- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे


 


            मुंबई दि १८ जुलै (प्रतिनिधी / वार्ताहर)- “महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर देखील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे,” अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.   


            विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यासंदर्भात विचार - विनिमय आणि नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्यांची बैठक आज विधानभवन येथे आयोजित केली होती.   


            यावेळी, माजी सदस्यांना विनंती पत्रे पाठवून त्यांच्याकडून विधानपरिषदेसंदर्भातील महत्वपूर्ण घटना आणि छायाचित्रे मागविणे, देशातील अन्य राज्यांमधील विधानपरिषद सदस्यांना चर्चा - परिसंवादासाठी निमंत्रित करणे, कायदानिर्मितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा, संदर्भांचे संकलन पुस्तक स्वरूपात करणे, वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि योगदान यासंदर्भातील मान्यवरांचे लेख, सभागृहातील चर्चा इत्यादींचे संदर्भ संकलित आणि संपादित करणे, या शतकोत्तर महोत्सव उपक्रमांमध्ये समाजातील विविध घटकांना सहभागी करून घेणे, निवृत्त सदस्यांना निरोप देतानाच्या छायाचित्रांचे पुस्तक स्वरूपात संकलन करणे, माहितीपट निर्मिती इत्यादी सूचना याबैठकीत गटनेते आणि सदस्यांनी मांडल्या. या सूचना स्वीकारण्यात येऊन विषयांनुसार समिती नेमण्यात येऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी निश्चित केले.


            या बैठकीस, विरोधीपक्ष नेते मा. अंबादास दानवे, सर्वश्री प्रवीण दरेकर, सतेज ऊर्फ बंटी पाटील, शशिकांत शिंदे, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, सुरेश धस, प्रा. मनिषा कायंदे, सत्यजित तांबे, अरुण लाड, अमोल मिटकरी, नरेंद्र दराडे, रामराजे नाईक निंबाळकर (दूरदृष्यप्रणालीद्वारे), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (२) विलास आठवले, उपसचिव राजेश तारवी, ऋतुराज कुडतरकर, सायली कांबळी, पुष्पा दळवी, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उपग्रंथपाल शत्रुघ्न मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.


0000


 

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲपक्रमांक कार्यान्वित करावा -कृषी मंत्री धनंजय मुंडे

 शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲपक्रमांक कार्यान्वित करावा -कृषी मंत्री धनंजय मुंडे


            मुंबई, दि 17:- खत विक्रेते काही वेळेस शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. 


            कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव


गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.  


            शेतक-यांनी सदर व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना संदेश जाऊन त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मंत्री श्री मुंडे यांनी दिल्या.


            कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना ते म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसेच बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओडिशाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.    


 


००००



Featured post

Lakshvedhi