Monday, 17 July 2023

घरमालकांनी भाडेकरूंची माहितीसिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक

 घरमालकांनी भाडेकरूंची माहितीसिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक मुंबई, दि. 17 : मुंबई पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या भाडेकरूचा सर्व तपशील www.mumbaipolice.gov.in या सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन कळवावा, असे पोलिस उपायुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            भाडेकरूंच्या वेशात दहशतवादी, समाजविरोधी घटकांकडून विध्वंसक कृत्ये, दंगल, भांडण घडू नये म्हणून घरमालक, भाडेकरूंची तपासणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. भाडेकरू परदेशी व्यक्ती असेल, तर घरमालक व परदेशी व्यक्ती यांनी नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्टचा तपशील, व्हीसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण, जारी करण्याची तारीख, वैधता नोंदणीचे ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण नमूद करणे आवश्यक आहे. हा आदेश ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय असेल, असेही पोलिस उपायुक्त श्री. ठाकूर यांनी म्हटले आहे.



अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा

 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचामंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा


            मुंबई, दि. 17 : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व कामकाजाचा सविस्तर आढावा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतला.


            मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी, संबंधित उपस्थित होते.


            यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी राज्यातील शिवभोजन केंद्राच्या सद्य:स्थितीबाबतचा आढावा घेऊन या केंद्रांच्या निधी वितरणाची माहिती घेतली. तसेच मराठवाडा व विदर्भातील 14 जिल्ह्यातील सर्व शेतक-यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली. ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामध्ये राज्यभरात करण्यात आलेल्या शिधा वितरणाचाही आढावा घेतला. शासकीय धान्य गोदामातील अन्न धान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल कंत्राट निश्चितीबाबत अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या प्रक्रियेची माहिती घेतली. विभागाच्या अधिपत्याखालील (पुरवठा शाखा) गट ‘अ’ व ‘ब’ संवर्गातील पदांचे सेवाप्रवेश नियम सुधारित करणेबाबत केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेतली.


            किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धानाकरिता प्रोत्साहनपर राशी अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या निधीची माहिती घेतली. त्याचप्रमाणे तृतीयपंथी नागरिकांना शिधापत्रिका वितरण, लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ (फोर्टीफाईड तांदूळ) वितरणाचा आढावाही मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी घेतला.


            ई ऑफिसच्या माध्यमातून विभागाचे पूर्ण कामकाज केले जात असल्याचे सांगून जनतेला वितरण व्यवस्थेतील सर्व सोयीसुविधा सहजतेने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागामार्फत महा रेशन तसेच महा निरीक्षक हे दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार आहेत, त्याबाबतची सविस्तर माहिती सचिव श्री.वाघमारे यांनी यावेळी दिली.


००००

केसांपासून ते हृदयापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल ‘काळ्या मनुक्या’चे सेवन....

 केसांपासून ते हृदयापर्यंत अनेक समस्यांवर गुणकारी ठरेल ‘काळ्या मनुक्या’चे सेवन.....

*काळ्या मनुका...* 


तुम्ही आंबट गोड केशरी मनुका खाल्लीच असेल, पण कधी काळ्या मनुक्याची चव चाखली आहे का? जर आपण कधीही काळी मनुका खाल्लाच नसेल, तर त्याचे फायदे देखील तुम्हाला ठाऊक नसतील. वास्तविक, पिवळा मनुका हिरव्या द्राक्षापासून बनवतात आणि काळा मनुका काळ्या द्राक्षापासून बनवतात. काळा मनुका उष्ण असतात आणि केशरी मनुकांपेक्षा जास्त फायदेशीर असतात.

काळ्या मनुकामध्ये प्रथिने, कार्ब, फायबर, साखर, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक घटक असतात. हे अशक्तपणापासून हृदय, बीपी, हाडे, पोट, केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. L

*चला तर, त्याच्या आश्चर्यकारक फायद्यांविषयी जाणून घेऊया…..* 


*पचन संस्था...*


काळ्या मनुकामध्ये अधिक फायबर आढळते. याचे दररोज सेवन केल्यास पाचन तंत्राच्या सर्व समस्या दूर होतात. यासह, हे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते, ज्यामुळे पोट चांगले राहते आणि बर्‍याच समस्यांपासून मुक्ती मिळते.

*ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमध्ये फायदेशीर...*


काळ्या मनुकामध्ये बोरॉन हा घटक आढळतो, जो हाडांच्या विकासासाठी ओळखला जातो. या व्यतिरिक्त त्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण देखील असते, जे हाडांची घनता मजबूत करते. ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येमध्ये काळ्या मनुका खूप उपयुक्त आहेत.

*अशक्तपणाची समस्या दूर करते...*


आजकाल, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, रक्त कमी होण्याची समस्या बर्‍याच लोकांमध्ये दिसून येत आहे. विशेषत: स्त्रियांमध्ये हा आजार अगदी सामान्य आहे. परंतु, दररोज काळ्या मनुकाचे सेवन केल्यास रक्ताची कमतरता फार लवकर दूर होते.

*हाय बीपीची समस्या नियंत्रित करते...*


पोटॅशियम आणि फायबर हे दोन्ही घटक उच्च रक्तदाब नियंत्रित करतात, असे मानले जाते. काळ्या मनुकांमध्ये या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणत आहेत, त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.


*हृदय निरोगी ठेवते...*


बॅड कोलेस्ट्रॉल ‘एलडीएल’ हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याच्या कारणांपैकी एक मानले जाते. काळ्या मनुकामधील पॉलिफेनॉल आणि फायबर रक्तातील कोलेस्टेरॉल आणि चरबी काढून टाकण्याचे काम करतात. अशाप्रकारे, काळ्या मनुकाचे सेवन हृदयाला सर्व गंभीर समस्यांपासून वाचवण्यासाठी कार्य करते.

*केसांसाठी फायदेशीर...*


शरीरात लोह आणि व्हिटामिन सी सारख्या पोषक तत्वांचा अभाव हे देखील केस गळण्याचे एक कारण आहे. काळ्या मनुकाचे पुरेसे सेवन केल्याने शरीरातील या पोषक तत्वांची कमतरता दूर होते, ज्यामुळे केस गळण्याची समस्या नियंत्रित होते आणि केसांची वाढ सुधारते. काळ्या मनुका पांढर्‍या केसांची वाढ नियंत्रित करते.

*आपली त्वचा चमकदार करते...*


काळ्या मनुकामध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात, जे त्वचेला अनेक समस्यांपासून वाचवतात. या मनुका नियमित खाल्ल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी होते.


*स्मरणशक्ती सुधारते...*


जर तुमची स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागली असेल तर, तुम्ही नक्कीच काळी मनुका खावी. त्यामध्ये उपस्थित अँटीऑक्सिडेंट घटक स्मरणशक्ती बळकट करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते.

*कशा सेवन कराल काळ्या मनुका...?* 


काळ्या मनुकाच्या औषधी गुणांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी 7 ते 8 काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी उठून ते पाणी प्या आणि मनुका चावून खा. मनुका खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नका. याशिवाय आपण त्या मनुका कोणत्याही पदार्थामध्ये मिसळू

न देखील खाऊ शकता.


*डॉ. सुनील इनामदार,




🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


अधीक महिना आहे...खरा श्रावण नेमका कधी?

 अधीक महिना आहे...खरा श्रावण नेमका कधी? यंदा काय झालाय गोंधळ? पहा दाते पंचांगच्या दातेंच मत....🙏


विधानसभा कामकाज : राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

 विधानसभा कामकाज :


राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी


– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार


            मुंबई, दि. 17- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


            हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले. 


            बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.  


000

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात


               मुंबई, दि. 17 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली.  


            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते.   

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय.

 विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय.

            मुंबई, दि. 17: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.   


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा परिचय विधानसभेत करुन दिला.

ला.


Featured post

Lakshvedhi