अधीक महिना आहे...खरा श्रावण नेमका कधी? यंदा काय झालाय गोंधळ? पहा दाते पंचांगच्या दातेंच मत....🙏
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 17 July 2023
विधानसभा कामकाज : राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
विधानसभा कामकाज :
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार
मुंबई, दि. 17- राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी आपत्कालिन आराखडा तयार करण्यात आला आहे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. याशिवाय, बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील कायदा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हवामान विभागाने येत्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. कालच यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही लवकरच मदत मिळेल, असे त्यांनी सांगितले.
बीटी बियाण्यांप्रमाणेच इतर बोगस बियाणे आणि खते विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई राज्य शासन करेल. त्या अनुषंगाने विधिमंडळात कायदा आणला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
000
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरुवात
मुंबई, दि. 17 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आज विधानसभेत वंदेमातरम् आणि राज्यगीताने झाली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते.
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय.
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन मंत्र्यांचा परिचय.
मुंबई, दि. 17: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर आठ नवीन मंत्र्यांचा परिचय आज विधानसभेत करुन दिला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा परिचय विधानसभेत करुन दिला.
ला.
*उंबरा •••* उंबरठा
*उंबरा •••*
उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड,रुंद आणि सपाट लाकूड.*दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) उंबराचा वृक्ष.* म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा उंबराच्या खोडापासून बनत असे.या वृक्षाच्या नावावरुनच दाराच्या चौकटीत बसवायच्या या लाकडाचं नाव उंबरा असे पडले असावे.उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे.
साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे.२१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली. *औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील.* तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील.*या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते.*
काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पुजा न चुकता करायची.*उंबरठ्यावर नृसिंहलक्ष्मीचे स्थान असते.तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते. घरात कोण,कसे, काय घेऊन जातेय त्यावर त्याचे ध्यान असते.*
उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठ्याला...उंबरठा म्हणजे, दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी.पण,किती अर्थ होता या लाकडी पट्टीला. चौकटी बाहेर पाऊल टाकायला पुर्वी कुणीही धजत नसे.सातच्या आत घरात हा पुर्वीच्या लोकांचा प्रघात होता.आता तर कुणी बाराच्या आतही घरात येत नाही. पुर्वी बायका म्हणायच्या कि आमच्या उंबरठ्याचा गुण आहे, *आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेक घरात आली कि तीला आमचे गुण लागलेच म्हणून समजा. हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतिक मानला जायचा.* ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का..? ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस कुणाला नसतो असे म्हणतात.आओ जाओ घर तुम्हारा.*सणवार आला कि उंबरठा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे.* दारावर तोरण बांधले जायचे. तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय.आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते. काहीच आडपडदा नको. कोणीही उपटसुंभ येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो. ना मानसन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण ?
*नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांघत घरात प्रवेशते.* उंब-याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो. घरातल्या उंब-याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उंबरा असते एक मर्यादा.*उंबरा असते एक सीमारेषा.उंबरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट..!*
*बाहेरुन घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उंबरा. प्रवेशात असलेल्या घरातल्या चालीरीतींना मान देत आपण वागायचं आहे हे उंबऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरा.*
उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान.उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं आहे. *उंबरठे झिजवल्या शिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा खरंच.* पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जागांचा सामना करणं सोपं होत असतं. अजून एक गोष्ट इथे नमूद करायलच हवी. ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं.हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं.
*उंबरा म्हणजे लक्ष्मण रेषा.जे जे अपवित्र असेल,वाईट असेल त्या वस्तू असतील,विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत थारा नाही.* मग ते काहीही असु शकते. भ्रष्टाचाराचा पैसा असेल, कुलक्षणी मित्र असतील, व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल,वाईट विचार असतील त्यांना उंबऱ्याच्या आत स्थान नाही. *म्हणूनच जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उंबऱ्याच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा.* म्हणून पुर्वीच्या घरांना ओसऱ्या असत. चहापाणी,गप्पा बाहेरच व्हायच्या. घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणी कधी नाही हे कोण आलंय याचे भान असायचे. आता काय भावोजी भावोजी करत असेल त्या अवतारात बाहेर.घरातील संस्कार,जेष्ठांचे वर्तन,मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तीमत्व ठरवते.*उंबरा म्हणजे मर्यादा. जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते,सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उंबऱ्याची मर्यादा असते.* ज्यावेळी नदी,सागर मर्यादा ओलांडतात तेव्ह जलप्रलय येतो. *तसेच उंबऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे.*
म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल.
*एकुणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली, आपण ती ध्यानात ठेऊ,उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेऊ.*
लेखक - अज्ञात
चातुर्मास सुरू झाला
चातुर्मास सुरू झाला चातुर्मासात सृष्टी चालक श्री विष्णू निद्रावस्थेत जातात मग ह्या सृष्टीचा कार्यभार चार महिने कोणकोणत्या देवता चालवतात पहा 👆👆
कथा चालू होती
😂 कथा चालू होती.
कथाकार म्हणाला - "मी तीन प्रकारच्या लोकांना सर्वात दुर्दैवी मानतो.
नवीन कपडे असताना जुने कपडे घालणारा पहिला.
दुसरे, ज्याच्या घरात गव्हाचे डबे भरलेले असतात तो उपाशी राहतो.
असे बोलून कथाकार शांत झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आले.
भक्तांनी विचारले, आता तिसऱ्या दुर्दैवी व्यक्तीबद्दल सांगा, प्रभु.
मग कथाकार भरल्या गळ्याने म्हणाला -
तिसरा माणूस तो आहे जो पैसा असूनही बायकोच्या भीतीने पिऊ शकत नाही!
हे ऐकून सर्वच भक्त रडू लागले!
हॅपी गटारी 😆😆
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...