सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 15 July 2023
भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव.....*
*भारतीयांसोबत मिठाचे जीवघेणे कारस्थान! WHO चा मोठा इशारा, या एका गोष्टीमुळे वाचेल 70 लाख लोकांचा जीव.....*
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका ताजा अहवालामुळे आपल्या जेवणाची चव कमी होऊ शकते. WHO च्या या अहवालानुसार, जगभरात जवळपास 18 लाख 90 हजार लोक मिठाच्या (Salt) अधिक सेवनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत. या अहवालात WHO ने इशारा देत, मीठ कशामुळे जीवघेणे ठरत आहे, हे सांगितले आहे. या अहवालानुसार, जगातील केवळ 3 टक्के लोकच मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करत आहेत.
*गरजेपेक्षा अधिक मिठाचे सेवन जीवघेणे...*
या अहवालानुसार, आवश्यकतेपेक्षा अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचे कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर 10.8 ग्रॅम एवढा आहे. तर WHO ने प्रति व्यक्ती मिठाच्या वापराची कमाल मर्यादा 5 ग्रॅम एवढी निश्चित केली आहे. मात्र, आणखी एक पाऊल पुढे टाकत, 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांनी हे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षाही कमी करायला हवे आणि लहान मुलांच्या बाबतीत हे प्रमाण आणखी कमी असावे, शी शिफारस WHO ने केली आहे.
*हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी केले जाऊ शकतात...*
WHO नुसार, जर मिठाचे प्रमाण कमी करता आले तर जगभरात दर वर्षी हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण बरेच कमी केले जाऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, मिठाचा वापर कमी केलास, 2025 पर्यंत 22 लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि 2030 पर्यंत जवळपास 70 लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. जे सध्या अधिक मिठाच्या सेवनामुळे हृदयरोगी बनत चालले आहेत, असा WHO चा अंदाज आहे. अर्थात सध्या होत असलेल्या मृत्यूचे प्रमाण 3 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.
*भारताला मिळाले असे रेटिंग...*
या अहवालात मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर 1 ते 4 दरम्यान आहे. 1 सबसे म्हणजे सर्वात कमी आणि 4 म्हणजे सर्वाधिक स्कोर आहे. 1 मध्ये असे देश आहे, ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. 2 स्कोर वर असे देश आहेत ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. याच बरोबर ज्या देशात पॅकेट बंद पदार्थांवर सोडियमचे प्रमाण सांगितले आहे. भारताचा स्कोर दोन आहे. 3 स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच 4 स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले, असे किमान दोन अनिवार्य पॉलिसी नियम तयार केले.
*WHO चा इशारा...*
WHO नुसार, भारतात पाकीट बंद अन्ना वर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही. मग, पॅकेज्ड फूड मगते चिप्स असोत अथवा कुठलाही पदार्थ, त्यात प्रमाणापेक्षा अधिक मिठ टाकले जाते. मिठ एक एडिक्टिव अर्थात सवय लागणारा पदार्थ आहे. तसेच जे अन्न अधिक चटपटीत असते, त्याची सवय फार लवकर लागते. याच धारणेने बाजारात अधिक चटपटीत मसाल्यांचे चिप्स, नमकीन आणि बिस्किटांची विक्री केली जाते.
*कुमार चोप्रा,*
*सुनील इनामदार.*
🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺
सामाजिक उपक्रम
l Philse: भाऊंच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त चांभारखिंड तिन्ही बालवाडीत खाऊ आणि वही वाटप केलं!:
आणि जि.प.शाळा,चांभारखिंड-मुलांना खाऊ वाटप केले.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख
मुंबई, दि.15: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’,असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे
रवींद्र महाजनी यांच्या निधनानेएक रुबाबदार अभिनेता गमावला
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, 15 : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, रवींद्र महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसायचे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.
0000
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि.15:- मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
*****
रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी
: सुधीर मुनगंटीवार
मुंबई : 'झुंज' या चित्रपटातून 1975 साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात 'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
000
दिलखुलास, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या
दिलखुलास, 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेच्या
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांची मुलाखत
मुंबई, दि. 14 : पावसाळ्यात मुंबई मध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच पावसाळ्यातील आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांशी समन्वय करून नियोजन करण्यात आले असल्याचे संचालक महेश नार्वेकर यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन हा आपत्ती व्यवस्थापनाचा प्रमुख भाग असून यामध्ये बचाव, शोध आणि शून्य मृत्यू हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. पीडितांना आपत्कालिन काळात मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दलाकडून त्वरित प्रतिसाद देण्यात येतो. त्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येतो. शासन-प्रशासन यंत्रणेच्या जोडीने मुंबई महापालिकेमार्फत आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात सूक्ष्म नियोजन करून कोणकोणती कामे करण्यात येतात तसेच कोणती खबरदारी घेण्यात येते, याबाबतची सविस्तर माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि.15, सोमवार दि.17 आणि मंगळवार दि. 18 जुलै 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 18 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASH
TRADGIPR
0000
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...

