Friday, 14 July 2023

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

 राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाही


            मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.


            मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग .


            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.


इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे: 


छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.


दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील –सहकार.  


राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास.


सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय.


हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य.


चंद्रकांतदादा बच्चू पाटील –उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य.


विजयकुमार कृष्णराव गावित – आदिवासी विकास.


गिरीष दत्तात्रय महाजन – ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन.


गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता.


दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम).


संजय दुलिचंद राठोड – मृद व जलसंधारण.


धनंजय पंडितराव मुंडे – कृषि.


सुरेशभाऊ दगडू खाडे – कामगार.


संदीपान आसाराम भुमरे– रोजगार हमी योजना व फलोत्पादन.


उदय रवींद्र सामंत –उद्योग.


प्रा.तानाजी जयवंत सावंत – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.


रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून).


अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन.


दीपक वसंतराव केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा.


धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन.


अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण.


शंभूराज शिवाजीराव देसाई – राज्य उत्पादन शुल्क.


कु. अदिती सुनील तटकरे – महिला व बालविकास.


संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे.


मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

.


अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.


०००००



4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई

 4 हजार 277 खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसवर कारवाई ;


1 कोटी 83 लक्ष रूपयांची वसूली


            मुंबई, दि. 14 : राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांतील ‘वायुवेग’ पथकांमार्फत 14 हजार 161 खाजगी बसेसची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 4 हजार 277 खाजगी बसेस नियम मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने या बसेसना तपासणी प्रतिवेदने जारी करुन प्रकरणे नोंदवित कारवाई करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमार्फत 1 कोटी 83 लक्ष तडजोड शुल्काचा दंड वसूल करण्यात आला आहे.


            तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वात जास्त 1702 बसेस वर कारवाई करण्यात आली. विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या 890 बसेसवर; योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेली 570 खाजगी बसेसवर, तर 514 बसेसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले असून त्यावर कारवाई करण्यात आली.


            शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची व इतर गुन्ह्यांबाबत तपासणी करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी 16 मे ते 30 जून 2023 दरम्यान विशेष मोहिम राबविली. सदर तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करतांना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकरणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन दर आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची राज्यभर व्यापक तपासणी करण्यात आली. त्यानंतर उक्त नमूद विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसेसवर कारवाई करण्यात आली.


विविध गुन्ह्यांसाठी कारवाई


                 मोटार वाहन कर न भरणाऱ्या 485 बसेस, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या 293 बसेस, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतुक करणाऱ्या 227 बसेस, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणाऱ्या 147 बसेस, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारी 72 बसेस, जादा भाडे आकारणी करणाऱ्या 40 बसेस व इतर गुन्ह्यांमध्येसुद्धा विशेष तपासणी मोहिमेच्या कालावधीत खाजगी बसेसवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून सदर व्यापक मोहिम राबविण्यात आली.


********

भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप

 भारताची अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी वैज्ञानिकांचे अभिनंदन


            मुंबई, दि. 14 :- चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.


            शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘चांद्रयान-3 ही मोहीम भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचे प्रतिक आहे. आपल्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात देखील भारत अग्रेसर असल्याचे सिद्ध केले आहे. चांद्रयान मोहीम भारतच नव्हे, तर जगासाठी महत्त्वपूर्ण अशी आहे. यातून पुढे अनेक वैज्ञानिक, संशोधन प्रकल्पांना चालना मिळेल, असा विश्वास आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारत सरकारने आपल्या वैज्ञानिकांना सातत्यपूर्ण असे पाठबळ आणि प्रोत्साहन दिले आहे. आपल्या तरूण वैज्ञानिकांसाठी हा क्षण प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या अवकाशातील या कामगिरीची जगाच्या इतिहासात गौरवाने नोंद होईल, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.   


0000




 


वृत्त क्र. 22

फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!

 सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!


दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात.

अधिकृत नाही


कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा.


ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत.


त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील.

हे सर्व फसवणूक आहे.


त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका.


कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका.


माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे!


कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!! दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात. अधिकृत नाही कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा. ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील. हे सर्व फसवणूक आहे. त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका. कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका. माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे! कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

 सर्व फ्लॅट / घरमालकांना हाय अलर्ट, सुरक्षिततेचा इशारा सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा !!!


दरोडेखोरांनी वापरलेले घरफोडीचे नवीनतम तंत्र. घरोघरी जाऊन ते खोटे बोलत आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालयाचे शिक्का आणि लेटर हेड आहे आणि ते पुढील जनगणनेसाठी प्रत्येकाकडे वैध ओळखपत्र असल्याची पुष्टी करण्याचा दावा करतात.

अधिकृत नाही


कृपया ही माहिती प्रत्येकाशी शेअर करा.... तुमचे शेजारी, गट, कुटुंबे. बातमी पसरवा.


ते सर्वत्र फिरत आहेत आणि ते सादर करण्यायोग्य दिसत आहेत. ते तुमच्या घरी येतील आणि म्हणतील मी आयुषमान भारत सरकारच्या योजनेशी संबंधित आहे आणि मला तुमचा फोटो/फिंगरप्रिंट्स घ्यायचे आहेत.


त्यांच्याकडे लॅपटॉप, बायोमेट्रिक्स मशीन आणि सर्व नावांची डेटा यादी आहे. ते तुम्हाला सर्व डेटा सूची नाव देखील दर्शवतील आणि अतिरिक्त माहिती विचारतील.

हे सर्व फसवणूक आहे.


त्यांना कोणतीही माहिती देऊ नका किंवा शेअर करू नका.


कृपया तुमच्या घरातील आणि समाजातील महिला सदस्यांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सांगा की त्यांनी ओळखपत्र दाखवले तरीही त्यांना तुमच्या घरात येऊ देऊ नका.


माहिती आणि जागरूकता यासाठी मी ही पोस्ट शेअर करत आहे!


कृपया इतर सर्व ग्रुप्स आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा.🙏

निरोगी जीवनशैलीसाठी*

 *निरोगी जीवनशैलीसाठी* 


डान्स किंवा नृत्य ही एक कला आहे. ही कला भाव व्यक्त करण्यासाठी असली तरी शारिरीक हालचालीसाठी उत्तम पर्याय आहे दे तुम्हाला प्रेरणा देत राहील. सर्व सामन्यांपैकी डान्सर हे नेहमी निरोगी राहतात आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करतात. डान्स किंवा नृत्य करणे हा सक्रिय राहण्याचा आणि एखाद्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा उत्तम मार्ग आहे.

तुमचे घर स्वच्छ करा

स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते. झाडून काढणे. धूळ पुसणे आणि फरशी पुसणे या अशा गोष्टी करुन घरात स्वच्छता ठेवू शकता आणि या सर्व गोष्टी रोज करत असाल तर तुमच्या दैनदिन कामामध्ये तुम्हाला मदत होईल.

टिव्ही पाहात व्यायाम करणे

टिव्ही पाहताना जर तुम्ही काही शारीरिक हालचाल करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या शारीरिक हालचालींमध्ये सीट-अपस मारणे, साधे खांदे वक्राकार फिरवणे किंवा स्ट्रेचिंग करणे अशा गोष्टी करता येऊ शकतात.

जेव्हा शक्य आहे तेव्हा चाला.

चालणे ही अशी दिवसभरातील सामान्य क्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती दररोज ठराविक पाऊले चालतो. पण ज्या लोकांना दिवसभरात दिर्घकाळ चालण्यासाठी वेळ मिळत नाही ते जवळच्या ठिकाणी चालत जाऊ शकता. बाईक किंवा कार अशा कोणत्याही वाहनाने जाण्याऐवजी जर जवळच्या दुकानात तुम्ही चालत गेलात तर तुमची शारीरिक हालचाल होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल.

नियमित योगा केल्यात तुम्हाला लवचकिता मिळेल आणि तुम्हाला तणावातून मुक्ती मिळेल. योगा ही एक सामान्य क्रिया आहे जी तुमचे मन शांत करते आणि शरीराला उर्जा प्रदान करते.

प्रमोद पाठक

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी

 विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी

- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


            मुंबई, दि. 13 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.


            प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, आघारकर संशोधन संस्थेचे प्रसाद कुलकर्णी, पोषण तज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव इम्तियाज काझी, अवर सचिव प्रमोद पाटील आदी यावेळी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त केंद्र व राज्य शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. विभागाने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांना तृणधान्य पिकांची पौष्टिकता लक्षात येईल. पोषण हा विद्यार्थ्यांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आहारामध्ये तृणधान्यांचा (मिलेटस्) वापर करावा. हे करीत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्याअनुषंगाने दररोज खिचडीसारखे पदार्थ देण्याऐवजी त्यात विविधता आणण्याची सूचनाही त्यांनी केली.


            यावेळी उपस्थित सदस्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले पोषण, त्यांची आवड या अनुषंगाने उपयुक्त सूचना केल्या.


00000

Featured post

Lakshvedhi