Tuesday, 11 July 2023

शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

 शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने१३ जुलै रोजी वाहतुकीत बदल

            पुणे, दि. १० : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने व अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.


            वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून १३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायं. ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.


            जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक : सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.


            वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. 


            सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हवीतील वाहतूक: पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.


            वाहतुकीस लावलेले निर्बंध १३ जुलै रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.


00

Monday, 10 July 2023

खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*

 *खानदानी ठेवा(Hereditary diseases).....*


आई वडील आजी आजोबा यांच्याकडून जसे आपल्याला पैसा,घर, दाग दागिने हे इस्टेट या स्वरूपात मिळतात त्याचप्रमाणे दमा, डोकेदुखी, Constipation पासून ते Obesity, BP, Diabetes, Thyroid ते टक्कल असा आनुवंशिक रोगांचा अमूल्य ठेवा सुद्धा मिळत असतो.


आमच्या कुटुंबात पिढ्यानुपिढ्या हे आजार आहेत असे सांगणारे खूप भेटतात परंतु हा आनुवंशिक रोगांचा शाप नष्ट करण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही.


हे प्रयत्न खूप च अवघड आहेत असच सर्वांना वाटते किंवा घरी सगळ्यांना आहे म्हणून मला सुद्धा हा आजार झालाय किंवा होईल अशीच धारणा असते सगळ्यांची.


परंतु योग्य lifestyle follow केली, चुकीच्या गोष्टी टाळल्या की आनुवंशिक आजार सहज दूर करता येतात पण एकवेळ आम्ही चार गोळ्या जास्त घेऊ पण पथ्य सांगू नका, खाण्यावर बंधन घालू नका असाच ट्रेण्ड दिसतो हल्ली.


रोग होऊ च नये म्हणून प्रयत्न करणे हे खूप कमी खर्चाचे आणि सोपे आहे. जीभेवर थोडासा संयम ठेवला की 50% लढाई जिंकली च म्हणून समजा. कारण महागडे उपचार घेऊन सुद्धा त्रास कमी होत नाहीत असे आजार खूप बळावले आहेत हल्ली नवनवीन tests आणि investigation ची भर पडत आहे. या सगळ्यापासून लांब रहायचे असेल तर आज पासून च Healthy lifestyle चा अवलंब करा.


वेळच्या वेळी जेवण, अती तिखट, खारट आंबट पदार्थ कमी खाणे, सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे, चौरस आहार, नियमित व्यायाम, दोन्ही जेवणानंतर शत पावली, त्या त्या ऋतू मध्ये उपलब्ध असलेली फळे, भाज्या खाणे, Junk food न खाणेह्याच तर गोष्टी healthy lifestyle मध्ये येतात.


खरंच खूप अवघड आहे का हे follow करणं?

एकदा करून तर पहा. आपसूक तुमच्या लक्षात येईल की छोट्या छोट्या तब्येतीच्या तक्रारी कोणतेही औषध न घेता कमी करता येतात.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


तंबाखू मुक्त करण्याबाबत

 


भात झोडपणी स्वस्तात मस्त पहा तर खर,शेअर करा

 


पित्ताशयातील खडे

 पित्ताशयातील खडे


 आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


पित्त दोष: त्याच्या अत्याधिक वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात दगड तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे.

कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते जे संपूर्णपणे पित्ताशयामध्ये जास्त चिकट पदार्थ तयार करतात.

वात दोष: पित्त आणि कफ दोषांच्या मिश्रणात कोरडेपणा वाढतो ज्यामुळे दगड तयार होतात.


 ◆पंचकर्म चिकित्सा◆

आयुर्वेदात पंचकर्म चिकित्सेला खूप महत्त्व आहे एका ठिकाणी म्हंटल आहे चुकीचा आहार आणि चुकीच्या दिनचर्येमुळे पित्त प्रधानआम दोष आपल्या शरीरात वाढतो आणि ऋतूनुसार पंचकर्म न केल्यामुळे हा आजार दिवसेंदिवस वाढू लागला आहे या आजारावर पंचकर्मातील वमन विरेचन तसेच औषधीय स्नान चिकित्सा, तसेच आवाहन स्वेद या क्रीया केल्यास रूग्णाचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.


आयुर्वेदाने यावर काही रामबाण उपाय व औषधी सुचवल्या आहेत ज्याचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास रुग्णाचे खडे विरघळण्यास निश्चितच मदत होते.

◆आयुर्वेदिक उपचार व घरगुती उपचार◆


*कडुनिंब आणि मोठी वेलची यांचे चूर्ण मिसळून खाल्ल्याने पित्तदुखी दूर होते.


*मक्याचे तंतू किंवा केस पाण्यात उकळून त्याचे पाणी प्या. यामुळे काही दिवसात पित्ताचे खडे बरे होतात


*रोज आल्याचा चमचाभर रस घेणे देखील फायदेशीर आहे

 

*कुळीथ मुठभर पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी उठून प्यावे

आहारात कुळीथाचा त्याच्या डाळीचा समावेश करा


*ग्लासभर सफरचंदाच्या रसामध्ये चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर मिसळल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.


**रोज एक चमचा हळद कोमट पाण्यासोबत घेतल्यास खडे विरघळण्यास मदत होते.


https://chat.whatsapp.com/HOiEuQyiTqxLY1sb5eVRd1


*गाजर,काकडी रस प्रत्येकी100 मिली एकत्र करुन दिवसातून दोनदा प्यायल्यास फायदा होतो.


*सकाळी रिकाम्या पोटी एक मध्यम लिंबाचा रस आठवडाभर प्यायल्याने फायदा होतो.


*नाशपाती मध्ये आढळणाऱ्या रासायनिक घटकांमुळे खडे विरघळण्यास मदत होते.


*गोमूत्र:तुमच्या आयुर्वेद तज्ञाच्या निर्देशानुसार 30 मिली ते 40 मिली ताजे गोमूत्र फिल्टर करून सकाळी रिकाम्या पोटी घेतले जाऊ शकते. हे पित्त प्रवाह नियंत्रित करते, अतिरिक्त कोलेस्टेरॉलशी लढा देते, यकृत शुद्ध करते, कफ पचवते आणि विकृत वात व्यवस्थापित करते.


*भृंगराज:यकृतावर भृंगराजची मुख्य क्रिया पित्तप्रवाह सुधारते. हे एक उत्कृष्ट तहान,भूक वाढवणारे औषध आहे आणि पचनाला चालना देते आणि यकृत उत्तेजक म्हणून कार्य करते. त्यामुळे वात कमी होतो.


*सैधव /रॉक मीठ:हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय असू शकतो जो तुम्हाला पित्तचा प्रवाह वाढवण्यास मदत करू शकतो. तुम्हाला फक्त रिकाम्या पोटी नाश्ता करण्यापूर्वी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा रॉक सॉल्ट किंवा सैधव . हे पेय घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सुमारे ४५ मिनिटे झोपावे लागेल. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने परिणामकारक परिणाम दिसून येतील.


*पिक्रोराइजा कुरोआ (किटनी) :

हे लिव्हर ला उत्तेजन देऊन पित्ताचे कार्य सुरळीत करत

 *गोखरू काढा किंवा पावडर घेणे लाभप्रद


*इसबगोल हे उत्तम असे विरघळणारे फायबर आहे. याच्या सेवनामुळे पोटात फायबरचे प्रमाण योग्य राहते आणि पित्ताशयातील खड्यांचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.


*बर्बेरिस अरिस्टाटा:याला दारुहरिद्र असेही म्हणतात. हे पित्त प्रवाह अवरोधित करण्यात मदत करते आणि अशा प्रकारे अडथळ्यामुळे होणारी तीक्ष्ण वेदना कमी करते. सतत वापर केल्याने, आपण नैसर्गिकरित्या पित्त खडे विरघळू शकता.


* मिल्क थिस्ल नावाच्या गोळ्या बाजारात मिळतात.ज्यांच्यामुळे पित्ताशयातील खडे विरघळतात


* एक कप पाण्यात सिंहपर्णीच्या पानाचे एक चमचा चुर्ण टाकून अर्धा तास भिजवून ठेवा नंतर मध घालून ते पाणी प्या.

*गुळवेलीचा काढा घेणे ही फायदेशीर


*जास्वंदीच्या फुलांची पावडर चमचाभर एक चमचा मधात हा यावरती सगळ्यात बेस्ट उपाय आहे


*वासागुलुच्यादी कषायम,अविपित्तीकर चुर्ण,द्राक्षादी कषाय,वरूणादी कषाय,पटोलकतुरोहीन्यादी कषायम,त्रिविल लेहम,आरोग्यवर्धीनी, भुनिंबादी काढा,रोहितकारिष्ट इ. औषध रचना तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करता येते. अजूनही असंख्य औषधी आयुर्वेदात आहेत ज्याचा वापर निष्णात वैद्य रूग्ण बरा होण्यासाठी करत असतात.

ताम्र सिंदूर, हजरुल यहूद भस्म, मेदोहरविडंगदी लौह, फलत्रिकादी क्वाथ अश्मरीहर रस,श्वेत पर्पटी,गोखरू क्वाथ इ.यासारख्या औषधींचा उपयोग आयुर्वेदिक वैद्याच्या सल्याने व मार्गदर्शनाखाली करावा.


. आपल्याला ही यातील काही लक्षण जाणवायला लागल्यास आपण आपल्या विभागातील आयुर्वेदिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन लवकरच व्याधीमुक्त व्हावे हीच सदिच्छा.

आशा आहे आपणास लेख आवडला असेल


वैद्य. गजानन



महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या

 महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि पुरातत्त्व शास्त्राविषयीच्या


75 परिसंवाद मालिकेतील पहिला परिसंवाद संपन्न

       मुंबई, दि. 10 : पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र आणि क. जे. सोमैया इंस्टिट्यूट ऑफ धर्म स्टडिज यांच्या वतीने नुकतेच 6 ते 8 जुलै, 2023 या कालावधीत “महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाः पुरातत्त्व व संग्रहालयशास्त्राचे पुनरावलोकन व भविष्यातील दिशा ” या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या वैभवशाली भूतकाळाचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा इतिहास, समृद्ध वारसा आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयास अनुसरून ७५ परिसंवाद आयोजित करण्याची संकल्पना मांडली आहे. त्यातील पहिला हा परिसंवाद होता.


            छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक डॉ. सव्यसाची मुखर्जी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्धाटन झाले. पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या परिसंवादात इतिहासपूर्वकालीन, प्रागैतिहासिक, ऐतिहासिक आणि मध्ययुगीन महाराष्ट्रासह मंदिर स्थापत्य, शिलालेख आणि नाणकशास्त्र, महाराष्ट्रातील संग्रहालये, राज्याशी संबंधित जागतिक वारसा विषय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर विद्वानांनी शोधनिबंध सादर केले. तरुण विद्वानांसाठी समर्पित एक स्वतंत्र विभाग देखील आयोजित करण्यात आला होता.


            परिसंवादानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शन, फ्लिंटनॅपिंग आणि प्राचीन खेळांच्या डेमोसही छान प्रतिसाद लाभला. माजी संचालक डॉ. ए.पी.जामखेडकर यांच्या हस्ते समारो

प झाला.


जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे

 जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी २५ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे


मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन


       मुंबई दि. १० : क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारा सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक व युवकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडून अर्ज २५ जुलै २०२३ पर्यंत सादर करण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.


            जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरिता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०२१-२२ व २०२२-२३ या दोन वर्षाकरिता प्रत्येकी २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे प्रतिवर्षी एकूण ०६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.


पुरस्कार पात्रतेचे निकष :


(अ) युवक/युवती पुरस्कार


(१) पुरस्कारवर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कारार्थींचे वय १३ वर्ष पूर्ण असावे, तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.


(२) अर्जदार हा मुंबई शहर जिल्ह्यात सलग ५ वर्षे वास्तव्यास असला पाहिजे.


(३) अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्र इ. जोडावेत.


(४) केंद्र, राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील प्राध्यापक/कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.


(ब) संस्था युवा पुरस्कार


(१) संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था ५ वर्षे कार्यरत पाहिजे.


(२) संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १८६० किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० नुमार पंजीबद्ध असावी


(३) गुणांकनाकरिता संस्थेने केलेल्या कार्याची वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती, छायाचित्रे इ. जोडावेत.


            वरीलप्रमाणे पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज पाठविण्याची मुदत वाढवली असून इच्छुकांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज, दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल - दुसरा मजला धारावी पश्चिम मुंबई ४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


000

Featured post

Lakshvedhi