Wednesday, 28 June 2023

अवैध मच्छिमारी नावा (बोटी) जप्त करणार

 अवैध मच्छिमारी नावा (बोटी) जप्त करणार


- सुधीर मुनगंटीवार


मच्छिमार संघटनांच्या बैठकीत जाहीर केला निर्णय


 


            मुंबई, दि. 27 : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.


            मच्छ‍िमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुंबई येथे विविध मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रमेश पाटील यांच्यासह चेतन पाटील, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, राजन मेहेर, ज्योती मेहेर आदी मच्छिमार नेते उपस्थित होते.


            कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसाळ्यातील सागरी मासेमारी बंदी झुगारून काही मच्छिमार सागरी मासेमारी करीत असल्याची तक्रार उपस्थित मच्छिमार बांधवांनी केली तेव्हा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अवैध मासेमारी थांबविण्यासाठी पोलिस खात्याची मदत घेण्याच्या सूचना दिल्या.


            यावेळी बोलतांना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अवैध मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. या क्षेत्रात जर गैरव्यवहाराच्या तक्रारी असतील, तर मच्छिमार बांधवांनीच हा गैरव्यवहार थांबविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शासन मच्छिमार बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


            मत्स्यव्यवसाय विभागातील गैरव्यवहाराच्या तक्रारींसाठी एक स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक जारी केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी उपस्थित मच्छिमार संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेऊन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तत्परतेने प्रशासन यंत्रणेस निर्देश दिल्याबद्दल उपस्थित मच्छिमार बांधवांनी समाधान व्यक्त केले. 


००००

‘ही’ ६ लक्षणे दिसल्यास समजून जा शरीरास पाण्याची किंवा हर्बल ड्रिंक्सची गरज आहे.....*

 *‘ही’ ६ लक्षणे दिसल्यास समजून जा शरीरास पाण्याची किंवा हर्बल ड्रिंक्सची गरज आहे.....*


 शरीरास निरोगी आहार, पाणी आणि हर्बल ड्रिंक्स दिल्यास तुम्ही अनेक गंभीर आजारां पासून दूर राहू शकता.


signs that body needs detox,शरीरात ही लक्षणे जाणवल्यास समजून जा डिटॉक्सची गरज आहे.

What happens when your body is detoxing : शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाहेरून स्वच्छता ठेवणे आवश्यक नाही तर अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. ज्याला डिटॉक्सिफिकेशन असे म्हणतात. यामध्ये शरीरात साचलेली घाण वेगवेगळ्या प्रकारे बाहेर काढली जाते. ज्यामुळे शरीराचे सर्व अवयव योग्यप्रकारे काम करू शकतात. शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहते. यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकता.

 

डिटॉक्सिफिकेशनसाठी शरीरात मुख्यत: पाण्याची, हर्बल ड्रिंक्सची गरज असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते. दरम्यान ज्यावेळीस आपल्याला पाण्याची किंवा हर्बल ड्रिंक्सची गरज भासते तेव्हा शरीरात ६ महत्वाची लक्षणे दिसत असतात. ती लक्षणे ओळखा आणि काळजी घ्या.


*शरीराला डिटॉक्सची गरज असल्याचे सांगणारी लक्षणे...*


*१) नेहमी थकल्यासारखे वाटते...*

अनेकांना दिवसभर थकवा जाणवतो ज्यामुळे त्याच्या रुटीनच्या कामावर परिमाण होतो. अशावेळी चहा-कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्सचे सेवन न करता हर्बल ड्रिंक्स किंवा पाण्याचे सेवन करा. हे शरीर डिटॉक्स करण्याचा उत्तम मार्ग आहेत. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. डिटॉक्सिफिकेशन केल्यानंतर शरीराला हलके वाटते आणि एनर्जी लेव्हलही वाढते.


*२) वजन वाढते...*

वजन कमी करण्यासाठी हजारो प्रयत्न करुनही ते होत नाही कारण शरीर टॉक्सिन्सने भरलेले असते. यासाठी शरीरातील साचलेले विषारी पदार्थ आधी काढा. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा. निरोगी आहार खा, ज्यात फळे आणि भाज्यांचा समावेश असेल. विशेषतः यासाठी विशिष्ट प्रकारची योगासने देखील तुम्हाला मदत करू शकतात.


*३) बद्धकोष्ठता...*

बद्धकोष्ठता म्हणजे पचनसंस्थेत निर्माण होणारा अडथळा. ज्यासाठी फायबर युक्त आहार आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु असे असूनही बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहिली तर ते शरीराला डिटॉक्स करण्याचे लक्षण आहे. यावेळी पाण्यासह हर्बल पेये प्या, यात कोलन डिटॉक्स करण्यासाठी कच्च्या भाज्या आणि फळांचे सेवन करा. यावेळी भात, टाळसोबतच निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.


*४) निद्रानाश...*

जेव्हा शरीरात खूप विषारी पदार्थ तयार होतात, तेव्हा ते मेलाटोनिनची पातळी कमी करून तुमच्या शरीराच्या नैसर्गिक चक्रात अडथळा येतो. ज्यामुळे क्वचितच झोप येते किंवा अजिबात झोप येत नाही. डिटॉक्सिफिकेशनमुळे शरीराचे नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत होते, ज्यामुळे चांगली झोप येते.



*५) डोकेदुखी...*

शरीरात खूप विषारी पदार्थ तयार झाल्यास ज्यामुळे सतत डोकेदुखीची समस्या जाणवते. जंक फूज, प्रिझर्व्हेटिव्हज पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूच्या सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम करणारे विषारी पदार्थ तयार होतात, त्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा सामना करावा लागतो.


*६) त्वचेवर एलर्जी...*

जेव्हा यकृत आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात अपयशी ठरते तेव्हा शरीर त्वचेच्या मदतीने यकृताचे काम करण्याचा प्रयत्न करते. मुरुम, एक्जिमा, त्वचेवर पुरळ उठणे, फोड येणे इ. हे सर्व त्वचा शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रयत्नाचे परिणाम आहेत. अशावेळी भरपूर पाणी प्या.



*बॉडी डिटॉक्सचे फायदे...*


*१) शरीर डिटॉक्स केल्याने रक्त शुद्ध होते.


*२) मानसिक आरोग्य सुधारते.


*३) भूक चांगली लागते.


याशिवाय हार्मोन्सचे संतुलन सुधारते, चांगली झोप येते, पचनशक्ती वाढवणे आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते असे अनेक फायदेही मिळतात.


होमिओपॅथिक औषधे मुळावरच घाला घालतात त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे घेतलीत तर तुम्ही पूर्णपणे बरा होऊ शकता.


होमिओपॅथी मध्ये निश्चित कारण शोधून त्यावर उपचार केला जातो व तो तात्पुरता उपाय नसून कायम स्वरुपी अशात.


*डॉ. सुनील इनामदार.*


मुंबईत जुलै महिन्यात होणार राज्य नाट्य स्पर्धेतीलसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव

 मुंबईत जुलै महिन्यात होणार राज्य नाट्य स्पर्धेतीलसर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव


            मुंबई, दि. २८ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १० जुलै ते १४ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.


                   या महोत्सवात रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दि. १० ते १४ जुलै, २०२३ या कालावधीत हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम आलेले नाटक “इन द सेल ऑफ सर्व्हायवल”, हिंदी नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मोक्षदाह”, संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम नाटक “संगीत सुवर्णतुला”, संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मृगयाकलह:”, बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “प्रायश्चित” आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “वाचवाल का” या सर्वोत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण या होणार आहे.


                 मंगळवार दि. ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ६० व्या राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल. या समारंभात मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.


                 महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नाट्य महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 

केले आहे.


नियोजनबद्ध आणि पारदर्शक धोरणामुळेविदेशी गुंतवणुकीत राज्याचा पहिला क्रमांक

 नियोजनबद्ध आणि पारदर्शक धोरणामुळेविदेशी गुंतवणुकीत राज्याचा पहिला क्रमांक


- उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह


उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची 'दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मुलाखत


 


            मुंबई, दि. २८ : भारत विदेशी गुंतवणुकदारांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून वेगाने उदयाला येत आहे. नियोजनबद्ध व पारदर्शक धोरणामुळे राज्यात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आली आहे. यामुळे देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे, असे उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले.


            राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उद्योग विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांतर्गत विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. २०२२-२३ या वर्षांत महाराष्ट्रामध्ये १ लाख १८ हजार कोटींची सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. राज्यात विदेशी गुंतवणुकदारांसाठी देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय तसेच विदेशी गुंतवणुकीत राज्याला मिळालेल्या या यशाबद्दल उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी 'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून माहिती दिली आहे.


            ही मुलाखत गुरूवार, दि. 29, शुक्रवार दि. 30 जून 2023 आणि शनिवार दि. 1 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.


            ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि. 3 जुलै 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


000

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणारमहात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

 राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणारमहात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब दीड लाखावरून पाच लाख रूपये


            मुंबई, दि. 28 : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


   मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे होणारे लाभ व वैशिष्ट्ये :-   


            • राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे. विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. 


            • आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रती वर्ष 5 लाख रूपये एवढे करण्यात आले आहे.


            • दोन्ही योजनांचे एकच कार्ड, कार्ड वाटप लवकरच सुरू होणार


            • आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996, तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या 1356 एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रूग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे. 


            • मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण 2.5 लाख एवढी मर्यादा आहे. ती आता 4.5 लाख रूपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   


            • महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यांत 140 व कर्नाटक राज्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त 200 रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


            • स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या 74 वरून 184 अशी वाढविण्यात आली आहे. उपचाराच्या खर्च मर्यादेत 30 हजार रुपयांवरून प्रती रुग्ण प्रती अपघात 1 लाख रूपये, अशी वाढ करण्यात आली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.


0000

Jeevdaya, विरार,,advasi लोकांनी बनवली उत्पादने

 


खेल खेल मे अजिंक्य भारत

 






Featured post

Lakshvedhi