Tuesday, 20 June 2023

दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत

 दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत


            मुंबई, दि. 19 : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.


            राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.20 आणि बुधवार दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

 २६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता


कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई दि. १९ :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी, गडगडी, तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.


-----000-

विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांनासुधारित प्रशासकीय मान्यता

 विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांनासुधारित प्रशासकीय मान्यता


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पूनर्वसनबाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  



----000-----


महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता

 महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 19 :- राज्य शासनाचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मात्र, आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत बैठक झाली.


            यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या ‘आयआयटी’ येथे या मिशनची सुरूवात करण्यात यावी, नंतर यामध्ये अधिक सुसुत्रता आणण्यात यावी. शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण याव्दारे संनियंत्रण करु शकतो. शेती क्षेत्रासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे तसेच यासंदर्भातील आदर्श कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.


            ‘आयआयटी’चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी सादरीकरण केले. जागतिक दर्जाचे ड्रोन हब तयार करणे, मुख्यालय स्थापन करणे, त्याचे विकेंद्रीकरण करणे, या सर्व यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ड्रोन पोर्ट तयार करणे, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे, एकात्मिक यंत्रणा उभारणे, ही कामे याअंतर्गत करण्यात येतील. विविध क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडू शकतात. उद्योग क्षेत्रालाही याद्वारे चालना मिळेल, रोजगार निर्मितीलाही याद्वारे चालना मिळू शकेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


----000----

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीवाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार

 राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीवाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 19 :- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढवण बंदर उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली.


            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, 'जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी, सागरमालाचे सह सचिव भूषण कुमार, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वाढवण बंदरामुळे परिसराचे चित्र बदलणार आहे‌. उद्योग व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. वाढवण बंदराच्या परिसरात विविध विकासकामे राबविण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे. येथे मासेमारीसाठीही स्वतंत्र भाग असावा. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत. परिसरात जनतेच्या आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.


            केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल तसेच बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनीही वाढवण बंदर उभारणीसंदर्भात विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.


यावेळी वाढवण बंदर उभारणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.


            वाढवण बंदर उभारणीनंतर ते क्रमांक १ चे महसुली उत्पन्नाचे स्त्रोत राहील. 'जेएनपीटी' पेक्षा तीन पट भव्य असेल.


            केंद्र-राज्य ७४:२६ असा सहभाग असेल. राज्य शासन मेरीटाईम बोर्डामार्फत सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


-----000-----

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर

 *जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


*हे आहेत दुष्परिणाम.* 


◼️ *चक्कर येणे.* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


◼️ *ताण-तणाव.* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


◼️ *लठ्ठपणा वाढतो.* 

भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो... वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि किमान 20 मिनिटे व्यायाम करा...


◼️ *मेंदूचे कार्य बिघडते.* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


◼️ *चिडचिड.* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो...


*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,




निरोगी रहा, उत्तम आरोग्यासाठी टिप्स

 १) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही.


२) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही.


३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही.


४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही.


५) स्मरण शक्ती साठी रोज एक पेरू सलग १५ दिवस खाणे, मुलांना देणे.


६) वर्षातून एकदा सलग १५ दिवस गाजराचा रस घेतला तर कॅन्सर होत नाही.


७) रोज ४ सीताफळाची पाने खाणे आणि ३ किलोमीटर चालणे – पहिले १ किलोमीटर रेगुलर चालणे हात पुढे व मागे – पोटावरची चरबी निघून जाते , दुसरे किलोमीटर कॅटवॉक सारखे चालणे एक रेषेत पाय पडले पाहिजेत, आतड्याला पीळ पडला पाहिजे – अपचनाचा त्रास होत नाही, पोटावरची चरबी निघून जाते, स्वादुपिंड काम करू लागते व शुगरचा त्रास होत नाही आणि तिसरे किलोमीटर आर्मी परेड सारखे चालणे.


८) रोज एक चमचा पांढरे तीळ खाणे – हाडे मजबूत होतात.


९) ऐकू न येणे- चमचाभर कांद्याचा रस काढणे, एक थेंब मध टाकणे, कोमट पाण्यात घेऊन वस्त्रगाळ करणे व कानात टाकणे कानात कापूस टाकणे. ३ दिवस करणे किंवा ६ ते ७ दिवस करणे. १५ दिवस करणे


१0) शरीरशुद्धी साठी वर्षातून एकदा सलग ३ दिवस काही न खाता पिता फक्त ताजे ताक च पिणे. रात्री झोपताना थोडेसे पाणी चालेल. पहिल्या दिवशी काही होत नाही, संध्याकाळी थकवा जाणवल्या लागतो, लूझ मोशन सारखे होते. दुसऱ्या दिवशी पान त्रास होतो. तिसऱ्या दिवशी पूर्णपणे झोपून राहायला लागते. ४ थे दिवसापासून ८ दिवसापर्यन्त वरण भात खाणे – हिरवी मिरची ८ दिवस खाऊ नये.


११) जुलाबासाठी- चमचाभर मेथीचे दाणे अर्धा ग्लासात कोमट पाण्यात गिळणे.


१२) नाकाचे हाड वाढणे- ५ रिटा ३ काप पाण्यात टाकून १ चमचा सुंठ पावडर टाकणे आटवून एक कप करणे, वस्त्रगाळ करणे, काचेच्या बाटलीत ठेवून व रोज रात्री झोपताना २-२ थेम्ब नाकात ८ दिवस घालणे.


१३) मुळव्याधासाठी- अर्धा लिंबू व त्याच्यात सैंधव मीठ – ४ ते ५ चमचे टाकणे व लोणचे चाखल्यासारखे चाखणे. १० मिनिटात थांबते. वर्षातून ७ दिवस सकाळी व संध्याकाळी करणे. पोटपण सुटणार नाही.


१४ ) वर्षातून फक्त एकदा शुद्ध संजीवनी १५ दिवस पिणे (250 मिली लिटर ) किंमत रुपये १२६०/- .फक्त फुलांचा व फळांचा रस आहे. सरबता सारखेय आहे. पथ्य काही नाही. कितीही काम केले तरी थकवा येत नाही कंबर दुखी, गुडघे दुखी, BP चा त्रास निघून जाईल. उष्णतेचा, मुळव्याधाचा, केस गळतीचा त्रास निघून जातो.


15) लिंबू घेऊन त्याच्यावर खायचा सोडा टाकणे व दागिन्यांमुळे आलेल्या डागावर १ मिनिट चोळणे व तिसऱ्या मिनिटाला धुवून काढणे. सलग ७ दिवस केले तर डाग पूर्णपणे निघून जातात.


१६) ५ ते ६ चमचे दुघ घेऊन त्याच्यात लिंबू पिळायचा व अर्धा तास ठेवणे व चेहऱ्याला लावणे. आठवड्यातून एकदा करणे. कातडी गोल्डन रंगाची होते.


१७) तुळशीच्या पानांचा रस रात्री लावला व सकाळी धुतला तर ब्युटी parlour ला जायची जरूर नाही. मेकअप करायची गरज नाही. चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग निघून जातात.


१८) पोटाच्या आजारावर – वावडिंग चमचाभर वाटीभर पाण्यात रात्री भिजत घालणे, सकाळी उठल्यावर कडक पाण्यात उकळवून गाळून चमच्याने देणे.


१९) कानाच्या पडद्याला भोक – उसाचे कांडे घेणे, त्याला जाळात टाकून गरम करायचे व चमचाभर रस घेणे व एक थेम्ब मध टाकायचे, वस्त्रगाळ करणे व कानात टाकायचे, कापूस लावायचा.


२०) हात पायाला घाम येणे – सुपारीचे एक खांड – सकाळी व संध्याकाळी खाणे – १५ दिवस खाणे.


२१) लहान मुलांची छाती भरते, सर्दी झाली तर- अर्धा चमचा मोहरी घेऊन चेचायची व एक थेम्ब मध घालायचे – त्याच फक्त १ मिनिटं बाळाला वास द्यायचा.


२२) तुरटीच्या पाण्यात सलग ८ दिवस अंघोळ (३ महिन्यातून एकदा – असे वर्षातून ४ वेळा ) केले तर हात पायाला खाज येणार नाही, खरूज, नायटा गजकर्ण होणार नाही.

Cp....👆👆


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



_*(

Featured post

Lakshvedhi