Tuesday, 20 June 2023

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

 २६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता


कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई दि. १९ :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी, गडगडी, तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.

विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता

 विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाची बैठक

            मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पूनर्वसनबाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  

Monday, 19 June 2023

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशीकरण्यासाठी विशेष चौकशी समिती मुख्यमंत्र्यांची मान्यता

 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशीकरण्यासाठी विशेष चौकशी समिती

मुख्यमंत्र्यांची मान्यता


            मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

            महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग) ने विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुध्द गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते.

            यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.




०००

बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आज पर्यंत कोणी केले नसेल

 


बटाटवड्याचे एव्हढे अप्रतिम वर्णन आज पर्यंत कोणी केले नसेल 


🤣😛❤️😋


*फक्त तुझ्या गंधाने* 

*मम मोह अनावर होतो*

*रसनेचा लगाम सुटतो* 

*मी सहज ओढला जातो।*  


*पाहुन पिवळी तव कांती*

*मी अति भुकेला होतो* 

*हातात यायच्या आधी* 

*नजरेने खाऊन घेतो।* 


*मग पाव पांघरूनी वरती* 

*लसणीची चटणी भरूनी*  

*तळल्या मिरचीच्या संगे*

*मी तुजला उचलून घेतो।* 


*प्रकृती स्वास्थ्य वाद्यांचा*

*किती विरोध झाला तरीही* 

*हे प्रेम न माझे घटते* 

*आस्वाद तुझा मी घेतो।*

Washing machine invention

Great Indian invention, that's going to change all homes in this world. Central govt has released the patent rights to this inventor, under skill developments ministry.🤔 Waterless Washing Machin

e

 

मुळव्याध✍* मोड येणे

 *मुळव्याध✍*


गुदद्वाराच्या आतील बाजूस अगर काठावर असणाऱ्या शिरा फुगतात. त्यास मोडा सारखा आकार येतो.यालाच मुळव्याध म्हणतात. व मोडातून क्वचित प्रसंगी रक्त स्त्राव होऊन प्रचंड वेदना होतात. मोडामध्ये दाह व ठणका येतो.अनेक वेळा शौचास साफ न झाल्याने कुथावे लागते.व ही शिर अथवा चुंबळच बाहेर येऊन लोंबकळत

 उपाय-

१)नारळाच्या शेंडीची राख व्हँसलिन मध्ये कालवून आतील भागास बोटाने लावणे.

२)नारळाच्या शेंडीची राख एक चमचा व साखर दिवसातून ३वेळा रक्त थांबते.

३)लिंबा वर खायचा सोडा व सेंधव टाकून पुर्ण लिंबू चोखणे रक्त पुर्णपणे थांबतेच.

४)१/२चमचा जीरे,१/२ओवा पावडर रोज गरमपाण्यात

५)अक्रोडाच्या तेलात बारीक कापडाचा काकडा भिजवून गुदद्वाराच्या आत सरकवावा रोज ऐक महीने करा मोड गळून पडेल.

६)डिकेमली व पिंपळीची मुळी उगाळून रोज मोडास लावली असता मोड गळून पडतो.

७)सुरण सुकवून चुर्ण करावे व रोज गाईच्या दुधात घ्यावे.

८)गुदद्वाराच्या आत गाईचे जुनाट तुप लावावे.

९)रोज मुळा खावा दहादिवस रिलिफ मिळतो.

१०)अर्शकुठार १गोळी,गंधक रसायन एक गोळी ,आरोग्यवर्धिनी गोळी १गोळी रोज घेणे.

११)कण्हेरीचे मुळ मोडावर उगाळून लेप द्या.

१२)रोज सकाळ संध्याकाळ गरम पाणी घ्या.रात्री झोपताना त्रिफळा चुर्ण लावा.

१३)सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ व गोमूत्र दुखर्या भागास लावावे त्रास बरा होईल.

वरील उपाय करून मुळव्याधीतून कायमस्वरूपी मुक्त व्हा.

गजानन.


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न

 महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न


शेठ वालचंद हिराचंद यांच्या व्याख्यानमालेत 50 वे पुष्प ओम बिर्ला यांनी गुंफले  


 मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अॅ ग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.


महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात ललित गांधी हे पहिलेच अध्यक्ष आहेत, ज्यांचा राजभवन मुंबई येथे पदग्रहण सोहळा झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी हा पदग्रहण सोहळा झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन पदग्रहण सोहळा झाला. तर वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांना सन्माचिन्ह देऊन पदग्रहण सोहळा झाला. पदग्रहण सोहळ्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस, विविध देशाचे कॉन्सुलेट, उद्योजक, व्यापारी यांनी शुभेच्छा दिल्या. चेंबरच्या वतीने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचा चांदीचा कलश, शाल देऊन सन्मापूर्वक सत्कार करण्यात आला.  


भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उदगार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.


राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे. त्यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने राज्याचा विकास करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  


महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र चेंबरच्या चौफेर प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अध्यक्ष निवडीनंतर त्यांनी दिली.


लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन को. लि. चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, प्रिमिअर ऑटो इलेक्ट्रीक लि. चे माजी अध्यक्ष अरविंद दोशी, वालचंदनगर इंडस्टीज लि. चे कार्यकारी संचालक चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार झाला. अतिरीक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर , महाराष्ट्र चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश खाबणी यांचा सत्कार झाला.चेंबरचे ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभा

र मानले.

Featured post

Lakshvedhi