Wednesday, 14 June 2023

भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला.....*

 *भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं? फक्त भात खाताना १ गोष्ट लक्षात ठेवा, आहारतज्ज्ञांचा सल्ला.....*


वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण ब्राऊन राईस खातात. भात आणि वजनवाढ याबाबत लोकांमध्ये अनेक भेद मतभेद आहेत. वजन कमी करण्यासाठी भात कसा शिजवायचा, कोणत्या प्रकारच्या भाताचा आहारात समावेश करावा याबाबत क्लिनिकल डाएटिशियन नियती नाईक (कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई) यांनी अधिक माहिती दिली आहे. 


*वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचा तांदूळ खावा...?*

भारतीय आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे भात. देशभरातील जवळपास सर्व घरांमध्ये रोजच्या आहारात भात खाल्ला जातो. असे असून देखील खूप जास्त भात खाल्ल्याने वजन वाढते अशी टीका तांदुळावर केली जाते. प्रत्येक आहारामध्ये भात योग्य प्रमाणात खाल्ला जात असेल आणि ताटातील उर्वरित पदार्थ संतुलित असतील तर तुम्ही कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरता याने फारसा फरक पडत नाही. पण तरीही निवड करायचीच असेल तर, कमीत कमी प्रक्रिया केलेला किंवा अनपॉलिश्ड तांदूळ वापरणे हितावह आहे.


तांदुळावर प्रक्रिया जितक्या कमी केलेल्या असतील तितके त्यामधील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे कमी भात खाऊन देखील पोट भरते व वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते. ब्राऊन राईस, लाल तांदूळ, काळा तांदूळ हे असे काही पर्याय आहेत जे अनपॉलिश्ड असतात आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे यापेक्षा ताटामधील भाताचे प्रमाण व ताटातील इतर पदार्थ संतुलित आहेत की नाही याला जास्त महत्त्व असते.


*कोणत्या प्रकारचा तांदूळ खाणे टाळावे...?*

संतुलित आहारामध्ये जर भाताचा समावेश असेल आणि त्याचे प्रमाण नियंत्रणात असेल तर भात खाणे टाळण्याची अजिबात गरज नाही. पण तरीही जर भात खाणे टाळायचे असेल तर पॉलिश्ड तांदूळ खाणे टाळावे. तांदुळाचा प्रकार कोणताही असला तरी चालेल, पण तो जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरूपात असेल तर तब्येतीसाठी चांगला असतो.


फॅड डाएट्सचा जमाना आहे, कॉलीफ्लॉवर राईस किंवा ब्रोकोली राईस असे पर्याय मोठ्या प्रमाणावर येत आहेत. पारंपरिक तांदुळापेक्षा त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी असते पण या तांदुळांवर देखील खूप जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेली असते त्यामुळे हे पर्याय आरोग्यास हानिकारक आहेत.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


_*

घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*

 *घसादुखणे, खवखवणे, आग होणे, सूजणे, इन्फेक्शन यावर सोपे घरगुती उपाय.....*


*१) ७/८, मिरे कुटून एक ग्लास दुधात मंद आचेवर उकळावे मग अर्धा टि स्पून हळद, टाकून उकळून, गाळून घ्यावे. याने घसा सुटतो व दुखणं थांबेल.

   

*२) मेथीचे दाणे पाण्यात उकळून थंड करून प्यावे, मध तुम्ही चमचा भरून घ्या. घश्याची खवखव बंद होईल.

 

*३) लसुण खाल्ल्यास घशाला आराम मिळतो, कारणं यात प्रतिजैविके आहे.

 

*४) वेलदोडे दाणे व‌ साखर एकत्र चघळावे, हळद व गूळ एकत्र करून खावे.

  

*५) संशमनि वटि चघळावी, एक पेला भर पाण्यात तिन चार कडुनिंबाची पाने उकळून थंड करून त्यात एक चमचा भरून मध मिसळून याने गुळण्या कराव्यात. लगेच आराम मिळतो.

   

*६) पाण्यात बडिशेप उकळून, गाळून, मग मध मिसळून घ्यावे.

  

*७) मधात काही लवंगा टाकून, मग थोड्या वेळाने हे चाटण घ्यावे, घसा दुखणं थांबेल.

  

*८) घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळावा. याने जंतुसंसर्ग जातो.

 

*९) घसा खवखवत असल्यास खडिसाखर व चिमूटभर काथ जिभेवर ठेवून चघळावे, त्याने खुपचं आराम मिळतो.


*१०) त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून थंड करून प्यावे.

 

*११ मध, ज्येष्ठमध पावडर हळद व कोरफड गर एकत्र मिसळून हे चाटण दिवसभर थोडे थोडे घ्यावे.


*१२) खदिरादि वटि, एलादि वटी चघळावी. याने घसा दुखणं थांबेल.


*१३ आंब्याची पाने पाण्यात उकळून मग गुळण्या कराव्यात.


*१४) कोमट पाण्यात मीठ घालून याने गुळण्या कराव्यात.


*१५)एक प्रभावी काढा...

एक पेला भर पाण्यात लवंग, ज्येष्ठमध, काळे मिरे, हळद, दालचिनी, केशर, आले, गुळ, हे सर्व पदार्थ एकत्र टाकून अर्धं उकळावे. व गरम गरम, शेकत प्यावे. याने घशाची सूज, वेदना, जंतूसंसर्ग, जातो.


 वरील सर्व प्रकारचे उपाय करावेत. आराम पडेल नक्कीच...


*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


प्रारुप विकास योजनांसाठी विविध शहरांतील प्राधिकरणांना मुदतवाढ

  


प्रारुप विकास योजनांसाठी विविध शहरांतील प्राधिकरणांना मुदतवाढ


 


            प्रारुप विकास योजनांसाठी प्राधिकरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम-१९६६ च्या कलम २६ (१) मध्ये महानगरपालिका किंवा नियोजन प्राधिकरण, असा मजकूर टाकण्यात येईल व अध्यादेश प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


            सध्या पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना तयार करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरु आहे. महानगर प्रदेशाची लोकसंख्या १७ लाख १२ हजार असून ६ हजार ९०० चौ. कि.मी. क्षेत्र आहे. इतर नगर परिषदांप्रमाणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास प्रारुप विकास योजनेस मुदतवाढ देण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी अपुरा पडतो. राज्यातील नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांकरिता देखील विकास प्राधिकरणे असून महानगरांची विकास योजना तयार करताना त्यांना देखील कालावधी कमी पडू शकतो ही बाब विचारात घेऊन विकास योजना तयार करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.


-----०-----

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा

 बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुख्य सचिवांना निर्देश, प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक


 


            मुंबई, दि‌. १३ :- बोगस बियाणे विक्रेत्यांवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीच्या घटनांसंदर्भात चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्य सचिवांना हे निर्देश दिले.


राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांत भरारी पथके तयार करून बियाणे विक्रीवर लक्ष ठेवावे. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकताहेत की नाही, ते तपासावे. बोगस बियाणे विक्री करताना आढळलेल्यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता काटेकोर कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशात म्हटले आहे

.


0000



जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार

 जर्मनीची कुशल मनुष्यबळाची मागणी महाराष्ट्र पूर्ण करणार


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


 


            मुंबई, दि. 13 : “युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहे. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शविली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करू शकेल”, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


            युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत राज्यस्तरीय कृती गट स्थापन करण्यात आला आहे. गटाची बैठक अध्यक्ष शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रनजित सिंह देओल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, शालेय शिक्षण आयुक्त तथा कृती गटाचे सदस्य सचिव सूरज मांढरे आदी यावेळी उपस्थित होते.


            श्री.केसरकर म्हणाले, “युरोपियन देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. भारतामध्ये विशेषत: महाराष्ट्रामध्ये असलेली युवकांची मोठी संख्या आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता पाहता त्यांना युरोपियन देशांमध्ये रोजगाराची मोठी संधी आहे. जर्मनीच्या शिष्टमंडळाने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भेटीत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यानंतर आपल्या जर्मन भेटीत त्यांनी सामंजस्य करार करण्यास उत्सुकता दर्शविली असून त्यांच्या मागणीप्रमाणे महाराष्ट्रातील युवकांना जर्मनीच्या तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. या माध्यमातून जर्मनीची गरज पूर्ण होऊन राज्यातील युवकांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी जर्मनीची गरज आणि मागणी लक्षात घेऊन त्यानुसार प्रशिक्षण देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा तसेच विद्यार्थ्यांना ज्या देशांमध्ये संधी आहे, त्या देशांची भाषा शिकविण्यात यावी, असे सांगितले. याकामी शालेय शिक्षण आयुक्तांनी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून या कामास गती द्यावी, असेही ते म्हणाले.


            यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील कौशल्य विकास, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, कृषी, उद्योग अशा विविध विभागांतर्गत कौशल्य प्रशिक्षण देणे शक्य असल्याचे सांगून युरोपियन देशांच्या मागणीनुसार आपल्या विभागांतर्गत करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.


0000

पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ

 पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ


 


            पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते.


सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

Tuesday, 13 June 2023

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात सुधारणा

 अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा;सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू


            अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


 भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. 


            अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे,त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेवून उच्च विद्या विभुषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विद्यार्थ्याकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959-60 पासून राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मार्च 2021 पासून या योजनेंतर्गत 2020-21 ते 2025-26 या वर्षांकरीता दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येतील.


निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यासाठी 6 कोटी 50 लाख इतक्या वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली. ही योजना केंद्र आणि राज्यामध्ये 60:40 अशी राबविण्यात येते. सुधारित निर्वाह भत्त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत :-


            वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 4 हजार रुपये ते 13 हजार 500 रुपये तर वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 2 हजार 500 ते 7 हजार रुपये असे सुधारित दर असतील. शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.


-----०-----

Featured post

Lakshvedhi