Saturday, 10 June 2023

Programme


 

घडी घडी दिल धडके

 


Walking practiced by ancient Siddhas

 👆Here is a video on how to do effective walking at home indoors even in a small room. It is called Siddha Walking practiced by ancient Siddhas. Pl see video Its easy to do


थकवा**का बरे थकवा येत असावा?*

 *◼️थकवा*


आज आपण पाहणार आहोत स्त्रियांना सतावणारा विषय म्हणजे थकवा. हल्ली प्रत्येकाच्या तोंडी सहज एक वाक्य येते,


*'आज-काल फारच थकायला होत आहे.’*


*का बरे थकवा येत असावा?*


*या थकण्याने आपले बालपण हरवले, तरुणपण मरगळून गेले आणि म्हातारपण असह्य झाले. थकवा येण्याची कारणे काय?*


*का वाटत नाही उत्साह?*


 *जाणून घेऊ यामागील कारणे आणि त्यावर उपचार करू.*


*◼️थकवा म्हणजे काय* ?


एखाद्य विशिष्ट मांसपेशीची किंवा एकपेक्षा अनेक मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे थकवा. काम करण्यास उत्साह न वाटणे, थोडय़ाशा परिश्रमानंतर दमून जाणे म्हणजे थकवा. हा थकवा शरीराचा असतो, तसाच मनाचाही असतो आणि म्हणून रडल्यानंतर थकल्यासारखे जाणवते. आपल्या बोलीभाषेत अनेक गोष्टी थकवा म्हणूनच आपण गृहीत धरतो. आळस आणि थकवा यात फरक आहे. आळसात आपली क्रियाशक्ती पुरेशी असते, तर थकण्यामध्ये शक्तिपात होतो आणि इच्छा असूनही पुरेशा प्रमाणात क्रिया करता येत नाहीत.


भारतात ३०-६० वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. अर्थात वयोपरत्वे शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे जाणवणारा थोडा थकवा हा नैसर्गिक असतो.


*प्रमुख कारणे आणि प्राथमिक उपाय*


*◼️झोपेच्या तक्रारी* 


विचित्र वेळी झोपणे, झोपेत खूप घोरणे, झोपताना जाणवणारा दम्याचा त्रास, सारखी स्वप्ने पडणे.. एक ना अनेक कारणांनी पुरेशी व शांत झोप होऊ  शकत नाही. यामुळे मेंदूला व शरीराला पूर्ण विश्रांती मिळणे कठीण होते. दिवसभर मग थकवा जाणवतो.

https://chat.whatsapp.com/I9NT3V0hTWK8KgpEiPt68Q

शारीरिक व मानसिक तक्रारींवर योग्य औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. आहार योग, ध्यान-धारणा, प्राणायाम शिकून घेऊन करावे.


झोपताना कोमट दुधात मध टाकून घ्यावे. दुधात ट्रीप्टोफन असते, यामुळे झोपेसाठी उपयोगी पडणारे सिरोटोनिन द्रव्य अधिक प्रमाणात तयार होते. मधातील कार्बोदके ही द्रव्ये मेंदूपर्यंत वेगाने पोहोचवतात.


खसखस व जायफळ घालून केलेली दुधाची खीर रात्री झोपताना घ्यावी.


झोपताना थोडे वाचन करावे शांत संगीताचा उपयोग करावा.


खोलीतील तापमान, दिव्यांचा प्रखर उजेड, आवाज या सर्वाची नोंद घ्यावी. अंधाराने मेलाटोनिन नावाचे द्रव्य मेंदूत तयार होते, ज्यामुळे नैसर्गिक झोप येण्यास मदत होतो.


भीतीदायक / संशयास्पद असे कार्यक्रम रात्री झोपेच्या वेळी बघू नयेत.


*◼️रक्ताल्पता (अ‍ॅनिमिया)*


लाल रक्तपेशी ऑक्सिजनचे वहन करीत असतात. लोह हा त्यांचा महत्त्वाचा घटक असतो. जेव्हा लोहाचे प्रमाण कमी होते, तेव्हा हा प्राणवायू पेशींपर्यंत कमी प्रमाणात पोहचतो. पेशींना पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने पेशींमधील थकवा आपणास जाणवू लागतो. चालून/जिना चढून धाप लागते. कामाची इच्छा होत नाही. सतत झोपावेसे वाटते. श्वास कष्टप्रद होतो.


लोहयुक्त आयुर्वेदिक औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी. लोहयुक्त औषधाने बरे न वाटल्यास पुढील तपासणी करणे गैरजेचे असते.


आहारात हिरव्या पालेभाज्या, खजूर, बीट, काळ्या मनुका, डाळी, फळे इत्यादीचे प्रमाण वाढवावे. लोहाच्या शोषणासाठी ‘क’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. त्यासाठी वरील पदार्थावर लिंबू पिळून घ्यावे. संत्री, मोसंबी, टोमॅटो, अननस इत्यादींचा आहारात समावेश करावा.


आवळ्याचा कोणताही पदार्थ रोज चालेल.



*◼️रक्तातील साखर* 


शरीरातील न वापरता येणारी साखर शरीरात थकवा निर्माण करते. रक्तात कमी असलेली साखरेची पातळीही थकवा निर्माण करते. शरीरात ऊर्जा निर्माण करण्यास पेशींना साखरेद्वारे उद्दीपन मिळणे हे दोन्ही प्रकारांत होऊ  शकत नाही आणि थकवा जाणवतो.


मधुमेह असणाऱ्यांसाठी आहारात योग्य बदल करावेत. पुरेसा व्यायाम करावा.


साखरेची पातळी कमी होत असल्यास लगेचच फळांचा रस घ्यावा.


*◼️थायरॉइड*


शरीरातील इंधनातून किती- कशी- केव्हा आणि किती वेगाने ऊर्जानिर्मिती होईल हे थायरॉइड ग्रंथीद्वारे निर्माण होणारे स्रावांचे प्रमाण ठरवत असते. या ऊर्जेद्वारे शरीराची विविध कार्ये घडून येतात. या ग्रंथीचे कार्य जेव्हा काही कारणाने कमी होते, (हायपोथायरॉइडिझम) तेव्हा थकवा येतो. यासाठी रक्त तपासणी करून घेता येते. योग्य आयुर्वेदिक औषध व आहार योजन व्यायाम व सकारात्मक दृष्टिकोन असणे गैरजेचे असते. स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात.


*◼️कॅफेन*


चहा, कॉफी, कोकसदृश पेय घेतल्यावर कॅफेनचे दुष्परिणाम जाणवू लागतात. थोडय़ा प्रमाणात कॅफेन उत्तेजक असले तरी अतिरेकाने मात्र झोप न येणे, छातीत धडधडणे, अस्वस्थ होणे आणि मग थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे निर्माण होतात. हे कारण अनेकदा थकण्याच्या संदर्भात दुर्लक्षित राहते.


हळूहळू करीत प्रमाण कमी करावे. एकदम बंद केल्यास इतर त्रास उद्भवतात.


*◼️हृदयरोग*


साफसफाई, खरेदी, जिने चढणे अशा लहानसहान गोष्टींनी दम लागतो. या क्रिया करताना हृदयावर रक्ताभिसरणाचा येणारा अधिकचा ताण सहन होत नाही. हाता-पायांपेक्षा महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा केला जातो. यामुळे थकवा जाणवतो. कामे पूर्ण करण्याच्या हट्टापायी स्त्रियांकडे दुर्लक्ष करतात आणि अंगावर काढतात.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



_*(

राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठीआठ वर्ष मुदतीचे 2 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस

 राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठीआठ वर्ष मुदतीचे 2 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस


            मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी आठ वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.


            या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                    


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे 13 जून, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् 13 जून, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 14 जून, 2023 रोजी करण्यात येईल.         


            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून 14 जून, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी आठ वर्षांचा असेल.


            रोख्यांचा कालावधी 14 जून 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड 14 जून, 2031 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 14 डिसेंबर व 14 जून रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 8 जून, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.


००


राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठीनऊ वर्ष मुदतीचे 2 हजार 500 कोटींचे रोखे विक्रीस 


            मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी नऊ वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.


            या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                    


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे 13 जून, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् 13 जून, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनु

सार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर


कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून उद्योग बैठकीचे आयोज

 कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून उद्योग बैठकीचे आयो


युवा लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी उद्योगांच्या पुढाकाराची गर

- राज्यपाल रमेश बैस

            पुणे दि. ९: भारतात जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असताना लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी युवकांना कौशल्ययुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित उद्योग, उद्योग संघटना, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याकरिता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उद्योग बैठकीचे (इंडस्ट्री मीट) आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. बैस बोलत होते. यावेळी १४१ सामंजस्य करार करण्यात आले.


            कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार, हनिवेल ऑटोमेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, 'एमसीसीआयए'चे महासंचालक प्रशांत गिरबाने, 'सीआयआय'चे कार्यकारी संचालक सौगत राय चौधरी, यशप्रभा ग्रुपचे संचालक अमित घैसास आदी उपस्थित होते.

            प्रगत देशात कुशल कामगारांची मोठी आवश्यकता आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांना छोट्या कौशल्याचे प्रशिक्षण दिल्यास ते मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम होतील. त्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांना उद्योगांची साथ आवश्यक आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आपण १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतांना सर्वांची साथ आवश्यक आहे. भारतासारख्या मोठ्या देशाच्या विकासात युवकांची महत्वाची भूमिका राहील. त्यासाठी हे युवक कौशल्यप्राप्त होणे आवश्यक असून कौशल्य केंद्र आपल्या दारी सारखे शासनाचे उपक्रम उपयुक्त ठरतील, असा विश्वासही श्री. बैस यांनी व्यक्त केला

            मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्य शासन उद्योगांच्या सोबत काम करण्यासाठी इच्छुक आहे. 'शासन आपल्या दारी' या नव्या घोषणेसह 'आम्ही कौशल्य केंद्र आपल्या दारी' घेऊन आलो आहोत. उद्योगांनी थोडी जागा उपलब्ध करून दिल्यास शासन उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य केंद्र उभारेल. तेथे उद्योगांच्या मनुष्यबळाच्या मागणीनुसार प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केले जातील. राज्य शासन युवकांच्या कौशल्य विकासासाठी उद्योगांना सहभागी करेल. राज्यात १०० कौशल्य केंद्र उद्योगांच्या ठिकाणी सुरू करण्याची उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच गावांमध्ये ५०० कौशल्य केंद्र स्थापन करण्यासाठी निविदा काढल्या असून उद्योगांनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही श्री. लोढा यांनी केले


         विभागाने आतापर्यंत ५७६ रोजगार मेळाव्याद्वारे २ लाख ८३ हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, महिला, तृतीयपंथीय आदी घटकांच्या रोजगार विकासासाठी विशेष पुढाकार घेणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या १ हजार ५०० रुपयांच्या भत्त्यामध्ये राज्य शासनाचे ३ हजार ५०० रुपये देण्याची योजना राबविली जात असून त्याचाही लाभ घेत रोजगार निर्मिती करावी, असे श्रीमती वर्मा म्हणाल्या.

            रोजगार निर्मितीमध्ये उद्योगांचा सहभाग अधिक वाढविण्यासाठी आयटीआय मध्ये उद्योगांच्या पुढाकाराखाली उत्कृष्टता केंद्रे (इंडस्ट्री लेड सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन व्हावीत असा प्रयत्न आहे. उद्योगांनी आयटीआय दत्तक घेत तेथे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करणे, राबविणे, तेथील शिक्षकांचे प्रशिक्षण, उद्योगांच्या ठिकाणी प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आदींसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

            प्रारंभी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या ‘फिनिशर प्लॅटफॉर्म’चा ई-शुभारंभ करण्यात आल


            यावेळी पुणे विभागातील नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार अशा सुमारे १४१ घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामार्फत सुमारे १ लाख युवकांना कौशल्यांचे प्रशिक्षण देत त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

            बैठकीस पुणे विभागातील नामांकित उद्योगांचे प्रतिनिधी, प्लेसमेंट एजन्सी

ज आदींचे प्रतिनिधी 

उपस्थित होते.




0000




 


पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*

 *पोट साफ करण्याचे प्रभावि उपाय...*


  १) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.

    २) १०० मि.लि पाण्यात एक चमचा मेथि दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे. व जेवणानंतर हे मेथिचे दाणे घालून खावे. याने सकाळी पोट साफ होते.

   ३) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर घ्या. पाण्यासोबत.,

  ४) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे., रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात इसबगोल मिसळून घ्यावे..

  ५) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.

   ६), दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे . आणि वरून दूध घ्यावे..

   ७) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे..,. त्रिफळा चूर्ण मातिच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.

    ८) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.

     ९) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते..

     १०) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे.. याने सकाळी पोट साफ होते..

    ११,) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते..

    १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते..


 वरील उपाय करावेत आणि, आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi