Thursday, 8 June 2023

जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात

 जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात


- डॉ. संजीव कुमार


महापारेषणचा 18 वा वर्धापन दिन


 


            मुंबई, दि. 7 : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे, असे प्रतिपादन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. 


            महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


            डॉ. संजीव कुमार म्हणाले, देशात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी संधी आहे व आव्हाने आहेत. पाच हजार मेगावॉटपेक्षा जास्त ऊर्जा तयार करण्यासाठी एक हजार सर्किट किलोमीटर अति उच्च दाब पारेषण वाहिनी सुरू करण्याचे धोरण आहे. महापारेषण ही देशात सर्वोत्तम पारेषण कंपनी आहे. महापारेषणने ड्रोनचा वापर सुरू केला आहे. हा ड्रोनचा वापर हा विशेषतः दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे वेळेवर सर्व्हेक्षण व देखरेख करण्यासाठी चांगला निर्णय ठरला आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे. भविष्यातही अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुरस्कार योजना चालू राहील, असे त्यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापारेषणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश दिला.


               ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले.


            महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या 18 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक (संचलन) संदीप कलंत्री, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, संचालक (वित्त) अशोक फळणीकर, संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे उपस्थित होते.


            नसीर कादरी, विश्वास पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगत गमरे यांनी तर सूत्रसंचालन विनायक शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?*

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?*


मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७




Email id:- aao.cmrf-mh@gov.in




राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांच्या यादीत अनेक नवीन आजारांचा समावेश केला आहे.




*जास्तीतजास्त शेअर करा, गरजू रुग्णांपर्यंत पर्यंत पोहोचवा!*




■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे


१. अर्ज ( विहीत नमुन्यात)


२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)


३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.


(रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.) 


४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक


५. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)


६. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. 


७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी चङउ रिपोर्ट आवश्यक आहे.


८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी नढउउ / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.


९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.




● अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी.




Email id:- aao.cmrf-mh@gov.in




● व त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.




■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नांवे.




१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६),


२. हृदय प्रत्यारोपण


३. यकृत प्रत्यारोपण


४. किडणी प्रत्यारोपण


६. बोन मॅरो प्रत्यारोपण


५. फुफ्फुस प्रत्यारोपण


७. हाताचे प्रत्यारोपण


८. हिप रिप्लेसमेंट


९. कर्करोग शस्त्रक्रिया


१०. अपघात शस्त्रक्रिया


११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया


१२. मेंदूचे आजार


१३. हृदयरोग


१४. डायलिसिस 


१५. अपघात


१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)


१७. नवजात शिशुंचे आजार


१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण 


१९. बर्न रुग्ण


२०. विद्युत अपघात रुग्ण




या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.




मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७




संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती व रुग्णालयांची यादी वेबसाईटवर आहे.




आपले नम्र,


मंगेश नरसिंह चिवटे,


कक्ष प्रमुख,


मुख्यमं

त्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, तथा विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय.


फोन - ९६१९९५१५१५


संपर्क - ०२२ - २२०२५५४०


Wednesday, 7 June 2023

बाल हृदय रुग्णांसाठीप्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र आवश्यक

 बाल हृदय रुग्णांसाठीप्रत्येक जिल्ह्यात उपचार केंद्र आवश्यक


- राज्यपाल रमेश बैस


            नवी मुंबई, दि. 7 :- “हृदयरोगाने आजारी मुलांपेक्षा जास्त वेदना त्यांच्या पालकांना सहन कराव्या लागतात. मुलांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी श्री सत्य साई संजीवनी केंद्रासारख्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहेत. रोगांचे लवकर निदान झाल्यास मृत्यू टाळता येऊ शकतो”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            नवी मुंबई खारघर येथील “श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अँड ट्रेनिंग इन पेडियाट्रिक कार्डियाक स्कील्स”चा 5 वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल श्री. बैस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी ते बोलत होते.


            यावेळी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअरचे अध्यक्ष डॉ. सी. श्रीनिवास, पूज्य सद्गुरु मधुसूदन साई पदव्युत्तर संस्था रोहतकच्या कुलगुरू अनिता सक्सेना, प्र-कुलगुरू कृष्णा डॉ.विद्यापीठ, कराडचे डॉ.प्रवीण शिनगारे आदी उपस्थित होते.


            “आजपर्यंत हजारो बालकांवर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले असून त्यांचे नवीन आयुष्य सुरू झाले असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, आजारी हृदयाला बरे करण्यासाठी आपल्याला चांगल्या हृदयाची गरज आहे आणि रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला निरोगी मनाची गरज आहे. जन्मजात हृदयरोग ही एक गंभीर समस्या आहे.भारतात जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांची अंदाजे संख्या दरवर्षी दोन लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणूनच या आजाराबाबत जनजागृती करणे सर्वात महत्त्वाचे आहे. रोगाचे निदान आणि उपचार यावर लक्ष केंद्रीत करून प्रतिबंध हे आमचे प्राथमिक ध्येय असले पाहिजे. गर्भवती मातांनी गर्भधारणे दरम्यान निरोगी जीवन शैलीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे”. 


            “जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये रोगाचे निदान शोधून त्यावर उपचार करण्याच्या सुविधाही वाढवायला हव्यात. या रुग्णालयांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तज्ञ आणि प्रगत उपकरणे पुरवली जावीत.असे केल्याने, मोठ्या रुग्णालयांवरील भार लक्षणीयरित्या कमी करता येईल आणि मौल्यवान जीव वाचवता येतील. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन हे अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला शासनाचा नेहमीच पाठिंबा असतो. श्री सत्य साई संजिवनी रिसर्च फाउंडेशन जन्मजात हृदयविकारावर संशोधन करत असल्याचे पाहून आनंद व्यक्त करत संस्थेशी संबंधित शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांचे त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अभिनंदन करुन यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी शुभेच्छा दिल्या.


            कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयात हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या बाल रुग्णांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्या

त आले.


0000


ग्रामीण खेळ

 


मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'

 




मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'


मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत


मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 7 : नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन'चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            दरम्यान, मुंबईतील पुनर्विकासाच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण


            मुंबईत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याचे सांगत पुनर्विकासाची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. म्हाडा, एमएमआरडीए, सिडको, मुंबई महानगरपालिका, महाप्रित यासारख्या शासकीय संस्थांच्या माध्यमातून बंद पडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महानगरपालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. दि. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महानगरपालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले.


अशी आहे 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' सुविधा


            बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 'मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अॕप हेल्पलाइन' कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना 8169681697 या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रिज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.


            भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी, अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण/ जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाइनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी/कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.


            घनकचरा व डेब्रिज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाइनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ॲप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची/संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रा

र निराकरणाचा आढावा घेतील.


००००

ग्रामीण खेळ

 Village games are sometimes better than Olympic games... Very interesting! 👌


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार   

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

वाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार   

                                               - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री यांनी केली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी

 

            नवी मुंबईदि. 07 : ‘‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करुन नियोजित वेळेत विमानतळ वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            उलवे येथील विमानतळाच्या आज हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार महेश बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकरसिडकोचे सहसंचालक कैलास शिंदेजिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसेनवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरपनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

            नवी मुंबई विमानतळ हे पुणेमुंबईगोवा यांच्यासाठी महत्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते, उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की2024 पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट जनतेला देणार आहे, असे त्यांनी सांगितले.

विमानतळाविषयी -:

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 22 किलोमीटरचा सीलिंक महत्वाचा दुवा ठरेल.  दरवर्षी 9 कोटी प्रवासी वाहतूक होईल.  म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून 42 विमाने उभी राहतील. 5500 क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ 11.4 किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

                                                                       0000000

                                               -



Featured post

Lakshvedhi