Wednesday, 7 June 2023

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची फेरनिवड  



वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा


 


मुंबई : ''महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर'' संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे.


                चेंबरच्या अध्यक्षपदासाठी ललित गांधी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी अनिलकुमार लोढा, करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी असे तिघांचे अर्ज दाखल झाले होते. पैकी करुणाकर शेट्टी आणि उमेश दाशरथी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चेंबरचे सरकार्यवाह सागर नागरे यांनी काम पाहिले.


                या निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ललित गांधी म्हणाले की, ललित गांधी गेल्या 21 वर्षापासुन महाराष्ट्र चेंबरमध्ये कार्यरत असून गव्हर्निंग काऊन्सील सदस्य, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी कार्य केले आहे. विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्थांवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत आहेत.


                शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राज्याच्या शिखर संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी पुन्हा मिळणे ही दुर्मिळ व महत्वपूर्ण घटना आहे. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह चेंबरच्या कार्यक्षेत्रातील सर्व भागांतील व्यापार-उद्योग-कृषी व कृषीपूरक उद्योग व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण कार्यरत राहणार आहे. छोट्यात छोट्या व्यापारी - उद्योजकांचे प्रश्नंही प्राधान्याने हाती घेतले जातील. तसेच महाराष्ट्राला संपूर्ण देशात पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या बरोबर कार्य करून यश मिळवु, असेही त्यांनी सांगितले.


                नूतन वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी महाराष्ट्र चेंबरच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचे दोनदा उपाध्यक्षपद भूषविले आहे. ते गेल्या २० वर्षापासून चेंबरशी संलग्न आहेत. गेले ४ टर्म त्यांनी कार्यकारिणी मंडळात प्रतिनिधित्व केले हाते. सन २०१६ ते २०२१ साली मध्ये उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. जगभरात प्रसिद्ध असलेल्या मे. भागचंद लोढा उद्योग समूहातील एम. बी. शुगर अण्ड फर्मस्युटिकल्स लि. कंपनीचे संचालक आहेत. बॉम्बे शुगर मर्चंन्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आहेत.


चौकट : १६ जूनला राजभवनात दिमाखदार सोहळा


दरम्यान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे ५० वे सत्र राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. येत्या १६ जून, २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता राजभवनातील दरबार हॉल मध्ये दिमाखदार सोहळ्याचे नियोजन केले असून निर्वाचित अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ या वेळी संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 


विविध प्रश्न मार्गी


महाराष्ट्र चेंबरच्या ९६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच १ कोटी, ३२ लाख रुपये गेल्या वर्षभरात उत्पन्न मिळविले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे व्यापारी आणि उद्योजकांच्या विविध मागण्या मांडून त्या मार्गी लावल्या. प्लास्टिकच्या वस्तूंच्या वापरावरील निर्बंध, कोरोना काळात उद्योजकांचे सरकारकडे प्रलंबित असलेले अनुदान थेट खात्यात जमा, विदर्भ विकास परिषद, उत्तर महाराष्ट्र विकास परिषद, राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषद, महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो (मायटेक्स) मुंबईत भरविले. महाराष्ट्र चेंबरच्या नाशिक कार्यालयासाठी सातपूर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीकडून १० हजार चौरस फुटाचा भूखंडाची मंजूरी मिळविली

सारिवाद्दासव अनंतमूळ औषधी गुण


..सारिवा म्हणजे.. अनंत मूळ.. वनस्पती.. अतिशय गुणकारी आहे.. हिच्या पासून . आयुर्वेद कंपनी 

...सारिवाद्दासव हे मौल्यवान औषध तयार करतात..या आसवाचा प्रमुख उपयोग सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर करतात.. गजकर्ण, खरूज, इसब, नायटा,दाद, सोरायसिस, या आजारांवर प्रभावी आहे..

.... आपण बघू या याचे मौल्यवान फायदे..


. मस्तिष्क विकार बरे होतात. बरेचदा स्त्रियांना बाळंतपणानंतर उन्माद येतो, डोकं हलकं होतं,अशा वेळी यांना नियमित पणे दोन चमचे हे आसव जेवणानंतर द्यावे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, डिप्रेशन येतं, सारिवाद्दासव घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळतात.शिवाय अर्धशिशी, मायग्रेन हे आजार बरे होतात.


 मूत्रपिंडाचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात,. मूत्राघात, म्हणजे. थेंब थेंब युरीन येणं, युरिन वारंवार होणे, युरिन होतांना जळजळ होणे, या सर्व त्रासांवर सारिवाद्दासव अतिशय परिणामकारक आहे, दररोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या. हळूहळू बरं वाटतं.


सारिवाद्दासव हे गुणधर्मानी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करते, अंगाचि आग होणं, नाकाचा घोळणा फुटणे, मुळव्याधित रक्त जाणे, युरिनमधुन रक्त येणे, कानातून रक्त येणे, हे उष्णतेचे विकार बरे होतात. भगंदर या विकारात भेगा फाटतात, रक्त येत, आग होते, अशा वेळी हे आसव काही दिवस घेतल्यास रूग्ण पूर्ण पणे बरा होतो.




रक्तात युरिक एसिड वाढल्याने, संधिवात आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी, सुरू होते, सांध्यांना सूज येते, चालता येत नाही, वेदना होतात, अशा वेळी रोज दोन वेळा सारिवाद्दासव हे दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या, बरं वाटतं.. बरेचदा स्म्रुतिभ्रंश होतो, अपघातात स्म्रुति जाते, किंवा

 व्रुद्धावस्थेत, अल्झायमर मूळे मेंदू तिल पेशी सुकून विस्मरण होते. अशा रूग्णांना नियमित.. *सारिवाद्दासव* दिल्यास. फरक पडतो. आणि गेलेली स्म्रुति येते.

               उच्च रक्तदाबात चक्कर येते, रुग्ण कोमात जातो, . सारिवाद्दासव बहुमोल कार्य करते,या त्रासांवर. पिंपल्स, मुरूम, अॅक्नेमुळे चेहरा खराब होतो, काळे डाग पडतात, तेव्हा हे आसव काही दिवस घेतल्यास पिंपल्स येत नाही.कारण याने रक्त शुद्ध होते, नवीन रक्त तयार होते,

... आपण बघणार आहोत याचे प्रमुख घटक....👉


...सारिवाद्दासव मद्धे वापरले जाणारे घटक....👎


... नागरमोथा,लोध्र,पिंपळ साल,कचूर,नेत्रबला,पाठा, तमालपत्र, आवळा, गुळवेल, चंदन,लाल चंदन, छोटि विलायचि, सफेद चंदन, ओवा, कुटकि, बडी विलायचि,कुष्ठ, हिरडे, सनाय, धातकिफुले.मनुका, गुळ,वडाचि साल, अनंतमूळ,.. अश्या वनस्पती वापरून हे.. मौल्यवान..आसव तयार केले जाते..


... तेव्हा. अवश्य हे औषध घरात असू द्या...


..... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.

_

*

पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल माहिती असते.*

 *पंजाबातील लोकांच्या जागृतीमुळे आपल्याला भगतसिंहांबद्दल माहिती असते.*

*परंतू "राजगुरू" (शिवराम हरी राजगुरू) मराठी असूनही आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही.*

*ही उपेक्षा. म्हणायची......?*


*मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण स्वकर्तृत्वाने काशीस संस्कृतचा पंडित बनला होता.*

*ते इतके निष्णात होते की,* *संस्कृतमधून सहज संभाषण करीत असत.*

*कुस्तीत त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता.*

*नेमबाजीत ते शब्दवेधी होते, एवढेच नव्हे तर उताणे झोपून पाठीमागे असलेले लक्ष्यही ते बाणाने सहज उडवित (कधी प्रयत्न करा मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते!).*

*स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता. तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत, दंश झाले तरीही चेहर्यावरील रेषही न हलवता.*

*एकदा तर त्यांनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला - हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाले तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही! आणि त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो.*

*साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली. त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही.*

*विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या! असे होते राजगुरू!*

*(आज हुतात्मा राजगुरुंची इंग्रजी तारखेप्रमाणे जयंती. त्यानिमित्त पूर्वी लिहिलेल्या एका लेखातील हा संपादित अंश.)*

*संकलीत लेख.*

*स्वातंत्रवीर मर्द मराठी वीर "राजगुरु जयंती" निमित्त अभिवादन*

*🚩जय श्री राम🚩*

*💥Pitter boy's💥*

भवताल

 जगातील सर्वाधिक पाऊस,


मेघालयाचा मान्सून अन्

"भवताल" चे नियोजन...


मान्सूनच्या हंगामात मनसोक्त फिरणे

मुसळधार पाऊस मनमुराद अनुभवणे

पावसाची मनोहर रूपं, तीसुद्धा

जगातील सर्वाधिक पावसाच्या प्रदेशात!


Exploring Monsoon@Cherapunjee

१८ ते २२ जुलै २०२३

(पाच दिवस, चार मुक्काम)


शुल्क: ₹ ४१,५०० प्रति व्यक्ती

(विमानप्रवास, स्थानिक प्रवास, मुक्काम, नाश्ता-जेवण, मार्गदर्शनासह सर्वसमावेशक)


नावनोंदणीसाठी लिंक: https://bhavatal.com/Ecotour/Meghalaya


संपर्क:

9545350862 / 9922063621



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

नवी मुंबई येथील बालाजी मंदिरराज्याचे नवे तीर्थस्थळ होईल

 नवी मुंबई येथील बालाजी मंदिरराज्याचे नवे तीर्थस्थळ होईल


                                                      -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


        अलिबाग,दि.7(जिमाका):-नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            उलवे, सेक्टर 12, नोडे उलवे, नवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री.वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.


              यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.


                 भूमीपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी योवेळी सांगितळे


               यावेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रेड्डी यांनी या मंदिराच्या उभारणी विषयीची थोडक्यात माहिती दिली.


00000

खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..

 🇮 🇲 🇵 


*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*


...(१). हळदिच्या दुधात खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो

...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो

....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.

     (४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.

.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

    (६) खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

      (७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास ढास जाते. बरं वाटते

.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..

      (८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

     (९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..

    (१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील

   (११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो 

   (१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

  १३).. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.

(१४). खोकला, कफ, सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.

(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..

(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि

(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.

२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.

(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.

(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.

(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.

(२८). कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..

(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो

(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..


सुनिता सहस्रबुद्धे


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*(

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्येमहाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्था

 राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्येमहाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्था


        नवी दिल्ली, 6 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी जाहीर केला.


            शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.


सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 11 संस्था


            संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई 30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई(41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (59), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा (75), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88), मुंबई विद्यापीठ – मुंबई (96) 


 विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे


            देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (39), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (47), मुंबई विद्यापीठ –मुंबई (56), भारती विद्यापीठ – पुणे (91), आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस 98 व्या क्रमांकावर आहे.   


संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था


            संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 4 व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई 10 व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई 15 व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे 27व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई 37 व्या स्थानावर आहे.   


अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील 8 संस्था


            अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला 37 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 41 वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे (73) क्रमांकावर आहे.    


महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये राज्यातील तीन महाविद्यालये


            महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन 57 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) 79 व्या आणि नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था 83 व्या स्थानावर आहे.   


उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 9 व्यवस्थापन संस्था


            देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9 संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था 7 व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10 व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (17), आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (20) , SVKM नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई (21) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – नागपूर (43), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(45), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च –मुंबई (73) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट –पुणे (76)


औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था


            देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई 11 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 29 व्या स्थानावर आहे. एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(38), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीट्युकल सायन्स अँड रिसर्च –पुणे (45, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर (50), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(51), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (55), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी –नागपूर (68), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई (79), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद (80), प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (91), ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ फार्मसी-पुणे (93), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे (94), सी.यू.शाह कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (95), आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी- पुणे 96 व्या स्थानावर आहे.


वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 2 महाविद्यालय


            वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ 15व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा 25व्या स्थानावर आहे.  


दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 7 महाविद्यालय


            दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ तिस-या स्थानावर आहे. शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर 15व्या स्थानावर आहे. दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था-वर्धा (17), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई (19), शासकीय दंत महाविद्यालय-मुंबई (29), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ –मुंबई (38) आणि भारती विद्यापीठ (डिम्ड युनिव्हर्सिटी) डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल-पुणे 39 व्या स्थानावर आहे.


            देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिम्बायोसिस विधी माहाविद्यालयाला 6 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर 12 वा क्रमांक पटकाविला आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रे या श्रेणीमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी-मुंबई 7 व्या क्रमांकावर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 36व्या क्रमांकावर आहे. तसेच नाविन्य श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई 7 व्या क्रमांकावर आहे.


0000

Featured post

Lakshvedhi