Tuesday, 30 May 2023

शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत

 राज्य शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाचेभारतरत्न सचिन तेंडुलकर होणार सदिच्छादूत


— वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन


            मुंबई, दि. 29 : प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास श्री. तेंडुलकर यांनी सहमती दर्शवली असून उद्या त्यांच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.


            सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या दि. ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.


            राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून 'महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान' म्हणजेच 'स्वच्छ मुख अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

Monday, 29 May 2023

स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा

 स्काऊटस आणि गाइडसचे कामकाजजुन्या नियमानुसार चालण्यासाठी सकारात्मक चर्चा


- मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेचे जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस या संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे यांची उपस्थिती होती.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाइडस या संस्थेची नव्याने तयार करण्यात आलेली नियमावली मंजुरीसाठी शासनास पाठविण्यात आली आणि त्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ही नियमावली भारत स्काऊटस आणि गाइडस राष्ट्रीय कार्यालय, नवी दिल्ली यांना पाठविण्यात आली आहे.


            आमदार श्री. बावनकुळे यांच्या शिष्टमंडळाने जुन्या नियमावलीनुसार कामकाज सुरू ठेवण्याची विनंती केली असल्याने त्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला राज्यातील स्काऊटस आणि गाइडसचे पदाधिकारी उपस्थित होते.


0000

पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठीसकारात्मक विचार करणार

 पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतरासाठीसकारात्मक विचार करणार


- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


 


            मुंबई, दि. 29 : राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव स.अं.साळुंखे, प्रधानमंत्री ग्रामीण रस्ते विभागाचे सचिव ख.तु. पाटील, रोजगार हमी योजना विभागाच्या उपसचिव संजना खोपडे यांच्यासह मंत्रालयीन वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, शेत/पाणंद रस्ते हे अवर्गीकृत स्वरुपाचे रस्ते आहेत. या रस्त्यांना दर्जोन्नत करून ग्रामीण मार्गाचा दर्जा द्यावयाचा झाल्यास प्रथम त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यामध्ये करणे आवश्यक असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यात येतील असे श्री महाजन यांनी सांगितले.


            यावेळी मंत्री श्री महाजन म्हणाले की, राज्यातील पानंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतीमालाची ने - आण करणे तसेच शेतातील उत्पादित मालाची बाजारपेठेसाठी वाहतूक करणे गरजेचे असून पावसाळ्यात रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन त्रासाला सामोरे जावे लागते. या मुळे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले

अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी

 अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी


- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा


 


               मुंबई, दि. 29 : आरे स्टॉल समोर अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे लक्षात घेता अनधिकृत बांग्लादेशी फेरीवाल्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.


             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रमात कुर्ला (पश्च‍िम) एल वॉर्ड येथे आज ६८९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 130 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.


                   यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. हा उपक्रम 31 मे 2023 पर्यंत दुपारी 3 ते 5.30 वाजता सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येणार आहे.


****

आहार सेवनाविषयीचे नियम

 📌 आहार सेवनाविषयीचे नियम 📌


🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.


🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.


🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.


🍎भूक लागल्याशिवाय जेवू नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.


🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.


🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.


🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.


🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.


🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.


🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.


🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.


📚संदर्भ-- डॉक्टर मी काय खाऊ?


📝माहिती संकलन👇

डॉ.स्वाती पाटील

होमिओपॅथ|बॅच फ्लॉवर रेमेडी थेरपिस्ट|आहारतज्ज्ञ.



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*



गर्भवती मातेचा असा असावा आहार.....*

 *री

जन्माला येणारे मूल आधी आईच्या पोटात वाढत असते. मूल पुढच्या आयुष्यामध्ये निरोगी, सक्षम, कार्यक्षम रहावे यासाठी त्याच्या आईला गरोदर अवस्थेत चांगला आहार दिला पाहिजे. याच काळात या मातांना फळे आणि पोषण द्रव्य युक्त अन्न दिले पाहिजे.


*गरोदरपणी गर्भाचे पोषण हे आईच्या अन्नावरच होत असते. त्यामुळे आईने दीडपट आहार घेतला पाहिजे. पण जेवणाच्या वेळी गच्च पोट भरून जेवू नये. दोन घास कमीच खावेत. थोडे थोडे करून ३-४ वेळा खावे.


*प्रथिनांसाठी अंडी आणि दूग्धजन्य पदार्थ दिले पाहिजेत. रोज निदान एक कप दूध सकाळी व संध्याकाळी प्यावे.


*कोणत्याही डाळीचे वरण किंवा आमटी जेवणात असावी. मटकी, मूग, हरभरा, चवळी, वाटाणा यापैकी कशालाही मोड आणून त्याची उसळ रोजच्या जेवणात असावी.


*भाकरी किंवा पोळी तसेच मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, अगस्तीचा पाला, आंबटचुका, पानकोबी, राजगिऱ्याची भाजी, कोथिंबीर अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोज दोन्ही वेळच्या जेवणात पाहिजे.


*पेरू, चिकू, केली, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही स्वस्त फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.


*गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून असाव्यात. मुळा, टोमॅटो, बीट काकडी वगैरे कच्चे खाणे अधिक चांगले. 


*दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लिटर) आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते.


*वैद्य तुषार साखरे,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे –

 आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्कसमन्वय राखावा;

धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नालेसफाई ते उपकरणेऔषध साठा अशा विविध बाबींच्या तयारीचा मान्सून पूर्व आढावा

 

            मुंबईदि. 29 :- एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावाअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरराज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्करनौदलहवाई दलतटरक्षक दलएनडीआरएफएसडीआरफमध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीभारतीय हवामान खात्याचेगृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारीविभागीय आयुक्तजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्त्वपूर्ण असे निर्देशही दिले. ते म्हणाले कीआपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजिटल मॅपिंग करावे. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधावा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतीलतर त्यांची माहिती घ्यावी. भूस्खलनदरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करावी. बहुउद्देशीय सभागृहेशाळा किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी. याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांत आतापासूनच औषधांचा पुरेसा साठा राहीलअसे पहावे. ग्रामीण रुग्णालयप्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही तयारी ठेवावी. संर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतीलयाची खात्री करावी. वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने सतर्क राहणे आवश्यक आहे. एनडीआरएफएसडीआरएफशी संपर्क-समन्वय राखावा. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहावे. जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्वावरही नेमणूक करण्यात यावी. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात यावी. पंढरपूरला विशेष निधी दिला आहे. आषाढी वारीपूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी याकडे लक्ष द्यावेअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 

राज्यातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट

            बैठकीत मुंबईतील २२६ धोकादायक इमारतींपैकी २७ इमारतीतील रहिवाश्यांना स्थलांतरित केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीराज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अहवालावर अवलंबून राहू नये. यामुळे भविष्यातील जीवितहानी टाळता येईल. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची निवासाची काळजीही घेण्यात यावी. जेणेकरून ते धोकादायक इमारतीतून बाहेर पडण्यासासाठी तयार होतील.

नालेसफाईवर लक्ष द्यावेबांधकामांचा राडारोडा-खरमाती हटवा

            नालेसफाईवर आतापासूनच लक्ष द्यावेअसे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईबरोबरच अन्य ठिकाणीही नाले सफाईवर चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास सखल भागात पाणी साचून होणारे नुकसान टाळता येईल. काही अंशी पुराचा धोका टाळता येईल. मुंबईत रेल्वे आणि महापालिकेने नाले सफाईबाबत संयुक्त मोहीम राबवावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय आणि संपर्क राखावा. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठीच्या उपाययोजनांवर लक्ष पुरवण्यात यावे. विविध यंत्रणांकडून सुरु असलेल्या बांधकांमातील राडारोडा-खरमाती वेळीच हटवण्यात यावी. काही कामांच्या ठिकाणी बांधकाम सुरक्षित टप्प्यांपर्यंत (सेफ-लेव्हल) पोहचेलयाची दक्षता घ्यावी. मुंबई उपनगरातील दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्राधान्यक्रम निश्चित करूनप्रस्ताव देण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

विविध दलयंत्रणांसाठी आवश्यक सामग्री तत्काळ उपलब्ध करावी

            एनडीआरएफएसडीआरएफ तसेच लष्करनौदलहवाईदल यांच्या मागणीनुसार आपत्ती व्यवस्थापनात जीवितहानी होऊ नये शोध आणि बचाव मोहिमेसाठी आवश्यक अशी उपकरणे तत्काळ उपलब्ध होतील यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. ठाणेयेथे एनडीआरएफसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूर या भागात जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच या दलाचे तळ तेथे प्रभावीपणे कार्यरत होतीलअसे निर्देशही देण्यात आले.

जलसंपदा विभागाने काळजीपूर्वक नियोजन करावे

            पावसाळ्यात जलसंपदा विभागाची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या विभागाने आतापासूनच सतर्क राहावे. कोल्हापूर-सांगली भागातील पुराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क-समन्वय राहावा यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे. संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करावे. नागपूर विभागाने मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून होणारा विसर्ग आणि तेलंगणातील मेडीगट्टाची पातळी याबाबत संपर्क-समन्वय राखावा. ज्यामुळे गडचिरोली आणि अन्य परिसराला पाण्याचा फटका बसणार नाही.

            मराठवाड्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूंबाबत वीज कोसळण्याचा इशारा देणारी  वीज अटकाव (लायटनिंग ॲरेस्टर) यंत्रणा उभारणीबाबत संबंधित सर्वच विभागांनी वेळेत कार्यवाही करावी. जेणेकरून लोकांना वेळेत इशारा मिळेल आणि जिवीतहानी टळेल.

मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वेमहापालिकेला दक्षतेच्या सूचना

            मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वे व महापालिकेने समन्वय राखावा. लोहमार्गांवर पाणी साचू नये यासाठी नालेसफाई चांगल्या पद्धतीने होईल यावर भर द्यावा. परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेने बसेसची उपलब्धताशाळा आणि निवाऱ्याची सोयपिण्याचे पाणी- अन्नपदार्थ यांबाबत नियोजन करावे. कोकण रेल्वे तसेच कोकणातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याबाबत वेळीच सर्व यंत्रणांना इशारा द्यावाअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

            मुंबई महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांनी रेल्वे आणि महापालिकेचा समन्वय राखल्याची माहिती दिली. मुंबईतील परिस्थितीवर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून ६ हजार ४०० कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यातील १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळातील मोठी भरती (हाय टाईड) च्या ५६ दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. जे खड्ड्यांची माहिती मिळताचपुढच्या सहा तासात खड्डे बुजवतीलअसे नियोजन आहे. पाणी तुंबू नये यासाठी सुमारे ५०० पंप्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

            मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी व पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्राकोकण रेल्वेच्या वतीनेही पावसाळ्यापूर्वीचे सर्वेक्षण व लोहमार्गांवर लक्ष ठेवण्याबाबत केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यात आली.

लष्करनौदलहवाईदलपोलिसांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक..

            महाराष्ट्रातील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूरवादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफएनडीआरएफच्या बरोबरीनेच या तीनही दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केल्याचे आणि उत्तम कामगिरी बजावल्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी या दलांतील जवानांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याचे आणि जवानांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावल्याचा अनुभव आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या महापुरात मध्यरात्री एका गर्भवती मातेने दूरध्वनीवरून मदतीची याचना केली होती. त्यामध्ये या सर्वच दलांच्या सहकार्यामुळे तिला वेळेत रुग्णालयात दाखल करता आल्याची आठवणही सांगितली.

            यावेळी लष्करनौदलहवाईतटरक्षक दलएनडीआरएफरेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. एनडीआरएफची १८एसडीआरएफची सात पथकेनौदलाची १० पथकेतटरक्षक दलाची ६ पथकेहवाई दलाची मिग ७० हेलीकॉप्टर्सतसेच या सर्वच पथकांकडे बोटीउपकरणे अनुषंगीक गोष्टींची सज्जता असल्याची माहिती देण्यात आली.

०००००


 

Featured post

Lakshvedhi