Monday, 29 May 2023

आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी

 आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी

राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश

 

            मुंबई दि. 29 : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

             राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करावा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

            या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्चकोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामेकोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्चई पंचनामेआपदा मित्रई सचेत प्रणाली आदि मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.

            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, एनडीआरएफ कंपन्या राज्यात प्रत्येक ठिकाणी आपत्तीमध्ये वेळेत पोहचू शकत नाहीतयासाठी राज्यात सातही विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दले नेमण्याची कार्यवाही व्हावी. सध्या एसडीआरएफच्या दोन तुकड्या धुळे आणि नागपूर येथे आहेत. याशिवाय राज्यात ही दले असतील. ठाणे येथे महानगरपालिकेने आपत्ती प्रतिसादासाठी वेळेत धावून जाणारे दल तयार केले असून त्यांनी विशेषत: इमारत दुर्घटनामध्ये उत्तम काम केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीज्या ठिकाणी उंच इमारती आहेत तसेच आपत्तींची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी पालिकांनी आपत्ती बचाव दले तयार करावीत.

कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने व्हावीत

            राज्यात कोकण भागास वारंवार वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच ३२०० कोटी रुपये कोकणात विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्याधूप प्रतिबंधक बंधारेबांध घालणेबहुउद्देशीय चक्रीवादळामधील आसरे बांधणेदरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपायवीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण करीत ही कामे तत्काळ सुरु करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

कोविडसाठी अर्थसहाय्य

            कोविड कारणांसाठी आजपर्यंत १ हजार ९७४ कोटी खर्च झालेला आहे. कोविड काळात झालेल्या मृत्यु झालेल्यांच्या वारसांसाठी एकूण १०३८ कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाने अनुदान वाटप केले आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकास ५० हजार रुपये राज्य शासनाने देण्याचे निश्चित केले होते. ५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली.


 

आपत्तींमुळे ४३७ मृत्युमुखी

            मागील वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ४३७ जण मरण पावले असून ६८० जखमी झाले आहेत. तर ४३४८ जनावरे मरण पावली आहेत, अशी माहितीही विभागाने बैठकीत दिली.

            ७९०० आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले असून राज्याला यासाठी २७ कोटी रुपये निधी मिळाला आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

मदतीसाठी निधी

            एसडीआरएफमध्ये केंद्राकडून प्राप्त निधी आणि तितकाच राज्याचा हिस्सा असे २०२२-२३ मध्ये ३ हजार ९४७ कोटी प्राप्त झाले. एसडीआरएफच्या निकषांव्यतिरिक्त एकूण ३ हजार ८६३ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाला आहे.  तसेच जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांना ७ हजार १५१ कोटी २५ लाख वाटप केल्याचेही सांगण्यात आले.

            सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केला असून त्वरित नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पंचनाम्यांसाठी नवीन तंत्रज्ञान

            पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करावेत. यासाठी एमआर एसएसी या कंपनीस नियुक्त केले आहे. यातून केल्या जाणाऱ्या ई - पंचनाम्यानुसार १५ दिवसांत बाधितांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच पोलीस महासंचालक रजनीश सेठमुख्यमंत्री सचिवालयातील तसेच इतर सचिववरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००


 

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


कोकणात आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचेही निर्देश


 


            मुंबई दि. 29 : विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.


             राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करावा तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


            या बैठकीत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा खर्च, कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे, कोविड व विविध प्रसंगी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा खर्च, ई पंचनामे, आपदा मित्र, ई सचेत प्रणाली आदि मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी सादरीकरण केले.


            मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, एनडीआरएफ कंपन्या राज्यात प्रत्येक ठिकाणी आपत्तीमध्ये वेळेत पोहचू शकत नाहीत, यासाठी राज्यात सातही विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दले नेमण्याची कार्यवाही व्हावी. सध्या एसडीआरएफच्या दोन तुकड्या धुळे आणि नागपूर येथे आहेत. याशिवाय राज्यात ही दले असतील. ठाणे येथे महानगरपालिकेने आपत्ती प्रतिसादासाठी वेळेत धावून जाणारे दल तयार केले असून त्यांनी विशेषत: इमारत दुर्घटनामध्ये उत्तम काम केले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी उंच इमारती आहेत तसेच आपत्तींची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी पालिकांनी आपत्ती बचाव दले तयार करावीत.


कोकण आपत्ती सौम्यीकरणाची कामे वेगाने व्हावीत


            राज्यात कोकण भागास वारंवार वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच ३२०० कोटी रुपये कोकणात विविध आपत्ती निवारण कामे करण्यासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये भूमिगत वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, बांध घालणे, बहुउद्देशीय चक्रीवादळामधील आसरे बांधणे, दरडी प्रवण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाय, वीज अटकाव यंत्रणा यांचा समावेश आहे. यासंदर्भातील तांत्रिक कार्यवाही पूर्ण करीत ही कामे तत्काळ सुरु करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


कोविडसाठी अर्थसहाय्य


            कोविड कारणांसाठी आजपर्यंत १ हजार ९७४ कोटी खर्च झालेला आहे. कोविड काळात झालेल्या मृत्यु झालेल्यांच्या वारसांसाठी एकूण १०३८ कोटी रुपये मदत व पुनर्वसन विभागाने अनुदान वाटप केले आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकास ५० हजार रुपये राज्य शासनाने देण्याचे निश्चित केले होते. ५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली.



 


आपत्तींमुळे ४३७ मृत्युमुखी


            मागील वर्षात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे ४३७ जण मरण पावले असून ६८० जखमी झाले आहेत. तर ४३४८ जनावरे मरण पावली आहेत, अशी माहितीही विभागाने बैठकीत दिली.


            ७९०० आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले असून राज्याला यासाठी २७ कोटी रुपये निधी मिळाला आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.


मदतीसाठी निधी


            एसडीआरएफमध्ये केंद्राकडून प्राप्त निधी आणि तितकाच राज्याचा हिस्सा असे २०२२-२३ मध्ये ३ हजार ९४७ कोटी प्राप्त झाले. एसडीआरएफच्या निकषांव्यतिरिक्त एकूण ३ हजार ८६३ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाला आहे. तसेच जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांना ७ हजार १५१ कोटी २५ लाख वाटप केल्याचेही सांगण्यात आले.


            सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केला असून त्वरित नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


पंचनाम्यांसाठी नवीन तंत्रज्ञान


            पंचनाम्यांच्या पद्धतीत सुधारणा करून मोबाईल ॲपद्वारे पंचनामे करावेत. यासाठी एमआर एसएसी या कंपनीस नियुक्त केले आहे. यातून केल्या जाणाऱ्या ई - पंचनाम्यानुसार १५ दिवसांत बाधितांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी व्यवस्था तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            बैठकीस मुख्य सचिव मनोज सौनिक तसेच पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुख्यमंत्री सचिवालयातील तसेच इतर सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


००००



 

आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*

 💥 *आज जो भारत में रेलवे है..उसको भारत में कौन लाया ?*


*आपका उत्तर ब्रिटिश होगा।*


*कैसा रहेगा अगर मैं कहूं कि ब्रिटिश सिर्फ विक्रेता थे, यह वास्तव में एक भारतीय का स्वप्न था।*


*भारतीय गौरव को छिपाने के लिए हमारे देश की पूर्व सरकारों के समय इतिहास से बड़ी एवं गम्भीर छेड़छाड़ की गई।*


*रेलवे अंग्रेजों के कारण नहीं बल्कि नाना के कारण भारत आयी। भारत में रेलवे आरम्भ करने का श्रेय हर कोई अंग्रेजों को देता है लेकिन श्रीनाना जगन्नाथ शंकर सेठ मुर्कुटे के योगदान और मेहनत के बारे में कदाचित कम ही लोग जानते हैं।*


*१५ सितंबर १८३० को दुनिया की पहली इंटरसिटी ट्रेन इंग्लैंड में लिवरपूल और मैनचेस्टर के बीच चली। यह समाचार हर जगह फैल गया। बम्बई (आज की मुंबई) में एक व्यक्ति को यह बेहद अनुचित लगा। उन्होंने सोचा कि उनके गांव में भी रेलवे चलनी चाहिए।*


*अमेरिका में अभी रेल चल रही थी और भारत जैसे गरीब और ब्रिटिश शासित देश में रहने वाला यह व्यक्ति रेलवे का स्वप्न देख रहा था। कोई और होता तो जनता उसे ठोकर मारकर बाहर कर देती लेकिन यह व्यक्ति कोई साधारण व्यक्ति नहीं था। यह थे बंबई के साहूकार श्रीनाना शंकरशेठ, जिन्होंने स्वयं ईस्ट इंडिया कंपनी को ऋण दिया था.. है न आश्चर्यजनक।*


*श्रीनाना शंकरशेठ का मूल (वास्तविक) नाम था जगन्नाथ शंकर मुर्कुटे, जो बंबई से लगभग १०० कि. मी. मुरबाड़ से थे और पीढ़ीगत रूप से समृद्ध थे। उनके पिता अंग्रेजों के बड़े नामी साहूकार थे। उन्होंने ब्रिटिश - टीपू सुल्तान युद्ध के समय बहुत धन अर्जित किया था। उनका एक मात्र पुत्र नाना थे। यह बालक मूँह में स्वर्ण चम्मच लेकर पैदा हुआ था लेकिन धन ही नहीं अपितु ज्ञान और आशीर्वाद का हाथ भी उसके सिर पर था। पिता ने एक विशेष अध्यापक रख कर अपने पुत्र को अंग्रेजी आदि की शिक्षा देने की भी व्यवस्था की थी। अपने पिता की मृत्यु के उपरांत, उन्होंने गृह व्यवसाय का बृहत विस्तार किया।*


*जब विश्व के अनेक देश अंग्रेजों के सामने नतमस्तक थे, तब ब्रिटिश अधिकारी नाना शंकरशेठ के आशीर्वाद के लिए अपने पैर रगड़ते थे। अनेक अंग्रेज उनके अच्छे मित्र बन गए थे।*


*बंबई विश्वविद्यालय, एलफिन्स्टन कॉलेज, ग्रांट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स, बंबई में कन्याओं के लिए पहला विद्यालय व बंबई विश्वविद्यालय नाना द्वारा स्थापित किये गये थे।*


*इसलिए श्रीनाना शंकरशेठ ने बंबई में रेलवे प्रारंभ करने का विचार बनाया। वर्ष था १८४३, तब वे अपने पिता के मित्र सर जमशेदजी जीजीभाय उर्फ जे जे के पास गए। श्रीनाना के पिता की मृत्यु के उपरांत वे श्रीनाना के लिए पिता तुल्य थे। उन्होंने सर जेजे को अपना विचार बताया, उन्होंने इंग्लैंड से आए सर्वोच्च न्यायालय के न्यायाधीश सर थॉमस एर्स्किन पेरी की भी राय ली कि क्या पारले, बंबई में रेलवे का आरंभ किया जा सकता है ?*


*वे भी इस विचार से चकित थे। इन तीनों ने मिलकर भारत में इंडियन रेलवे एसोसिएशन की स्थापना की।*


*उस समय कंपनी सरकार का भारत में रेलवे बनाने का कोई विचार नहीं था लेकिन जब श्री नाना शंकरशेठ, सर जेजे, सर पैरी जैसे लोगों ने कहा कि वे इस कार्य के लिए गंभीरता से इच्छुक हैं तो उन्हें इस ओर ध्यान देना पड़ा। १३ जुलाई १८४४ को कंपनी ने सरकार को एक प्रस्ताव पेश किया।*


*बंबई से कितनी दूर तक रेल की पटरी बिछाई जा सकती है, इस पर प्रारंभिक रिपोर्ट तैयार करने की आज्ञा दी गई। उसके पश्चात "बॉम्बे कमेटी" का गठन किया गया। नाना ने कुछ अन्य बड़े अंग्रेज व्यापारियों, अधिकारियों, बैंकरों को एकत्रित किया और ग्रेट इंडियन रेलवे की स्थापना कर दी जिसे आज भारतीय रेल के नाम से जाना जाता है।*


*अंत में दिन ढल गया। दिनांक १६ अप्रैल १८५३ को मध्यान्ह ३.३० बजे ट्रेन बंबई के बोरीबंदर स्टेशन से थाना (ठाणे) के लिए रवाना हुई। इस ट्रेन में १८ डिब्बे और ३ लोकोमोटिव इंजन थे। इस ट्रेन के यात्रियों में श्री नाना शंकरसेठ एवं जमशेदजी जीजीभाय टाटा भी थे, जिसे विशेष रूप से अपनी पहली यात्रा के लिए फूलों से सजाया गया था।*


*नमन है श्रीनाना शंकरसेठ जी को 💐👏*


*कृपया यह अनमोल जानकारी अपने अन्य मित्रों व परिजनों से अवश्य साझा करें।*🙏🌹👍❤️🎉❤️


https://en.m.wikipedia.org/wiki/Jagannath_Shankarseth

सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे*

 *सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे*

 

*रक्ताभिसरण सुधारते* 

सोयाबीन खाण्याचे फायदे असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. 


*गरोदरपणात उपयुक्त* 

सोयाबीनमध्ये फॉलिक अॕसिड आणि बी कॉप्लेक्स भरपूर प्रमाणात असते. जे गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीराला आवश्यक असते. गर्भवती महिलांनी सोयाबीनचा आहारात समावेश केल्यास त्यांच्या शरीराला हे पोषक घटक मिळतात. गर्भाच्या वाढ आणि विकासासाठी आणि सुलभ प्रसूतीसाठी गर्भवती महिलांच्या आहारात सोयाबीन असायला हवे. 


*ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते* 

सोयाबीन खाण्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्या कमी होतात. ह्रदयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल कमी आणि गुड कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. कारण कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येतो आणि ह्रदयाच कार्य सुरळीत होत नाही. सोयाबीनमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते. ह्रदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीराला याचा चांगला फायदा होतो. सोयाबीनमध्ये असलेल्या लेसीथीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहत नाही. म्हणूनच ह्रदयविकार असलेल्या लोकांनी सोयाबीनचा आहारात अवश्य वापर करावा. 


*हाडांचे आरोग्य सुधारते*

 

सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आणि कॅल्शिअम असतात. हाडे मजबूत होण्यासाठी याची शरीराला गरज असते. ज्या लोकांना आर्थ्राटीस सारखे गंभीर हाडांचे विकार आहेत. त्यांनी आहारात सोयाबीनचा वापर केल्यास चांगला आराम मिळू शकतो. शिवाय सोयाबीनमध्ये फॅट्स आणि कॅलरिज कमी असतात. ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. एवढंच नाही तर अॕनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांनी नियमित सोयाबीनची भाजी खाल्लास चांगला फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे त्यांच्या शरीरातील लाल रक्त पेशीतर वाढतातच शिवाय हाडेही मजबूत होतात. शरीराचा योग्य विकास करण्यासाठी सोयाबीन हा एक चांगला पर्याय आहे. कारण त्यामुळे तुमच्या मांसपेशी, नखं, हाडे, केस मजबूत होतात.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

Sunday, 28 May 2023

मेरा भारत महान

 *निविदा फेटाळल्यानंतर धीरूभाई अंबानी नितीन गडकरींना म्हणाले की, रस्ता बांधण्याची सरकारची औकाद आहे काय? वर्ष होते 1995 तरुण नितीन गडकरी यांना महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तयार करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.*


*त्यावेळी धीरूभाई अंबानी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्योगपती होते. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक सर्वांना माहीत होती. त्यामुळे या द्रुतगती मार्गाच्या बांधकामाची निविदा काढण्यात आली. धीरूभाईंनी 3,600 कोटी रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली. हे कंत्राट धीरूभाईंकडेच जाईल, असे शिवसेनेने ठरवले होते.*


*पण नितीन गडकरींनी ह्या मध्ये एक जबरदस्त खुट टाकली. दोन हजार कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चात हा रस्ता पूर्ण होणार असल्याचे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले. पण सर्वात कमी निविदा ३,६०० कोटींची होती. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी सांगितले की, सर्वात कमी निविदा असलेल्याला काम मिळावे, परंतु गडकरींनी उपमुख्यमंत्री मुंडे यांना सांगितले की, 2,000 कोटी रुपयांपर्यंतच्या कामासाठी 3,600 कोटी रुपये खूप आहेत. निविदा नाकारण्यात याव्यात.*


*त्यावेळी मुंबईत धीरूभाईंचा प्रचंड प्रभाव होता. मात्र गडकरींनी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि मुंडे यांना स्वस्तात रस्ते बनवणार असल्याचे पटवून दिले. त्यावेळी सरकारकडे तेवढा पैसा पणं नव्हता. त्यामुळे पैसे कुठून येणार, असा सवाल जोशी यांनी केला. गडकरी म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेवा... मी तोडगा काढतो.*


*मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गडकरींचा मुद्दा मान्य करत निविदा रद्द केली. अंबानी कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. धीरूभाईंचे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्याशी चांगले संबंध होते. निविदा नाकारल्याने धीरूभाई नाराज झाले. त्यांनीही नाराजी व्यक्त केली. प्रमोद महाजन यांनी नितीन गडकरींना धीरूभाईंना भेटून समजून घेण्यास सांगितले.*


*महाजन यांचे बोलणे गडकरी टाळू शकले नाहीत. नितीन गडकरी धीरूभाईंना भेटायला गेले. गडकरींनी अनिल, मुकेश आणि धीरूभाई या तिघांसोबत जेवण केले. जेवण झाल्यावर धीरूभाईंनी नितीनजीना विचारले, "रस्ता कसा बनणार? टेंडर रद्द केले आहे तर आता कस करणार?" गडकरींनी धीरूभाईंना सांगितले की, "तुम्ही 2000 कोटी रुपयांमध्ये बनवन्यास तयार असाल तर हे टेंडर मी तुम्हाला देऊ शकतो." त्यावर उत्तर देताना धीरूभाई म्हणाले, "सरकारची काय लायकी आहे, तुम्ही काय रस्ता बांधणार? ते तुम्हाला शक्य नाही. तुम्ही व्यर्थ आग्रह करत आहात." ते पुढे गडकरींना म्हणाले, "मी अनेकांना असे म्हणताना पाहिले आहे, पण काहीही होणार नाही." असे म्हणत धीरूभाईंनी नितीन गडकरींना एकप्रकारे आव्हान दिले.*


*नितीन गडकरींनीही धीरूभाईंचा मुद्दा मनावर घेतला आणि ते म्हणाले की, "धीरूभाई, जर मला हा रस्ता बांधता आला नाही तर मी माझ्या मिशा कापून टाकेन आणि मी हे करू शकलो तर तुम्ही काय कराल? याचा विचार करा." त्यांची बैठक संपली आणि नितीन गडकरी अंबानींना आव्हान देऊन निघून गेले.*


*आता रस्ता कसा बांधणार आणि पैसा कुठून येणार हा प्रश्न होता. नितीन गडकरी यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर त्यावेळी राज्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना केली. पब्लिक आणि कंपन्यांच्या माध्यमातून पैसा उभा करण्यात आला. मनोहर जोशी व गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने व अनुभवी अभियंते यांच्या देखरेखी खाली काम सुरू झाले. नितीन गडकरींनी 2000 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चात काम केले. हे सर्व पाहून गडकरींच्या प्रतिभेचा सर्वांनीच धसका घेतला.*


*हे प्रकरण धीरूभाई पर्यंतही पोहोचले. ते हेलिकॉप्टरने रस्ता पाहण्यासाठी निघाले. एक्स्प्रेस वे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तातडीने नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी बोलावले. ते मेकर्स चेंबरमध्ये पुन्हा भेटले. ते भेटल्यावर धीरूभाई म्हणाले, "नितीन, मी हरलो, तू जिंकलास. तू रस्ता बनवून दाखवलास.*


*धीरूभाईंनी नितीन गडकरींना सांगितले की, "तुमच्यासारखे आणखी 4-5 लोक देशात असतील तर देशाचे नशीब बदलेल." नितीन गडकरींनी ज्या आव्हानाने आपले काम केले, ज्यांनी सरकारी पैसा वाचवण्यासाठी धीरूभाईंसारख्या मोठ्या व्यक्तीशी दुश्मनी घेतली ते आजही स्मरणात आहे.*


*🌹🙏आज या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण आहे की आज भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे खंबीर नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीजी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला. श्री नितिन गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा....!!!💝🎂💐💐💐🙏🌹*


*🔷Shri Nitin Gadkari🙏🔷*


*🇮🇳जय हिंद! 🇮🇳*

मॉरिशसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

 मॉरिशसमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण


स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचविण्याची गरज


                                                     - सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

       मॉरिशस, दि. २८ : - एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले,फळे, मुळे उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर हे कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मॉरिशस येथे केले.


                  स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत रुजवण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु रहावे म्हणून मॉरिशस येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजन करण्यात आले आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आज मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


                 मॉरिशस आणि महाराष्ट्राचे भावबंध महासागराएवढे गहिरे आणि विशाल आहेत. मॉरिशसच्या मराठी बंधू-भगिनींनी २०० वर्ष आपली हिंदू संस्कृती जपून येथे मराठी भाषा वाढविण्याचे आणि संवर्धनाचे कार्य केले आहे. येथील सरकारच्या विविध मंत्रालयांना भेटी देत असताना २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला विशेष मित्रराष्ट्राचा दर्जा दिल्याने भारताचे आणि मॉरिशसचे भावबंध अधिक दृढ झाले आहेत असेही यावेळी मंत्री श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.


      महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात व्यावसायिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ऋणानुबंध वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. त्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धाकृती पुतळा महाराष्ट्रातर्फे आम्ही आज भेट दिला आहे. स्वातंत्र्यवीर यांच्या विचारांची ऊर्जा मॉरिशसमधील समस्त मराठी बांधवांना मिळत राहील असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.


         सावरकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. अंदमानच्या कारावासातही सावरकरांनी आपले अजरामर काव्य रचले. अंदमानमधील सेल्युलर जेलमधील भिंतीवर कोरलेले सावरकरांचे राष्ट्रभक्तीपर काव्य आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.


      भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत होताना दिसत आहेत. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत आणि मॉरिशस हे दोन्ही देश विकासाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मकरित्या पुढे जात आहेत. मॉरिशस मधील सांस्कृतिक चळवळ ही वृद्धिंगत होताना दिसत आहे असेही गौरवोद्गार मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी काढले.


         या प्रसंगी मॉरिशस हाऊसिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद बब्बीआ, मॉरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष आणि मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे मुख्य निर्माते अर्जुन पुतलाजी, मराठी भाषिक संघाचे अध्यक्ष नितीन बाप्पू, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे अध्यक्ष आणि सीएसके असंत गोविंद, खासदार अ‍ॅश्ले इट्टू, कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्रालया अंतर्गत राष्ट्रीय वारसा निधी संचालक शिवाजी दौलतराव, मॉरिशस मराठी मंडळी महासंघाचे सरचिटणीस बाबुराम देवरा, क्रॉसवेज इंटरनॅशनल, मॉरिशसचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.


000000

नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब

 नवीन संसद भवनाचे उद्घाटन देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब

                                                     – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            नवी दिल्ली, २८ : नवीन संसद भवनाचे उद्घाटन तसेच लोकार्पण, समस्त देशवासियांसाठी अभिमानाची व सन्मानाची बाब असून या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.


देशाच्या राजधानीमध्ये नव्या संसद भवनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे खासदार, विविध मंत्रालयांचे सचिव, माजी केंद्रीय मंत्री, संसदेचे दोन्ही सभागृहांचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.


नवीन संसदेच्या निर्मितीबाबत बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन झाले आहे, ही देशातील जनतेसाठी सन्मानाची बाब आहे. आज या वास्तूचे लोकार्पण झाले असून संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट, वृद्धिंगत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. आजचा दिवस हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील या नव्या वास्तूचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री यांचे अभिनंदन केले.


नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या टप्प्यात सकाळी सर्व धर्म प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात प्रधानमंत्री यांनी सेंगोलला साष्टांग दंडवत घातला व नंतर या नव्या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावलेल्या कामगारांचा गौरव त्यांनी केला.


000



नई संसद भवन का उद्घाटन देश की जनता के लिए सम्मान की बात है


                                                                     – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे






     नई दिल्ली, २८ : नए संसद भवन का उद्घाटन एवं लोकार्पण, समस्त देशवासियों के लिए गर्व और सम्मान की बात है और इस अभूतपूर्व समारोह का साक्षी होने का सौभाग्य मुझे मिला है, यह भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने व्यक्त की.


      देश की राजधानी में नए संसद भवन का उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों आज हुआ। इस अवसर पर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला समेत केंद्रीय मंत्री, विविध राज्यों के राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, उपमुख्यमंत्री, दोनों सभागृह के सांसद, विविध मंत्रालयों के सचिव, पूर्व केंद्रीय मंत्री, संसद के दोनों सभागृह के पूर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित थे।


      नए संसद के निर्माण को लेकर कहते हुए मुख्यमंत्री ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों नए संसद भवन का उद्घाटन हुआ है और यह देश की जनता के लिए गर्व की बात है। आज इस वास्तू का लोकार्पण हुआ है और समूचे देश को गर्व महसूस हो, ऐसी इस नई वास्तू के माध्यम से लोकशाही अधिक मजबूत, वृद्धिंगत होगी, यह विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे ने इस दौरान व्यक्त किया। आज का यह दिन सभी भारतीयों के लिए गर्व का दिन है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से इस नई वास्तू निर्माणकार्य विक्रमी समय में पूरा होने पर उन्होंने प्रधानमंत्री का अभिनंदन किया।


      नए संसद भवन के उद्घाटन के इस पहले चरण में सुबह सर्व धर्म प्रार्थना सभा का आयोजन किया गया था। इस दौरान मुख्यमंत्री श्री. शिंदे इस कार्यक्रम में शामिल हुए थे। इस कार्यक्रम में प्रधानमंत्री ने सेंगोल को साष्टांग प्रणाम किया और इसके बाद नई इमारत के निर्माण में काम करनेवाले कामगारों का सम्मान उन्होंने इस अवसर पर किया।


0000

                         

उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!*

 *उन्हाळी लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या !!*


डोक्यावर सूर्य तापला, उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरु होतो. तो म्हणजे उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याचबरोबर जळजळ, मुत्रानालीकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे. हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात उद्भवतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी असतेआपण बघणार आहोत उन्हाळी लागण्याची करणे आणि त्यावरचे घरघुती उपाय !!...


*कारणे !*

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कामी होतं. पाणी कमी झाल्याने लघवीत क्षारचं प्रमाण वाढतं. म्हणजेच शरीरात पाणी नसल्याने ‘उन्हाळी लागते’. स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या प्रकारे असतो.

पुरुषांमध्ये लघवीला व मुत्रानालीकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात. स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्त्रावाचा त्रास होतो. यापासून लहान मुलंही वाचलेली नाहीत .

, या समस्येवर काही घरघुती उपाय आहेत. चला तर बघुयात !!

.

.

.

*उपाय*

१. पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे ‘भरपूर पाणी प्या.’


२. खाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्यायल्यास त्रास कमी होतो.


३. शहाळ्याचे पाणी प्या.


४. धने, जिरे, बडीशेप भिजवून, कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे.


५. कलिंगडचा रस प्या.


६. नारळाच्या पाण्यात धने व गूळ घालून प्या.


७. नीरा प्यायलाने देखील फायदा होतो.


८. आमसुलाचे पाणी, कोकम सरबत साखर घालून प्यावे.


९. कैरीचे पन्हे वेलदोडा घालून प्यावे.


१०. पुदिन्याचे पाणी प्या !!

.

११ रोज दोन विलायच्या खाव्यात..

  

 १२.. चूना ओला करून. तो बेंबित भरा. लगेच आराम मिळतो.

   

  १३एका बादलीत थंड पाणी भरून मग त्यात पाय सोडून बसा...


       आयुर्वेद अभ्यासक...... सुनिता सहस्रबुद्द्धे .🍁☘️🍁



_*(

Featured post

Lakshvedhi