Sunday, 28 May 2023

आणीबाणी लढा स्वातंत्र्य पुरस्कार सूचना

 



खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*

 🇮 🇲 🇵 


*खोकला... 👇व..त्यावर प्रभावी उपाय..*


...(१). हळदिच्या दुधात खारिक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारिक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. याने कफ सुटतो व बाहेर पडतो . खोकला बरा होतो

...(२). आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो

....(३). लसुण प्रक्रुतीने उष्ण आहे. त्यात एन्टि बॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो. व बरं वाटतं.

     (४).. काळि मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे.

.....(५) पिंपळि गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.

    (६) खोकला बरा होत नसेल तर नीलगिरिच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातिला मालिश करा. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

      (७) ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली कि, ज्येष्ठमध काडि चघळल्यास ढास जाते. बरं वाटते

.... किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो..

      (८).. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहे. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले कि. एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ सुटतो व बरं वाटतं.

     (९). लवंग व मध.. खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी. पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे त्यात..

    (१०).. सर्दि व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा.. संक्रमण दूर होतील

   (११). खोकला बरा होत नसेल तर चार वेलदोडे व तितकिच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो 

   (१२).. नुसति कोरडी ढास लागलि असेल तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या पावडर करून त्यात तुप व साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

  १३).. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे आटवून अर्धं करा मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.

(१४). खोकला, कफ, सर्दिवर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.

(१५). खोकल्यावर सुंठिचि पावडर अर्धा चमचा + पिंपळि चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.

(१६) खोकला झाल्यास बडिशेप व खडिसाखर खावि.

(१७). एक चिमटि काताचि पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.

(१८). खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच ,सहा मनुका घालून खावे..

(१९).. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावि

(२०). खोकला बरा होत नसेल तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन , चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.

(२१). कोरडा खोकला झाल्यास. खसखशिचि खिर खावि. मुठभर खसखस भाजून (तुपात). घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्यावे. साखर आवडिनुसार मिसळून द्यावे.

२२).. डांग्या खोकल्यावर तुरटि कुटून गरम करून घ्या. मग त्या त्या पाणि मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटि शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.

(२३).. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.

(२४). बकुळिचि फुले ओंजळभर + सोनचाफ्याचि ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन साखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.

(२५).. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा. व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.

(२६).. एक कप दूधामध्ये लसणिच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.

(२७).. ज्येष्ठ मध + खडिसाखर चघळावि.

(२८). कोरफडिचि पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा.. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे..

(२९).. भिमसेन कापुर व एक चमचा साखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो

(३०).. खोकला झाल्यास तुळशी ची पाने ठेचून व गरम करून या पोटिसनि छाति शेकावि..


सुनिता सहस्रबुद्धे


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

जांभूळ खाताना या चुका करु नका...*

 *जांभूळ खाताना या चुका करु नका...* 


        जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.


*रिकाम्या पोटी जांभुळ खाणे टाळा* 

            रिकाम्या पोटी जांभुळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभुळची चव आंबट असते, त्यामुळे रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने एसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.


*जांभुळ आणि हळद एकत्र कधीही खाऊ नका* 

            जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जांभुळ खाल्ल्यानंतर हळद खाण्याची इच्छा असेल तर किमान 30 मिनिटे थांबा. वास्तविक, जांभुळ आणि हळद एकत्र मिसळल्याने शरीरात प्रतिक्रिया होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटेल. तसेच यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.


*दूध आणि जांभुळ एकत्र खाल्ल्याने गॅस होतो* 

          दूध आणि जांभुळ एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे फळ खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर रहा आणि किमान 30 मिनिटांनंतरच दूध प्या.


*लोणचे आणि जांभुळ एकत्र खाऊ नका* 

          घरी बनवलेले आंबट-गोड लोणचे खायला कोणाला आवडत नाही. पण इथे काही फूड कॉम्बिनेशनसोबत लोणचे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या दोन गोष्टींच्या मिश्रणाने पोटाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जांभुळ खाल्ल्यानंतर एक तास लोणचे टाळले तर बरे होईल.


*जांभुळ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका* 

            जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे हे अनेक समस्यांवर मेजवानीसारखे आहे. त्यामुळे डायरियासारखा आजार तुम्हाला घेरतो. येथे जांभुळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतरच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



Suorabhat

: 🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

*ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात, सदैव यशस्वी होतो. लाचारी स्विकारून, अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा, स्वाभिमानाने स्विकारलेला एकटेपणा, कधीही चागंला.*

🪷🪷🌹🩷🌹🪷🪷

🪔🪔 **🪔🌸❄️⚜️सुप्रभात ⚜️❄️🌸🔅*

*आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत.*

*पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते.*

🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️🏵️⚜️

Saturday, 27 May 2023

झोपेचे नियम,l निवांत झोप

 कस झोपावं.

लाईफस्टाईलमधील अनेक चूकीच्या सवयीमुळे आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. झोप ही शरीराला सक्रीय करते आणि दिवसा आपले शरीर जी उर्जा गमावते ती पुन्हा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केवळ झोपेमुळेच शक्य होते.रात्रीच्या झोपेसाठी संस्कृतमध्ये 'भुतधात्री' असा शब्द आहे, ज्याचा अर्थ आहे 'संपूर्ण चराचराची माता'. ज्या प्रकारे आई आपल्या बाळाचे पालन पोषण करते त्या प्रमाणे ही सृष्टी आपल्याला निद्रा काळात विश्रांती देऊन एक प्रकारे पोषणच करीत असते.म्हणूनच रात्री गाढ झोप घेणे आणि ही झोप पुरेशी असणे खूप गरजेचे आहे.

झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतू ती योग्य स्थितीत योग्य दिशेत घ घेणेही तितकेच आवश्यक आहे.

चला तर मग पाहूया कस झोपाव या संबंधित काही नियमः


,*झोपण्यासाठी योग्य दिशा*

*पूर्व दिशेला डोके करून झोपणे आयुर्वेदामध्ये खूप चांगले समजले गेले आहे. जर तुम्हाला स्मरणशक्तीचा प्रॉब्लेम असले तर तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला डोके करून झोपायला हवे. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल असे जाणकार सांगतात. पूर्व दिशेला डोके करून झोपल्याने एकाग्रता सुधारते, चांगली गाढ व शांत झोप लागते आणि मेंदू तल्लख होतो.

 

*पश्चिमेला डोके करून झोपण्यास सुद्धा आयुर्वेद मनाई करते. पश्चिम दिशेला डोके करून झोपल्यास रात्री गाढ झोप लागत नाही. वास्तूशास्त्र म्हणते की या दिशेला डोके करून झोपल्यास वाईट स्वप्ने पडू शकतात आणि त्यामुळे रात्रभर तुम्ही झोपेत तळमळत राहू शकता. शास्त्रामध्ये सुद्धा पश्चिम दिशेला तोंड करून झोपणे अशुभ मानले जाते.


*पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा ह्रास होतो, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे.


*दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने खूप गाढ आणि सुखाची झोप लागते असे आयुर्वेद सांगते. दक्षिणेकडे ऋणात्मक आवेश असते आणि तुमचे डोके हे धनात्मक रूपाने अवेषित असते आणि म्हणून तुमचे डोके आणि दिशा यांच्या मध्ये एक सामंजस्यपूर्ण आकर्षण निर्माण होते. दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने शरीरात स्वास्थ, सुख आणि समृद्धी यांना वाढवणारी उर्जा निर्माण होते.


*आयुर्वेदात स्पष्ट सांगितले आहे की उत्तर दिशेला डोके करून कधीच झोपू नये अन्यथा शरीरावर त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात.आयुर्वेदामध्ये असे समजले जाते की या दिशेला वाहणारी चुंबकीय धारा तुमच्या डोक्यात प्रवेश करू शकते आणि रक्ताभिसरण क्रियेला (Blood circulation) प्रभावित करते. यासोबतच डोक्याला डिस्टर्ब करण्याचे काम करते. या दिशेने डोके करून झोपल्यास सकाळी उठल्यावर उर्जावान वाटत नाही.


*वास्तुशास्त्रानुसार ही दक्षिण दिशेसह पूर्व दिशेला डोके करून झोपणे शुभ मानले जाते. पूर्वेला डोके करून झोपल्यास देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. सूर्योदयाची हीच दिशा असल्याने ती जीवनदायी मानली गेली आहे.

    आता पाहूया कुठल्या कुशीवर झोपण योग्य ते.


*कोणत्या कुशीवर झोपल्यास काय फायदे तोटे होतात.*


आपण कोणत्या बाजूला चेहरा करून किंवा कोणत्या स्थितीत झोपणे योग्य आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया रात्री झोपताना कोणत्या बाजूने झोपणे (Best Sleeping Position) चांगले आहे जेणेकरून अन्न पचन नीट होईल आणि आपले शरीरही निरोगी राहील.झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरित प्रतिसाद देते. याचे कारण म्हणजे, बाहेरून आपले शरीर डाव्या व उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते. हृदय, पोट, मूत्राशय व आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात. आपले हृदय, पचनक्रिया व मेंदू कसा काम करेल, हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपण्याच्या दिशेची (डावी की उजवी) भूमिका महत्त्वाची असते.

*डाव्या कुशीवर का झोपावे.*

    जर तुम्ही डाव्या बाजूला तोंड करून म्हणजेच डाव्या कुशीवर (Sleeping On Left Side) झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण असे केल्याने शरीराला आरामही मिळतो आणि अनेक फायदेही होतात.

      डाव्या कुशीवर का झोपावे, यामागेही शास्त्रीय कारण आहे. आपल्या नाकातून जो श्वास बाहेर येतो आणि आत जातो, याला आवाज म्हणतात. नाकाच्या डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याच्या प्रक्रियेला चंद्र स्वर म्हणतात. तर उजव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडण्याला सूर्य स्वर म्हणतात. सूर्य स्वर हा आपल्या शरीरात उष्णता उपन्न करतो. यामुळे जेवणाचे पचन होण्यास मदत होते. तसेच हृदयावर दबाव जाणवत नाही. यामुळे ते सुरळीत कार्य करते. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय डाव्या कुशीवर झोपण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शास्त्रात डाव्या अंगावर झोपण्यास सांगितले जाते.


https://chat.whatsapp.com/HbXbrXHDBms0IucijhSlEZ

* पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्‍यांनी अवश्य डाव्या कुशीवर झोपावे. 

*डाव्या कुशीवर झोपल्याने ह्रदयाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. हृद्याला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.


*डाव्या कुशीवर झोपल तर याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.


*डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


*घोरण्याची सवय तुम्हांला त्रासदायक आणि तुमच्या आजुबाजूच्या लोकांंना नाहक त्रासदायक ठरू शकते. पाठीवर झोपण्याच्या सवयीमुळेही घोरण्याची सवय वाढते. डाव्या बाजूला झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहू शकतो.  


*दम्याचा त्रास होत असेल, तर डाव्या कुशीवर झोपावे. त्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि देहातील उष्णता वाढून श्वसनमार्गातील कफाचे कण वितळून दम्याचा त्रास न्यून होतो. त्यामुळे शांत झोप लागते.


*गरोदर स्त्रिया - डाव्या कुशीवर झोपल्याने पाठीवर आणि कंबरेवर दाब कमी पडतो. यामुळे गर्भाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाळाच्या विकासासाठी गरोदर स्त्रियांंनी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरतंं.

याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.डाव्या कुशीवर झोपल्याचे बाळाला पण खुप फायदे आहेत.रक्त प्रवाह सुरळीत चालते.आणि बाळ जास्त हालचाल करते.


*बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.


*अन्न पचत नसेल, तर जेवल्यावर डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या बाजूला जठराचा भाग अधिक असल्यामुळे, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जठराला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होऊन अन्नपचन होण्यास साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला झोपल्यामुळे चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी चालू होते आणि जठराग्नी चांगला प्रज्वलित होतो. त्यामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते आणि लवकर अन् शांत झोप लागते.


*डाव्या कुशीवर झोपल्या मुळे सांधे आणि पाठदुखी तसेच तीव्र वेदना यासारख्या अनेक आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते.


*उजव्या कुशीवर का झोपू नये.*

उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे. याला राइट लॅटरल पोझिशन म्हणतात, मात्र त्यावर झोपू नये. जेव्हा आपण उजव्या कुशीवर वळून झोपतो, तेव्हा फूड पाइपचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग, ज्याला GE जंक्शन म्हटले जाते. तिथे अन्न एकत्रित होते. ते वरच्या बाजूस येऊ शकते. उजव्या कुशीवर वळून झोपल्यामुळे अन्न, पाणी किंवा हवा वर येऊ शकते. आणि आपण झोपेत असताना ते आपल्या नाकातून अथवा तोडांतून बाहेर येऊ शकते. अथवा त्याचे काही कण फुप्फुसांमध्येही जमा होऊ शकतात. हे न्यूमोनियासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे साधारणत: उजव्या कुशीवर वळून झोपणे टाळले पाहिजे.

    आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवायच्या असतील योग्य दिशेला झोपावे, व उजव्या बाजूवर झोपणं टाळाव म्हणजे शांत झोप लागून आरोग्य ही उत्तम राहील हे वरील पोस्ट वरून आपल्याला एव्हाना समजले असेल अशी आशा करतो.

वैद्य. गजानन


B p issues? No problem, स्मॉल टिप्स fallaw

 Please send it all your groups, known and related people. Please target atleast 1000 people by each person. The domino effect of your action will be that in one week it will reach 10 crore people and in three weeks 100 crore people


थायराँईड साठी उपाय व उपचार...*

 *थायराँईड.....*


*थायराँईड साठी उपाय व उपचार...*


*उपाय...१*

ऊपाशी पोटी 

1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.

1 चमचा धणे पावडर १ वेळा.

1 एक चमचा बडिसोप १वेळा.

पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी 

रोज खायची 3 महिने 

 उपाशी पोटी.


 *उपाय...२*


 सकाळी 

अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.


*उपाय...३*


अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.

उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.

कपालभाती 10 मिनिटे.

रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.


*उपाय...४*


वजन वाढले असेल तर 

भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.

एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.


*उपाय...५*


दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.


*उपाय...६*


 नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.


*उपाय...७*


रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.


*उपाय...८*


थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची. 


*उपाय...९*


रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.


*उपाय...१०*


आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी 

सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.


*उपाय़...११*


मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.


*उपाय़...12*


अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.


 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.


*राजु गोल्हार आरोग्य संवाद गृप, अौरंगाबाद,*

*सुनील इनामदार,संग्रहक.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

Featured post

Lakshvedhi