Saturday, 27 May 2023

पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती

 पशुसंवर्धन विभागात ४४६ पदांची भरती


- राधाकृष्ण विखे पाटील

            मुंबई, दि. २६ : पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जातअसल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

            लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, त्यावेळी पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे - पाटील यांनी लवकरच आवश्यक त्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री श्री. विखे - पाटील यांनी याबाबत धोरणात्मक निर्णय घेत ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे.


            स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे मंत्री श्री. विखे -पाटील यांनी सांगितले.


            २७.०५.२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११.०६.२०२३ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार असल्याचे सांगि

तले.



0000

भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीच्या निर्णयाला स्थगिती;

 भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था नोंदणीच्या निर्णयाला स्थगिती;


अभ्यास समिती स्थापन करावी


- मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


मासेमारी सहकारी संस्थांना मंत्री मुनगंटीवारांकडून दिलासा!


            मुंबई, दि. 25 : भूजलाशयीन मासेमारी व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या व्यक्तींची सहकारी संस्था अथवा संघ नोंदणीच्या 12 मे 2023 च्या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.


            सह्याद्री अतिथीगृह येथे मासेमारी सहकारी संस्थांच्या नोंदणीसंदर्भातील बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयाविरोधात भूजलाशयीन मासेमारी सहकारी संस्थांच्या विविध स्तरावरुन प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीचे आयोजन करुन सविस्तर चर्चेअंती हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील मासेमारी सहकारी संस्थांना दिलासा मिळणार आहे.


            मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, भूजलाशयीन मासेमारी सहकारी संस्थांच्या नोंदणीसंदर्भातील शासन निर्णयाविरोधात तक्रारी आणि मागण्या शासनाला प्राप्त झाल्या. या तक्रारींच्या अनुषंगाने 12 मे 2023 च्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात 15 सदस्यीय अभ्यास समिती तत्काळ गठित करुन त्याचे आदेश लवकरात लवकर निर्गमित करावे. या समितीमध्ये महिला प्रतिनिधी, मासेमारी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांचा समावेश करावा. समितीने पुढील तीन ते सहा महिन्यात त्यांचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देशही श्री. मुनगंटीवार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.


            या निर्णयाचे भूजलाशयीन मासेमारी सहकारी संस्थांनी स्वागत करुन मंत्री श्री. मुनगंटीवार आणि प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले.


            या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव तथा आयुक्त डॉ. अतुल पाटणे, सहायक उपायुक्त सुरेश भारती, उपसचिव श्री. जकाते, पुणे आणि नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त यांच्यासह विविध भागातील मासेमारी सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


००००

Friday, 26 May 2023

 वक्फ मंडळाचे जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे सुरू

            मुंबई, दि. 26 : शासनाने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे जिल्हास्तरावर कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय कार्यालय सुरू होत आहे.


            रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना मशीद, दर्गा आदी ट्रस्टची नोंदणी करण्यासाठी किंवा संबंधित कामासाठी औरंगाबाद येथील मुख्यालयी जावे लागत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचे कार्यालय सामाजिक न्याय भवन रत्नागिरी येथे सुरू करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो.बा. ताशिलदार यांनी कळविले

 आहे.


सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा

 सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा


 


            मुंबई,दि. २६: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे.


            राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला. या अनुदानाचा लाभ राज्यातील सुमारे १४ लाखांहून शेतकऱ्यांना मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांपर्यत हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ पोहोचत नसल्याने शेतकरी थेट सहकार मंत्र्यांकडे निवेदने/तक्रार अर्ज देत आहेत. त्याची सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकारी यांनी दखल घेवून तातडीने कार्यवाही देखील करीत आहेत.


            यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बेलोरा येथील एक नियमित कर्जफेड करणारे वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी अनुदान मिळत नसल्याने याबाबत चौकशी व्हावी यासाठी थेट सहकार मंत्र्यांच्या नावे मंत्रालयातील कार्यालयात निवेदन/ तक्रार अर्ज दिले. बुधवारी (दि.२४) मंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांनी याची दखल घेत तात्काळ विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली. यात शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभासाठी पात्र होते, मात्र बॅंक खात्याच्या आधार प्रमाणीकरणानंतर नावातील फरकामुळे हे अनुदान अडले होते. ही तांत्रिक अडचण लक्षात येताच ती तत्काळ दूर करून शेतकऱ्याला लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना त्यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्याच दिवशी काही क्षणातच शेतकरी जाधव यांच्यासह १२ शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या खात्यात ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले. सदर अनुदान शेतकऱ्यांना मिळाले की नाही याचा पाठपुरावा करून खात्री देखील मंत्री कार्यालयाने करुन घेतली.


            हा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाल्याने वयोवृद्ध शेतकरी नथ्थु जाधव यांनी समाधान व्यक्त करुन सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांचे आभार मानून त्यांच्या कामाचे कौतुकही केले. या उदाहरणातील तत्परतेतून विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. राज्य शासनाचे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान नक्कीच बळीराजाला प्रोत्साहन देणारे ठरेल.


            “राज्य शासन आणि सहकार विभाग महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत १३ लाख ९० हजार इतक्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाने ५ हजार ५५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार विभाग आणि आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना नेहमी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबीर आयोजित करण्याच्या सूचना दिल्या जातील,” अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री अतुल सावे यांनी दि

ली.  


00000


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाचा घेतला आढावा

 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागाचा घेतला आढावा


            मुंबई, दि.२६: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.


           सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागातील योजनेची यावेळी माहिती दिली. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे उप मुख्य अभियंता श्री.मिटकर, म्हाडाचे निवासी कार्यकारी अभियंता श्री. सानप, सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे उपस्थित होते

.  


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थराज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थराज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता


ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन


 


               मुंबई दि.२६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यातील ५० गावांमध्ये भव्य व सुसज्ज सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.   


            नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री महाजन यांनी या ५० गावात सामाजिक सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली . या माध्यमातून जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, जालना, नंदुरबार, पुणे, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांतील गावांची निवड करण्यात आली असून लवकरच बांधकाम करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री महाजन यांनी दिली.


            विविध जिल्ह्यातील पहूरपेठ, वाकोद, पहुरकसबे, ता. जामनेर, लोहारा, कुऱ्हाड. ता, पाचोरा, म्हसावद ता.जळगाव, अहिरवाडी, ता रावेर. शिरसाळा, ता.बोदवड, चहार्डी ता. चोपडा, पाळधी, ता.धरणगाव, निमगाव घाना, ता.अहमदनगर, मोहरी ता.पाथर्डी, आस्तेगाव. ता.राहता, मुकिंदपूर ता.नेवासा, पट्टनकोडोली, ता. हातकंणगले, आदमापूर ता. भुदरगड (गारगोटी), वाशी, ता. करवीर, घाणेवाडी ता. जालना, टेंभुर्णी, ता जाफराबाद, चिंचोली निपाणी, ता. भोकरदन, आनंदगाव, ता. परतुर, म्हसावद ता. शहादा, नागरे ता. पुरंदर, जाडकरवाडी ता. आंबेगाव, माळेगांव, रीसनगांव ता.लोहा, शेळगाव छत्री, ता. नायगाव(खै), वझरगा.ता देवलूर, नरसी, ता.नायगांव, पोफळी ता.उमरखेड, मंगलादेवी ता.नेर, चिखलगाव, ता.वणी, धनगरवाडी, ता.दारव्हा, मारवाडी बु. ता. पुसद, भरणे, ता.खेड, कांबळेश्वर, ता.फलटण, टाकेवाडी, ता.माण, वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, तरंदल (धनगरवाडी) ता. कणकवली, खेडी, ता. सावली, बेम्बाळ, ता. मूल, थुतरा ता. कोरपना, तेमुर्डा ता. वरोरा, भंगाराम तळोधी, ता.गोडपिंपरी, नवरगाव ता.सिंदेवाही, वाठोडा शुक्लेश्वर ता.भातकुली, घोराड ता.कळमेश्वर, रोहणा -इंदरवाडा ता.नरखेड, बेला ता.उमरेड, केळवद, ता.सावनेर या ५० गावांचा समावेश आहे.


            पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहासाठी निवडण्यात आलेल्या गावातील ग्रामपंचायतींच्यावतीने सभागृह बांधण्यासाठी जागेची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. याठिकाणी सुसज्ज ५० सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहेत.

अवश्य वाचा व स्वतःला खूप हायफाय समजणाऱ्यांना अवश्य पाठवा*

 *अवश्य वाचा व स्वतःला खूप हायफाय समजणाऱ्यांना अवश्य पाठवा*


ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख!

👇

*सुवर्ण मध्य !*

👇

अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका 'पोस्ट'ला ब-यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही 'पोस्ट' लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतूम भारताच्या एक दोन वार्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज ह्रदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणार्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसर्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्ण मध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रवीवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.


- माधुरी बापट

===


[संक्षिप्त परिचय: श्रीमती माधुरी बापट यांनी पुणे विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. एस्सी. केल्यानंतर ओहायो येथील राईट स्टेट युनिव्हर्सिटीतून प्लाझ्मा फिजिक्समध्ये

एम. एस. डिग्री.

..

त्यानंतर अमेरिकेत सलग ३५ वर्षे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका, ७ वर्षे गणिताच्या व ३ वर्षे खगोलशास्त्राच्या ही प्राध्यापिका. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त व त्यानंतर सातत्याने लेखन व संशोधन.]

Featured post

Lakshvedhi