મુલુંડ માં બનેલી ઘટના please be careful
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 27 May 2023
Congratulations
It gives me immense pleasure to announce that our Karate Student's of *"Japan Shitoryu Karate - Do, India"* which is affiliated with *AISKU, APSKF, & WSKF* represented India at the International Karate Championship in Abu Dhabi, UAE at the Al Jazira Club on 21st May 2023 where participants from 42 countries fought for the identity of their respective Countries.
Our Team India under the auspicious Guidance of
*Kyoshi C. S. Arun Machaiah* and Coach
*Kyoshi Rahul S. Tawde*
gave a splendid performance and brought glory to our Country.
The results are as follows;
*Mit Y. Pawar*
Kata : 1st Place
Kumite : 1st Place
*Shreeyans R. Tawde*
Kata : 1st Place
Kumite : 3rd Place
*Saisha N. Mumbaikar*
Kata : 2nd Place
Kumite : 1st Place
*Tuaha T. Gondekar*
Kata : 3rd Place
Kumite : 3rd Place
*Omkar V. Babar*
Kata : 1st Place
Kumite : 2nd Place
We wish them every success in Fu
ture.
राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीनेअंमलबजावणी करावीl
राज्य शासनाच्या फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीनेअंमलबजावणी करावीl
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहमदनगर, दि.26 : - राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
या बैठकीस महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याने 651 कोटी रुपये खर्च करत 1 हजार 35 गावांमधून 32 हजार कामांद्वारे 2 लाख 98 हजार हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात यश मिळाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा 2 मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. टप्पा दोन मधील कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार करावा. तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेमध्ये लोकसहभाग वाढवत कामांना अधिक गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आता मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसह शबरी, रमाई, प्रधानमंत्री आवास योजना एकत्रित करून १० लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट वाढवून समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन पात्र गरजूंना लाभ देण्यासाठी मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वसामान्यांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन महिन्यात जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठीच्या योजना पोहोचवायच्या असून जिल्ह्याचे दीड लाख दाखले वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सौर कृषि वाहिन्यांचा पथदर्शी प्रकल्प सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. कृषीवाहिन्या या शंभर टक्के सौर कृषि वाहिन्यांमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात मोठा वाव आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत याद्वारे शेतीला दिवसा विनाव्यत्यय वीज देता येणार आहे. सरकारी जमिनी उपलब्ध नसणाऱ्या गावात शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रतिवर्ष ५० हजार रुपये भाडे दिले जाणार असल्याने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटीची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. ही रक्कम येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान टप्पा २.०, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, जलजीवन मिशन, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनांसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा व दिलेल्या मदतीचा आढावा घेतला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विकासकामांना समन्वयाद्वारे गती देण्यात येत असून जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात
झालेल्या कामांमुळे श
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीसमाधान शिबिरात आज ११२ तक्रारींचे निराक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्तीसमाधान शिबिरात आज ११२ तक्रारींचे निराकरण
मुंबई,दि. २६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात खार (पश्चिम) एच पश्चिम वॉर्ड येथे आज ६३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.
हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकणार आहे.
.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.
अहमदनगर, दि.26: (जिमाका वृत्तसेवा) - व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बविस्कर आदी उपस्थित होते.
10 कोटी 88 लक्ष रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या निधीतून दोन मजली सुसज्ज इमारत उभी होत आहे. पहिल्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर एक व्ही.आय.पी.सूट, मिटिंग हॉल, डायनिंग हॉल स्वागत कक्ष आदी तर दुसऱ्या मजल्यावर 2 व्ही.व्ही.आय.पी. तर 3 व्ही.आय.पी.सूट उभारण्यात येणार आहे. 75 व्यक्तींची क्षमता असलेल्या सभागृहाचाही यामध्ये समावेश आहे.
0000
पालकमंत्री वॉररूमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालकमंत्री वॉररूमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर, दि.26 : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर या नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा यांनी हा कक्ष सुसज्ज करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी श्री.मापारी यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पालकमंत्री नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना
यंत्रसामुग्रीच्या वापराचा सल्ला देत उत्पन्नवृद्धीसाठी शेतकऱ्यांना
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
औरंगाबाद दि.२६ (जिमाका) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचा प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना चाव्या सुपुर्द करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले… शेती आणि संबंधित उद्योगांमध्ये या यंत्रसामुग्रीचा वापर करून उत्पन्नवृद्धीसाठी संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
आज कन्नड येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात पीक काढणीसाठी वापरण्यात आलेल्या हार्वेस्टरची माहिती घेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जवळपास 500 मीटरपर्यंत ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर चालवले. हा क्षण लाभार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने सुखद ठरला. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्या सुर्पुद केल्या. यावेळी ट्रॅक्टर 250, हार्वेस्टर 10, शेती अवजारे, नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र 35 तसेच यावेळी मालवाहतुकीसाठी 10 वाहने वाटप करण्यात आली.
राज्यात विविध शेतकरी हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. कधी शेतीच्या बांधावर जात पिकाची पाहणी किंवा गारपीट व अवकाळीमुळे हतबल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलेला मदतीचा हात आणि आधार असो यातून नेहमीच शेतकरी बांधवांप्रती कर्तव्य दक्षतेने व तळमळीने काम करतात.
आपुलकीची भावना, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रती असलेला जिव्हाळा आणि त्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याच्या निर्णयातून दिसून येत आहे.
0000
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...



