Friday, 26 May 2023

*थायराँईड.....**थायराँईड साठी उपाय व उपचार...*

 *थायराँईड.....**थायराँईड साठी उपाय व उपचार...*


*उपाय...१*

ऊपाशी पोटी 

1 चमचा जवस पावडर दिवसात ३ वेळा.

1 चमचा धणे पावडर १ वेळा.

1 एक चमचा बडिसोप १वेळा.

पावडर न करता खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत पावडर करुन घेऊ शकता सकाळी 

रोज खायची 3 महिने 

 उपाशी पोटी.


 *उपाय...२*


 सकाळी 

अंघोळ करतांना तोंडात कोमट पाणी पुर्ण भरुन घ्या व अंघोळ होई पर्यंत तसेच पाणी ठेवा त्यांने थायरॉईड ग्रंथी ॲक्टिव होऊन सुरळीत काम करते.


*उपाय...३*


अनुलोम विलोम प्राणायाम 7 मिनिटे.

उज्जायी प्राणायाम 10 मिनीटे.

कपालभाती 10 मिनिटे.

रोज सकाळी संध्याकाळी हे प्राणायाम करा.


*उपाय...४*


वजन वाढले असेल तर 

भोपळ्याचे (लौकी) ज्युस 20ml प्यावे.

एक ग्लास कोमट पाणी 20 मिली कोरफड ज्युस त्यात 10 तुळशीचा रस टाका.


*उपाय...५*


दररोज तांब्याच्या भांड्यातीलच पाणी प्यायचे.


*उपाय...६*


 नारळाच्या झाडाच्या ४ मूळ्या पेन च्या आकाराच्या घेऊन याचा काढा बनवुन रोज संध्याकाळी 21 दिवस प्यायचे.


*उपाय...७*


रात्री ब्रश करुन झोपा, सकाळी उठल्याबरोबर आपल्या लाळेने थायराँईड ग्रंथीला स्पर्श करुन सावकाश १० १२ वेळा चोळायचं आहे.


*उपाय...८*


थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशी सुती कापडाची गरम पाण्याची पट्टी करुन रात्री ३० मिनिटे ठेवायची. 


*उपाय...९*


रोज रात्री झोपतांना सोन्याचा दागिना थायराँईड ग्रंथीला स्पर्श होईल अशा पद्धतीने रात्रभर ठेवा.


*उपाय...१०*


आपल्या आहारातुन पांढऱ्या मिठाचा वापर बंदच करुन त्या ऐवजी 

सैंधव मिठ व काळ्या मिठाचा वापर करावा.


*उपाय़...११*


मूठभर वारुळाची माती, मूठभर कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकून माती शिजवून घ्यावी व आपल्या थायरॉईड ग्रंथी जवळ रोज रात्री झोपताना कोमट असताना 21 दिवस ठेवावे.


*उपाय़...12*


अति ताणतणाव आपल्या आजाराचे मुळ कारण असल्यामुळे तणावरहीत जीवन, पुरेशी झोप आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. योगा प्राणायाम ध्यान आहार याने आपला आजार आपण १०० % बरा करु शकता.


 3 महिन्यात कुठल्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास 100% कमी होईल आणि आराम मिळेल.


*राजु गोल्हार आरोग्य संवाद गृप, अौरंगाबाद,*

*सुनील इनामदार,संग्रहक.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


A मु ल

 अमूल की लस्सी या जो पैकेट वाला तरल पदार्थ पीने से पहले एक बार जरूर चेक कर लेवे। वह कितना भी बड़ा ब्रांड क्यों ना हो एक बार जरूर चेक कर लेवे।                  अगर आप का शरीर स्वस्थ है, तो यह जहां आपका है। जागरूक रहें सतर्क रहें सावधान रहें।🙏🏻🙏🏻😨😨😨


व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

 व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी संघटनेचा वर्धापन दिवस राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा


केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनाने व्यापार सुलभीकरण करावे


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. 26 : देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. व्यापाऱ्यांचा संबंध स्थानिक प्रशासनाशी अधिक येतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक शासनामध्ये 'व्यापार सुलभीकरण' (इज ऑफ डुईंग बिझनेस) करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम) या व्यापारी संघटनांच्या शिखर संस्थेचा ४५ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. २५) बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


            कार्यक्रमाला पर्यटन, महिला व बालकल्याण तसेच कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, फेडरेशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह, महासचिव प्रितेश शहा, मानद अध्यक्ष विनेश मेहता, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष मेहता व राजेश शहा तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


            आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे येत असताना किरकोळ व्यापार क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे, महिलांनी व्यापार क्षेत्रात अधिक प्रमाणात यावे, यासाठी व्यापारी संघटनांनी अनुकूल वातावरण तयार करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.    


            नोकरीच्या मागे न लागता युवकांनी व्यापाराकडे वळावे, असे आपण सांगत असतो. मात्र, व्यापारी वर्गासाठी स्थानिक पातळीवर अडचणी येत असतात. व्यापार संघटनांनी आपल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणाऱ्या शिफारसी शासनाकडे कराव्या, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.   


            राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यास तसेच महिन्यातून एकदा व्यापारी संघटनेस भेटण्यास तयार आहे, असे सांगून शासन व्यापाऱ्यांना सर्व प्रकारे मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.


            फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शाह यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.


            राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते फॅम संघटनेच्या ध्वजाचे, स्मरणिकेचे तसेच संघटना गीताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यापारविषयक धोरणावर आधारित नृत्य नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. 


०००००



 


Maharashtra Governor attends Foundation Day of


Federation of Traders Associations


 


            Maharashtra Governor Ramesh Bais presided over the 45th Foundation Day of the Federation of Associations of Maharashtra (FAM), the apex organisation representing various trade associations across Maharashtra at Birla Matushri Sabhagar in Mumbai on Thursday (25 May).


            Speaking on the occasion the Governor stressed the need to improve the Ease of Doing Business at the local level. He called upon the organisation of traders to encourage more women to assume leadership roles in trading bodies.


            Minister of Tourism, Women and Child Welfare and Skills Mangal Prabhat Lodha said he will hear the grievances of the traders associations once in a month and try to resolve them.


            President of FAM Jitendra Shah, Director General Pritesh Shah, Chairman Emeritus Vinesh Mehta, Senior Vice Presidents Ashish Mehta and Rajesh Shah and representatives of traders organisations were present.


            The Governor released the Flag, Souvenir and FAM anthem on the occasion. A dance drama depicting the policy of Chhatrapati Shivaji Maharaj towards traders was shown on the occasion.


0000

आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथेप्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेश सूचना

 आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथेप्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेश सूचना


 


            मुंबई, दि. २६ : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरीकरीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर/सोलापूर/मुंबई/ओरंगाबाद यांच्यामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी केले आहे.


            इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. शिवाय अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे श्री. चंदन यांनी कळविले आहे.


००००

राहता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय

 राहता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय


प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग


दिलखुलास कार्यक्रमात मंडळाधिकारी डॉ. मोहसीन शेख यांची मुलाखत


            मुंबई, दि. 26 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी डॉ. मोहसीन युसुफ शेख यांना राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या क्यूआर कोडचा वापर बद्दल श्री. शेख यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


            महसूल विभागामार्फत विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात. हे आदेश या विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे सर्व बाबींवर मात करण्यासाठी राहाता मंडळ अधिकारी कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरणासाठी 'क्यूआर कोड' (QR code) ही संकल्पना राबविण्यात आली. या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी डॉ. शेख यांना राजीव गांधी प्रशासकीय अभियान 2022-2023 शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. अशाच प्रकारची कल्पकता व नावीन्यता डॉ. शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली. ही नावीण्यपूर्ण संकल्पना कशा प्रकारे राबविण्यात आली याबाबतची सविस्तर माहिती, ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. शेख यांनी दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शनिवार दि. 27 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आ

हे.


0000


छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी

 छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी


- राज्यपाल रमेश बैस


राजभवन येथून मुंबई ते रायगड जाणाऱ्या जल कलश रथयात्रेचा झाला शुभारंभ  


            मुंबई, दि. 26 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी नौदलाची उभारणी केली होती. म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.


            “श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सहस्त्र जल कलशाभिषेकाचा संकल्प” साठी ११०८ पवित्र जलकलश आणले आहेत. त्याचा जलपूजन सोहळा राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जलकलशांचा प्रवास मुंबई ते रायगड असा होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महंत सुधीरदास महाराज, श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या सेवा समितीचे सदस्य सुनील थोरात आदी उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या यशस्व‍ितेसाठी मी शुभेच्छा देतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती सोहळ्याचा एक भाग बनणे हा मी माझा विशेष सन्मान समजतो. किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी गोळा केले जात आहे हे जाणून मला आनंद झाला आहे.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ते एक दूरदर्शी राजे होते ज्यांनी इंग्रज आणि मुगल यांच्यापासून राज्याला असलेला धोका वेळीच ओळखला होता. परकीय शक्तींनी उभे केलेले आव्हान ओळखून शिवाजी महाराजांनी आपले नौदल उभारले. उद्योग आणि व्यापाराबाबत त्यांचे धोरण दूरदर्शी होते.ते महिला सक्षमीकरण आणि सन्मानाच्या बाजूने होते.


            छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील भक्कम पायामुळेच महाराष्ट्र महान योद्ध्यांची आणि समाजसुधारकांची भूमी बनला. नुकतेच मी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठीही मोहीम राबवायला हवी, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.


 छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरित करणारे


- मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वीर माता जिजाऊ यांच्या विचार संस्कारातून श्री छत्रपती शिवाजी महाराज घडले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त राज्याच्या अस्मिताच नव्हे, तर संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची मोहिनी पडली. हे विचार आणि कार्य सर्व पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे.किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी संकलित केले आहे. आज राजभवन येथून सुरू झालेल्या या यात्रेमुळे या उपक्रमासाठी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होईल. या रथयात्रेच्या माध्यमातून गावोगावी विचार पोहोचवणार, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.


               मान्यवरांच्या हस्ते यावेळी जल कुंभाचे पूजन करण्यात आले. इतिहासकालीन खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.


*****

भजी खा बो बलाची भजी

थेरोंदा कोळीवाडा 
 

Featured post

Lakshvedhi