Friday, 26 May 2023

आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथेप्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेश सूचना

 आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथेप्रथम व द्वितीय वर्षाकरीता प्रवेश सूचना


 


            मुंबई, दि. २६ : केंद्र सरकारच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाचा प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता १३ जागा, आर्थिकदृष्या दुर्बल घटकाकरीता १ जागा तसेच वेंकटगिरीकरीता २ जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर/सोलापूर/मुंबई/ओरंगाबाद यांच्यामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. दि. २० जून २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन नागपूरचे वस्त्रोद्योग आयुक्त एम. जे. प्रदीप चंदन यांनी केले आहे.


            इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. २० जून २०२३ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमूना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. शिवाय अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे श्री. चंदन यांनी कळविले आहे.


००००

राहता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय

 राहता मंडळ कार्यालयाचा अर्धन्यायिक निर्णय


प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग


दिलखुलास कार्यक्रमात मंडळाधिकारी डॉ. मोहसीन शेख यांची मुलाखत


            मुंबई, दि. 26 : महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच क्यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी डॉ. मोहसीन युसुफ शेख यांना राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या क्यूआर कोडचा वापर बद्दल श्री. शेख यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.


            महसूल विभागामार्फत विविध अर्धन्यायिक प्रकरणात निर्णय दिले जातात. हे आदेश या विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतात. मात्र, या संकेतस्थळावरील निकालपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्यामुळे सर्व बाबींवर मात करण्यासाठी राहाता मंडळ अधिकारी कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरणासाठी 'क्यूआर कोड' (QR code) ही संकल्पना राबविण्यात आली. या नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी डॉ. शेख यांना राजीव गांधी प्रशासकीय अभियान 2022-2023 शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. अशाच प्रकारची कल्पकता व नावीन्यता डॉ. शेख यांनी महसूल विभागात प्रथमच राबविण्यास सुरूवात केली. ही नावीण्यपूर्ण संकल्पना कशा प्रकारे राबविण्यात आली याबाबतची सविस्तर माहिती, ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. शेख यांनी दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शनिवार दि. 27 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आ

हे.


0000


छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी

 छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी


- राज्यपाल रमेश बैस


राजभवन येथून मुंबई ते रायगड जाणाऱ्या जल कलश रथयात्रेचा झाला शुभारंभ  


            मुंबई, दि. 26 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी नौदलाची उभारणी केली होती. म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.


            “श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सहस्त्र जल कलशाभिषेकाचा संकल्प” साठी ११०८ पवित्र जलकलश आणले आहेत. त्याचा जलपूजन सोहळा राजभवन येथे राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जलकलशांचा प्रवास मुंबई ते रायगड असा होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महंत सुधीरदास महाराज, श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या सेवा समितीचे सदस्य सुनील थोरात आदी उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या यशस्व‍ितेसाठी मी शुभेच्छा देतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती सोहळ्याचा एक भाग बनणे हा मी माझा विशेष सन्मान समजतो. किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी गोळा केले जात आहे हे जाणून मला आनंद झाला आहे.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ते एक दूरदर्शी राजे होते ज्यांनी इंग्रज आणि मुगल यांच्यापासून राज्याला असलेला धोका वेळीच ओळखला होता. परकीय शक्तींनी उभे केलेले आव्हान ओळखून शिवाजी महाराजांनी आपले नौदल उभारले. उद्योग आणि व्यापाराबाबत त्यांचे धोरण दूरदर्शी होते.ते महिला सक्षमीकरण आणि सन्मानाच्या बाजूने होते.


            छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील भक्कम पायामुळेच महाराष्ट्र महान योद्ध्यांची आणि समाजसुधारकांची भूमी बनला. नुकतेच मी प्रतापगड किल्ल्याला भेट दिली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठीही मोहीम राबवायला हवी, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.


 छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरित करणारे


- मंत्री सुधीर मुनगंटीवार


 


            सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वीर माता जिजाऊ यांच्या विचार संस्कारातून श्री छत्रपती शिवाजी महाराज घडले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त राज्याच्या अस्मिताच नव्हे, तर संपूर्ण जगाला त्यांच्या विचारांची मोहिनी पडली. हे विचार आणि कार्य सर्व पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे.किल्ले रायगड येथे 2 जून 2023 रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी संकलित केले आहे. आज राजभवन येथून सुरू झालेल्या या यात्रेमुळे या उपक्रमासाठी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती होईल. या रथयात्रेच्या माध्यमातून गावोगावी विचार पोहोचवणार, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.


               मान्यवरांच्या हस्ते यावेळी जल कुंभाचे पूजन करण्यात आले. इतिहासकालीन खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.


*****

भजी खा बो बलाची भजी

थेरोंदा कोळीवाडा 
 

चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय...

 *चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय.....*    


*कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हांला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. 

 

*एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते. हळूहळू तीळ कमी होण्यास सुरूवात होईल.  


*मध आणि सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तिळ कमी होण्यास मदत होईल.  


*कपभर अननसाचा रस आणि पाव कप सैंधव मीठ एकत्र करा. या मिश्रणाने स्क्रब केल्यास चेहर्‍यावरील तिळ कमी होण्यास मदत होईल. 


*लसणाची पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी तिळावर लावा. त्यावर बॅन्डेज लावा. सकाळी उठल्यावर त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा प्रयोग नियमित केल्यास तिळाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.  


*काही आल्याचे तुकडे ठेचून तिळाच्या जागी लावा. त्यावर कपडा बांधून झोपा. या उपायानेही तिळ कमी होण्यास मदत होते. 


व्हिटॅमिन सीची एक गोळी बारीक कुटा. रात्री ही पेस्ट तिळावर लावून, त्यावर बॅन्डेज लावून झोपा. 


*व्हिनेगरचा वापर करूनदेखील तिळ हटवला जाऊ शकतो. सुरूवातीला चेहरा गरम पाण्याने धुवा. कापसाच्या बोळ्याने व्हिनेगर तिळावर लावा. 10 मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवावा.


*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


कोबीच्या रसाचे फायदे !!

 *कोबीच्या रसाचे फायदे !!* 


अनेकदा प्रत्येकजण जेवणात हिरव्या भाज्यांचे सेवन करण्यास सांगतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात भरपूर प्रमाणात असलेले पोषक घटक. कोबी यापैकी एक आहे, विशेषतः आजकाल सॅलड्स आणि भाज्यांमध्ये आणि चायनीज फूडमध्ये त्याचा वापर झपाट्याने वाढला आहे. कोबी खाण्यात जितका फायदेशीर आहे तितकाच त्याचा रस देखील फायदेशीर आहे.

कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, ई, के, बी6, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, मॅंगनीज, कोलीन, रिबोफ्लेविन आणि थायामिनसह अनेक पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासोबतच हा रस बीपी नियंत्रित करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. 


*चला तर मग कोबीच्या रसाचे फायदे जाणून घेऊयात -* 


*1. वजन कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे :-* 


जर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोबीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्ही रिकाम्या पोटी या रसाचे सेवन केले तर त्याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येतो.


*2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ते प्रभावी आहे :-* 


कोबीचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. व्हिटॅमिन सी पासून ते कोबीमध्ये आढळणारे इतर पोषक घटक देखील खूप फायदेशीर आहेत. जर तुम्ही याचे रोज नियमित सेवन केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.


*3. रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो :-* 


कोबीमध्ये आढळणारे पोटॅशियम आपल्या शरीरातील वाढलेले सोडियम कमी करण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.


*4. हार्मोन्स संतुलित करते :-* 


कोबीचा रस शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे काम करतो. हे थायरॉईड ग्रंथीसह हार्मोन्सचे उत्पादन वाढवते. हा रस शरीरातील आयोडीनची कमतरता देखील पूर्ण करतो आणि हायपोथायरॉईडीझमच्या शक्यतेवर देखील काम करतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



खेळ आमच्या वेळेस नव्हता , कितीतरी उघडे पडले असते

 

*

Featured post

Lakshvedhi