Thursday, 25 May 2023

मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

  मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे 28 मे रोजी अनावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित

             मुंबई, दि. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त 28 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मॉरिशस येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

          मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रूपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती लाभणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातून असंख्य सावरकर भक्त या अपूर्व सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये दाखल होणार आहेत.

            महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये रस्ते विकास, पायाभूत सुविधा, गुंतवणूक याबाबत मंत्री श्री.चव्हाण विविध स्तरांवर भेटीगाठी घेणार असून दोहोंमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर त्यांचा भर असणार आहे. मॉरिशस म्हणजे चहूबाजूंनी हिंदी महासागराने वेढलेले पाचूचे बेट असून निसर्गाने मुक्त उधळण केलेले पर्यटन स्थळ आहे. सागरी जैव विविधता आणि पारदर्शक स्फटिकासारखे निळेशार पाणी व सुंदर स्वच्छ समुद्रकिनारे अनुभवणे असा सुवर्णयोग जुळून आला आहे.

0000

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठीसहकार विभागाने पाठपुरावा करावा

                    शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठीसहकार विभागाने पाठपुरावा करावा

- सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

            मुंबई, दि. २५ : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

            सहकार मंत्री श्री. सावे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष खोरगडे, नितीन गायकवाड, श्री. शिंगाडे, विशेष कार्य अधिकारी तथा अवर सचिव श्रीकृष्ण वाडेकर, साखर संचालक उत्तम इंदलकर, कक्ष अधिकारी अनिल चौधरी, राहुल शिंदे उपस्थित होते, तर साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. 

            मंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कार्यवाही करावी. 

            राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन, पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रशासन आणि सनियंत्रणासाठी हा जबाबदार असून या क्षेत्राला सक्षम करून सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. या संस्थांच्या ऑनलाइन नोंदणीवर उपनिबंधक कार्यालयाने भर द्यावा. त्यासाठी विविध कार्यकारी संस्थांना मार्गदर्शन करावे. तसेच नवीन सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी प्रमाणित पद्धत तयार करून तिचा वापर करावा, असेही मंत्री श्री. सावे यांनी सांगितले. 

            यावेळी मंत्री श्री. सावे यांनी शेतकरी कर्जमाफी योजना, अटल अर्थसाहाय्य योजना, सहकारी पाणीपुरवठा संस्था अनुदानाचा आढावा, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी भरती पॅनल, सहकारी पतसंस्था तपासणी लेखापरीक्षण व निधी वितरण, बंद, अवसायानातील साखर कारखाने, सहकार विभागाचे तालुका व जिल्हास्तरी कार्यालयांचे शासकीय जागेत स्थलांतर, साखर गाळप हंगाम, सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदांचा आढावा घेतानाच विभागातील पदोन्नती प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश दिले. अपर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

००००

यशातून मिळेल नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ

यशातून मिळेल नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बारावी परीक्षा उत्तीर्णांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

          मुंबई, दि. २५ :- 'बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावी उत्तीर्णांचे अभिनंदन केले आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी, दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवले आहे, त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. 

          शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘आयुष्यात येणारे महत्त्वाचे टप्पे-आव्हाने म्हणजे एक परीक्षाच असते. या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी अशा परीक्षा करवून घेत असतात. त्यामुळे सातत्यपूर्ण मेहनत आणि प्रयत्न महत्वाचे ठरतात. कित्येक जण कठोर मेहनत घेतात, त्यातून मिळालेले यश नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ देते. बारावीच्या परीक्षेत असे यश मिळविणाऱ्यांचे आणि त्यासाठी त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’.

          ‘परीक्षा एक टप्पा आहे. त्यामुळे यात यश न मिळालेल्यांनी खचून न जाता, नव्या उमेदीने प्रयत्न करावे. यश तुमचेच असेल’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

०००००

माणसाचा स्वभावाचा आणि आजारांचा संबंध काय आहे ?

 माणसाचा स्वभावाचा आणि आजारांचा संबंध काय आहे ?

तुमची गोष्ट बुद्धी मान्य करत नाही इथूनच सर्व आजारांना सुरुवात होते सात जन्माचे गाठोडे तुम्ही सोबत घेऊन आलेले असत योग प्राणायाम ध्यान साधना यांनी जीवनातील सर्व आजार दोष तुम्ही घालू शकता पण आपण आज मान्यच करत नाही

हा आपल्या मधील सर्वात मोठा दोष आहे

सर्व गोष्टी तुमच्या मनावर आहेत मनाने ठरवलं कुठली गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही

  तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो......

*१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.*

*२).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.*

*३)अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.*

*४)अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.*

*५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.*

*६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.*

*७) आपलं तेच खरं/ मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.*

*८) दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.*

*९)अधिरता,अतिआवेश,घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.*

*१०) स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.*

*११) प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.*

*१२) स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.*

*१३) हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.*

तर मग आता आपल्या रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट रहा म्हणजे निरोगी व तंदुरूस्त बनाल

सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल.

 सर्वोच्च न्यायालयाने काल ऑल इंडिया टॅक्स पेअर्स ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, जी जगातील सर्वात मोठी संस्था असेल.

  कोणतेही सरकार या संस्थेच्या मान्यतेशिवाय मोफत वीज, मोफत पाणी, मोफत वितरण किंवा कर्जमाफीची घोषणा करू शकत नाही, मग सरकार कोणतेही असो.

  पैसे आमच्या करदात्यांच्या मालकीचे असल्याने, करदात्यांना त्याच्या वापरावर लक्ष ठेवण्याचा अधिकार असला पाहिजे.

  राजकीय पक्ष मतांसाठी फुकटचे आमिष दाखवून जनतेला भुरळ घालत आहेत. जे काही प्रकल्प जाहीर केले जातात, ते आधी सरकारने त्यांची ब्लू प्रिंट सादर करून या संस्थेची मंजुरी घ्यावी. हे खासदार आणि आमदारांच्या पगारावर आणि त्यांना मिळालेल्या इतर गैर-विवेकात्मक लाभांवरही लागू व्हायला हवे.

  लोकशाही फक्त मतदानापुरती मर्यादित आहे का? त्यानंतर करदाते म्हणून आम्हाला कोणते अधिकार आहेत?

  संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल खासदार, आमदारांना जबाबदार धरण्याचा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार करदात्यांना असला पाहिजे. ते सर्व "सेवक" नंतर करदात्यांनी दिले आहेत.

  अशा कोणत्याही ‘फ्रीबीज’ मागे घेण्याचा अधिकारही लवकरच लागू झाला पाहिजे.

  आपण सहमत असल्यास, कृपया शक्य तितक्या लोकांशी संपर्क साधा. हे करण्यासाठी, पोस्ट शेअर करा.

  तुमच्या किमान 10 मित्रांना हे पाठवा.

  कृपया व्हायरल होण्यासाठी हा संदेश शेअर करा. 🙏

  https://www.nationalheraldindia.com/india/sc-forming-panel-to-examine-issue-of-freebies-by-political-parties-is-burial-by-committee-experts

 *एक अतिशय आनंदाची बातमी ज्याची खूप प्रतीक्षा होती.*

 👏👏👏👏👏

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा

        मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, 1997 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कलम 24 अ नुसार राज्य शासन आदेशाद्वारे विनाअनुदानित खाजगी तंत्रनिकेतन किंवा मंडळाशी संलग्न संस्था यांद्वारे चालविण्यात येणाऱ्या प्रत्येक पदविकास्तरीय तंत्र शिक्षण देण्याचा प्रत्यक्ष खर्च ठरविण्यासाठी एक फी निश्चिती समिती गठीत करील. शासन या आदेशामध्ये फी निश्चिती समितीचा अध्यक्ष व सदस्य यांच्या वित्तलब्धी व इतर देय भत्ते, पदावधी व सेवेच्या शर्ती असणार आहे.

            दीर्घ शीर्षाची सुधारणा, उद्देशिका, कलम 2, 5, 6, 20, 22, 23, 24 अ, 25, 26, 27, 32, 33, 34, 34 अ, 37, 46, 47 यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच कलम 4 अ व कलम 35 अ समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलम 35, 38 व कलम 38 मध्ये अनुसूची बदली दाखल केले आहे.

            सुधारणांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कलम 4 अ नुसार अध्यापन, संशोधन, विस्तार व सेवा यांद्वारे ज्ञान व सामंजस्य यांचा प्रसार, निर्मिती व जपणूक करणे, ही मंडळाची सर्वसाधारण उदि्दष्टे असतील. कलम 35 अ नुसार संस्थेच्या व्यवस्थापनाच्या बदलाकरीता किंवा हस्तांतरणाकरीता शासनाची परवानगी मागणारे व्यवस्थापन, मंडळाने किंवा यथास्थिती नियामक प्राधिकरणाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार मंडळाच्या सचिवाला, मंडळाद्वारे किंवा यथास्थिती, नियामक प्राधिकरणाद्वारे विहित करण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे अर्ज करतील. या सर्व कलमांमधील सुधारणा, नवीन कलम समाविष्ट करणे व बदली कलम दाखल करणेबाबत शासनाने राजपत्र प्रसिद्ध केले आहे.  

Featured post

Lakshvedhi