Thursday, 25 May 2023

उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५

 *उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५

उन्हाळा हळूहळू वाढायला लागला की आपल्याला उष्णतेचे त्रास भेडसावू लागतात. यामध्ये तोंड येणे, पुरळ येणे, जळजळ होणे, लघवीच्या समस्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करतो.


उन्हाळा सुरू झाला की पाणी जास्त पिणे, पाणीदार फळं खाणे, सरबत, दही, ताक यांचा आहारात समावेश करणे असे उपाय केले जातात. यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदातही गुलकंदाला बरेच महत्त्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा हा गुलकंद अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे लहान मुलेही तो आवडीने खातात. गुलकंद नुसता खाल्ला तरी चालतो. पण तो दूधातून घेतलेला अधिक चांगला. याशिवाय गुलकंदाचा शिरा, लाडू, फालुदा असे गुलकंदाचे काही पदार्थही करता येतात. पाहूयात उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे...


*१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर :* 


अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.


*२. बद्धकोष्ठता :* 


ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.


*३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर :* 


आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.


*४. त्वचा सतेज राहण्यास मदत :* 


गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.


*५. हृदयासाठी फायदेशीर :* 


उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय

 👉ऑयली त्वचा (Oily Skin) साठी उपाय.


1) बेसन, तांदळाचे पीठ, दही आणि हळद मिक्स करून लेप बनवून लावल्यामुळे स्कीन चे ऑईली पण समाप्त होते आणि चेहऱ्यावर चमक येते. हा उपाय face वरून काळे दाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी देखील फायदेशीर होतो.


2) मध, पुदिना रस आणि लिंबू रस यांचा देखील oily skin पासून सुटका मिळवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.


3) हळद, मुलतानी माती आणि चंदन यांचा लेप चेहऱ्यातील मॉश्चराइज ओढून घेतो आणि स्कीन ऑईल फ्री होते. या घरगुती उपाया मुळे स्कीन टाईट होते. यामुळे तुम्ही नेहमी फ्रेश दिसाल. हा लेप लावल्यावर 30 मिनिटांनी चेहरा धुवावा.


4) चेहऱ्यावर कच्चा बटाटा किंवा काकडी चोळल्यामुळे देखील फायदा होतो.


👉चेहरा गोरा आणि सुंदर कसे बनवायचे :


1) एलो वीरा ज्यूस, एप्पल साइडर विनिगर आणि हळद, या तीन वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा सावळे पण दूर होतो.


2) गोरा रंग मिळवण्यासाठी हळद आणि लिंबूरस वापरणे उत्तम आहे. हा उपाय तेलकट त्वचेच्या लोकांसाठी उत्तम आहे.


3) दुधा ची मलाई, बेसन आणि हळद मिक्स करून एक लेप बनवा. हा लेप चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. ऑईल स्कीन वाल्यांनी हा उपाय करू नये. ड्राय स्कीन वाले करू शकतात.


4) मध, गुलाबाच्या पाकळ्या आणि दुध यांचा लेप रंग उजळण्या साठी आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी वापरा.


5)बाहेरून आल्यावर त्वरित चेहरा स्वच्छ धुवावा कारण त्वचेच्या रोम छिद्रात मळ जमा होऊ शकतो.


6) पपई चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर आहे. कच्ची पपई dead skin cells दूर करण्यासाठी उपयोगी आहे.


 👉तुळशीची पाने बारीक वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा टवटवीत होतो.


👉अननस आणि पिकलेले टोमाटो चेहऱ्यावर face pack बनवून लावल्याने हळूहळू गोरे पण येईल.


👉वाफ घेतल्याने छिद्रात साठलेले तेल, माती आणि डेड स्कीन सेल्स सहज निघून जातात. हा skin care चा सर्वात उत्तम आणि सोप्पा उपाय आहे.


👉दही, आवळा पावडर, हळद आणि बेसन मिक्स करून एलोवीरा ज्यूस आणि थोडा लिंबूरस मिक्स करून फेशियल पैक तयार करा. यास चेहऱ्यावर लावा. या उपायाने काळे दाग दूर होतील आणि skin moisturize होईल.


☝️शरीराची बाहेरील सुंदरता वाढवण्यासाठी आवश्यक आहे कि तुम्ही शरीराच्या आतून देखील निरोगी असले पाहिजे. वर सांगितलेले ब्युटी चे घरगुती उपाय करण्या सोबतच आवश्यक आहे तुम्ही हे उपाय देखील केले पाहिजेत.


👉पौष्टिक भोजन खावे ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतील आणि त्वचा निरोगी राहील. यासाठी तळलेले, मसालेदार, फास्ट फूड खाण्याच्या एवजी विटामिन आणि मिनरल्स असलेले पदार्थ आहारात घ्यावेत.


👉पोटाच्या आजारा पासून स्वताला वाचवा. सकाळी पोट सोफ्ट करण्यासाठी गरम पाण्यात थोडासा लिंबूरस, मध आणि अद्रक रस मिक्स करून प्यावे.


👉रोज 3 ते 4 लीटर पाणी प्यावे ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातील.


👉वेळेवर भोजन करावे.


👉रोज व्यायाम करावा.

तणाव मुक्त राहावे आणि चांगली झोप घ्यावी.


👉खाण्यापिण्याच्या वाईट सवयी पासून वाचावे.


👉जर तुम्ही पिंपल्स ने हैराण आहे तर कांदा आणि लसून यांची पेस्ट बनवून यामध्ये कडूलिंबाची पाने मिक्स करून पेस्ट बनवा. आता हे मिश्रण थोडी हळद मिक्स करून फेस वर लावा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाफ घेऊ शकता ज्यामुळे pimples दूर होतील.




आरोग्य धनसंपदा


*कपालभाती प्राणायाम*

 

कपाल = कपाळ; भाती= ओजस्वी; प्राणायाम = श्र्वोच्छ्वासाचे तंत्र,


ही अशी प्रक्रिया आहे ज्याने वजनच कमी होते असं नाही तर पूर्ण (शारीरिक व मानसिक) प्रणाली सुद॒धा संतुलित ठेवते. कपालभातीचं महत्व समजावून सांगताना डॉ. सेजल शहा (ज्या श्री श्री योग प्रशिक्षकही आहेत) म्हणतात : आपल्या शरीरातील ८०% विषांत द्रव्ये ही श्र्वासावाटे बाहेर टाकली जातात. कपालभातीचा सराव करते वेळी शरीरातील सर्व संस्थांची सफाई / प्रक्षालन / शोधन होते. आणि ओजस्वी कपाळ हे उत्तम आरोग्याचं प्रतिकच म्हणता येईल. कपालभातीचा शब्दशः अर्थ ओजस्वी कपाळ असा होतो आणि या प्राणायामच्या नियमित सरावाने नेमके हेच होते. ही चमक बाह्यच नसून बुद्धीला तल्लख व शुद्ध करणारी आहे.


कपालभाती प्राणायाम कसा करावा?

१. सुखासनात बसावे, पाठीचा कणा ताठ ठेवावा व हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला उघडून गुडघ्यांवर ठेवावेत. 


२. श्वास घ्यावा.


३. श्वास सोडता सोडता पोट आत घ्यावं. नाभीलाही पाठीच्या कण्याकडे ओढून घ्यावे. सहज शक्य होईल तेवढेच करावे. पोटाच्या स्नायूंची हालचाल जाणवावी म्हणून उजवा हात नाभीवर ठेवावा व नाभी आतल्या बाजूस ओढून घ्यावी.


४. जसं ओटीपोट आणि नाभीकडचा भाग सैल सोडाल, फुफुसात हवा आपणहून शिरेल.


५. अशा प्रकारे २० वेळा केल्याने एक चरण पूर्ण होते.


६. एक चरण पूर्ण झाल्यानंतर डोळे बंद ठेउन शरीरां मध्ये होणाऱ्या संवेदनांकडे लक्ष द्यावे.


७. अशाच प्रकारे अजून २ चरणं पूर्ण करावी.


श्वास बाहेर सोडण्यावर भर असावा. श्वास घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. पोटाचे स्नायू सैल सोडल्याबरोबर आपणहून श्वास आत घेतला जातो. श्वास बाहेर सोडण्यावरच लक्ष असू द्या.

कपालभाती शिकण्यासाठी एखाद्या अनुभवी श्री श्री योग प्रशिक्ष्काचे मार्गदर्शन घ्यावे.त्यानंतर घरीच ह्याचा सराव करू शकाल.


कपाल भातीने होणारे लाभ:

चयापचयाची (म्हणजेच खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याची गती) वाढते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

शरीरातील सूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.

पोटाचे स्नायू उत्तेजित होतात ज्याचा लाभ मधुमेहींना होतो.

रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्याची कांती वाढते.

पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते, पोशाक तत्वांचं शरीरात परिपाक जलद गतीने होतो.

पोट सुडौल राहते.

मज्जासंस्था उर्जित होते व मेंदूच्या पेशींना चालना मिळते.

मन शांत हलके होते.

कपालभाती कोणी करू नये?

हृदयविकार असेल, पेस-मेकर बसवला असेल किंवा स्टेन्ट्स बसवले असतील, स्लिप-डिस्क मुळे पाठदुखीचा त्रास असेल, पोटाचे ऑपरेशन झालेले असेल, फेफरे येत असेल किंवा हर्नियाचा त्रास असेल तर अशा व्यक्तीने कपालभाती करू नये.

गरोदर महिलांनी किंवा मासिक पाळी चालू असल्यास काल्पालभाती करू नये कारण ह्या प्रकियेत ओटीपोटाचे स्नायू पिळवटून निघतात.

उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तीने योग तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हा प्राणायाम करावा.


योगाभ्यास केल्याने मानसिक आणि शारीरिक विकास होतो ज्यामुळे अनेक लाभ होतात. तरी पण त्याला औषधांना पर्याय म्हणून मानू नये. एखाद्या तज्ञ श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच आसनांचा सराव करणे आवश्यक आहे. .


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_


दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय,

 दात दुखी / दाढ दुखी वर काही उपाय, 


दातदुखीपासून लगेच आराम हवा असेल तर पेरूची पानं चावावीत अथवा पेरूची झाडाची पानं पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी. यामुळे तुमची दातदुखी तर बंद होतेच पण त्याचबरोबर हिरड्यांमधील सूज आणि त्रासदेखील बंद होतो

तुमच्या दातामध्ये दुखत असल्यास, त्या ठिकाणी कच्च्या कांद्याचा तुकडा ठेवावा. त्यामुळे पटकन दातदुखी बंद होते..##आंबटपदार्थखाल्ल्यानेहोणार्याकळाथांबतात..##दातदुखणेकमीहोते...

दातदुखीसाठी हिंगाचा वापर अतिशय फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चिमूटभर हिंग आणि एक चिमूटभर सैंधव घालून उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने तुम्ही चूळ भरा. त्यामुळे लगेच दातदुखी बंद होईल

दाताला कीड लागली असेल आणि त्यामुळे तुमचे दात दुखत असतील तर दोन चिमूट सैंधवमध्ये तिळाचं तेल घालून ही पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा. असं केल्यास, तुमच्या कीड लागलेल्या दातातील वेग थांबतील

दातदुखीसाठी लसूनदेखील एक चांगला उपाय आहे. लसणाची एक पाकळी दाताखाली दाबून ठेवावी. काही वेळातच दातामध्ये येणारे वेग कमी होतील

प्रत्येकाच्या घरात बटाटे तर असतातच. तुमच्या दातांमध्ये दुखत असल्यास आणि सूज आली असल्यास, बटाटा कापून त्याचे स्लाईस करून त्या भागावर साधारण 20 मिनिट्स ठेवा. लगेचच दुखणं बंद होईल 

दातदुखीपासून सुटका होण्यासाठी तुम्ही टी - बॅगचादेखील वापर करू शकता. गरम पाण्यात टी बॅग्ज ठेवा आणि तुमच्या दातदुखीच्या ठिकाणी शेका. यामुळे दुःख कमी होईल

दातामध्ये खूप जास्त दुखत असेल तर 20 ते 25 मिनिटांपर्यंत बर्फ त्याच दातावर शेकवा, जिथे दुखत आहे. असं केल्यामुळे तुम्हाला लवकर सुटका मिळेल

लिंबामध्ये जास्त प्रमाणात विटामिन सी असतं. दात दुखत असलेल्या ठिकाणी लिंबाचा थेंब लावल्याने लगेचच तुमचं दुखणं थांबेल

दात दुखत असल्यास, ब्रँडीचादेखील उपयोग केला जातो. तुमच्या घरी ब्रँडी असल्यास, कापसावर थोडी घेऊन दुखणाऱ्या दातावर लावा. तुमचं दुःख दूर होईल

तुमचा जो दात दुखत आहे, त्यावर कापूर लावा. कीड लागल्याने दात दुखत असल्यास, त्या ठिकाणी कापूराचा चुरा भरा. दुखण्याबरोबर त्या कीड्यापासूनदेखील सुटका मिळेल

दातदुखीासाठी आलंदेखील खूपच लाभदायी आहे. आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर सैंधव घाला. ज्या दातामध्ये दुखत आहे, तिथे आल्याचा तुकडा दाबून धरा. या दरम्यान तोंडात जे पाणी येईल, ते न गिळता थुंकत राहा. त्यामुळे दातदुखी 5 ते 10 मिनिटांत बंद होईल

लवंग ठेचून त्यात लिंबाचा रस घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा दुखत असलेल्या दाताला लावा

दातदुखीपासून सुटका मिळण्यासाठी फिटकरी पावडर दुखत असलेल्या ठिकाणी लावा. असं केल्यामुळे तुम्हाला दातदुखीपासून मुक्ती मिळेल

दातदुखीची समस्या असल्यास, कडिलिंबाची तीन- चार पानं धुऊन घ्या. हे कडू असतं पण तरीही दातदुखीसाठी ही पानं चावा. यामुळे तुमचा त्रास बंद होईल


_

रंगात रंग है शाम रंग

 हे पेंटिंग पहा.. श्रीकृष्णाच्या डोळ्यातील भाव, स्मितहास्य राधेच्या चेहऱ्यावरीलश्रीकृष्ण प्रेमाची तल्लीनता.. खूप मनमोहक रंगसंगती आहे.. प्रकाशयोजना अदभुत..साक्षात राधेकृष्ण प्रकट झाल्यासारखे वाटते..ह्या कलाकाराचे मनापासून कौतुक करावे वाटले..


शासन आता थेट आपल्या दारी”ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र

 

विशेष लेख :


शासन आता थेट आपल्या दारी”ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र मिळू शकणार


 


            सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी “शासन आपल्या दारी” अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. महसूल विभागाच्या 3 सेवा यामध्ये अधिसूचित करण्यात आल्या आहेत.


            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत असून यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ मिळण्यासाठी कमीतकमी कागदपत्रे सादर करुन जलद मंजुरी मिळणार आहे. पहिल्यांदाचा सर्व प्रशासन “हर घर दस्तक” मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाला या योजनेची माहिती देणार आहे. महसूल विभागाच्या एकूण 55 सेवांचा लाभ या अभियानातून सर्वसामान्यांना होणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. 


            या अभियानात ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वय आणि अधिवास प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेतील जन्मनोंदणीबाबतचा गोषवारा किंवा शासकीय दवाखान्यातील डॉक्टरचा वयाबाबतचा दाखला किंवा शाळा सोडल्याबाबतचा दाखला देणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्र, वाहनचालक अनुज्ञप्ती (लायसन्स), पॅनकार्ड, रेशनकार्ड किंवा बँक अथवा पोस्ट पासबुक किंवा ग्रामपंचायत रहिवास पुरावा तसेच अर्जदाराचा फोटेा असणे आवश्यक आहे.


            उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी संबंधित व्यक्तीने प्रतिज्ञापत्र, आयकर भरण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म किंवा ज्या ठिकाणी काम करतो तेथील मालकाने दिलेले गत आर्थिक वर्षातील एकूण वेतन प्रमाणपत्र किंवा चालू सातबाराचा उतारा किंवा तलाठ्याने दिलेले आयकर प्रमाणपत्र, तलाठी अथवा मंडळ अधिकारी पडताळणी अहवाल किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, रेशनकार्डची प्रमाणित प्रत, वीज बिल किंवा मालमत्ताकराची पावती किंवा तलाठयाचे रहिवासी प्रमाणपत्र, मागील तीन वर्षांचे मिळकती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


            वय आणि डोमिसाईल अर्थात अधिवास प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जदाराने स्वत:चा फोटो यासह शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्राथमिक शाळेबाबतचा गोषवारा किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. तसचे रहिवासाच्या पुराव्यासाठी ग्रामसेवकाचा रहिवास पुरावा, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा मोटर वाहन चालक लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा एनआरजीए जॉब कार्ड किंवा आरएसबीवाय किंवा शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र किंवा आधारकार्ड देणे आवश्यक आहे. तसेच मतदार यादीचा गोषवारा किंवा वीज तथा टेलिफोन बिल किंवा घरभाडे पावती किंवा पाणीपट्टी पावती किंवा सातबारा गोषवारा किंवा रेशनकार्ड देणे आवश्यक आहे.


 


आधुनिकता आणि गतिमानतेला प्राधान्य – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत असल्यामुळे महसूल विभागातील यंत्रणेमध्ये अधिक सुधारणा करून पारदर्शकता आणण्यास मदत होणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांना महसूल विभागाच्या सेवा या अभियानात एकत्रित स्वरुपात आणि जलद पद्धतीने मिळण्यास मदत होणार आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जात असून या विभागाच्या सेवा मिळण्यासाठी ऑनलाईन यंत्रणेचा उपयोग अधिकाधिक केल्यामुळे महसूल विभागाचे काम अधिक गतिमान आणि पारदर्शक होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.


 


“शासन आपल्या दारी” अभियानाची वैशिष्ट्ये


• राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. या उपक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


• जिल्हाधिकारी “शासन आपल्या दारी” अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.


• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ मिळण्याचे ध्येय सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवावे प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर / तालुका स्तरावर 2 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.


• मंत्रालयीन स्तरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन या उपक्रमांतर्गत राबवावयाच्या योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.


            शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येत असतात. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र, यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. काही वेळा अनेक लोकांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही. म्हणून या अभियानातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यावर भर असणार आहे.


 

समान संधी केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

 समान संधी केंद्र विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

– समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे

 

            मुंबईदि. 24 : सामाजिक न्याय विभागातर्फे सुरु करण्यात आलेली समान संधी केंद्र ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्वाची असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

            रुईया कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण उपायुक्त वंदना कोचुरेरुईया कॉलेजच्या प्राचार्य वर्षा शुक्लामुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनाररायगडचे सहाय्यक आयुक्त  सुनील जाधव उपस्थित होते.

            डॉ. नारनवरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक अभ्यास न करता बदलत्या तंत्रज्ञानानुसार तंत्रज्ञान अवगत करावे. भविष्याचा विचार करून वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्ञान प्राप्त करावे. शासनाच्या विविध योजनांची माहिती समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मिळण्यास निश्चित मदत मिळेल. कौशल विकासावर आधारित जपान व भारतामध्ये वेगवेगळ्या बाबतीत केंद्र सरकारचे करार झालेले असून त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये सुद्धा नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्रात सुमारे 15 हजार महाविद्यालयात समान संधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत, असेही यावेळी डॉ. नारनवरे यांनी सांगितले.

            या कार्यक्रमात प्रादेशिक उपायुक्तसमाजकल्याण मुंबई विभाग कार्यालयाने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा व समान संधी केंद्र या माहिती पुस्तिकेचे प्रकाशनसहाय्यक आयुक्तसमाज कल्याणरायगड या कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या आस्थापना व लेखा विषयक प्रणालीच्या ऑनलाईन पोर्टलचे उद्घाटन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रकरणाची सद्यस्थिती व नुकसान भरपाई या अँड्रॉईड मोबाईल प्रणालीचे उदघाट्न डॉ. नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

****

Featured post

Lakshvedhi