Wednesday, 24 May 2023

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावरस्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही

 बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावरस्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नाही


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील


            मुंबई, दि. 24 : एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित अकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री करण्यात येते. ही खात्री केल्यानंतर अशा जमिनींकरिता स्वतंत्रपणे अकृषिक परवानगीची गरज नसल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


            महसूल व वन विभागामार्फत 23 मे 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार अकृषि‍क प्रयोजनांचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केल्यानंतर या जमिनींकरिता महाराष्ट्र जमीन संहिता, 1966 च्या कलम 42-अ, 42-ब, 42-क, 42-ड किंवा 44-अ अन्वये स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशा जमिनी अकृषिक वापरात रुपांतरित झाल्याचे मानण्यात येत असल्याने, अशा जमिनींबाबत सक्षम प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास/ भूखंडधारकास/ विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे श्री. विखे- पाटील यांनी सांगितले.


            जमीन भोगवटदार वर्ग-१ या धारणाधिकाराची असल्यास बीपीएमएस (Building Plan Management System (BPMS)) प्रणालीतच आवश्यकता असेल तिथे रुपांतर कर वसूल केला जाईल व विकास परवानगी सोबतच अकृषिक वापराची सनद निर्गमित करण्यात येईल. जमीन वर्ग-२ धारणाधिकाराची असल्यास, नजराणा किंवा अधिमुल्य आणि इतर शासकीय रकमांची देणी इ. रकमांची परिगणना करण्यात यावी आणि या रकमांचा भरणा केल्यावर सक्षम महसूल अधिकारी यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर बीपीएमएस यंत्रणेद्वारे विकास परवानगी देणे बंधनकारक राहील व अशा प्रकरणी सुद्धा अकृषिक वापराची सनद सोबतच निर्गमित होईल. ही सनद स्वयंचलित (System generated) स्वरुपाची असेल व अशा सर्व प्रकरणांमध्ये सनदेची एक प्रत ऑनलाईन (electronically) गाव दप्तरात नोंद घेण्यासाठी जाईल व परवानगी घेणाऱ्यावर पुढे नियमित देय अकृषिक सारा भरणे बंधनकारक राहील.


००००

शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणे, खते मिळण्यासाठीकृषी विभागाने दक्ष राहावे

 शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणेखते मिळण्यासाठीकृषी विभागाने दक्ष राहावे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

 

            मुंबईदि. २४ : राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणेखते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावेअसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज सकाळी राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकृषी मंत्री अब्दुल सत्तारपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीलरोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेबंदरे व  खनिकर्म मंत्री दादाजी भुसेकामगार मंत्री डॉ. सुरेश खाडेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसहकार मंत्री अतुल सावेआमदार प्रकाश आबिटकरमुख्य सचिव मनोज सौनिकसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमारकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेकृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीमागील काही दिवसांत अवकाळी पाऊसगारपीट यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यावेळी प्रत्यक्ष शेतात जावून शेतकऱ्यांशी संवाद साधता आला. त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी खरीप हंगामाची उत्तम पूर्व तयारी झाली आहे. मात्रत्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथकेभरारी पथके कार्यान्वित करावीत. लिंकेजच्या तक्रारी आल्यातर तातडीने कारवाई करावी. शेतकऱ्यांसाठी पुरेसे बी - बियाणेखतांचा साठा उपलब्ध असून ते वेळेत मिळतीलअशी दक्षता कृषी विभागाने घ्यावी. यंदाच्या मॉन्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरण्यांचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. राज्य शासनाच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे बियाणे दर्जेदार असावे. त्याचीही आपण प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाचा पुरवठा करावा. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावाअशीही सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. अवकाळी पाऊसगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान’ योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसायकृषी पर्यटनावर भर द्यावा. जलयुक्त शिवार योजनेची भूजल पातळी उंचावण्यास मदतच झाली आहेअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीयंदाच्या पावसाळ्यावर एल- निनोचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्रअन्य दोन घटक पावसाला अनुकूल आहेत. त्यानंतरही पावसाने ओढ दिलीतर कृषी विद्यापीठांनी पेरण्यांचे वेळापत्रक निश्चित करावे. त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाने जनजागृती करावी. बोगस बियाणेखते विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. वेळप्रसंगी त्यांचे परवाने रद्द करावेत. शेतकऱ्यांची कृषी कर्जासाठी अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल दाखल करावा. पीक कर्ज वितरणाला गती द्यावी. जिल्हा प्रशासनाने पीक कर्ज वितरणाचा नियमितपणे आढावा घ्यावा. पावसाळा सुरू होईपर्यंत तलावातील गाळ काढणेबांधबंदिस्तीजलयुक्त शिवारच्या कामांना गती द्यावी. हवामान केंद्र अद्ययावत करावीत. आगामी काळात पिकांचे पंचनामे करताना मानवी हस्तक्षेप टाळून तो ई- पीक पाहणीच्या माध्यमातूनच झाला पाहिजे. तसेच ऊर्जा विभागाने जोडण्यांची संख्या वाढवावी. याशिवाय मुख्यमंत्री सौर ऊर्जा विभागाला सर्व विभागांनी सहकार्य करावेअसेही त्यांनी सांगितले. 

            कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले कीराज्यातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खरीप हंगामास अनन्यसाधारण महत्व आहे. कृषी क्षेत्राच्या सूक्ष्म नियोजनाच्या दृष्टीने राज्यात सर्वत्र खरीप हंगामपूर्व आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९६ टक्के पाऊस अपेक्षित आहे. राज्यात सन २०२२ - २३ मध्ये धान्य पिकाचे १७२.४९ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या खरीप हंगामात लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र ५८.२८ लाख हेक्टर राहणार आहे. यामध्ये कापूस पिकाखाली ४१.६८ लाख हेक्टरतर सोयाबीन पिकाखाली ४९.११ लाख हेक्टरभात पिकाखाली १५.९१ लाख हेक्टरमका पिकाखाली ९.१० लाख हेक्टरतर कडधान्य पिकाखाली २०.५३ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. या खरीप हंगामासाठी १९.२३ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. महाबीजराष्ट्रीय बीज निगमखासगी उत्पादकांमार्फत २१.७७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. ते आवश्यकतेपेक्षा ११३ टक्के आहे. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याचे कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

            यावेळी सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. डवलेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाखपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणीराहुरी येथील महात्मा जोतिराव फुले कृषी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. प्रदीपकुमार पाटीलदापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंतभारतीय हवामान विभागाचे पुणे येथील प्रमुख श्री. होसाळीकर आदींनी आपापल्या विभागाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षविभागीय आयुक्तजिल्हाधिकारीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीकृषी विभागाचे संचालकजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००००

‬चरबी कमी करा

 ‬चरबी कमी करा

> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.

> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

> फायदे :

> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.

> ०२) हाडे मजबूत होतात.

> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.

> ०४) डोळे तेजस्वी होतात.

> ०५) केसांची वाढ होते.

> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.

> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.

> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.

> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

> १०) बहिरेपणा दूर होतो.

> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.

> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.

> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.

> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.

> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.

> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.

> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.

> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.

> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.

> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.

> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.

> २३) कोणत्याही वयाची व्यक्ती, स्त्री / पुरूष सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे



मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील राज्य शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर मंदिर विकास, अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता


गर्दी होणाऱ्या मंदिरांचे डिजिटल मॅपिंग करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


पंढरपूर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरविकास विभागाकडून १० कोटी रुपयांचा निधी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


 


            मुंबई, दि. 23 : राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगरपरिषदेस वितरीत करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य शिखर समितीच्या बैठकीत ७३ कोटी ८० लाख रुपयांच्या पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते.


            मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ही बैठक झाली. खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते - पाटील, विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी यावेळी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, ‘वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधांची सांगड घालण्याचे काम करावे. यात्रेसाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असतात, अशावेळी घाट सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती तसेच विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी यात्रा अनुदान ५ कोटीवरून १० कोटी रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


            आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवतानाच त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. नगरविकास विभागाने रस्त्यांच्या डागडुजीसाठी पंढरपूर नगरपरिषदेला तातडीने १० कोटी रुपयांचा निधी वितरित करावा. पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


            पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात ७३ कोटी ८० लाख रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचे सादरीकरण पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. या आराखड्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरूस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत.


            मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने काही शिफारशी केल्या असून त्यामध्ये नवीन बांधकाम करताना मुख्य मंदिराशी सुसंगत काळे किंवा लाल पाषाणांचा वापर करणे, मंदिर संवर्धनातील कामात बदल वा सुधारणा, नव्याने बाधकाम करणे यासाठी संनियंत्रण करण्याकरिता समिती गठित करण्याच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून उच्चाधिकार समितीच्या संमतीशिवाय कोणतेही काम हाती घेण्यात येणार नाही, असे सादरीकरणा दरम्य़ान सांगण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भाविकांसाठी ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


            दरम्यान, यावेळी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. यावेळी ३६८ कोटी ७१ लाख रुपयांच्या आराखड्यामध्ये करण्यात येणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. वाहनतळ, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या भूसंपादनाला यावेळी मंजुरी देण्यात आली. प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहनतळ, वॉटर एटीएम, रस्ते विकास, शौचालय निर्मिती, हत्ती तलाव उद्यानांचा विकास, व्यापारी केंद्र, भक्त निवास, चौक सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.


०००००

‬चरबी कमी करा > शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी

 ‬चरबी कमी करा

> शरीरात जास्त चरबी वाढलेली असणाऱ्यांसाठी चरबी कमी करण्याचा खात्रीशीर रामबाण उपाय येथे देत आहोत.

> साहित्य : १०० ग्राम मेथी, ४० ग्राम ओवा, २० ग्राम काळे जीरे हे एका व्यक्तीसाठीचे प्रमाण आहे. यात फरक करू नये. प्रमाण वजन करूनच घ्यावे.

> कृती : वरील तीनही वस्तू लोखंडाच्या कढईत सौम्य तापमानात (साधारण लालसर होईपर्यंत) वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. नंतर तीनही वस्तू एकत्र करून मिक्सरमधून पावडर करावी. रात्री झोपताना एक चमचा (टी स्पून) पावडर एक कप कोमट पाण्याबरोबर घ्यावी. पाणी कोमट घेणे आवश्यक आहे.

> हे चूर्ण रोज घेतल्यामुळे शरीरात कुठेही कानाकोपऱ्यात साचलेली घाण मळाद्वारे अथवा लघवीद्वारे बाहेर निघून जाते. तीन महिन्यानंतर शरीरात अनावश्यक साचलेली चरबी किंवा चरबीच्या गाठी आपोआप विरघळायला लागतात. सुरकुतलेली त्वचा ताणली जाते. शरीर सुंदर होते.

> फायदे :

> ०१) जुनाट वातविकार कायमचा जातो.

> ०२) हाडे मजबूत होतात.

> ०३) काम करण्यास स्फूर्ती येते.

> ०४) डोळे तेजस्वी होतात.

> ०५) केसांची वाढ होते.

> ०६) जुनाट वायुविकारापासून कायमची सुटका होते.

> ०७) रक्ताभिसरण चांगले होते.

> ०८) कफ प्रवृत्ती असलेल्यांना तर कायमचा फायदा होतो.

> ०९) हृदयाची कार्यक्षमता वाढते.

> १०) बहिरेपणा दूर होतो.

> ११) बाळंतपणानंतर बेडौल होणारे स्त्रियांचे शरीर सुडौल होते.

> १२) अॅलोपॅथीच्या औषधांमुळे होणारा साईड इफेक्ट कमी करतो.

> १३) दात बळकट होतात व त्यावरील इनॅमल टिकून राहते.

> १४) रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात म्हणजे रक्त शुद्ध होते व रक्तातील गुणधर्म टिकून राहतात.

> १५) नपुंसकता असेल तर ती दूर होते.

> १६) ज्यांना मुल हवे असेल तर त्यांचे होणारे मुल तेजस्वी होते.

> १७) मलेरिया, कावीळ, टाईफॉइड, कॉलरा इ. रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती येते.

> १८) त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत नाहीत. वृद्धापकाळामुळे येणाऱ्या सुरकुत्या पडण्याचा कालावधी लांबतो म्हणजे दीर्घायुष्य लाभते.

> १९) स्त्रियांना तरूणपणी किंवा लग्नानंतर येणारी मरगळ, मेनोपॉजचा त्रास दूर होण्यास मदत मिळते.

> २०) शरीरात पाण्याद्वारे, हवेद्वारे, तापमानामुळे होणारे जुनाट आजार कायमस्वरूपी नष्ट होतात.

> २१) शरीरात वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत मिळते. हार्टअॅटॅक येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

> २२) त्वचेचा रंग काळवंडत नाही. त्वचेचे आजार, त्वचा सुकणे, खाज येणे हे बंद होते.

>

पुणे - मेहकर एसटी अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्तमृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये

 पुणे - मेहकर एसटी अपघात, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्तमृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये


 


            मुंबई, दि. 23 : सिंदखेडराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत सहा जण मृत्युमुखी पडले असून दहा जखमी आहेत.


            मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये तत्काळ द्यावेत तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या अपघाताविषयी कळताच मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाकडून माहिती घेतली. तसेच प्रशासनाने प्रवाशांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचे निर्देश दिले.

रक्ताची अशुध्दी-*

 *रक्ताची अशुध्दी-*


आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके जड पडणे, मानसिक आजार होणे, एखादा मोठा आजार होणे, शारिरीक वाढ कमी होणे किंवा योग्य न होणे, हार्मोन्स ची कमी असणे, निरूत्साह होणे, सतत चिंताग्रस्त राहणे, चिडचिड होणे, राग येणे, अशक्तपणा अशी कारणे आपण ऐकतो, कारण जिवंत राहण्यासाठी जसा श्वासोच्छवास गरजेचा आहे तेवढेच महत्वाचे शरिरातील रक्त व रक्तप्रवाह.

तर आज काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करू शकतो.


◼️दररोज किमान ३ खजुर खाणे.

◼️महिन्यातुन दोन वेळेस दुपारी सर्व भाज्यांचे सुप घेणे.

◼️आठवड्यातुन किमान एकवेळेस जेवणानंतर पान खावे. 

◼️दररोज किमान २० ग्रॅम बडीसौफ खाणे.

◼️सकाळी अनोश्यापोटी एक चमचा साजुक तुप घ्यावे त्यानंतर १ तासाने कोमट पाणी घ्यावे.

◼️टॅामेटो - गाजर - बीट इत्यादी सॅलाड दररोज दुपारी किमान एकवेळेस तरी घ्यावे.

◼️शिर्षासन ५ मीनीट व पायांच्या टाचेवर ५ मी. उभे राहावे.

◼️महिन्यातुन किमान एकदा १.५ लीटर कोमट पाण्यात मीठ टाकुन ते प्यावे व वमन करावे

◼️महिन्यातुन ७ दिवस रात्रीचे जेवण बंद करावे, सलाड व पाणी चालेल.

◼️महिन्यातुन २ वेळेस भेंडी व दोडक्याचे ज्युस करून त्यात काळी मिरी ची पावडर व काळे मीठ टाकुन ते कमीतकमी एक कपभर किंवा अर्धाग्लास तरी घ्यावे.

◼️पहाटे लवकर उठून १० मीनिट प्राणायाम करावा.

◼️ज्यांना वांग आहेत किंवा रक्ताचे इतर काही विकार आहेत, किंवा काही गुप्त त्रास आहेत त्यांनी बृहदहरिद्राखंड चुर्ण ३ महिने घ्यावे. ते कोठेही सहज उपलब्ध आहे. सकाळी व रात्री एक चमचा पाण्यासोबत.

◼️स्त्रियांनी मासिक पाळीनंतर व त्याआधीच्या त्रासासाठी दररोज दुपारी जेवणानंतर अर्धाग्लास कोमट पाण्यात काळे मीठ टाकुन नियमित घ्यावे. रक्ताची शुध्दी होतेच शिवाय शरिरातील विषतत्वे हि नाहिशी होतात.

◼️दररोज कमीत कमी २० मीनीट चालावे.

◼️कडधान्ये, पालेभाज्या, तूप, काळे मीठ, लिंबुचा रस याचे सेवनाने रक्त शुध्द होतेच शिवाय अशक्तपणा हि जातो.

◼️आठवड्यातुन किमान एकदा दोन्ही पाय कोमट पाण्यात बुडवुन अगदी थोडासा चुना टाकावा व २०/२५ मीनीट बसावे. रक्तातील विषाणु ओढले जातात. असे दररोज केल्यास उत्तमच.

◼️कोणत्याही आहारामध्ये थोडीशी सुंठ वापरावी.


वरील काही मोजके उपाचार सुचवले आहेत, याव्यतिरिक्त अनेक असे घरगुती उपाय आहेत ज्याने असाध्य रोगांवर मात करण्यास आपण आपल्या शरिराला मदत करू शकतो. परंतु ते सर्व लिहिणे शक्य नाही, तेव्हा वरील पैकी कोणतेही जे सहज शक्य असतील ते उपाय करून स्वताला व परिवाराला निरोगी करूया.


*

Featured post

Lakshvedhi