Saturday, 20 May 2023

ऑइल पुलिंग : दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर !*

 🇸 🇭 🇪 🇦 🇷   🇦 🇱 🇱  🇬 🇷 🇴 🇺 🇵 


*ऑइल पुलिंग : दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी आहे अत्यंत फायदेशीर !* 


ऑइल पुलिंग म्हणजे "तेलाने तोंड स्वच्छ धुणे". ही अत्याधुनिक पद्धत नसून ते एक प्राचीन आयुर्वेदिक तंत्र आहे. आयुर्वेदात आपले पोट आणि तोंड खूप महत्वाचे मानले जातात.


जर तुमचे पोट आणि तोंड निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहाते. ऑइल पुलिंग हे तंत्र दातांसाठी तसेच संपूर्ण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला ऑइल पुलिंग म्हणजे काय आणि त्यासाठी कोणते तेल उत्तम आहे याबद्दल माहिती देणार आहोत. तेलाने गुळणा करणे, हे तुम्हाला ऐकायला थोडे विचित्र वाटेल. पण ही पद्धत आता खूप प्रचलित आहे. अगदी सेलिब्रिटीदेखील याचे समर्थन करताना दिसतात. तुम्हाला वाटेल पाण्याने आपण तोंड स्वच्छ धुवू शकतो, मग तेलाने असे करण्याची काय गरज? परंतु तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की, तेलाने तोंड धुणे आणि पाण्याने धुणे या दोन भिन्न पद्धती आहेत, ज्यांचे विशेष महत्त्व आहे.


ऑइल पुलिंग म्हणजे तेलाने गुळणा करणे. या पद्धतीला आयुर्वेदात कवला किंवा गंडुश असे म्हणतात. प्राचीन काळी ऋषी-मुनींनी तोंड आणि पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर केला, अशी मान्यता आहे. अनेकजण हल्ली ऑइल पुलिंगसाठी खोबरेल तेलाचा वापर करतात. 


*ऑइल पुलिंगसाठी कोणते तेल आहेत उत्तम ?* 


नियमित ऑइल पुलिंग करण्यासाठी तिळाचे तेल वापरणे सर्वोत्तम आहे. आयुर्वेदानुसार गार्गलिंगसाठी हे तेल सर्व लिक्विड फॅट्समध्ये सर्वोत्तम आहे. ऑइल पुलिंगचे फायदे ऑइल पुलिंगने दात निरोगी आणि चमकदार राहतात. एवढेच नाही तर हिरड्यांच्या जळजळीच्या समस्येपासूनही सुटका मिळते. तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. तसेच दातांमधली पोकळी काढून टाकण्यासही मदत होते. या तंत्राने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ऑइल पुलिंगने रक्त शुद्ध होते. यामुळे त्वचेवर चमक येते आणि पिंपल्सची समस्याही दूर होते. तसेच केस गळणेही थांबते.


तेलाव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या गोष्टी वापरू शकता - दातांमध्ये मुंग्या येणे, दात सैल होणे किंवा दुखत असल्यास तिळाचे तेल उत्तम आहे. - तुमच्या तोंडात जळजळ होत असेल, तोंडात व्रण होत असतील, तर तूप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. - तुमचे तोंड खूप कोरडे राहात असेल आणि जास्त तहान लागत असेल दुधाचा वापर करावा.


तोंडात कोणत्याही प्रकारचा जडपणा जाणवत असेल तर कोमट पाण्याने गार्गल करणे चांगले. - तोंड स्वच्छ करण्यासाठी आणि तहान शमवण्यासाठी मधदेखील एक चांगला पर्याय आहे.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे*


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*(

दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती

 दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रीमंडळ व इतर महत्वाच्या निर्णयांची माहिती


 


            मुंबई, दि. 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या तसेच राज्य शासनाने घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर' या ॲपवर सोमवार दि. 22 मे, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा 'दिलखुलास' कार्यक्रम प्रसारित होईल.


0000

आरोग्य दाई बीट*

 *आरोग्य दाई बीट*


भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर मानली जाते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते शरीरात हिमोग्लोबिन बनविण्याचे कार्य करतात. बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते. बीटरुटमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. याशिवाय लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटकांमध्येही समृद्ध आहे. एकीकडे बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासही फायदेशीर आहे. हे अँटीएजिंग म्हणून कार्य करते.

चला तर मग जाणून घेऊया बीटाचे फायदे...


*फायदे -*


डागविरहित त्वचेसाठी - चमकदार आणि गुळगुळीत त्वचेसाठी बीटचा रस खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, सी आणि व्हिटॅमिन-के असते जे शरीराच लोह, तांबे आणि पोटॅशियमची आवश्यकता पूर्ण करते आणि त्वचा निरोगी ठेवते. बीटचा रस इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांच्या रसात मिसळला जाऊ शकतो


*चमकदार त्वचेसाठी* - 

चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी आपण बीट फेस मास्क वापरू शकत फेस मास्क बनविण्यासाठी, ब्लेंडरमध्ये सोलून बीटचे तुकडे घालून पेस्ट तयार करा एका भांड्यात पेस्ट काढा आणि त्यात एक चमचा मॉइश्चरायझिंग क्रीम मिसळा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. पेस्ट सुकल्यावर चेहरा धुवा. यानंतर आपल्याला आपला स्वतःचा चमकणारा चेहरा दिसेल.


*डाग नाहीसे करण्यासाठी* 

 मुरुमांचे चेहऱ्यावर कुरूप डाग पडतात. अशा प्रकारे, बीटचा मास्क चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. बीट मास्क तयार करण्यासाठी, दोन चमचे मुलतानी माती मध्ये 5-6 चमचे बीटचा रस घाला आणि एक पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा आणि 15 मिनिटे कोरडे होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होईल तेव्हा त्यावर हातांनी चेहरा आणि गळ्यावर मालिश करा. काही काळ मालिश केल्यानंतर, ते पाण्याने स्वच्छ करा. हे डाग काढून टाकण्यास मदत करेल.


*त्वचेचे टोनिंग करण्यासाठी* 


बीटचे सेवन देखील टोनरसारखे कार्य करते. यासाठी बीटरूटचे तुकडे करा आणि त्यात थोडा कोबी घाला आणि बारीक वाटू घ्या. आइस क्यूब तयार करण्यासाठी हि तयार होणारी पेस्ट आइस ट्रेमध्ये टाका आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवा. जेव्हा गोठते तेव्हा ते चेहऱ्यावर लावा.


*ओठांकरिता* 


 फाटलेल्या ओठांना बरे करण्यासाठी आणि ते मऊ करण्यासाठी बीटरूटचा रस वापरा. बीट रस फ्रिजमध्ये ठेवा, तो दाट झाल्यावर रात्री आपल्या ओठांवर लावा. सकाळी आपण मलईच्या मदतीने ते स्वच्छ करा. ओठांना मऊ आणि गुलाबी बनवण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे.


*(

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी


२५ मे पासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


 


            मुंबई, दि. १९ : राज्य शासनाच्या वतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ च्या या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून नाव नोंदणी दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून https://forms.gle/z5mw9A2dTu6J3zyNA या लिंकवर सुरू होणार आहे.


             या पुरस्कारासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी दि. १५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे यांनी केले आहे.

विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन - वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार

 विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन - वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार


- मंत्री दीपक केसरकर


लाखो तरुणांना मिळणार नोकरीची संधी


            स्टुटगार्ट, दि. 19 ; कौशल्य विकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी तातडीने सांमजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन- वूटॅमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.


            कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास श्री. केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास व उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे सहकार्य मिळाले.


            जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण, पर्यटनाला चालना, जर्मन भाषा शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सोमवारी (दि. १५) व मंगळवारी (दि. १६) तीन बैठकांमध्ये विविध मुद्दे मार्गी लावले. त्यातील चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्र व बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांमध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. त्यासाठी बाडेन-वूटॅमबर्गच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रीतसर आमंत्रित केले आहे. बाडेन-वूटॅमबर्ग जर्मनीतील सर्वांत संपन्न, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्याच्याशी महाराष्ट्राचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होतील, असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.


            श्री. केसरकर म्हणाले, "भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. 'सेवाक्षेत्राच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय तरुण जगातील प्रगत देशांत जातील आणि आपल्या कामाद्वारे भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवतील,' असेच पंतप्रधानांना अपेक्षित आहे. त्यांचे हे स्वप्न बळकट करण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल."


            मंत्री श्री. केसरकर त्यांच्या समवेत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आणि मंगळवारी तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. स्टुटगार्ट व कार्ल्सरूह येथे झालेल्या या बैठकांना भारताचे महावाणिज्य दूत (दक्षिण जर्मनी) मोहित यादव, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव श्री. रणजितसिंह देओल उपस्थित होते. या महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन जर्मनीतील मराठी उद्योजक ओंकार कलवडे यांनी केले.


            स्टुटगार्टमध्ये आज सकाळी श्री. केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची बाडेन-वूटॅमबर्ग राज्य सरकारशी बैठक झाली. त्यास स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन, राज्याच्या शिक्षणमंत्री थेरेसा शॉपर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यात अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये तातडीने कृतिदल सुरू करून, कौशल्य विकास, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबतचे सामंजस्य करार केला जाईल. त्यातून मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळेल आणि जर्मनीतील मनुष्यबळाची कमतरता दूर होईल.


कौशल्य विकासासाठी जर्मनीचे सहकार्य


            मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, तातडीने अंमलात आणण्याच्या धोरणामध्ये भारतीय तरुणांना कौशल्य विकासाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणे व त्या माध्यमातून जर्मनीमधील मनुष्यबळाची कमतरता दूर करणे यावर चर्चा झाली. जर्मनीतील सर्वांत प्रगत बाडेन-वूटॅमबर्ग राज्यात मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, हॉटेल मॅनेजमेंट, आरोग्य क्षेत्रातील नर्सिंगसह विविध टेक्निशियन आदी दैनंदिन गरजांच्या कामांसाठी जर्मनीत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हवे आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमधून कौशल्याचे प्रशिक्षण दिले जातेच. जर्मनीमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्याची त्यात भर घातली जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने नवे तंत्रज्ञान व जर्मन भाषेचे शिक्षण याचा समावेश असेल. त्यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारच्या नियंत्रणाखाली दोन सरकारमध्ये किंवा उद्योगांमध्ये करार केले जातील.


            कुशल कामगारांना जर्मनीत काम करण्यासाठी व्यावसायिक प्रमाणपत्राची गरज असते. ते काम फ्रायबर्ग ( बाडेन- वूटॅमबर्ग) येथील संस्था करतील. त्यामुळे तरुणांना व्हिसा व जर्मनीत रोजगार मिळणे यात येणाऱ्या अडचणी दूर होतील, असे श्री. केसरकर म्हणाले.


०००००



अर्चना शंभरकर/विसंअ



 


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरातआज १७५ तक्रारींचे निराकरण

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरातआज १७५ तक्रारींचे निराकरण


 


           मुंबई, दि. १९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नार्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या.तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड येथे ७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या तसेच ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या देखील तातडीने सोडविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


          यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमात महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांच्या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणा-या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.      


          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते ५.३० वाजता सुरू राहणार आहे.अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.


000

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी

 समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी,

निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा

 

            मुंबई दिनांक १९: नागरिक आपल्या सूचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन आणि माहिती तंत्रज्ञान संचालक जयश्री भोज यांनी यासंदर्भात सादरीकरण केले.

            नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेलट्विटरफेसबुकइंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमातून शासनाकडे सूचनातक्रारीनिवेदने पाठवित असतात. त्यावर कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागांना त्या पाठवणेपाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहेमाहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

नागरिकांना योजनांची माहिती

            राज्यातील कोणत्याही नागरिकाला आपल्याला राज्य किंवा केंद्राच्या कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो हे आता पोर्टलवरून सहजपणे कळू शकणारी केंद्राप्रमाणे माय स्कीम हे पोर्टलही तयार होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळात देखील अमुलाग्र बदल करण्यात येत असून त्यातून सहज आणि त्वरित आवश्यक माहिती मिळेल याची काळजी घेण्यात येत आहे.

प्रकल्पांसाठी ट्रॅकिंग सिस्टिम

            राज्यात विविध प्रकल्प सुरु असतात.  त्यांच्या कामांवर लक्ष ठेऊन ते त्यांची सद्यस्थिती कळण्यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम तयर करण्यात येत आहे

गोल्डन डेटा (सुवर्ण विदा)

राज्यातील सर्व विभागांचा आणि एकूणच शासनातील सर्व डेटा एकत्रितरीत्या ठेवण्यासाठी गोल्डन डेटा (सुवर्ण विदा) व्यवस्था विकसित करण्यात येत आहे.

ड्रोनसाठी धोरण

            ड्रोनची अनेक कारणांसाठी उपयुक्तता असून शासनात देखील याचा वापर विविध विभाग करतात. यासाठी एक सर्वंकष ड्रोन धोरणही अंतिम होत असून त्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

न्यायालयीन प्रकरणे

            एकूणच राज्य शासनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांची माहिती तसेच सद्यस्थिती व इतर बाबींची माहिती एका क्लिकमध्ये कळण्यासाठी लिगल ट्रॅकिंग सिस्टिम देखील तयार होत आहे याविषयी सांगण्यात आले.  

            याशिवाय ई ऑफिसच्या माध्यमातून फाईल्सचा निपटारा कशा रीतीने करणे सुरु झाले आहे हेही सांगण्यात आले. भारतनेट चे जाळे राज्यभर पसरविण्याचे काम २६ जिल्ह्यांत मिळून ७७ टक्के झाले आहे याची माहिती देऊन प्रधान सचिव पराग जैन म्हणाले की२७५१ ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बीएसएनएल कार्यवाही करते आहे.

मुख्यमंत्री डॅश बोर्ड

            याशिवाय मुख्यमंत्री डॅश बोर्डमुख्यमंत्री हेल्पलाईनविषयी माहिती देण्यात आली. हेल्पलाईनमध्ये चॅटबॉट तसेच व्हॉटसएपचा अंतर्भाव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचा संदेश नागरिकांना द्यायचा असल्यास त्याचीही सोय असेल.

0000

Featured post

Lakshvedhi