Thursday, 18 May 2023

साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. १७ : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.


श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते.


            संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


यावेळी खासदार श्री. लोखंडे आणि संस्थानच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती, शाल देऊन मुख्यमंत्र्यांचा आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


०००००

डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…*

 *डोळ्याखालची वर्तुळे घालविण्यासाठी…* 


1) तणाव, कमी झोप यामुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, ॲलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. त्यासाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणेः

१. चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील.

२. टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात.

३. बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा.

४. पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात.

५. काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.

६. साध्या थंड टी बॅग्ज डोळ्यांभोवती ठेवा. हर्बल टी बॅग्ज वापरू नका.

७. व्हिटॅमिन सी, बी आणि डी यांचा आहारात समावेश करा.

याव्यतिरिक्त, पुरेशी झोप घेणे आणि ताण कमी करणे आवश्यक आहे. तसेच, आपल्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्वांचा पुरेसा समावेश असायलाच हवा.


*डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही उपाय* 

 

◼️सकाळी चहा केल्यानंतर चहाचे (चोथा) छोटे कण फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर थंड झाल्यावर डोळ्यांखाली हलक्या हाताने चोळावा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. 

 

◼️टोमॅटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्यांखाली लावावे. दोन मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर थंड पाण्याने डोळे धुवून काढावे. 

 

◼️बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्यांखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवावा.


अपुरी झोप, रात्री उशीरापर्यंत काम, पार्टीमुळे झालेले विशेषत: मद्यसेवन करून झालेले जागरण अशी कारणं तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार करण्यासाठी पुरेशी ठरतात. 

हे खरं असलं तरी, काळी वर्तुळे वाढण्यासाठी अजूनही काही घटक कारणीभूत ठरतात. बहुतेकदा, यासाठी विविध घटक कारणीभूत असून त्यात जनुकीय अनुवांशिकतेचाही समावेश असू शकतो. याबाबत जागतिक पातळीवरील प्रसिद्ध कॉस्मॅटिक सर्जन आणि इन्सेप्टर कॉस्मॅटिक सर्जरी ॲन्ड स्किन इन्स्टीट्युटचे संस्थापक डॉ. मोहन थॉमस यांच्याकडून या काही स्पेशल टीप्स...


*कशी काढता येतील डोळ्यांखालची वर्तुळं...*


पाहा : 

◼️डोळ्यांभोवतीच्या भागात त्वचेचा अत्यंत पातळ आणि नाजूक थर असतो. किंबहुना ही शरीराची सर्वात पातळ त्वचा असते. या भागात अत्यंत अत्यंत निमुळत्या रक्तवाहिन्या आणि धमन्या असतात. या धमन्यांमध्ये प्राणवायू युक्त आणि प्राणवायुरहीत रक्त असतं. पातळ त्वचेमुळे गडद रंगाचे रक्त दिसून येते. त्यामुळेच सकाळच्या वेळी काळी वर्तुळे अधिक स्पष्ट दिसतात.

◼️लाल रक्तपेशींची या निमुळत्या असलेल्या धमन्यांमधून गळती होते. या लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असते. हे हिमोग्लोबिन शरीराच्या सुरक्षायंत्रणेद्वारे हेमोसिडेरिन या गडद रंगांच्या रंगद्रव्यात विभाजन होते. हे रंगद्रव्य पातळ त्वचेमधून दिसू लागते आणि त्यामुळे काळी वर्तुळे तयार होतात.

◼️ॲलर्जीमुळे डोळ्याभोवती सूज येते आणि त्यामुळे कंड सुटते. डोळे पुन्हा पुन्हा चोळल्यामुळे धमन्यांना इजा पोहोचून लाल रक्तपेशींची गळती सुरू होते.

◼️काळी वर्तुळे ही कित्येकदा अनुवांशिक असू शकतात. अनुवांशिक असल्यामुळे अशा कुटुंबांतील व्यक्तींमध्ये खूप लवकर काळी वर्तुळे दिसू लागतात.

◼️थकवा किंवा अपुरी विश्रांती

◼️अपुरे पोषण


*काळ्या वर्तुळांवरील उपचार :* 

कॉस्मॅटिक सर्जरी इन्स्टिट्युटमध्ये डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर पूर्ण उपचार केले जातात. शस्त्रक्रिया करून आणि विना-शस्त्रक्रिया अशा दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत. यातील शस्त्रक्रिया वापरून केलेली उपचार पद्धती आधुनिक आहे.


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/Chq4o0qlHlK3NJAuvdEIH2


शस्त्रक्रियेचा वापर करून : 

स्वत:च्या शरीरातील चरबीचा वापर करून त्या भागात सुधारणा करण्याच्या पद्धतीमुळे डोळ्यांना उठाव मिळतो. ज्यामुळे निओअँजिओजेनेसिस होतो आणि उतीच्या संख्येत वाढ होते. यामुळे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला नैसर्गिक झळाळी, भरीवपणा आणि तेज प्राप्त होते.

चरबी रोपण आणि नॅनो चरबी रोपण एकत्र केले तर उत्तम परिणाम साध्य होतात, कारण ते स्थानिक उतींमध्ये सहज मिसळून जातात. पारंपरिक चरबीचे रोपण आणि नॅनो ग्राफ्ट एकत्र करून तयार केलेल्या या नवीन उपचार पद्धतीचा आम्ही पुरस्कार केला आहे. त्याच रुग्णाच्या शरीरातील मूलपेशींपासून (स्टेम सेल) या चरबीतल्या पेशी तयार करण्यात येतात आणि काळी वर्तुळे असलेल्या ठिकाणी त्यांचे रोपण करण्यात येते. स्टेम सेल (मूलपेशी) आणि इतर वाढीस कारणीभूत असणाऱ्या घटकांमुळे नवीन रक्तवाहिन्या तयार होतात त्यामुळे त्या भागाला गुलाबी झळाळी प्राप्त होते.


विना शस्त्रक्रिया : 

◼️रासायनिक साली

◼️फ्रॅक्टोरा – एक क्रांतीकारी उपचारपद्धती

◼️वाढीसाठी आणि कमतरता भरून काढण्यासाठी फिलर्सचा वापर


◼️ *डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी घरगुती उपाय...*

◼️डोळ्यांखाली काळी वर्तुळे कंप्यूटर, मोबाईलवर जास्त वेळ घालवणे, तणाव, झोपेची कमतरता अशा कारणांमुळे येतात. या काही घरगुती उपायांनी डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल. 

◼️डोळ्यांखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडीचे तुकडे करा आणि डोळ्यावर ठेवा. दिवसातून दोनदा असे करा म्हणजे असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी चिंचेचा कोळ बनवून डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर “हलक्या हातांनी” लावा. १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर दुधाच्या मदतीने ही पेस्ट काढा. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल.

◼️बराच काळ व्यवस्थित झोप न घेतल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे होतात. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेतली तरी ही डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी एक पूर्ण पिकलेल्या टोमॅटोच्या बिया काढून पेस्ट बनवा. एक चमचा पेस्टमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली असलेल्या गडद वर्तुळांवर लावा. दहा मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होण्यास मदत मिळेल. 

◼️डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी रात्री डोळ्याखाली थोडेसे बदाम तेल लावा आणि “हलक्या हातांनी” मालिश करा. सकाळी उठल्यानंतर आपले तोंड धुवा. असे केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतील.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे.

*

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

            मुंबई, दि.१७ : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला.


            राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय विभागासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनाकडून ज्येष्ठांसाठी एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ ज्येष्ठांनी घ्यावा. ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. हे कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी पोलीस विभागाने सर्व स्थानकांना सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


           

२०२८ लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबद्दल

  २०२८ लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबद्दल

अमेरिका प्रयत्नशील - राजदूत एरिक गारसेटी

अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. १७ : सन २०२८ साली लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी आज येथे दिली. सन २०३६ साली भारताने देखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे, असे त्यांनी सुचवले.  


            राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेले राजदूत एरिक गारसेटी यांनी बुधवारी (दि. १७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


            एरिक गारसेटी म्हणाले, आपण स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असून भारतात असेपर्यंत क्रिकेटमधील छोटेमोठे तज्ज्ञ होण्याचा आपला मानस आहे, असे सांगून आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी आपण गुजरात येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण दहा वर्षे लॉस एंजेल्सचे मेयर होतो, असे सांगून लॉस एंजेल्सच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते व्हावे यासाठी अभिनेते शाहरुख खान यांना कालच विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली.


            पुढील चार महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन व नवी दिल्ली येथे चार बैठकी होणार असून अंतरिक्ष विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सप्लाय चेन यांसह संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी राजदूत गारसेटी यांनी सांगितले.  


            आपण चौदा वर्षाचे असताना प्रथम भारतात आलो होतो. त्यानंतर राजदूत म्हणून भारतात येणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे सांगताना भारत आणि अमेरिकेपुढे समसमान संधी व आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले.


            अमेरिकेतील लोकांनी भारत समजून घ्यावा व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी देखील भारताला भेट द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गारसेटी यांनी सांगितले. 


            महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याचे सांगून शिक्षण कौशल्य प्रशिक्षण व हवामान अनुकूल कृषी या विषयात सहकार्य वाढविण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.


देशाच्या सर्व भागातून आंब्यांच्या पेट्या


            राजदूत म्हणून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसह देशाच्या सर्व भागातून आपणांस आंब्याच्या पेट्या मिळत असून आपले कुटुंब अद्याप भारतात आले नसल्याने इतक्या आंब्यांचे करायचे काय असा प्रश्न आपणास पडला आहे. आंब्यांचे दुकानच लावता येईल की काय याची चाचपणी करण्याची सूचना आपण दूतावासातील कर्मचाऱ्यांना केली असल्याची मिश्किल टिप्पणी राजदूत गारसेटी यांनी केली.


अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे - राज्यपाल रमेश बैस


            महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने आपण २६ विद्यापीठांचे कुलपती असून अलीकडेच राज्यातील काही विद्यापीठांचे अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कशी करार झाल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले.


            जगातील युवा देश असलेल्या भारताला अमेरिकेने कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धन करण्यासाठी तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे राज्यपालांनी सांगितले.


            अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात आपल्या शाखा सुरु कराव्या किंवा राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.


 


ऐतिहासिक संदर्भ


            राजदूतांनी कालच साबरमती आश्रमाला भेट दिल्याचे समजल्याचे सांगून महात्मा गांधी यांनी राजभवन उभे असलेल्या जागी सन १९१५ साली भेट दिली होती, असे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. सन १८९६ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी देखील तत्कालीन गव्हर्मेंट हाऊस येथे भेट दिल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. अमेरिकेतील नागरिकांनी आणि विशेषतः विल ड्युरांट सारख्या लेखकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत केल्याबद्दल राज्यपालांनी राजदूतांकडे कृतज्ञता व्यक्त केली. 


            बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, राजकीय व आर्थिक विषयक काऊंसल क्रिस्तोफर ब्राऊन व राजकीय सल्लागार प्रियांका विसरिया - नायक उपस्थित होते. 


०००


 


US Ambassador Eric Garcetti meets Maharashtra Governor


Keen to include cricket in 2028 LA Olympics


      The newly appointed Ambassador of the United States of America to India Eric Garcetti today said that the United States is keen to include the game of cricket in the Olympics being hosted by Los Angels in the year 2028. The Ambassador felt that Mumbai and Ahmedabad can consider hosting the 2036 Olympics.


      Garcetti was speaking to Maharashtra Governor Ramesh Bais during a courtesy call at Raj Bhavan Mumbai on Wed (17 May)


Mentioning that he is a keen follower of cricket, the Ambassador said he has requested film star Shahrukh Khan to lend his support the Los Angels cricket team.


      The Ambassador told the Governor that President Joe Biden and Prime Minister Narendra Modi are expected to have four meetings in as many months in Tokyo, Australia, Washington and New Delhi.


Referring to his meeting with Maharashtra Chief Minister Eknath Shinde, Ambassador Garcetti said he is keen to enhance cooperation with Maharashtra in the areas of Education, Skill Development, Agriculture and Climate Adoption technologies.


      Welcoming the Ambassador to Maharashtra, Governor Ramesh Bais expressed the hope that well known Universities in USA will open campuses in Maharashtra or tie up with State universities. He said India will appreciate US support it in the areas of skilling, upskillling and reskilling.


Consul General Mike Hankey, Consul for Political and Economic Affairs Christopher Brown and Priyanka Visaria-Nayak, Political Advisor to Consul General joined the Amb

assador Garcetti during his meeting with the Governor.


००००

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांनारस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये..

 ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांनारस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये..


संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश


भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडसपिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना

          मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


          आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री श्री. शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले. संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या श्री. शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली.


          यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांचे आयुष्य सुसह्य व्हावे यासाठी घेतलेले हे सकारात्मक पाऊल दिलासादायक ठरणा

र आहे.


००००


Wednesday, 17 May 2023

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठीराज्यस्तरीय समिती स्थापन करावी

 औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठीराज्यस्तरीय समिती स्थापन करावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि.१७ : राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्या.


            राज्यातील औषध विक्रेत्यांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि औषध विक्रेत्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, औषध विक्रेता हे समाजाचा महत्वाचा घटक आहेत, त्यांना व्यवसाय करतांना येणाऱ्या जाचक अटी दूर करायला हव्यात. राज्यात कुठे बोगस औषधांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाया कराव्यात. त्याचवेळी इतर औषध विक्रेत्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी मुख्यमंत्र्यांनी औषध विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.

' कारणाने जंक फूड खाण्याची सवय सोडणं कठीण होऊन बसतं, रिसर्चमधून खुलासा.....*

 *'या' कारणाने जंक फूड खाण्याची सवय सोडणं कठीण होऊन बसतं, रिसर्चमधून खुलासा.....*


जंक फूड खाणे ही आता सामान्य बाब झाली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जंक फूड आवडतात. इतकेच नाही तर अनेकांना याचे दुष्परिणाम माहीत असूनही ते हे पदार्थ नेहमी खातात. अनेकांना एकप्रकारे या पदार्थांची सवयची लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जंक फूड किंवा फास्टूफूड खाऊन आरोग्य धोक्यात येऊ शकतं हे माहीत असूनही अनेकजण हे पदार्थ खातात, पण त्यांना हे पदार्थ खाण्याची लालसा सोडता येत नाही. हे पदार्थं खाण्यापासून अनेकांना स्वत:ला रोखताही येत नाही. पण हे पदार्थ खाण्याची सवय का सोडता येत नाही, याचा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.  


*सामान्य नाहीये ही सवय...*

एका शोधानुसार, जंक फूड खाण्याची सवय ही तंबाखू किंवा नशा या सवयींसारखी असते. ही सवय केवळ तरुणाईमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही बघायला मिळते. इतकंच काय तर जंक फूड अनेकांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. सामान्यत: जंक फूड खाण्याचे दुष्परिणाम माहीत असूनही अनेकजण हे पदार्थ खाण्याची सवय सोडू शकत नाहीत. 


*का लागते ही सवय...?*

जंक फूडमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट, फॅट आणि शुगर असते. यातील जास्तीत जास्त तळून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये पिझ्झा, बर्गर, फ्रॅंकी, चॉकलेट, पेटीज इत्यादींचा समावेश होतो. पण याच पदार्थामुळे आरोग्याला वेगवेगळ्या समस्या होतात. सामान्यपणे जंक फूडमध्ये आढळणारी शुगर, फॅट आणि इतर गोष्टींमुळे आपल्याला या पदार्थांची सवय लागते. शुगर आणि फॅटचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीरात डोपामाइन नावाचं रसायन रिलीज होतं. या रसायनामुळे व्यक्तीला फार चांगलं जाणवतं. त्यामुळे अनेकदा चांगलं वाटावं असं आपल्याला वाटतं आणि असं करत करता या पदार्थांची आपल्याला सवय लागते. 


*का या पदार्थांची सवय सुटत नाही...?*

यूनिव्हर्सिटी ऑफ तस्मानियाने प्रकाशित केलेल्या ॲपेटिट मॅगझिनमध्ये याचं कारण सांगण्यात आलं आहे. जंक फूडची सवय का सोडवली जात नाही हे जाणून घेण्यासाठी ५० व्यक्तींच्या दैंनदिन जीवनावर १० दिवस निरीक्षण करण्यात आलं. यात त्यांचा मूड, खाण्याच्या सवयी, सोशल इंटरॅक्शन आणि त्यांची वागणूक यावर लक्ष ठेवण्यात आलं होतं.  


त्यानंतर या अभ्यासातून हे स्पष्ट झालं की, जंक फूडची सवय का सोडवली जात नाही. या अभ्यासात म्हटले आहे की, घरचं जेवण ही सर्वांची कमजोरी आहे. सर्वांनाच घरचं जेवण आवडतं. मात्र सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे घरी जेवण तयार करण्यासाठी अनेकांकडे वेळच नाहीये. इथेच जंक फूड आपलं काम करुन जातं. मेट्रो स्टेशनपासून ते ऑफिस, एअरपोर्ट, मॉल्स, रस्त्यांवर सगळीकडेच जंक फूड सहज उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकजण हे पदार्थ खाण्याची सवय सोडू शकत नाही. अशात या पदार्थांपासून सुटका मिळवण्यासाठी हे पदार्थ तुम्ही जिथे जास्त वेळ घालवता त्या ठिकाणापासून दूर ठेवा. उदाहरणार्थ तुमचं ऑफिस. 


*काय करु शकता...?* 

हे पदार्थ खाण्याची सवय लागण्याचं आणखी एक कारण म्हणजे आपलं मूड. तुम्ही नाराज, निराश, दु:खी असाल तर जास्त जंक फूड खाता. त्यामुळे तुमच्या भावनांवर कंट्रोल मिळवला तर या पदार्थांच्या सेवनावरही कंट्रोल मिळवता येऊ शकतो. या पदार्थांची सवय सोडवण्यासाठी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, तुम्ही जंक फूड का आणि कधी खाता? तसेच या पदार्थांकडे तुम्ही कधी आकर्षित होता हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर आणि मनावर नियंत्रण ठेवल्यावरच तुम्ही जंक फूडच्या सवयीपासून सुटका मिळवू शकता.


संकलन-

डॉ. प्रमोद ढेरे,



Featured post

Lakshvedhi