Tuesday, 16 May 2023

तळपायांची, हाताची सतत आग होणे.....*

 *तळपायांची, हाताची सतत आग होणे.....*


*कारणे...*

१) नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास.


२) मधुमेहाची शक्यता असल्यास.


३) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी.


४) उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.


५) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास.


६) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास


७) रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.


८) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.


९) फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.


१०) बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही.


११) मद्यपानाचे व्यसन.


१२) किडनी संबंधित आजार.


१३) एखाद्या किटकाचा दंश.


*उपाययोजना...*


१) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.


२) नस्य (नाकात दोन दोन थेंब सोडणे) .


३) एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.


४) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.


५) तुपाची तळपायांना मालिश व भीमसेन कापुर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.


६) पायाला कोकम तेल लावायच ! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण खुप घट्ट असतं हे तेल, हे तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध.


७) कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव किलो, आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.


८) शतधौत घ्रुत पायाला लावत जा.


९) धनेजीरे पाणी पीत जा.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-*

 *हृदयरोग व मधुमेहींसाठी एक वरदान : टोमॅटो-* 


टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे.


टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाट्या खालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.


*औषधी गुणधर्म :-* 


कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस 'अ', 'क' जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.


*उपयोग :-* 


◼️ आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.


◼️ टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कार्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.


◼️ अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.


◼️ रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.


◼️ टोमॅटोच्या १ कप रसामध्ये १००० इ.यु. 'अ' जीवनसत्त्व असते. तसेच 'क' जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.


◼️ टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.


◼️ पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.

टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.


*सावधानता :-* 

टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.


*संकलन-*


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



घशात दुखणे (Sore throat).....*

 *घशात दुखणे (Sore throat).....*


वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.


*घसादुखी होण्याची कारणे...*


अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने घसादुखी होत असते...


*सर्दी, खोकला झाल्यामुळे घसादुखी होऊ शकते.

*टॉन्सिल्सला सूज आल्याने,

*स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे,

*गालफुगी आजारामुळे,

*एलर्जीमुळे,

*वायुप्रदूषण, 

*सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,

*तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशात दुखते.


*घसा दुखीवर हे करा घरगुती उपाय...*


*मीठाच्या पाण्याच्या गुळण्या...*

घशामध्ये दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज व वेदना कमी होतात. तसेच कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय घसादुखीवर खूप उपयुक्त ठरतो.


*आले व मध...*

घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.


*लवंग आणि मध...*

काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो.


*लिंबू आणि मध...*

ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.


*गरम दूध प्यावे...*

घशात सूज आल्यास घसा दुखत असल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.


*घसादुखी असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे...?*

*घसादुखी ही प्रामुख्याने सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनमुळे होत असते. त्यावर घरगुती उपाय करून घसादुखी दूर होण्यास मदत होते. मात्र घरगुती उपाय करुनही आठवडाभर घसादुखी कमी न झाल्यास आपल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.


*याशिवाय घसादुखी बरोबरच खालील लक्षणे दिसून येत असल्यास जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते. यामध्ये...*

*घसादुखी बरोबर अन्न गिळताना त्रास होत आल्यास,

*श्वास घेण्यास त्रास होत असल्यास,

*तोंड उघडण्यास त्रास होत असल्यास,

*थुंकी व कफातून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाचे निदान व योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे. 


*डॉ. सतीश उपळकर,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

ST canteen rate

 


ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख! 👇

 🌷अवश्य वाचा🌷


ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीमती माधुरी बापट यांचा विचार करायला लावणारा लेख!

👇

*सुवर्ण मध्य !*

👇


अलिकडेच लिहिलेल्या माझ्या एका 'पोस्ट'ला ब-यापैकी प्रतिसाद मिळाल्याने ही 'पोस्ट' लिहायचं ठरवलं. काही वर्षापूर्वी माझ्या बहिणीच्या दहा वर्षाच्या नातवाने मला त्याच्या सायन्सच्या घरच्या अभ्यासात मदत मागितली. आता तो बारावीला आहे. 

..

विषय होता आधुनिक संशोधनाचे माणसावर होणारे वाईट परिणाम. माझ्या शिकवण्याचाच हा एक भाग असल्याने मी उत्साहाने त्याला मदत केली. विमाने, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन्स, वाय फाय, मेडिकल एक्स रेज, रेफ्रिजरेटर, प्रेशर कुकर, इलेक्ट्रिक कॅन ओपनर, कॅन फूड , कंप्यूटर मौस, वगैरे वगैरे. यातील प्रत्येकाचाच होणारा वाईट परिणाम ऐकून त्याची आई, माझी भाचे सून म्हणाली, ‘म्हणजे कुठल्याच गोष्टी सुरक्षित नाहीत का?’ माझे उत्तर होते, ‘कुठल्याही गोष्टीत चांगले वाईट असणारच. त्याचा उपयोग आपण मर्यादित ठेवला तर त्यापासून इजा व्हायची शक्यता कमी. त्याच्या आहारी गेलं तर धोका संभवतो.’

..

माझे वडील म्हणायचे माणसानं थोडं शहाणं नि थोडं खुळं असावं. प्लास्टिकचा त्यांना तिटकारा होता. प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी विशेषत: लूक वॅार्म, पिण्यानं त्यातील ॲस्ट्रोजेन सदृश मॅालिक्यूल रक्तात जातो. जो पुरुषांच्यात बायकीपणा व बायकांच्यात कॅन्सर निर्माण करू शकतो.

..

विमाने तीस चाळीस हजार फुटांवरून उडत असतांना नेहमीपेक्षा दहा वीस पटीने सूर्याकडून वा इतरत्र आलेली वाईट रेडिएशन्स ( गॅमा, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट वगैरे) आपल्या शरीरात शिरतात. मी स्वत: एका फ्लाईटमध्ये गायगर कौंटर नेला होता व ३५,०००फुटावर असतांना नेहमीपेक्षा वीसपट रेडिएशन कौंट्स बघितले होते. ज्याने कॅन्सर होऊ शकतो. बहुतेक सर्व पायलट्स, एअर होस्टेसेस कॅन्सरने दगावतात. 

..

न्यूक्लिअर फिजिक्सचा कोर्स शिकवतांना मी विद्यार्थ्याना एक सर्व्हे भरायला देत असे. तुमच्या लाईफ स्टाईलवर आधारीत वर्षात किती रेडिएशन तुमच्या शरीरात जाते, हे अजमावण्यासाठी. यात तुम्ही कुठे रहाता म्हणजे समुद्रसपाटीपासून किती उंचीवर, सिगरेट ओढता का, विमानाने किती तास प्रवास करता, किती एक्स रे काढून घेता यासारख्या गोष्टीवरून ठरवता येते.माझी एक विद्यार्थिनी तीस वर्षापूर्वी कोसोव्हच्या युद्धात दर दोन आठवड्याने मिलिटरी विमानाने सैनिकांना औषधे वगैरे पोहोचवण्यासाठी जात असे. तिने तो सर्व्हे भरला नाही. म्हणाली, ‘मी कॅन्सरने मरणार हे मला माहीत आहे. पण आपल्या सैनिकांसाठी मी ते खुशाल सहन करीन.’

..

भारतात विमानाचा प्रवास तेवढा पॅाप्युलर नाही. पण अमेरिकेत काही लोक सतत विमानाने प्रवास करतात. दर तासाला १० मिलीरिम एवढे रेडिएशन शरीरात जाते. वर्षात ३६० मिलीरिमची मर्यादा घातलेली आहे. त्यातले अर्धे तर नैसर्गिक रीत्याच शरीरात घुसते. अगदी उन्हात रोज तासाभरापेक्षा जास्त वेळ घालवू नये. दर वर्षी अमेरिकेतूम भारताच्या एक दोन वार्या करणारी मंडळी आहेत. प्रत्येक वारीत ४०० मिलीरिम रेडिएशन शरीरात जाते. मी स्वत: सरासरी तीन वर्षात भारताची एक वारी करते.

..

मायक्रोवेव्ज ह्रदयाला वाईट असतात. एम. एस. साठी मी लाईव्ह मायक्रोवेव्ज वापरून माझा प्रॅाजेक्ट केला होता. तेव्हा माझ्या ॲडव्हयझरने मला सांगितले होते, ‘Don’t get pregnant while working on your project.’ शिवाय त्यात पदार्थ चांगले शिजत नाहीत. त्यामुळे त्यातील बॅक्टेरिया वगैरे मरत नाहीत. कारण पाण्याचा मॅालीक्यूल २.५ गीगॅ हर्ट्झ फ्रीक्वेन्सीने कंप पावून ते गरम होते. त्या वेव्ज ह्रदयाला हानिकारक असतात. म्हणून मायक्रोवेव्ह ओव्हनचा उपयोग कमीत कमी करावा.

..

कॅन फूड टाळावे. त्यातील प्रिझर्व्हेटिव्ज वाईट असतात व अलुमिनम रक्तातून मेंदूत जाऊन अल्झायमर होऊ शकतो. इलेक्ट्रिक कॅन ओपनर तर सर्वात वाईट. मायक्रोवेव्हपेक्षाही जास्त रेडिएशन्स त्याने शरीरात घुसतात.

..

मोबईल फोन्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालतात. ती जरी तेवढी घातक नसली तरी वर्षानुवर्षे वापरल्याने कॅन्सर होऊ शकतो. तीस वर्षापूर्वी ते टेस्ट करणार्या मोटरोलातील एका शास्त्रज्ञाला कानाजवळ कॅन्सर झाला. भारतात मोबाईल व मायक्रोवेव्ह ओव्हन वापरायचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, असं माझ्या लक्षात आलं.

..

केवळ इन्शुरन्स पैसे भरतो म्हणून सतत मेडिकल एक्स रेज काढून घेऊ नयेत. त्यानेही कॅन्सर उद्भवू शकतो. केवळ डॅाक्टर म्हणतात म्हणून दिलेल्या औषधाचा पूर्ण डोस घेण्या आधी वा एखादी सर्जरी करण्याआधी दुसर्या डॅाक्टर वा सर्जनचे मत अजमावावे. विशेषत: जनरल अनॅस्थेशिया द्यावा लागणार असेल तर. ॲंजियोप्लास्टीचे पण प्रमाण फार वाढले आहे. बहुतेकवेळा प्रॅापर डाएट, व्यायाम, वगैरेनी ती टाळता येते.

..

सतत फ्रिजमधील पाणी वा अन्न खाल्याने तसच प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने वजन वाढते. १९८४ सालापासून मी कंप्यूटरवर टाईप करत आहे. त्याने माझ्या दोन्ही मनगटातील नर्व्हज दाबल्या जाऊन दोन्ही हाताच्या बोटात नम्बनेस आलेला आहे. तो ॲार्थोपेडिक सर्जनकडून शस्त्रक्रिया करून बरे होईल असं डॅाक्टरचं म्हणणं आहे. टी. व्ही. व कंम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघून डोळ्यांची वाट लागते हे सर्वश्रुतच आहे.

..

अर्थात कामासाठी नोकरीसाठी लोकांना काही गोष्टी कराव्याच लागतात. ते वेगळे. ही सगळी माहिती तुम्हाला घाबरवून टाकण्यासाठी दिलेली नाही तर तुमच्यात एक प्रकारची जाणीव, जागृती यावी म्हणून दिलेली आहे. जुनं ते सोनं म्हणून त्याला कवटाळून रहाणं जेवढं वाईट तेवढंच केवळ आधुनिक म्हणून त्याच्या फशी पडणंही बरोबर नाही. अति तेथे माती म्हटल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एका टोकाला जाऊन करू नये. आपणा सर्वांना सुवर्ण मध्य शोधता यावा हीच सदिच्छा!

..

पंचवीस वर्षांपूर्वी एकदा माझे बी. पी. वगैरे एकदम पर्फेक्ट आलेले बघून माझ्या अमेरिकन डॅाक्टरने मला विचारले. ‘यावेळी तू वेगळं काय केलस?’ तेव्हा त्याला सांगितलं होतं, ‘काल आमचा उपास होता. (आषाढी एकादशीचा) मी फोनला हात लावला नाही, टी. व्ही. बघितला नाही की कारमध्ये बसले नाही. फक्त भक्तीगीते ऐकली, ध्यान धारणा केली.’ त्यावर तो म्हणाला होता, ‘असं दर रवीवारी करत जा. तुला औषधाची कधी गरजच पडणार नाही.


*- माधुरी बापट*

===


[संक्षिप्त परिचय: श्रीमती माधुरी बापट यांनी पुणे विद्यापीठातून न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम. एस्सी. केल्यानंतर ओहायो येथील राईट स्टेट युनिव्हर्सिटीतून प्लाझ्मा फिजिक्समध्ये

एम. एस. डिग्री.

..

त्यानंतर अमेरिकेत सलग ३५ वर्षे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका, ७ वर्षे गणिताच्या व ३ वर्षे खगोलशास्त्राच्या ही प्राध्यापिका. काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त व त्यानंतर सातत्याने लेखन व संशोधन.]

Job job job

 B. Sc. (फिजिक्स, मॅथेमॅटिक्स) कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर (कमीत कमी ६०% टक्के मार्क) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी. भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीसाठी जाहिरात, एकूण ९९० पदे, मराठी मुलांच्या निदर्शनास ही जाहिरात आणावी. फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण ३ वर्षांनंतर आपले चॉईस स्टेशन मिळते.

           दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जुन देतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते.

त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा. 


*नम्र विनंती आहे की, अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे.*


https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

 मराठी मुलापर्यंत पोहोचवा.

🙏

Monday, 15 May 2023

*🦅 गरुड 🦅 आदर्श राहा

 *🦅 गरुड 🦅*:- 


*गरुड पक्षी ज्याला आपण गरुड किंवा शाहीनसुद्धा म्हणतो.* 


*ज्या वयात इतर पक्ष्यांची पिल्ल आवाज करायला शिकतात त्या वयात मादी गरुड तिची पिल्ल पंजामध्ये पकडते आणि उंच उडते.* 

*इतर कुणालाही पक्ष्यांच्या जगात असे कठोर आणि घट्ट प्रशिक्षण नसते.*


*मादी गरुड तिच्या पिल्लाला सुमारे 12 कि.मी. वरपर्यंत नेते.* 

*जेवढ्या वर विमान उडत असते एवढ्या वर जाण्यास मादी गरुड ७/८ मिनट घेते.* 

*येथून त्या चिमुरड्या पिल्लाची कठोर परीक्षा सुरू होते.* 


*त्याला येथे सांगितले जाते आपण कशासाठी जन्माला आलो आहोत?* 

*आपले जग काय आहे?* *आपली उंची किती आहे?* 


*आणि नंतर मादी गरुड आपल्या पंजातून त्या पिल्लाला खाली सोडते.*

*वरुन खाली पडत असताना 2 कि.मी. अंतरानंतर खाली येताना, त्या पिल्लाला कळतच नाही की त्याच्या बरोबर काय घडतं आहे.*


*अंदाजे 7 किमी च्या अंतरानंतर पिल्लाचे पंख हळू हळु उघडण्यास सुरुवात होते.* 

*सुमारे 9 किमी अंतरावर त्यांचे पंख आगमनानंतर पूर्णपणे उघडले जातात.* 

*जीवनाचा हा पहिला टप्पा असतो जेव्हा पिल्लू आपले पंख फडफडू लागतो.* 


*आता ते पिल्लू जमिनीपासून फक्त सुमारे 3000 मीटर अंतरावर आहे, परंतु अद्याप त्याने पूर्णपणे उड्डाण करणे शिकलेले नाही.* 

*आता तो पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आहे.* 

*आता त्याचे अंतर पृथ्वीपासून फक्त 700/800 मीटर अंतरावर आहे.* 

*परंतु त्याचे पंख अद्याप इतके मजबूत झाले नाहीत की, तो उडू शकेल.* 


*पृथ्वीपासून सुमारे /०० मीटर अंतरावर, त्याला आता असे वाटले आहे की, कदाचित हा त्याच्या जीवनाचा शेवटचा प्रवास आहे.* 

*मग अचानक एक पंजा त्याला पकडतो*

*हा पंजा त्याच्या आईचा आहे, जी त्याच्या उजवीकडे उडत असते.* 


*आणि उडण शिकल्याशिवाय त्याचे प्रशिक्षण सतत चालू राहते.*


*हे प्रशिक्षण कमांडोसारखे आहे, तेव्हा जाऊन जगाला 'गरुड'(बाज) मिळतो.* *आणि तो गरुड नंतर आपल्यापेक्षा दहापट जास्त वजन असलेल्या प्राण्याचीसुद्धा शिकार करतो.*


हिंदीमध्ये एक म्हण आहे ... "बाज के बच्चे मुंडेरो पर नहीं उड़ते ..."


नक्कीच, *आपल्या मुलांना आपल्याशी जवळीक ठेवा, जगाच्या समस्या त्यांच्या समस्यांसमोर आणा त्यांना लढायला शिकवा.* 

*त्यांना गरज नसतानाही संघर्ष करण्यास शिकवा.*


*आजच्या वर्तमान सुविधा आणि आई-वडिलांनी केलेल्या लाडकाची सवय यामुळे आपल्या मुलांना "ब्रॉयलर कोंबडी" सारखे बनविले आहे.* 

*ज्यांचे पाय मजबूत आहेत परंतु चालु शकत नाही. पंख वजनदार आहेत पण उडू शकत नाही.*


*कुंडीत असणार रोपट आणि जमिनीवरील रोपट ह्यात खूप फरक असतो.*


*पालकांनो, आपल्या मुलांना नरम नाही कठोर बनवा.*


*शस्त्रे आणि धर्मशास्त्र दोन्ही शिक्षा द्या, हेच आपले प्रथम कर्तव्य आहे.*


*एअर कंडीशनर मध्ये बसायला तेव्हाच द्या जेव्हा तो उष्णतेमध्ये राहू शकेल.* 


*वाहनाची चावी तेव्हाच द्या जेव्हा तो कित्येक किलोमीटर चालताना कंटाळणार नाही.

Featured post

Lakshvedhi