Monday, 15 May 2023

निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!*

 *निलगिरी तेलाचे आश्चर्यचकीत फायदे !!* 


अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे निलगिरी तेल.


निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.


याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.


हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.


प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.


ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगिरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शांत व गाढ झोप लागते.


पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही. पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.


जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.


डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद 🙏🏻*



यामुळे प्या रोज हळदीचे पाणी*

 *यामुळे प्या रोज हळदीचे पाणी*


अनेक जणांना सकाळी पाणी पिण्याची सवय असते. कारण यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र तुम्ही जर फक्त पाणी पीत असाल तर थांबा. कारण कोमट पाण्यात हळद मिसळून पिलात तर पोट साफ होण्याबरोबरच अनेक फायदे होतात. म्हणून पाण्यात हळद टाकून पिल्यास अजून काय फायदे होतात त्यावर एक नजर...


🎯 _*कसे तयार करावे हळदीचे पाणी*_


हळदीचे पाणी पिण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. यामध्ये अर्धा लहान चमचा हळद पावडर, अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिसळा.


*हळदीचे पाणी पिण्याचे फायदे*_

👉 अनेक रिसर्चनुसार हळद पाणी रोज खाल्याने पचनसंस्था सुधारते.

👉 हळदीत अँटीऑक्साइड कॅन्सरच्या कोशिकांपासून सरंक्षण करण्यास मदत करतात.

👉 हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त न गोठता साफ होण्यास मदत होते.

👉 हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.

👉 हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन शरीरातील सूज कमी करण्यासाठी औषध म्हणून काम करते.

👉 तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून पिल्यास तुमची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.

👉 हळदीत करक्युमिन गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात मदत करते.

👉 दररोज हळदीचे सेवन केल्याने ग्लुकोजची लेव्हल कमी राहते. तसेच टाइप 2 च्या डायबिटीजचा


 धोकाही टळतो.

👉 शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून पिल्यास यामुळे शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकल..



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



पर्यावरण संरक्षणासाठी अभिनव उपक्रम


 

 मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार


                                                                                    - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद आणि सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -2023



            मुंबई दि. 14 : - मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता वाटल्यास प्रचलित नियमांत बदल करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


            गोरेगांव येथील नेस्को मैदानावर आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेत ते बोलत होते . यावेळी सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सहकारी संस्था पुरस्कार -2023 यांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर , मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे (म्हाडाचे) मुख्याधिकारी मिलींद बोरिकर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे.या विषयावर या परिषदेत चर्चा करण्यात आली. काही कायदे आणि नियम यांचा फेर आढावा घेणे आवश्यक आहे. त्यात बदल होणे गरजेचे आहे. शासन स्तरावरून या सूचनांची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्याच बरोबर गृहनिर्माण संस्थांनी “सेल्फ रिडेव्हलपमेंट” हे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. यात स्वयं पुनर्विकासाचा सर्व सामान्यांना लाभ होणार आहे. यासाठी ‘स्वयं पुनर्विकास महामंडळ ‘ स्थापन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल असेही श्री शिंदे म्हणाले.


            गृहनिर्माण संस्थेला दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, बाॅम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळीचा प्रश्न, ज्या इमारतींना ओ सी प्रमाणपत्र मिळाले नाही अशा इमारतींचा पुनर्विकास, यासारख्या अनेक मागण्यांवर शासन तोडगा काढेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुरस्कार मिळालेल्या गृहनिर्माण संस्थाचे अभिनंदन केले तसेच वर्षा बंगल्यावर चहापानाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिले.


            दि. डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटीव्ह फेडरेशन हे भारतातील सर्वात मोठे फेडरेशन असून 24 हजार गृहनिर्माण संस्था यांचे सदस्य आहेत. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सातत्य राखत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या शिखर संस्थेचे तसेच मुंबै बॅंकेचे कौतुक केले


            यावेळी बोलतांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, गृहनिर्माण संस्थाच्या जागेसंबधी महसूल विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या विविध मागण्या या परिषदेत करण्यात आल्या. या मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.


            विदर्भात नझुलच्या जमिनीसंदर्भात लागू केलेला निर्णय इतर ठिकाणी लागू करता येईल, जमिनीवर भरावयाच्या करासंदर्भातही काही महत्वपुर्ण निर्णय घेतला जाणार आहे. यानुसार वारंवार कर भरण्याची आवश्यकता राहणार नाही असा प्रस्ताव मांडत आहोत. सर्व परवानग्या आणि मंजुऱ्यांसाठी एक खिडकी योजना आणली आहे. मुंबईत सहकार भवन साठी जागा द्यावी ही मागणी या परिषदेत करण्यात आली , त्यासाठी गोरेगाव येथे जागा देण्याचे आश्वासन श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले. परिषदेच्या भव्य आणि यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


 


गृहनिर्माण संस्थांना पुरस्कार


            स्वच्छता, पर्यावरण रक्षण, सौदर्यीकरण आणि आरोग्यविषयक जन जागृती या निकषांवर आधारित हजारो संस्थांच्या प्रवेशिकांमधून निवडक काही संस्थांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. एक लाख रूपयाचा धनादेश, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप होते. निवडक पाच संस्थांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर इतर संस्थांना संचालक मंडळाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले . यात छेडा हाईट्स, रहेजा विस्टा, स्प्लेंडर कॉम्प्लेक्स, विशाल सह्याद्री आणि संजोग को. ऑप. सं

स्थांचा समावेश होता.


0000


मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

 मुंबईतील सागरी महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

                                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव दिमाखात साजरा


 


          मुंबई, दि. 14 : मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही घोषणा केली.


      या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, राजमाता जिजाऊ यांचे वंशज विजयराव जाधव, संयोजक व्यासपीठावर उपस्थित होते.


गड, किल्ल्यांच्या जतन,संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध


मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, बलिदान नव्या पिढीला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. राज्यातील गड, किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थळ वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही जागांचा विकास आराखडा राबविण्यात येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. मुंबईतील कोस्टल हायवे परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारला जाईल. मराठा समाज बांधवांना सर्व सोयीसुविधा देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करणार


         छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मुंबईतल्या गेटवे ॲाफ इंडिया येथे पहिल्यांदाच साजरी होतेय याचा आनंद आहे. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायक असून शिवशंभुरायांचे कार्य, योगदान जतन करणे ही आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव देशभरात पोहचवला जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य करण्याची तयारी देखील राज्य शासन करित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. 


         यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार

 राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार


                                                - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा


महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास अजरामर - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह


            औरंगाबाद दि 14 (जिमाका)- सर्वसामान्य, शेतकरी-कष्टकऱ्यांचे हे सरकार असून त्यांच्या कल्याणाचे विविध निर्णय घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम हे सरकार करीत आहे. राजपूत समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, राजपूत समाजाच्या पुढील ‘भामटा’ हा शब्द काढण्यात येईल आणि केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, महाराणा प्रतापसिंह हे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी प्राण पणाला लावून राष्ट्राप्रती असणारा स्वाभिमान जपला. जनतेचा राजा म्हणून ओळख असलेल्या महाराणा प्रताप सिंहांचा इतिहास अजरामर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.


            औरंगाबाद शहरात सकल राजपूत समाजाच्या वतीने आज ‘वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार जयकुमार रावल आदी मान्यवर उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराणा प्रतापसिंह आणि शिवाजी महाराज हे साहसी होते. महाराणा प्रतापसिंह यांनी सवंगड्यांना देखील युद्धाचे धडे दिले. सर्वसामान्य जनतेला आपलंसं केलं. महाराणा प्रतापसिंह यांनी अकबराच्या सैन्याला जेरीस आणले. हे दोन्ही धर्मवीर राजे आपल्या भूमीत होऊन गेले. यांचा आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत, असे सांगून राजपूत समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढून टाकण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केल्याची घोषणा करून आता यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करण्यात येणार असून महाराणा प्रताप यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


लढवय्ये महाराणा प्रतापसिंह स्वाभिमानाचे प्रतिक- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह


राष्ट्रीय स्वाभिमानाची भावना महाराणा प्रतापसिंह यांच्यात होती. त्यांनी आपले जीवन जंगलात व्यतित केले. असे हे लढवय्ये महाराणा प्रताप सिंह स्वाभिमानाचे प्रतिक आहेत. पाचशे वर्षांपूर्वी महाराणा प्रताप जेवढे महत्त्वाचे होते आजही तेवढेच महत्त्वाचे आहेत, आणखी हजारो वर्षांनंतरही ते महत्वाचे असतीलच. महाराणा प्रताप यांच्या कार्यकाळाला मुघल काळ न म्हणता महाराणा प्रताप काळ म्हणून ओळखले जावे, अशी अपेक्षाही केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केली.


 


राजपूत समाजाला योजनेपासून वंचित ठेवणार नाही -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            राजपूत समाजाचे या देशाच्या इतिहासात मोठे योगदान आहे. प्राण गेले तरी चालेल पण देशसेवा महत्वाची मानणारा हा समाज आहे. अशा या समाजाला आता कोणत्याही योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या 15 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मेडिटेशन आणि विचार.....*

 *मेडिटेशन आणि विचार.....* 


आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं. 


मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया.


मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण रगडीता....


 *सकाळची वेळ निवडा...* 

वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.


 *ध्यानधारनेच्या वेळी संगीत लावू नका...* 

मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संगीत ऐकत ध्यानधारणा केली असता, मन गाणे ऐकण्यात रमेल आणि गाण्याशी संबंधित विचार मनात डोकावू लागतील. अशा वेळी कोणतेही संगीत न ऐकता आपल्याला श्वासाचे संगीत ऐकायचे आहे, हे लक्षात ठेवा.


*डॉ. अमित भोरकर,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi