Sunday, 14 May 2023

ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत

 ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठीत


२० मेपर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन


 


            मुंबई, दि.13: केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.


            नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार आहे. तरी याबाबत नागरिकांनी dycommr.enf1@gmail.com या ई-मेलवर दिनांक २० मे २०२३ पर्यंत अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन राज्याच्या परिवहन आयुक्त यांनी केले आहे.


            याविषयी अधिक माहितीसाठी कैलास कोठावदे, सहाय्यक परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. (मो. ९५५२८८३९३०/ ई-मेल- dycommr.enf1@gmail.com) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्याची लिंक https://morth.nic.in/sites/default/files/notificationsdocument/Motor%20Vehicle%20Aggregators 27112020150046.pdf   


000

उद्दिष्ठपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा

 उद्दिष्ठपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा


विदर्भाच्या आर्थिक समावेशन बैठकीत मंत्र्यांचे आवाहन


गडकरी, फडणवीस, डॉ. कराड यांच्याकडून विदर्भस्तरीय आढावा


 


            नागपूर दि. १३ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल व्हावा यासाठी डिजीटल क्रांतीचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांनी आखलेल्या महत्वाकांक्षी योजना लोकाभिमुख करण्याकडे लक्ष वेधावे. बँकेच्या उद्दिष्ठपूर्तीपेक्षा योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बँकांना केले.


                  केंद्रीय अर्थमंत्रालय, राज्यस्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँक नागपूर यांच्यावतीने हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे "विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे आर्थिक समावेशन आढावा बैठक” आयोजित करण्यात आली. या बैठकीत तीनही मंत्र्यांनी बँकांनी सार्वजनिक हिताच्या योजनांसाठी काम करतांना केवळ उद्दिष्टपूर्ती डोक्यात न ठेवता संवेदनशीलतेने कार्य करण्याच्या सूचना केल्या. 


                 केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वश्री खासदार रामदास तडस, अशोक नेते, सुनील मेंढे, डॉ. अनिल बोंडे, आमदार मोहन मते यावेळी उपस्थित होते.


            प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय),प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना(पीएमजेजेबीवाय),अटल पेन्शन योजना(एपीवाय), प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडिवाय), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान क्रेडिट कार्ड - पशुसंवर्धन, किसान क्रेडिट कार्ड -मत्स्यपालन आदी महत्वाकांक्षी योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.विविध शासकीय योजनांमध्ये बँकांचा सहभाग आणि जनतेचा बँकिंग क्षेत्राशी संबंध, सहभाग, लाभ व त्या माध्यमातून आर्थिक सबळीकरणाबाबत आढावा घेण्याचा या बैठकीचा उद्देश होता.


            मत्स्यपालन व पशुसंवर्धन विभागाशी संबंधित योजनांना अधिकाधिक कर्जपुरवठा होईल, याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. पूर्व विदर्भात मालगुजारी तलावाच्या रूपाने मत्स्यपालन व्यवसायाला पूरक पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. प्रधानमंत्री किसान क्रेडिट-मत्स्यपालन योजनेअंतर्गत या भागातील मत्स्योत्पादकांना जास्तीत-जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत शिशुगटात उत्तम कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हेरून त्यांना वाढीव कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. तरुण गटासाठी असलेल्या या योजनेतील तरतुदीमध्ये जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगारांना समाविष्ट करावे. बँकांनी नेमून दिलेल्या किमान उद्दिष्टांपेक्षा अधिकाधिक रोजगार निर्मिती होण्यासाठी अधिक प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी मंत्र्यांनी केल्या.


            सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या या योजना आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना परफॉर्मन्स ऑडिट करणे गरजेचे असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीतील कामगिरीचा अहवाल बँकांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.


            आर्थिक समावेशनासाठी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या कामगिरीविषयी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भातील जिल्हानिहाय माहिती जाणून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी या योजना आखल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी ही योजना लोकप्रिय व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व बँकर्सनी गांभीर्याने उद्दिष्ठपूर्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजना ही महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या लाभार्थींसोबत बँकेचा समन्वय असावा. त्यासाठी संपर्क वाढवावा अशा सूचना त्यांनी केल्या. डिजीटल ट्रांजेक्शन संदर्भात बँक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात वाढ करा, असे निर्देश त्यांनी दिले. पीएम स्वनिधी योजनेबाबत विदर्भात चांगले कार्य झाले आहे, याबाबत श्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.


            तत्पूर्वी, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष ए.बी.विजयकुमार यांनी प्रास्ताविक केले.समितीचे सदस्य सचिव राजेश देशमुख यांनी योजनांच्या आढाव्या संद

र्भात सादरीकरण केले.


जवस " - तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.....*

 *" जवस " - तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.....* 


सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत आणि यामुळे लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याशी संबंधित चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो तसेच शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते.


त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. तथापि आपल्या आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देऊन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण रोखले जाऊ शकते. तुम्ही ताबडतोब तुमची जीवनशैली बदलली पाहिजे. यासाठी आज आपण जवस तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकते, हे जाणून घेणार आहोत.


*जवसाचा शरीरावर होतोय चांगला प्रभाव* 


पेरिफेरल आर्टरी डिसीज असलेल्या लोकांमध्ये ग्राउंड फ्लेक्ससीड्स खराब कोलेस्टेरॉल कमी करतात आणि कोलेस्ट्रॉल-कमी करणार्‍या औषधांसोबत एकत्रित केल्यावर शरीरातील कोलेस्टेरॉलवर परिणाम न होता अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. इतकंच नाही तर तुमचा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी जवसाच्या बिया खूप चांगल्या आहेत यात शंका नाही. जवसामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे अनेक आजार दूर होतात. या कारणास्तव फ्लॅक्ससीड हे पृथ्वीवर आढळणारे सर्वात पौष्टिक अन्न आहे असे म्हटले जाते.


*जवस ‘असे’ लढते कोलेस्टेरॉलशी* 


प्राचीन काळापासून लोक आपल्या आहारात जवसाचा वापर करत आहेत. जवस सोबत त्याचे तेल देखील वापरले जाते. ग्रीक, रोमन, इजिप्शियन, चिनी आणि भारतीय संस्कृतींमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फ्लेक्ससीडमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड, विरघळणारे फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. हे सर्व पोषक खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.


*कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध* 

फ्लेक्ससीड्स अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (एएलए) मध्ये समृद्ध असतात, ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. यासोबतच ते इकोसापेंटायनोइक ॲसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्साएनोइक ॲसिड (डीएचए) मध्ये समृद्ध आहे. हे तिन्ही ॲसिड खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच कोलेस्टेरॉलच्या आजारावर जवस हे जादुई औषध आहे.


*जवस रोज किती खावे ?* 


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात एक चमचा जवसाचा वापर केला पाहिजे. पण फ्लॅक्ससीड कधीही कच्चे खाऊ नका, नेहमी आधी भाजून घ्या आणि नंतर खा. त्याचे फायदे मिळविण्यासाठी, ते योग्य स्वरूपात खाणे आवश्यक आहे. तुम्ही ते आणखी अनेक ड्रायफ्रूट्स आणि संपूर्ण बियांसोबत भाजून खाऊ शकता.


जवसाच्या बिया भाजून, बारीक करून, स्मूदी, हलवा, लापशी, लाडू आणि दह्यामध्ये मिसळूनही खाता येतात. सर्वसाधारणपणे, प्रत्येकाने जवसाच्या तेलाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकत नाही कारण त्यात आवश्यकतेपेक्षा जास्त ऍसिड असतात, जे चुकीच्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जवसाचे सेवन करावे. तुम्ही जर कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट घेत असाल, तर फ्लॅक्ससीड घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



शासन आपुल्या दारी





 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'शासन आपल्या दारी' अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ


'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार


-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


           


            सातारा दि.१३ : शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या 'शासन आपल्या दारी' अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेकजण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. या योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासठी 'शासन आपल्या दारी' अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे.


            'लेक लाडकी' सारखी योजना प्रथमच सुरू करण्यात आली असून. महिलांना एसटी बस प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे. या योजना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या असल्याने त्यांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचल्यास जनतेच्या समस्या कळू शकतात. ही योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावात यावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            श्री.शिंदे म्हणाले,शासनाने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करताना मंत्रिमंडळ बैठकीत ३०० पेक्षा अधिक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अल्पावधीत २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.


            'नमो शेतकरी' योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. सामान्य माणसालाही मुख्यमंत्र्याला भेटावेसे वाटते हा विश्वास शासनाविषयी निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्यासाठी २ हजार ४५ कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी शासनाने दिला आहे. डोंगरी विकासाच्या २०० कोटी रुपयांच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.


            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेला समजावून सांगाव्यात आणि त्यांचा लाभ त्यांना द्यावा या हेतूने 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलतीची योजना सुरू केली. याचा मोठ्या प्रमाणात लाभ नागरिकांना झाला. जलयुक्त शिवार योजना नव्याने सुरू करण्यात आली. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सामान्य शेतकऱ्याला उभे राहता आले. दुधाळ जनावरांचे अनुदान वाढविण्यात आले, सातबारा ऑनलाईन देताना डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्ध झाला, ६०० रुपये ब्रास दराने वाळू, १०० रुपयात आनंदाचा शिधा अशा अनेक जनकल्याणकारी योजना शासनाने सुरू केल्या आहेत.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. ते म्हणाले, शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत. 'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकारी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जनतेच्या दारात जात आहेत. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचावे. शासनाने निर्णय घेतल्याने भूकंपग्रस्तांच्या पुढील पिढ्यांना लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.


            आमदार शहाजी पाटील यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे गजानन पाटील यांनी अभियानाची माहिती दिली. लाभार्थ्यांना एखाद्या योजनेचा लाभ तत्काळ देण्यासाठी ८ हजार योजनादूत सातारा जिल्ह्यात योजनांची माहिती देत आहेत. त्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


             'शासन आपल्या दारी' अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील २५ हजार ६९९ पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, कृषी, महिला व बाल कल्याण, रोजगार यासह १७ विभागाकडील योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना देण्यात आला. महसूल व सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वाटपही यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आले.


            अभियानाद्वारे तहसील कार्यालय पाटणकडून १० हजार १५१ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तसेच पंचायत समिती पाटणकडून ९ हजार ३७१, वेल्फेअर बोर्ड साताराकडून १ हजार ५५१, तालुका कृषी अधिकारी पाटण यांच्याकडून १ हजार २९५ , तहसील कार्यालय कराडकडून १ हजार २३२ यासह प्रांत कार्यालय पाटण, तालुका कृषी अधिकारी कराड, नगर पंचायत पाटण, महावितरण, वन विभाग, दुय्यम निबंधक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, जिल्हा रुग्णालय कराड यांच्यामार्फत लाभार्थींना लाभ देण्यात आला.


            कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व.शिवाजीराव देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभवस्तू व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सातारा जिल्हा दिव्यांग सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.


            कार्यक्रमाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, शहाजी पाटील, अनिल बाबर, प्रकाश आबीटकर आदी उपस्थित होते.   


000



 


महिलांना सशक्त, सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी

 महिलांना सशक्त, सक्षम करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद


                    -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे






प्रातिनिधिक स्वरुपात २५ महिलांना अर्थसहाय्य लाभार्थी प्रमाणपत्र प्रदान


            मुंबई,दि.१३ : आजच्या काळात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमुळे महिलांना शिलाई, घरघंटी आणि मसाला कांडप मशिन आदी संयंत्र सामग्रीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याने महिला आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि सक्षम होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


            चुनाभट्टी येथील सोमैय्या मैदान येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य लाभ वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, सर्वश्री आमदार अॅड. आशिष शेलार, ll लाड, मंगेश कुडाळकर, सुनिल शिंदे, राजहंस सिंह, सदा सरवणकर, कॅप्टन तमिल सेल्वन, कालिदास कोळंबकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, नरेश मस्के, श्रीमती भारती लव्हेकर, यामिनी जाधव, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, श्रावण हार्डिकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देण्याबरोबरच त्यांच्या प्रयत्नांना, प्रगतीला, कष्टाला बळ देण्याचे काम करण्यात येत आहे.जवळपास २७ हजारांहून अधिक पात्र महिलांना शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र दिले जाणार आहेत. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम राज्य सरकार, मनपा करीत आहे. मनपाच्या जेंडर बजेटमध्ये १० ते १५ कोटी रुपये तरतूद होती. यामध्ये साहित्य वाटप, महिलांना सक्षम, पायावर उभे करण्यासाठी २५० कोटी रूपयांची बजेटमध्ये तरतूद केली. मुंबईत अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू आहेत. मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी कायमचा तोडगा काढण्यासाठी ४५० किमीचे सिमेंट काँक्रिंटचे रस्ते केले. उर्वरितही रस्ते काँक्रिटचे करणार असून अडीच वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करणार आहे.


    Ll       मुंबई ही आर्थिक राजधानी असून मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करणार बनविण्यासाठी प्रयत्नशील असून मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या विकासासाठी वापरणार आहे. खराब काम करणारे कंत्राटदार हद्दपार करणार आहे. शहरात १,१७४ सुशोभिकरण प्रकल्प, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून ८ लाख मुंबईकरांना लाभ झाला आहे. सर्वसोयींनीयुक्त दवाखाना असा हा दवाखाना असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी सर्व सुविधा यामध्ये आहेत. मुंबईला प्रदूषणमुक्त करणार आहे. जी-२० कार्यक्रम मुंबईत होत असून देशाला जी-२० चा मान मिळालाय हे अभिमानास्पद आहे. हे सरकार राज्याला विकासासाकडे नेण्याचे काम करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            लेक लाडकीच्या माध्यमातून मुलगी जन्माला आल्यानंतर सुकन्या योजना, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सूट, घरघंटी, कांडप मशिन, शिलाई मशिनसोबत मार्केटिंग करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या वस्तूला बाजारात भाव मिळण्यासाठी मनपाने योजना तयार करावी. मुंबई मनपाच्या ७७ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी होत्या त्या वाढून ८८ हजार कोटी झाल्या. २५ हजार कोटींची कामे करूनही ११ हजार कोटी रूपयांच्या सुरक्षा ठेवी वाढल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख, लोकोपयोगी काम करीत आहे. केंद्राची राज्याला मदत होत आहे. प्रत्येक निर्णय सर्वसामान्यासाठी घेतोय. सर्व योजना राबवून मुंबईचा कायापालट करण्याच्या ध्येयाबरोबर मुंबई बाहेरचा माणूस पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यनी सांगितले.

*'हे' पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील !*

 *'हे' पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील !


कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.


कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने वाढण्याचे ते संकेत आहेत. त्यामुळे सतत भूक लागण्यावर ती नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा, तुम्हाला सतत लागणारी भूक ही वजन वाढण्यासह इतर आजारणाही निमंत्रण देण्याची शक्यता आहे.


शिवाय आजकाल लठ्ठपणा ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे लोक आपलं वजन कसे वाढणार नाही याची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय वाढत्या वजनामुळे केवळ शरीरच खराब दिसत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे अनेकांना आपलं वजन कमी करण्याची इच्छा असते पण त्यांना भूक कंट्रोल करता येत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ सुपरफूडबद्दल माहिती, जे खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही आणि लठ्ठपणाची समस्याही उद्भवत नाही...


*वजन कमी करण्यासाठीचे ते ५ सुपरफूड्स :–* 


*बदाम –* 


बदाम हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट, प्रथिने आणि फायबर असतात. बदाम खाल्ल्याने भूक लागणं खूप कमी होते. तसंच त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळे वजन वाढण्यास आळा बसतो.


*नारळ –* 


नारळ हे आपणाला सहज आणि कुठेही उपलब्ध होणारे फळ आहे. नारळात लॉरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड असे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे आपणाला पोट भरल्यासारखे वाटते. नारळाला जलद गतीने फॅट बर्न करणारे फळ मानले जाते.


*ताक –* 


ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. शरीराची तरलता राखण्यासाठी ताकापेक्षा चांगला पर्याय नाही. ताक प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप लठ्ठपणाला आळा बसतो.


*मोड आलेले हरभरे –* 


मोड आलेल्या हरभरामध्ये जास्त प्रथिने आढळतात. त्यामध्ये भूक कमी करणारे हार्मोन्स असतात. याशिवाय त्यात फॅट आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे मोड आलेला हरभरा हा लठ्ठपणाचा शत्रू असल्याचे मानले जाते.


*भाज्यांच्या रस –* 


भाज्यांच्या रस हा लठ्ठपणा मुळापासून दूर करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर जास्त वेळेपर्यंत भूक जाणवू देत नाहीत. भाजीपाल्याच्या रसात जवसाच्या बिया मिक्स केल्या तर ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.


*डॉ. प्रमोद ढेरे,*


 *⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*(

Featured post

Lakshvedhi