Saturday, 13 May 2023

पाण्याची expiry date काय असते...*

 *पाण्याची expiry date काय असते...*


जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे

expiry date 1 दिवसाची


जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते


जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते

लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expiry होते आणि फेकून दिली जाते.


वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत जवळचे पाणी चालते..

धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते

जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते...


जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते - expiry date शेकडो वर्षे


जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षा पूर्वी भूगर्भात साठलेले असते तरीही ते चालते..


एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धीमतेवर ठरवली जाते...😢


*पाणी जपून वापरा, नाहीतर आपले विचारच आपला घात करतील....✒️* ____🥀🌺🌺🥀____ *🙏 धन्यवाद

शेंगदाणे* खा

 *शेंगदाणे*


*भिजलेले शेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते*. 


*यामध्ये असलेले, कैल्शियम, विटामिन A आणि*


*प्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते*. 


*रोज भिजलेले शेंगदाणे खालल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहते. यामुळे तुम्ही डायबिटीजसारख्या आजारा पासून वाचता*.


*फाइबरयुक्त असलेले शेंगदाणे भिजवून खाण्यामुळे पचन तंत्र चांगले राहते. थंडीत याचे सेवन केल्यामुळे शरीराला आतून गरमी आणि उर्जा मिळते*.


 *पोटेशियम, मैग्नीज, कॉपर, केल्सियम, आयरन*,


*गुणांनी संपन्न असलेले शेंगदाणे भिजवून रिकाम्या पोटी खाण्यामुळे गैस आणि एसिडीटीच्या समस्या दूर होतात*. 


*थंडी मध्ये भिजलेले शेंगदाणे आणि गुळ खाण्यामुळे सांधेदुखी आणि कंबरदुखी या समस्या दूर होतात*.


 *लहान मुलांना सकाळी भिजलेले शेंगदाणे खायला दिल्यामुळे त्यांना विटामिन मिळते ज्यामुळे डोळ्यांची नजर चांगली राहते आणि स्मरणशक्ती चांगली होते*.


*शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील रक्ताची कमी दूर होते. याच सोबत शरीराला उर्जा आणि स्फूर्ती मिळते*.


*शेंगादाण्यात असलेले तेल ओला खोकला आणि भूक न लागणे या समस्या दूर करते*.


*रोज मुठ भर शेंगदाणे खाण्यामुळे महिला कैंसरपासून दूर राहतात. कारण यामध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट, आयरन, नियासिन, फोलेट, कैल्शियम आणि जिंक शरीराला कैंसर सेल्स सोबत लढण्यास मदत करतात*.


*शेंगदाणे नियमित खाणे गर्भवती महिलांच्यासाठी पण चांगले असते. हे गर्भाच्या वाढीसाठी मदत करते*. 


 *जेवणानंतर जर 50 किंवा 100 ग्राम शेंगदाणे खाल्ले तर बॉडी बनते, भोजन पचते, रक्ताची कमी होत नाही. तसेच यामध्ये प्रोटीन, फैट, फाईबर, खनिज, विटामिन आणि एन्टीऑक्सीडेंट असते*.



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


खा तूप येईल रूप

 *तूप.. घी...*


जेवण कसलेहि असो, पंगतिला तूप वाढले कि मगच जेवायला सुरुवात करायचि आपलि परंपरा आहे, एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातला एक अविभाज्य घटक आहे..

  .... ..## तुपः ।। घ्रुतम् आयुः।। , सहस्रवीर्य विधिभिघ्रुतं कर्मसहस्रक्रुत्।।

   ज्याच्या आहारात थोड्या फार प्रमाणात तुप रोज आहे तो निरोगि आयुष्य दिर्घकाळ जगतो... सर्व प्रकारच्या स्निग्ध पदार्थात तूप हे सर्वश्रेष्ठ आहे.. शरिराचि दर क्षणाला झिज होत असते, ती भरून यायला शरिरात स्निग्धता लागते..


##.. सात धातुंमद्ये मज्जा हा धातू सर्वात श्रेष्ठ धातू होय. शरिराच्या ठिकठिकाणाच्या कार्यास तुपाचि मदत मोठि होते, आयुर्वेदाप्रमाणे तूप हे आयुष्यवर्धक, व मधूर रसाच्या पदार्थात श्रेष्ठ आहे, शरिराला तुपामुळे स्थैर्य मिळते, बुद्धि, धारणा शक्ति, स्मरणशक्ति वाढवणे याकरता तूप माफक प्रमाणात रोज घ्यावे..

        घ्रुत हे शित गुणांचे असून वात व पित्त विकारात काम करते, अरूचि, भूक न लागणे , अग्निमांद्य, या विकारात अग्निवर्धन होते, शीतपित्त, व गांधि उठणे या विकारात, तुपात कालवून मिरेपुड लावलि तर अंगाचि खाज कमि होते,,....


##. आम्लपित्तात, नियमाने सकाळि व संद्याकाळि पंधरा ग्रँम तूप घ्यावे, स्रियांच्या प्रदर विकारात गुणकारि आहे, क्रूश व्यक्तिने कंबरदुखी, गुडघेदुखि, सांधेदुखि यावर थोडे तुप गरम पाण्याबरोबर घ्यावे,

      ज्यांचा कोठा रुक्ष आहे, बद्धकोष्ठ आहे, त्यांनी रोज रात्रि एक कप गरम दुधासोबत एक चमचा तूप घ्यावे

     कान सतत वाहणे, कानात आवाज येणे, कान कोरडे पडणे, तसेच डोळे रूक्ष होणे, डोळ्यांचा वाढता नंबर, डोळे लाल होणे, या विकारात रसायनकालि म्हणजे सकाळी, वीस ग्रँम तूप खावे..


##**.. उष्णतेने केस गळत असल्यास, केसात खवडे, चाई, फोड होत असल्यास, नियमित तूप खावे, कुरूप या विकारात कुरूप कापण्यापेक्षा, शतघौत तुप तिथे घासावे, बरे होतात. शांत झोपेकरता, तळपायाला, कानशिल, कपाळपट्टि, यांना तूप चांगले जिरवावे..

 ... वात, गुल्म, पोटात फिरणारा वायू गोळा याकरता जेवणाच्या सुरुवातिला तूप चमचाभर खाउन जेवण संपतांना पुन्हा चमचाभर खावे..

  शरिरातिल कोणतिहि जखम भरून येण्यास व आतड्यातील व्रण भरण्यास तु पाचे सेवन गुणकारि आहे..


##*.. क्रुश व्यक्तिच्या छातित दुखणे, क्षयरोग, थुंकितून रक्त पडणे, कडकि, बारिक हाडे ताप, यि विकारात नेमाने तुप खावे, बल मिळते,. सततचि डोकेदुखि, असल्यास नाकपुडित दोन थेंब तुपाचे टाकावै, 

     तोंड आल्यास, अल्सर झाल्यास जिभेला तुप चोळावे. त तोंडात तुप धरावे,, 

         त्वचा विकारात , खाज व आग, थांबवण्याकरता, विशेषतः सोरायसिस मद्ये तुप खाणे लाभदायि आहे,.......


##*.. समस्त विषविकारात पोटात घेण्यासाठि तुपासारखा उपाय नाहि, विषाच्या दहा गुणाविरूद्ध लढा देण्यास तुपाचे दहा गुण आहेत, चुकिच्या औषधांचे परिणाम डोळ्यावर, त्वचेवर, केसांवर, किडनिवर, झाल्यास , सकाळि, तूप घ्यावे..

        फिटस् येणे, आकडि, विस्मरण, उन्माद, या वातविकारात, पोटात तूप घ्यावे, तळहात, पाय, कानशिले, यांना तूप घासावे, लकवा, तोंडावरून वारे जाणे, तोंड वाकडे होणे, या विकारात, नाकात दोन थेंब 

 तुप टाकावे, डोळ्यात टाकावे


##*.. मूळव्याधित गरम दूधात तुप घालून प्यावे, वारंवार गर्भपात होत असल्यास तूपाचे नियमित सेवन केल्यास गर्भाशय बलवान होते, कँसर व्याधित केमोथेरपि, रेडिएशन, यांचे दुष्परिणाम टाळण्याकरता तूपाचे सेवन करावे.. शुद्ध तुपाने चेहर्याला मालिश केल्यास चमकतो

 मुलायम राहतो, डाळ शिजतांना तूप टाकल्यास गँस होत नाही..

        तुपामद्ये विटामिन ए. डी., व कँलशिअम, फाँस्फोरस, मिनरल्स, पोटँशिअम, असे अनेक पोषक तत्वे असतात, तेव्हा, आपल्या आहारात नक्किच तूप कायम असावे... 


सुनितासहस्रबुद्धे....



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



तिसरी पोळी*_

 _*तिसरी पोळी*_


*पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.*

*तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे.* 


*आज सर्व मित्र शांत बसले होते.*

*एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.*

*"तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो? आज मी सांगेन." रामेश्वर बोलला!*

        *"सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का?" एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले!*

*"नाही यार! असं काही नाही, सून खूप छान आहे.*

        *वास्तविक "पोळी" चार प्रकारची असते.*

       *पहिल्या "मजेदार" पोळीमध्ये "आईची" ममता "आणि" वात्सल्य "भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही.*


        *एक मित्र म्हणाला, "शंभर टक्के खरं आहे, पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते",*


 *"दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे, जी "पोट" आणि "मन" दोन्ही भरते." तो पुढे म्हणाला..*


*"आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे?" मित्राने विचारले.*


       *"तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात फक्त "कर्तव्या ची" भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासांपासून वाचवते,"*


*तिथे थोडा वेळ शांतता पसरली!*


*"मग ही चौथी पोळी कसली आहे?" शांतता मोडून एका मित्राने विचारले!*

*"चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही! चवीचीही हमी नसते."*

*मग माणसाने काय करावे?*


       *"आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा, सूनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.*


         *"जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चविकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरुन आपलं म्हातारपण आरामात आणि आनंदात व्यतीत होईल."*

   

*सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत!!*


 _*वाचनात आलेला छान लेख....*_

*लेख चांगला आहें तो आपले ,,, स्नेह मित्र परिवार ला जरुर जरुर पाठवा,, धन्यवाद,,*


         🌹🙏🌹😊

सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

 सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख


मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक


           


            मुंबई, दि. 12 : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे गुरूवार (दि.११) सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारांवर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


            गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भाऊचा तांडा येथील शेत वस्तीवरील एका घरातील सेप्टिक टॅंक मधील मैला सफाई करताना पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. एका कामगारास गंभीर अवस्थेमध्ये अंबजोगाई येथील शासकीय रुग्णालयाय येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती होताच त्वरित आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

गाठी,व चरबीच्या गाठीसाठी*

 🇮 🇲 🇵 



*गाठी,व चरबीच्या गाठीसाठी*


 (Lipoma)उपाययोजना

१)गंडमाला कंडनरस दोन गोळ्या गाईच्या दुधात साखर थोडी घालून दोन वेळा.

२)त्रिफळा गुगुळ दोन गोळ्या दोन वेळा गरमपाण्यात घेणे कातडीखालील चरबीच्या गाठी Lipoma काढतं

३)वरूणादि काढा नं २ दोन चमचे समभाग पाण्यात.

४)रक्तदोषांतक घेत जा रोज

चरबीच्या गाठी lipoma साठी उपयुक्त उपाय नं २व ३

    ज्यांना गाठी जास्त आहेत त्यांनी सर्व उपाय करा.ज्यांना फक्त चरबीच्या आहेत त्यांनी उपाय दोन तीन करा.


*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_*(

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार

 संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            बुलडाणा, दि. 12 : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.


            संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा राजानजिकच्या चिखली तालुक्यातील इसरूळ येथे संत चोखोबारायांच्या मंदिराचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, नारायण कुचे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, गोपिकिसन बाजोरीया, हरिभाऊ बागडे, विजय जगताप, हभप पुरूषोत्तम महाराज पाटील, श्री पाटणकर महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


            श्री. शिंदे म्हणाले की, आध्यात्मिक परंपरेचे स्थान राजकीय व इतर क्षेत्राहून वरचे आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूर येथे आषाढी एकादशीची पूजा करण्याचे भाग्य लाभले. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे भूषण आहे. हभप पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्‍या प्रयत्नातून चोखोबारायांचे मंदिर साकारले गेले आहे आणि हा परिसर तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यात येतील. लाखो भाविक पायी वारी करून पंढरपूरला जातात. त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. संत विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापिठाची उभारणी करण्यात येणार आहे.


            संतांच्या सानिध्याने शांती आणि समाधान लाभते. वारकरी हे महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांचा सहवास जीवनातील अंधार दूर करणारा असतो. वारकरी संप्रदाय समाजात समानता राखण्याचे काम करतो. त्यामुळे त्यांच्यापासून चांगले काम करण्याची प्रेम, ऊर्जा मिळते. त्यांच्या प्रेरणेतून समाजासाठी झटण्याचे बळ मिळते. चोखोबारायांचे चांगले मंदिर उभे राहिले आहे. या मंदिराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगितले.


            इसरूळ येथील कार्यातून संत परंपरेचे प्रतिक, पावित्र्य पहायला मिळाले. येथे होत असलेले कार्य पाहून आनंद वाटला. संत परंपरेचा अनमोल ठेवा यातून जपला जाणार आहे. संत साहित्याचा अभ्यास आणि चिकित्सा होणे गरजेचे आहे. नव्या विचारांनुसार अभंग, भारूडाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत विद्यापीठ उपयुक्त ठरेल. संत परंपरा भक्ती, सहनशक्ती, संयम, विवेक आदी गुणांची प्रेरणा देते. त्याचे विचारांचे वसा जोपासत कष्टकऱ्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी अनेक लोकहिताचे निर्णय राज्य शासनाने घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले. 


            यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज पठाडे, पंकज महाराज गावंडे यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना संत चोखोबारायांची प्रतिमा भेट दिली.

Featured post

Lakshvedhi