Tuesday, 9 May 2023

युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.

 युवा संगम उपक्रमांतर्गत पंजाब मधील युवकांची राज्यपालांशी भेट.


"महाराष्ट्र, पंजाब यांचे देशासाठी योगदान फार मोठे"


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 9 : पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांमधील अंतर दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक असले तरी दोन्ही राज्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे भगिनी राज्ये असून स्वातंत्र्य लढ्यात व त्यानंतर राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये दोन्ही राज्यांचे योगदान फार मोठे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा भाग म्हणून आयोजित 'युवा संगम' उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्र भेटीवर आलेल्या पंजाबमधील ४५ युवक -युवतींनी मंगळवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.


            संत नामदेव महाराष्ट्रातून पंजाबला गेले व भक्तिमार्गाचा पुरस्कार केला तर शिखांचे दहावे गुरु गोबिंद सिंग यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्य केले. हुतात्मा भगतसिंह यांना महाराष्ट्रातील क्रांतिकारक हुतात्मा राजगुरु यांनी साथ दिली.


            आज महाराष्ट्र व पंजाब या दोन्ही राज्यांमधील सर्वाधिक युवक सैन्यदलामध्ये भरती होतात. महाराष्ट्राच्या विकासात देखील राज्यातील पंजाबी बांधव मोठे योगदान देत आहेत असे राज्यपालांनी सांगितले. युवकांनी खूप शिकावे, नवनवी कौशल्ये आत्मसात करावी, व्यसनांपासून दूर रहावे व आपण निवडलेल्या क्षेत्रातून देशसेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी युवकांना केले.


            आयआयटी मुंबईने एनआयटी जालंधर या संस्थेला शैक्षणिक सहकार्य करावे तसेच दोन्ही संस्थांनी शिक्षक व विद्यार्थी आदान प्रदान करावे अशीही सूचना राज्यपालांनी केली.


मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा मुलांनी देश पाहावा


            पूर्वी लोक सुटीच्या दिवशी मित्रांकडे, नातलगांकडे जात. त्यामुळे संवाद होत असे. आज मोबाईल - लॅपटॉपच्या युगात माणसे कुटुंबापासून दुरावत आहेत. युवकांनी देशातील विविध प्रदेशांना भेटी दिल्यास त्यातून संवाद वाढेल व खूप काही शिकायला मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.


पुरण पोळी, श्रीखंड पहिल्यांदा खाल्ले


            महाराष्ट्रात पहिल्यांदा येऊन खूप आनंद झाला व येथून परत जाऊच नये असे वाटते. मात्र येथे उकाडा फार जास्त आहे, असे पंजाब मधून आलेल्या एका युवतीने सांगितले. महाराष्ट्रातील पुरणपोळी, श्रीखंड व शिरा खूप आवडल्याचे एका युवकाने सांगितले तर येथील जनजीवन खूप धावते असल्याचे मत एका युवतीने नोंदवले.


            राज्यपालांशी झालेल्या चर्चेनंतर युवकांनी राजभवनाला भेट दिली. यावेळी भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रो. टी.जी सीताराम, आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. सुभासिस चौधरी, 'युवा संगम'चे निमंत्रक प्रो. मंजेश हनावल, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार सुरेंद्र नाईक, आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार गणेश भोरकड़े, पंजाब येथून आलेले शिक्षक समन्वयक, आयआयटीच्या जनसंपर्क अधिकारी फाल्गुनी बॅनर्जी नाहा आदी उपस्थित होते.


            'युवा संगम' उपक्रमांतर्गत पंजाबमधील युवकांना महाराष्ट्राची संस्कृती, पर्यटन, विकास व औद्योगिक प्रगती यांची झलक दाखवली जाणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील ३५ व दादरा नगर हवेली दमण - दिऊ येथील १० युवक देखील पंजाबला भेट देत आहेत. महाराष्ट्राला भेट देत असलेल्या पंजाब मधील युवकांचे पालकत्व आयआयटी मुंबई करीत आहे.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतराज्यातील प्रकल्पांबाबत बैठक

 केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीतराज्यातील प्रकल्पांबाबत बैठक


राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करून


प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश


 


            मुंबई, दि. 9 : राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत. वनांच्या हद्दीतील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामांसाठी वन विभागाने प्राधान्याने कार्यवाही करून ते प्रकल्प मार्गी लावावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


            राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नवीन रस्ते प्रकल्पांबाबत आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, वाढते शहरीकरण त्याचबरोबर वाढत्या पायाभूत सुविधांसाठी रस्ते, महामार्ग तसेच उड्डाणपूलांचे विविध प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. त्याचबरोबर काही प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादन तसेच वन विभागाची मान्यता यासाठी प्रलंबित आहेत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पांना तातडीने गती देण्याची आवश्यकता आहे.


            जे प्रकल्प जमीन संपादन अभावी रखडलेले आहेत, त्याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी कालमर्यादेत जमीन संपादन करावी. या कामी वेळ जात असल्याने प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होते त्यामुळे लवकरात लवकर जमीन संपादन करून प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करावे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


            १५ वर्षापूर्वीची वाहने मोडीत काढण्याचे धोरण केंद्र शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार अशी वाहने मोडीत काढावी, यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरू करण्याची सूचना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी केली. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये ४ आणि लहान अविकसित जिल्ह्यांत दोन अशी किमान १५० ते २०० युनिट सुरू करण्याची सूचना श्री. गडकरी यांनी यावेळी केली. यामुळे किमान १० ते १५ हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले. महामार्ग, रस्ते प्रकल्पांसाठी वेळेत जमीन संपादन करण्यात यावी, असे श्री. गडकरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देतानाच गणपतीपूर्वी एकेरी मार्गाचे काँक्रिटीकरण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत मुंबई विभागात चार, सहा आणि आठ पदरी मार्गिकांचे ९ प्रकल्पांच्या ४३५ कि.मी. लांबीचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. ६२१ कि.मी. लांबीचे सहा न्यू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे, १७८ कि.मी. लांबीचे तळेगाव, चाकण, शिरूर, पुणे शिरूर, रावेत नाऱ्हे, हडपसर रावेत, द्वारका सर्कल ते नाशिक रोड स्टेशन अशा या ५ एलिव्हेटेड कॉरिडोअर्सचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेच्या कामांमध्ये ब्लॅकस्पॉट दूर करणे, उड्डाणपूल, सर्वीस रस्ते, पादचारी पूल यांची ६८ ठिकाणी कामे प्रस्तावित आहेत.


            यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कळंबोली आणि अन्य सहा ठिकाणच्या जंक्शनच्या विकासकामांविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामासाठी सात कि.मी.च्या जमीन संपादनाविषयी देखील चर्चा झाली.


०००००

श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट,महाड


 








हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*

 *हाता-पायाच्या तळव्यावरखो (कोकोनट) तेल लावा आणि अनेक रोगांपासून मुक्त व्हा*


१. एका सौ.शेट्टी या महिलेने लिहिले की, माझ्या आजोबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले, त्याना पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही ना दात दुःखी नाही. 

माझे आजोबा सांगायचे,ते मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याचा सल्ला दिला होता. आणि हाच तेंव्हापासून आजोबांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत होता. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.


२. मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की, लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हापासून तो हाता-पायाच्या तळांवर तेल लावण्याची ही प्रक्रिया सुरू ठेवली, तेव्हा १ महिन्यानंतर माझ्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे नियमित झाला. 


३. उडुपी येथील एक व्यापारी गृहस्थ श्री. कामथ सुट्टीसाठी केरळला गेले असता, तिथल्या हॉटेलमध्ये ते झोपू शकले नाही. म्हणून बाहेर चालू लागले. तेव्हा रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकऱ्याने विचारले, "काय झाले आहे, असे का भटकता?" 

ते म्हणाले "मला झोप येत नाही!"  

तो हसला आणि म्हणाला, "तुमचा कडे नारळ तेल आहे का?"  

मी म्हणालो "हो". 

तो म्हणाला, "मग त्याने आपल्या हाता-पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा, शांत झोप येईल." 

आता श्री कामथ स्वस्थ आणि सामान्य आहेत.


४. रात्री झोपण्यापूर्वी हाता-पायाना नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .


५. पोटाचा त्रास- हाता-पायाच्या तळांवर नारळाच्या तेलाने मालिश केल्यानंतर पोटाचा त्रास 2 दिवसात बरे होते.


६. लहान मुलांच्या पायाच्या तळव्यांवर नारळ तेलाने मालिश देखील केल्यास, त्यांना खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.


७. पाय दुखणे/मुंग्या येणे- रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची मालिश करण्यास सुरवात करावे. या प्रक्रियेमुळे पायांच्या दुखण्यापासून व मुंग्या येणे यापासून बराच आराम मिळातो.


८. पाय नेहमी सुजलेले आणि चालत असताना थकवा येत असेल, तर, रात्री झोपायला जाण्यापूर्वी पायांच्या तळांवर नारळ तेलाने मालिशची ही प्रक्रिया सुरू करावी. फक्त दोन दिवसातच, पायांची सूज अदृश्य होते.


९. पायाला जळजळ होत असल्यास आपल्या हाता-पायाचा तळव्यांवर नारळाचे तेल लावायला सुरुवात करा. आठव्या दिवसापासून वेदना कमी होतील आणि परत जळजळ कधीच होणार नाही.


१०. थायरॉईड रोगाने पाय सर्व वेळ दुखत असल्यास झोपायच्या आधी पायाच्या तळांवर नारळ तेलाची मालिश करा आणि स्वस्थ व्हा.


११. पायाला फोड असल्यास रात्री झोपायच्या आधी चार दिवस नारळ तेलाने पायातील तळांची मालिश करावे. बराच मोठा फरक दिसेल.


१२. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने झोपेत घोरणे प्रतिबंधित करते.


१३. हाता-पायाच्या तळांवर तेल लावल्याने गुडघ्यात वेदना कमी होतात.  


१४. रात्री झोपण्यापूर्वी नारळ तेलाची हाता-पायाचा तळव्यावरील मालिश या पद्धतीने पाठीचा, मणक्याचा त्रास कमी होतो.


दक्षिण भारतीय रहस्य खालीलप्रमाणे आहेः


एकमात्र रहस्य आणि प्रत्येकासाठी खूप सोपे, आहे.

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.


प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात. याला - *फूट रिफ्लेक्सोलॉजी*

असं म्हणतात. ही फुट मालिश थेरपी संपूर्ण जगभरात वापरली जाते.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*

भवतालचा मार्च एप्रिल चा अंक प्रसिद्ध !

 भवतालचा मार्च एप्रिल चा अंक प्रसिद्ध !


नमस्कार.


भवताल मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक प्रसिद्ध झाला आहे. तो सोबत शेअर करत 


आहोत. अंकात पुढील लेखांचा समावेश आहे.


 


• मान्सूनचा पाऊस कसा बरसणार?


• "गंगा" जी आणि डॉल्फिनचा दोस्त


• पर्यावरणामध्ये "केल्प" चे योगदान


• पिवळ्या मुंग्यांमधील चमत्कार


• आणि बरेच काही...


 


आपण अंकासाठी नावनोंदणी केल्यामुळे आपणाला हा अंक देत आहोतच. जोडीला 


अंकाचे कव्हर आणि नावनोंदणीची लिंक देत आहोत. ती आपल्या संपर्कात पोहोचवून 


लोकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन करावे.


 


तसेच, आपणही वर्गणीसह अंकाची नावनोंदणी करून ‘भवताल’ च्या कार्याला पाठबळ 


द्यावे, ही विनंती.


 


नावनोंदणीसाठी लिंक:


https://www.bhavatal.com/connectus/masik-nondani-information



--



भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and s

ustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

शिवकाळात चुन्याचा घाणा कसा कार्यरत असायचा याची माहीती सर्वांना व्हावी

 रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने नाना दरवाजाची पुर्नबाधंणी करत असताना, रायगडवाडी येथे पारंपरिक चुन्याच्या घाण्याचे चाक मिळाले.

यावरून शिवकाळात चुन्याचा घाणा कसा कार्यरत असायचा याची माहीती सर्वांना व्हावी यासाठी हा पारंपारीक चुण्याचा घाणा पुन्हा कार्यान्वीत करण्यात आला.

याच घाण्यात तयार झालेला चुणा सध्या नाना दरवाजाच्या पुर्नबाधंणीसाठी वापरण्यात येत आहे🙏🙏🙏🙏🚩🚩🚩


🚩

व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फ्रेश.....*

    व्यायामाला वेळच नाही? नियमित करा फक्त ३ गोष्टी; राहाल एकदम फिट आणि फाईन 

सकाळी दिवस सुरू झाला की ओट्यापाशी नाश्ता, स्वयंपाक सगळ्यांचे डबे भरणे, मुलांचे आवरणे, साफसफाईची कामे आणि ऑफीसला जाण्याची घाई. पुन्हा ऑफीस सुटलं की घरी पोहचून स्वयंपाक करायचा असल्याने घरी पोहोचण्याची घाई. या सगळ्या धावपळीत महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ होतोच असे नाही. घरातील सगळ्यांची काळजी घेता घेता आपण अनेकदा स्वत:कडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्याला नीट बसून खायलाही वेळ होत नाही. त्यामुळे व्यायामाला तर वेळ मिळेल याची शक्यताच नसते. घरातली कामे म्हणजे व्यायाम नाही. त्यातही दिवसभर बैठे काम असेल तर शरीराची फारशी हालचाल होत नाही. यामुळे कालांतराने पचनाच्या तक्रारी, लठ्ठपणा, सांधेदुखीच्या तक्रारी उद्भवायला लागतात.


आजकाल कमी वयातच या सगळ्या तक्रारी उद्भवत असल्याने आपण आपल्या हातानेच आरोग्याची हेळसांड करत असल्याचे दिसते. शरीराचे कार्य सुरळीत चालायचे तर शरीराला थोडा तरी व्यायाम हवाच. यासाठी रोजच्या दिनक्रमात सहज करता येतील अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया


*१. सूर्यनमस्कार...*

आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो, आंघोळ करतो. त्याचप्रमाणे १२ सूर्यनमस्कार घालण्याची शरीराला सवय लावली तर संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होते. १२ सूर्यनमस्कार घालायला मोजून १२ ते १५ मिनीटे लागतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर इतर गोष्टींप्रमाणेच आपण स्वत:साठी हा वेळ आवर्जून काढायला हवा. यामुळे आपल्याला नक्कीच दिवसभर फ्रेश वाटेल.


*२. जीने चढ-उतार...*

आपण वरच्या मजल्यावर राहत असू तर लिफ्टचा वापर न करता आवर्जून जिन्यांचा वापर करायला हवा. ऑफीसमध्येही लिफ्टच्या ऐवजी जिन्यानेच चढ-उतार करायला हवी. यामुळे किमान व्यायाम होतो. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा जीने चढ-उतार केल्यास आपला एन्ड्युरन्स चांगला राहण्यास मदत होते आणि स्टॅमिनाही वाढतो. 


*३. शतपावली...*

दिवसभराचे काम करुन आपण आधीच थकलेले असतो. त्यातही संध्याकाळी घरी आल्यावर स्वयंपाक आणि मागची आवराआवरी, दुसऱ्या दिवशीची तयारी हे करता करता आपण पार थकून जातो. त्यामुळे जेवण झाल्यावर कधी एकदा आपण आडवे होतो असे आपल्याला होऊन जाते. अशावेळी कंटाळा घालवण्यासाठी आपण टिव्ही पाहणे किंवा एकमेकांशी गप्पा मारणे हे आवर्जून करतो. त्या वेळात आपण घराच्या आजुबाजूला १५ मिनीटे शतपावली केल्यास दिवसभराचा ताण तर निघून जातोच पण अन्न पचण्यासही त्याचा चांगला उपयोग होतो. शरीराची हालचाल झाल्याने झोपही गाढ लागण्यास मदत होते. 


*कुमार चोप्रा,*

*सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi