Thursday, 4 May 2023

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे.*

 *जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे.*


छातीत जळजळ आणि अॕसिडीटीचा त्रास अनेकांना होत असतो. अॕसिडीटी झाल्यावर लोक गोळ्या खातात. गोळ्या खाल्ल्यानंतर काही वेळ अॕसिडीटीचा त्रास कमी होतो. पण नंतर पुन्हा त्रास जाणवतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही आवळा पावडर घातलेलं पाणी पिऊ शकता.  

 

▪️ *वजन कमी करण्यासाठी फायदेशीर* 

आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही.


चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहते.


▪️ *पचनक्रिया उत्तम राहते.*

आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये *फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो.* फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते. 


▪️ *लिव्हर निरोगी ठेवते.*

अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते. पण तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.


▪️ *हृदय स्वास्थ्यासाठी*

एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो. यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.


▪️ *प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी*

रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.



दहीभात :: एक आयुर्वेदिक औषध*

 *दहीभात :: एक आयुर्वेदिक औषध* 


पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, " शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! " 

मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! 

आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!


मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ? 


यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक शास्त्रीय कारण आहे !

पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !


मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ?

दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणते शास्त्र ?


आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.


जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का?


दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे संशोधनात सिद्ध झाले आहे.


मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते.

पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.


आता असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात......


दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा सर्वसामान्य गैरसमज आहे. मात्र दही भात खाणे हितकारक ठरू शकते. त्यामुळे वजन वाढत नाही तर कमी होतं. आजकालच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो. पुर्वी दही भात आर्वजून खाला जात असे. जाणून घेऊया दही भात खाण्याचे फायदे.


■ वजन कमी होते

दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. कॅरलीज घटतात. 


■ तापावर फायदेशीर

ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते. 


■ पोट बिघडल्यावर

पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.


बद्धकोष्ठतेवर परिणामकारक

तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते. 


■ तणावमुक्ती

 दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.


- श्रीकृष्ण पंडित,



*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



ये जीवन हैं aur मजबुरीया

 


येथे कर माझे जुळती


 

राज्यपालांच्या हस्ते 22 वे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' प्रदान

 राज्यपालांच्या हस्ते 22 वे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' प्रदान


"देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची"


- राज्यपाल रमेश बैस


 


            मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमे पाहणाऱ्यांपेक्षा, प्रभावी मत परिवर्तक, व्हीडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.           


            विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील 10 पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.


            आपण 1978 मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आज माध्यमबहुल युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात होते, असे राज्यपालांनी सांगितले. 


            ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित मजकूर पडले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. 'सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्ट‍िने पाहतात' या वचनाचा संदर्भ देताना आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.  


            रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर, दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, नीलेश खरे, जयंती वागधरे, यू ट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाजमाध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर यांना पुरस्कार देण्यात आले.


            विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.


००००


 



 


Governor conferred Devarshi Narad Awards to 10 journalists


 


      Governor Ramesh Bais presented the 22nd 'Devarshi Narad Patrakarita Puraskars' for the year 2023 to journalists and media personalities from Maharashtra at Raj Bhavan today. 


      Ten media personalities from the print, electronic, digital and social media were given the awards.


      Senior journalist from Ratnagiri Pramod Konkar, political satirist from daily Sakal Pravin Tokekar, news anchor Deepak Palsule, Times of India's Vaibhav Purandare, Nilesh Khare, Jayanti Wagdhare, Anay Joglekar, Anshul Pandey and social media journalists Ninad Patil and Hrishikesh Magar were felicitated on the occasion.


      Chairman of Vishwa Samvad Kendra Mumbai Sudhir Joglekar, Trustee Nishith Bhandarkar, Consul General of Israel in Mumbai Kobbi Shoshani and media per

sonalities were present.


**



 


म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*

 *म्हणून पाया पडायची पध्दत आहे...*


चागंली पध्दत‌आहे, पण कलियुगात वाईट घडते?


●● *नमस्काराचे महत्व* ●●


● *महाभारताचे युद्ध सुरु होते.* 

   *दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे*

   *मारले जात होते. पितामह भिष्मांसारखे*

   *ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून* 

   *देखील त्यांच्या सेनेची सतत हानी* 

   *होत होती..*


● *एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर* 

   *व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन* 

   *भीष्म पितामह घोषणा करतात की..*


● *"मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन.."*


● *त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या* 

   *शिबिरात पोहोचताच पांडवांची* 

   *अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या* 

   *क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती..*


● *तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल* 

   *झाले. पांडवांची अस्वस्थता त्यांच्या* 

   *लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..* 


● *"माझ्या सोबत चल.."*


● *द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण* 

   *पितामहांच्या कक्षात पोहोचले.* 

   *ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर* 

   *उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,* 

   *आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..*

 

● *सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत* 

   *जाऊन पितामहांना प्रणाम करताच,* 

   *"अखंड सौभाग्यवती भव" असा* 

   *आशीर्वाद त्यांनी तिला दिला..*


● *त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की,* 

   *"वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी* 

   *काय आलीस..??"* 


● *"माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे*

   *आले आहे आणि ते बाहेर थांबले* 

   *आहेत" असे द्रौपदीने सांगताच* 

   *श्रीकृष्णाला भेटायला पितामह* 

   *बाहेर आले आणि त्या दोघांनी* 

   *एकमेकांना प्रणाम केला..*


● *भीष्म पितामह म्हणाले..*

   *"माझ्या एका वचनाला दुसऱ्या* 

   *वचनाने मात देण्याचे काम फक्त*

   *श्रीकृष्णच करु शकतात.."*

 

● *शिबिरात परतताना श्रीकृष्ण* 

   *द्रौपदीला म्हणाले की, "बघ,* 

   *तुझ्या फक्त एक वेळ जाऊन* 

   *पितामहांना नमस्कार करण्यामुळे*

   *तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,* 

   *हे तुझ्या लक्षात आले का..??*


● *जर तू दररोज नित्यनेमाने पितामह* 

   *भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या* 

   *मान्यवरांना नमस्कार केला असतास* 

   *आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या* 

   *पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू* 

   *पांडवांना नमस्कार केला असता तर* 

   *हि युद्धाची वेळच आली नसती..*


● *अशी असते नमस्कार* 

   *आणि आशीर्वादाची शक्ती..!!*


●● *तात्पर्य..*


● *वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की,*


*कळत नकळत आपल्या हातून वडिलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते..*


● *जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात..*

   *असे घर स्वर्ग बनू शकते..*


● *मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे*

   *कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही..* 

 

● *कारण..*


● *नमस्कारात प्रेम आहे..*

   *नमस्कारात विनय आहे..*

   *नमस्कारात अनुशासन आहे..*

   *नमस्कार आदर शिकवतो..*

   *नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..* 

   *नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो..* 

   *नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो..* 

   *नमस्कारात शीतलता आहे..*              

   *नमस्कार अश्रू पुसण्याचे काम करतो..*

   *नमस्कार आपली संस्कृती आहे..*

   *ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..*


*🙏 आपणास माझा साष्टांग नमस्कार !! 🙏*

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 


            मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            मंत्रालयात एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे महासंचालक हुन किम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ओ. पी. गुप्ता आदी उपस्थित यावेळी उपस्थित होते.


            पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्रात मोठी संधी आहे. कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, उपलब्ध आहे. राज्याच्या शाश्वत विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केले असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंपांच्या योजनेसाठी एशियन इन्फ्रास्टक्चर इनव्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करावे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शेतकऱ्यांना हरित ऊर्जा पुरविणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णालयांसाठी सौर उर्जा, माहिती व तंत्रज्ञान, शेतीसाठी सौर ऊर्जा आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. बँकेमार्फत सुरू असलेल्या एमयुटीपी प्रकल्पाच्या कामाबद्दल शिष्टमंडळाने यावेळी समाधान व्यक्त केले.


०००० 

Featured post

Lakshvedhi