Saturday, 29 April 2023

केस गळती*

 *केस गळती*


1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा परत आणण्याचेही काही उपाय आहेत. केसांचे आरोग्य हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते त्यामुळे फक्त तेल लावून केस गळणे थांबवणे अवघड आहे. पण जर तुम्ही Hair Loss थांबवण्यासाठी केसांची निगा संपूर्ण घेतली म्हणजे तुमचे केस पुन्हा वाढायला लागतील यासाठी आणखी काय करता येईल ते पुढे पाहू. 


2) मक्याचे तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याचा रस किंवा जास्वंदीची पाने उपलब्ध असल्यास त्यांचा रस मिक्स करून केसांना मालीश करावी. 


3) आवळा, कोथंबीर आणि लिंबू यांचे मिश्रण केसांना लावा. थोडयावेळाने केस धुवून घ्या. केस मजबूत होतील आणि तुटणार नाहीत. 


4) बदाम खालल्याने केसांना आवश्यक असणारे विटामिन्स मिळतात. 


5) केसांना डाय करणे, कलर लावणे, प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहचेल अश्या गोष्टी करणे टाळा. 


6) पौष्टिक आणि योग्य आहार, व्यायाम, केसांना तेल लावणे, पाणी भरपूर प्यावे. 


7) वाईट व्यसनाच्या पासून दूर रहावे. 


8) Hair Loss Problem होण्यासाठी अनेक कारणे असतात त्यामध्येच एक Vitamin D ची कमतरता हे देखील एक कारण असू शकते. जसे इतर पोषक घटक केसांचे आरोग्य वाढवतात तसेच Vitamin D हे देखील केसांचे आरोग्य वाढवते. Vitamin D हे एक निशुल्क असा घटक आहे. Vitamin D केसांच्या वाढीसाठी मदत करतो. Vitamin D स्वताहून Iron and Calcium शोषून घेतो. Iron ची कमतरता पण Hair Loss होण्याचे कारण असते. तुम्ही दिवसातील १५ मिनिट सूर्यप्रकाशात राहिलात तरी तुमची त्यादिवाशाची Vitamin D ची आवश्यकता पूर्ण होते. सूर्यकिरण घेत असताना सकाळचे किंवा संध्याकाळचे सूर्यकिरण अंगावर घ्या प्रखर सूर्यकिरण त्वचेला अपाय करू शकतो हे पण लक्षात ठेवा. 


9) बरेचसे लोक असंतुलित खानपानाच्या सवयी मुळे Hair Loss Problem मध्ये फसतात. केवळ पौष्टिक आहार घेऊन Hair Loss Problem पासून दूर राहता येत नाही



*सर्व ग्रुप मेंबर ना विनंती,* 

*तुम्ही ज्या दुसऱ्या इतर ग्रुप वर कार्यरत आसाल,* 

 *त्या सर्व ग्रुप वर आरोग्य विषयक माहिती फॉरवर्ड करा 🙏🏻*


_

मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं

 मॉरिशसमधील उद्योजकांपुढे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली महाराष्ट्राची बलस्थानं


उद्योगात गुंतवणूक वाढविण्यासाठी ईडीबी-एमआयडीसी यांच्यात सामंजस्य करार


            मोका (मॉरिशस), 28 : इंडो-मॉरिशस बिझनेस फोरमच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मॉरिशसमधील उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची बलस्थानं सांगत त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी एक व्यासपीठ स्थापन करण्यात येणार असून यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड, मॉरिशस (ईडीबी) आणि एमआयडीसी यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.


            महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात गुंतवणुकीसाठी सहकार्य वाढविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, यासाठी यंत्रणा विकसित करणे, संस्थागत संबंध वाढविणे, क्षमता निर्माणाचे कार्य करणे आणि आर्थिक संबंधांना चालना देणे, हे उद्देश या सामंजस्य करारातून साध्य केले जाणार आहेत. मॉरिशसचे अर्थमंत्री डॉ.रेनगॅनाडेन पदयाची, परराष्ट्र व्यवहार मंत्री ॲलन गानू, माहिती-तंत्रज्ञान मंत्री दीपक बालगोबिन तसेच भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला तसेच मॉरिशसमधील उद्योजक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ॲलन गानू यांनी येथे निमंत्रित करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार मानत देवेंद्र फडणवीस यांनी आजचा दिवस हा महाराष्ट्र-मॉरिशस यांच्या मैत्री संबंधातील ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले.


            महाराष्ट्र हे भारतातील एक अग्रेसर राज्य आहे. भारताच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 25% आहे, देशात येणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 28% महाराष्ट्रात येते, औद्योगिक उत्पादनात वाटा 20% आहे. कोविड काळाचा अपवाद सोडला तर महाराष्ट्राचा सीएजीआर (कंपाऊंड ॲन्यूअल ग्रोथ रेट) हा सातत्याने 10% आहे. महाराष्ट्राची 57% लोकसंख्या ही 27 पेक्षा कमी वयाची आहे. सर्वाधिक विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत. सर्वाधिक वीजनिर्मिती आणि वीजवापर महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राची डेटा क्षमता 65% आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी आहे. 80,000 पैकी 15,000 स्टार्ट अप आणि 100 पैकी 25 युनिफॉर्न हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र हे देशाची व्याघ्र राजधानी सुद्धा आहे आणि 700 किमीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            राज्य सरकार इज ऑफ डूइंग बिझनेस आणि कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस यावर सातत्याने काम करते आहे. आज जो सामंजस्य करार करण्यात आला, त्यामुळे मॉरिशस मधील उद्योजकांना एक मोठे दालन खुले होणार आहे. 'स्पीड ऑफ ट्रॅव्हल' आणि 'स्पीड ऑफ डेटा' हे महाराष्ट्राचे वैशिष्ट आहे. महाराष्ट्रात एकाहून एक पायाभूत सुविधांची निर्मिती सुरू आहे आणि दुसरीकडे फायबरच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत इंटरनेट पोहोचविले जात आहे. आता त्याला 5-जी तंत्रज्ञानाची जोड प्राप्त होईल. आजचा करार हा महाराष्ट्र-मॉरिशस विकासाचा मानबिंदू ठरेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम राज्यांनी इतर देशांशी संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी आग्रही असतात. भारत हा राज्यांमध्ये वास्तव्य करतो, हीच त्यामागची त्यांची भावना आहे. आज जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य हीच वसुधैव कुटुंबकम् ची भावना घेऊन त्यांच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखला आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.


००००

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा

 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा


पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


            मुंबई, दि. २८: राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो मार्ग तयार होत असून देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे सांगत उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या वतीने 'कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्' सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुखलाल मांडवीय, जी २० चे मुख्य शेर्पा अमिताभ कांत, बेनेट अँड कोलमन कंपनीचे संचालक विनीत जैन, इकॉनॉमिक टाईम्सचे मुख्य संपादक बोधिसत्व गांगुली, केंद्रीय वित्तसचिव टी. व्ही. सोमनाथन, यांच्यासह उद्योगपती, उद्योजक आणि उद्योग समूहांचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


            कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डस् च्या माध्यमातून इकॉनॉमिक टाइम्सने उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, पायाभूत सुविधांचे जाळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्याने उद्योजकांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टीनेशन आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांना आम्ही गती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अनेक विकास कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.


            राज्यातील रखडलेली विकास कामे पुन्हा गतिमानपणे सुरू झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, असे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्याच्या विकासाला निश्चित दिशा देण्यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर 'मित्रा'ची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी बनवण्याचे स्वप्न पाहिले असून त्यात महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर्सची भर टाकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. त्यासाठी राज्यातील उद्योजकांची साथ आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता राज्यात असून त्यामुळे या राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. यावेळी राज्याला उद्योग क्षेत्रात नवीन उंची मिळवून देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या सोहळ्यात पुरस्कारप्राप्त उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

निरोगी रहा

 हे काही नियम पाळा निरोगी रहा.

१)रोज ४०शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्या.

२)दिवसात कमीत कमी तीन लिटर पाणी घ्या.

३)भोजनाची वेळ पाळा.

४)चौरस आहार घ्या.जिभेचे चोचले टाळा,जाऊ तिथे खाऊ धोरण टाळा.

५)जेवणा पुर्वी अर्धातास व जेवणानंतर एक तासाने पाणी प्या.

६)रोज तुळस,बेल,कडुलिंबाची पाच पाच पाने कुटून गोळी गिळा.

७)जंकफूड, पाव,चहा ,बेकरी आयटम कमी खा.

८)रोज त्रिफळा सकाळी दुधा बरोबर पुरक व रात्री गरम पाण्या बरोबर रेचक म्हणून घ्या.

९)सकाळी उठल्या वर थोडे पाणी घेऊन तोडातली पहीली लाळ गुळण्या करुन प्या अँसिडीटी कमी होईल.

१०)सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना गरमपाणी घ्या.

११)महीन्यातून एकदा ऐरंडेल घ्या कोठा म ऊ होतो.

१२)जेवणात मेथीचा प्रयोग करा,सकाळी उठल्या उठल्या मेथीचे दाणे चाऊन खा.

१३)महीन्यातून एकदा तरी लंघन उपवास करा हलके अन्न खा.

१४)प्राणायाम, योगा,चालणे कमीत कमी ४५मिनिटे करा.

१५)मन एखाद्या ठिकाणी एकाग्र करा.

१६)संगीताचा शरीरावर पुर्ण पाँझिटिव्ह इफेक्ट होत असल्याने सकाळी इनस्ट्रुमेंन्टल धून ऐकत जा.

स्वतः ला तणाव विरहित ठेवा.

आणि आनंदी जगा.

   ..आणि हो मोबाईलच्या आहारी जाऊन जागरण करू नका.

 पहा पटतंय का मंडळी.

ता.क.दुपारी बिलकुल झोपू नका .डायबेटीस चा धोका वाढतो


वैद्य.गजानन


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*





मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*

 *मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ*


*केळी* - कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. (मुलांना सतत कफ व सर्दी च्या तक्रारी नसल्यास)


*साय असलेले दूध* - यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते.


*भात -* यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चिकू* - यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते.


*मासे* - यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे.


*सोयाबीन* - सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये प्रोटीन असते. यामुळे मुलांचे वजन वाढते.


*डाळ* - यामध्ये प्रोटीन अधिक असते. ते मुलांचे वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते.


*चीज* - यामधील भरपूर प्रोटीन आणि फॅट मुलांचे वजन वाढवण्यासाठी चांगले आहे.


*अंडी*- प्रोटीनयुक्त मुलांना दररोज खाऊ घातल्याने त्यांचे वजन लवकर वाढेल.


*दही* - यामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते. त्याचा मुलांची उंची वाढवण्यात फायदा होतो.


*संत्री* - यामधील व्हिटॅमिन सीमुळे मुले ऊर्जावान राहतात आणि त्यांनी कमजोरीही दूर होते.


*डाळिंब* - यामधील अँटीऑक्सिडंट्स बुद्धी तल्लख करण्यामध्ये मदत करतात.


*पालक* - यामधील लोह, कॅल्शियममुळे मुलांची उंची वाढवण्यात मदत होते.


*पनीर* - यातील फायबर, फॉस्फरसमुळे पचन चांगले होते व दात मजबूत राहतात.


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

 महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी

     -ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर.

            मुंबई, दि. 28: महाराष्ट्र देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरोवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.


            महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. राज्याच्या जडणघडणीचा हा प्रवास ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांच्याकडून 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाज माध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी घेतली आहे.

            महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येतील.

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR   


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.

co/MAHARASHTRADGIPR


महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

 महाराष्ट्र दिनी माहीम, शिवाजी पार्क, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध


          मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहीम, शिवाजी पार्क आणि वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही उड्डाण क्रियांना प्रतिबंध असल्याचे आदेश बृहन्मुंबई पोलीस उप आयुक्त (अभियान) यांनी काढले आहे.


            या परेड समारंभाच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उत्सवासाठी एकत्र येणे अपेक्षित आहे. त्याकरिता शिवाजी पार्क परिसरातील अवांछित कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याने हा आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश ०१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 


00000

Featured post

Lakshvedhi