Thursday, 27 April 2023

सत्संगती सदा घडो

 *गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते, तर साप दूध पिऊन देखील विषच देतो.ll*

*तसंच काही लोकांचं असतं.ll*

*तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात,*

 *व जे कृतघ्न नसतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,*

*हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच भाग असतो.।।*

*आपण आपले कर्तव्य करत जावे.।।*


*🌹🌹🌹शुभ सकाळ🌹🌹🌹*

हे माँ तेरे सुरत से अलग

 


वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे

 वार्षिक उद्योग पाहणी अहवालासाठी उद्योगांनी सहकार्य करावे


- विजय आहेर


            नागपूर, दि. 26 : वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.


            सन 2021-22 या वर्षासाठी संचालनालयाकडून नागपूर येथे नुकतेच तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे जिल्हा कार्यालयांतर्गत उपक्षेत्र काम करणारे कर्मचारी असे एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. या कार्यशाळेत उपस्थितांना संबोधित करताना संचालक श्री. आहेर बोलत होते.


            संचालक श्री. आहेर पुढे म्हणाले की, वार्षिक उद्योग पाहणी (Annual Survey of Industries) हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) आकडेवारीचा महत्त्वपूर्ण प्रमुख स्त्रोत आहे. वार्षिक उद्योग पाहणीतील आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (GDP) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी तसेच उद्योगविषयक धोरण निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते. तर राज्यातील माहितीचे समन्वयन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून करण्यात येते.


            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना माहिती दिली. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होण्यासाठी पाहणीचे काम अतिशय महत्वाचे असल्याचे सांगून यासाठी उद्योग विभागाकडून सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.


            राष्ट्रीय सांख्यिकी उपमहासंचालक सौम्या चक्रवर्ती यांनी बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वाधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहित वेळेत संकलित करून उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


            यशदाचे महासंचालक श्री. चोकलिंगम यांनी देशातील सर्वेक्षणाचा, माहितीचे महत्त्व, त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित - अनपेक्षित परिणाम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. माहिती तंत्राज्ञानात होत असलेल्या, नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशीअल इंटीलिजन्स व मशिन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानाचा विचार करून माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.


            यावेळी सहसंचालक नवेन्दु फिरके, उपसंचालक रणबीर डे, बाप्पा करमरकर उपस्थित होते.


             दुसऱ्या दिवशी अर्थतज्ज्ञ व प्राध्यापक डॉ. प्रदिप आपटे, अपर संचालक डॉ. जितेंद्र चौधरी, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी पुष्कर भगुरकर, यशदाचे उपमहासंचालक डॉ.मल्लीनाथ कलरोही यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे

 प्रत्येक मुलाच्या लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 26 : सन २०१९ - २०२१ या करोना काळात जगभरातील जवळ-जवळ साडे सहा कोटी लहान मुलांचे पूर्णतः किंवा अंशतः लसीकरण होऊ शकले नसल्याचे युनिसेफ अहवालाने नमूद केले आहे. अत्यावश्यक लसीकरणाअभावी अनेक मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. भारताची लसीकरणातील कामगिरी सर्वोत्तम आहे. तरी देखील राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत पोहोचून त्याचे लसीकरण करण्यासाठी युनिसेफ महाराष्ट्राने राज्य शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. 


            'युनिसेफ' संघटनेतर्फे तयार करण्यात आलेल्या 'जगातील लहान मुलांची सद्यस्थिती – २०२३: लसीकरण, प्रत्येक मुलाकरिता' या अहवालाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २५) राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या अहवालाचा मुख्य विषय 'लसीकरण' हा आहे.


            अहवाल प्रकाशन कार्यक्रमाला युनिसेफ महाराष्ट्राच्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी राजश्री चंद्रशेखर, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य अधिकारी, पालघर व नाशिक येथील 'आशा' सेविका, लाभार्थी मुलांच्या माता तसेच युनिसेफच्या संवाद तज्ज्ञ डॉ स्वाती महापात्रा उपस्थित होते. 


            जगात नैसर्गिक आपत्ती वा मनुष्यनिर्मित आपत्ती असो, युद्ध अथवा गृहयुद्ध असो, त्यामध्ये महिला व मुले सर्वाधिक बाधित होतात. गरिबीमुळे देखील अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहतात. त्यामुळे युनिसेफने लसीकरणाच्या दृष्टीने उपेक्षित घटकातील मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानात’ भारताने स्पृहणीय कामगिरी केली असून लसीकरणासाठी सर्व मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी देखील राज्याकडे सुसज्ज यंत्रणा आहे, असे सांगून लसीकरणाच्या बाबतीत भारताने जगासमोर आदर्श ठेवला आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 


राज्यात दररोज ४ हजार ८०० बालकांचा जन्म


            राज्यात वर्षाला १७.४७ लाख मुले व दिवसाला ४ हजार ८०० मुले जन्माला येतात. या सर्व नवजात शिशूंचे पूर्णपणे लसीकरण करण्याची व्यवस्था शासनाकडे असल्याचे आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून शासन युनिसेफच्या मदतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.


            लसीकरणावर केवळ १ डॉलर इतका खर्च केला, तर त्याचा परतावा २६ डॉलर इतका होतो, असे सांगून युनिसेफ क्षमता निर्माण, प्रभावी शीत साखळी व्यवस्थापन, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक एकत्रीकरण व संबंधित धोरणासह सरकारला सहकार्य करीत असल्याचे युनिसेफच्या राजश्री चंद्रशेखर यांनी सांगितले.


            यावेळी आशा सेविका माया विकास पिंपळे व वैशाली पाटील तसेच लसीकरणाच्या झालेल्या लाभार्थ्यांची माता उर्मिला ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


**


Governor Ramesh Bais releases 'UNICEF State of World's Children Report for 2023


 


            Maharashtra Governor Ramesh Bais released the UNICEF State of the World's Children Report - 2023 - For Every Child, Vaccination at Raj Bhavan Mumbai on Tuesday (25 April). The focus of this year's report is Immunization. 


            Chief Project Officer of UNICEF Maharashtra Rajashree Chandrashekhar, Secretary of Public Health Department Nawin Sona, ASHA workers and invitees were present.


**

ग्राहकाभिमुख ‘महारेरा’कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण

 ग्राहकाभिमुख ‘महारेरा’कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण


- महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू


           


            मुंबई, दि. 26: “ 'महारेरा' कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शकपणे व नियमित करणे ही या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्ट्ये आहेत”, अशी माहिती महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.


            महारेरा हा “ग्राहकाभिमुख” कायदा असून या कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीला पायबंद घातला जाणार आहे. भूखंड, अपार्टमेंट, इमारत तसेच कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पाच्या खरेदी आणि विक्रीमध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी हा कायदा महत्वाची भूमिका पार पाडत आहे. या कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकांना आपल्या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा, परवानग्या व इतर आवश्यक कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मोठमोठ्या आकर्षक व अवास्तव जाहिराती करुन ग्राहकास भूलवणे अशक्य होणार आहे. ग्राहक आणि बांधकाम व्यवसाय यावर या कायद्यामुळे कसा परिणाम होऊ शकतो, ग्राहकांनी घर खरेदी करतांना कोणत्या नियमांचे काटेकोरपणे वाचन व पालन केले पाहिजे अशा विविध विषयांवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती डॉ. प्रभू यांनी दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत, गुरुवार दि. 27 एप्रिल 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या पुढील समाजमाध्यमांच्या लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत निवेदक रिताली तपासे यांनी घेतली आहे.


महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


0000


 

ADHS मुंबई जागतिक मलेरिया दिनानिमित्त उरण भागातील 130 हून अधिक गावांमध्ये डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करणार आहे

 ADHS मुंबई जागतिक मलेरिया दिनानिमित्त उरण भागातील 130 हून अधिक गावांमध्ये डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करणार आहे.


हार्ट फाउंडेशनचा नॉव्हेल पब्लिक आयईसी ओरिएंटेड इनिशिएटिव्ह, आणि अमेय लॉजिस्टिक, नवी मुंबई द्वारे समर्थित

नवी मुंबई : सन 2030 पर्यंत मलेरिया आणि डेंग्यूचे समूळ उच्चाटन करण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून आरोग्य सेवा मुंबईच्या अस्तित्त्व संचालक कार्यालयाने हार्ट फाउंडेशन आणि अमेय लॉजिस्टिक्स, उरण यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबवला आहे. उरणच्या जवळपास 130 गावांमध्ये 130 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित करून विविध आरोग्य समस्या, त्यांची लक्षणे आणि खबरदारी याविषयी माहिती प्रदर्शित करणे. पूर्वी, ADHS कार्यालयाने खारघरमधील विविध सोसायट्यांमध्ये 80 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड वितरित केले होते.


अशी सामान्य जागरूकता वाढवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हा संयुक्त उपक्रम डॉ. बाळासाहेब सोनवणे, सहाय्यक यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आणि त्याचे अनावरण करण्यात आले. संचालक आरोग्य सेवा NVBDCP. मुंबई, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. तसेच डॉ. राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी-रायगड, डॉ. जयकर एलिस, संस्थापक अध्यक्ष हार्ट फाउंडेशन आणि आयईसी समन्वयक यांच्या उपस्थितीत, डॉ. आर.जी इटकरी, THO- उरण, श्री. धुमाळ आणि श्री. किर्वे. , आरोग्य पर्यवेक्षक सहसंचालक कार्यालय - पुणे, डॉ. धाडवड, वै. अधिकारी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री. अरुण परदेशी, आरोग्य सहाय्यक आणि अमेय लॉजिस्टिक, नवी मुंबईच्या कु. शुभांगी मोकल आणि छाया पाटील ह्या सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्याचा आम्हाला आनंद आहे. तसेच, कोणताही उपक्रम सार्वजनिक आणि समाजाच्या मोठ्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि एकत्रितपणे आम्ही निश्चितपणे ध्येय साध्य करू.

“माझ्या रायगड परिसरात विशेषतः उरणमध्ये आम्ही हे 130 डिजिटल IEC डिस्प्ले बोर्ड लॉन्च करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. हार्ट फाऊंडेशनचे डॉ. जयकर एलिस आणि अमेय लॉजिस्टिक्स यांनी पुढे येऊन या अत्यंत आवश्यक कार्याला पाठिंबा दिल्याबद्दल मी आभारी आहे” डॉ. राजाराम भोसले म्हणाले.

यावेळी बोलताना सु. शुभांगी मोकल, अमेय लॉजिस्टिक्स, नवी मुंबई म्हणाल्या, “अमेय लॉजिस्टिकला या CSR उपक्रमाचा एक भाग होण्याचा बहुमान मिळाला आहे. रोग सर्वत्र पसरत आहेत आणि जागरूकतेचा अभाव आहे ज्यामुळे विविध मृत्यू होतात. पण या उपक्रमात आम्ही त्याबद्दल बोलतो आणि त्यांना स्वतःची काळजी घेण्यास मदत करतो. आम्हाला खरोखर लोकांच्या आरोग्याच्या प्रतिबंधात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि या उपक्रमाद्वारे आम्ही ते करत आहोत, म्हणून आम्ही याचा एक भाग बनल्याबद्दल आभारी आहोत.”चित्र 1: डावीकडून उजवीकडे: डॉ. महेंद्र धाडवड, श्री. किर्वे, डॉ. इटकरे, डॉ. जयकर एलिस संस्थापक अध्यक्ष हार्ट फाउंडेशन आणि आयईसी समन्वयक, कु. शुभांगी मोकल, अमेय लॉजिस्टिक, डॉ. बाळासाहेब सोनवणे सहाय्यक, संचालक आरोग्य सेवा NVBDCP. मुंबई. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन. डॉ.राजाराम भोसले आणि श्री.धुमाळ.

चित्र 2:- आशा स्वयंसेविका आणि आरो



चेहरा सुंदर होण्यासाठि...... अप्रतिम उपाय....👇*

 *चेहरा सुंदर होण्यासाठि...... अप्रतिम उपाय....👇*



  मसूर डाळ तुपासह घोटुन तयार केलेला लेप दुधात मिसळून चेहर्यावर लावावा. असे सात दिवस केल्यास, चेहरा गुलाबासारखा टवटवीत व सुंदर होतों..

२)##वांगदूर #होण्यासाठि... डाळिंबाची साल मधासह वाटून याचा लेप लावावा. वांग समूळ नष्ट होतात.

३) ,##तारुण्यपिटिका ##जाण्यासाठि..धने, वेखंड , लोध्र, यांचा दूधासह वाटून याचा लेप चेहऱ्यावर लावावा. पिंपल्स, मुरूमे जातात.त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळी तुळशीच्या पानांचा रस व मध यांचे मिश्रण घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि त्वचा तजेलदार होते.

४) अल्प प्रमाणात आठवडाभर द्राक्षाचा रस घेतल्यास निस्तेज त्वचा उजळते. तसेच द्राक्षाचा रस सर्वांगाला लावल्याने त्वचा उजळते.

५) त्वचा नेहमी चांगली राहावी यासाठी ३-४ थेंब लिंबाचा रस, चिमुटभर हळद, एक चमचा भरून काकडी रस, एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्याला लावावे.

६) काकडिचा रस, संत्र्याचा रस, पपयीचा गर, सीताफळाचा गर, यापैकी जे उपलब्ध असेल तो चेहर्याला लावा. यामुळे त्वचा उजळते. व काळसर पणा जाईल. व त्वचा मऊ होते.

७) त्वचेला घट्टपणा यावा यासाठी त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी ग्लिसरीन, अंड्याचा पांढरा भाग,३-४ थेंब मध, या मिश्रणाचे चेहर्यावर दोन थर द्यावेत. हे वाळल्यावर कोमट पाण्याने धुवावे.

८) त्वचा अतिशय नाजूक असते.हे लक्षात घेऊन मेक अप करताना ही काळजी घ्यावी. व मेक अप उतरवताना काळजी घ्यावी. त्यासाठी क्लिंजिंग म्हणून कच्च्या दूधाचा वापर करावा. तसेच..१ टेबल स्पून तांदूळ पिठी, व २ टेबल स्पून दहि एकत्र करून तयार झालेले मिश्रण क्लिंजिंग प्रमाणे वापरता येईल..

                          


९) जायफळ दूधामध्ये उगाळून लावावे. याने चेहऱ्याची त्वचा उजळते. व काळे डाग जातात.


   ###तेलकट ##त्वचेसाठि... रात्री कच्च्या बटाट्याचा किस चेहर्याला चोळून सकाळी थंड पाण्याने धुऊन घ्या. याने तेलकट पणा जातो.

चेहर्यावरील तेलकट पणा जाण्यासाठी, व चेहरा उजळण्यासाठी रात्री मसूर डाळ पाण्यात भिजवून सकाळी वाटून दूधामध्ये मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावावे याने चेहरा उजळतो.

१०) पिंपल्स असेल तर आठवड्यात एक दिवस गरम पाण्याने वाफ घ्यावी. नंतर पाव चमचा गुलाब पावडर, अर्धा चमचा चंदनपावडर, ग्लिसरीन, गुलाब पाणी यांचा., फेसपॅक, करून लावून ठेवा. त्वचा मवू होईल. जांभूळ बी उगाळून लेप लावावा.

११) रोजच्या आहारात पुदिना पाने वापरावे. याने पोटाचे विकार होत नाही. वपिंपल येत नाही. सितोपलादी चूर्ण, व मध मिसळून हे चाटण घ्यावे, चेहर्यावर फोड, फुंसी येत नाही.

१२) चेहर्यावर जास्त पिंपल्स येत असेल तर बाजरिच्या पिठाचा लेप लावावा. चेहरा तेजस्वी होतो.

 मेरिगोल्ड जेल.. चेहर्यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा..


              


१३) ##कोरड्या ##त्वचेसाठि.... कोरडेपणा कमी करण्यासाठी चेहरा दिवसातून एकदा तरी कच्च्या दूधाने धुवावा., त्वचा मवू, मुलायम होण्यासाठी सर्वांगाला लोण्याने मसाज करावा. यामुळे त्वचा मवू होईल. 

        रात्री झोपण्यापूर्वी तीळ, बदाम, लवंग असलेल्या तेलाने मालिश करा. थंडित कोल्ड क्रीम, माॅईच्शरायजर आवर्जून वापरावे. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

         नारळाच्या पाण्यात ताजि साय मिसळून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्याला लावावे. याने कोरडि त्वचा मऊ होते. व सुरकुत्या सुद्धा जातात.

     चेहरा मुलायम होण्यासाठी कलिंगड रस चेहऱ्याला लावावा. पंधरा मिनिटे ठेवावे व नंतर धूवावे.

 १४) ###निस्तेज ##चेहरा....चंदन पावडर एक चमचा, मंजिष्ठ पावडर एक चमचा, एक चमचा कापूर पावडर, अर्धा चमचा आंबेहळद, हे सर्व दूधात मिसळून चेहर्यावर लावावा. व २० मिनिटांनी धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.

.... आवळा, हिरडा, बेहडा समप्रमाणात घेऊन एक चमचा याचे चूर्ण घेउन याचा लेप चेहऱ्यावर लावावे. नंतर धूवावे. चेहरा चमकदार होतो.

          गव्हाचा कोंडा.. यात भरपूर प्रमाणात विटामिन ( इ) असतं. तो सायित मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावावा.यामुळे चेहरा उजळतो..


...... आपण वरिल उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्याचे आरोग्य नेहमी चांगले राहील......


       आयुर्वेद अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे.........



*⭕️

Featured post

Lakshvedhi