Monday, 24 April 2023

संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवरविधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

 संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवरविधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिलला कृतीसत्र

            मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कृतीसत्रात विविध संसदीय आयुधे, समिती पद्धत, विधेयके या विषयांवर तीन सत्रे होतील.

            या कृतीसत्राचे उद्घाटन विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद सदस्य तथा माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, ॲड. अनिल परब, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

            या कृतीसत्रासाठी वक्ते म्हणून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे) सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (समिती पध्दत) सह सचिव डॉ. विलास आठवले व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधेयके) सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे विधानपरिषद सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप, कपिल पाटील आणि एकनाथराव खडसे - पाटील हे भूषवतील.

            विधानपरिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत यांनी केले आहे.

नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार

 नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीचे पदग्रहण  

मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

  येथील सेंटर पाँईट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर , महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाला, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे आदी मंचावर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकारचेही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू करणार तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले. त्यांनी क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, श्री फडणवीस यांच्या हस्ते क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारीणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवर्तमान अध्यक्ष विजय दर्गण आणि नवनियुक्त अध्यक्ष गौरव अग्रवाला यांनी उपस्थितांना संबोधित केले.   

000

प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही

 प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लिक झालेला नाही  

                                              - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

            मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित अराजपत्रित गट ‘ब’ व गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे २१ एप्रिल २०२३ रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणतीही अन्य विदा (डेटा) लिक झालेला नाही, याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांची वैयक्तिक विदा (डेटा) आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा असून, अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचे आयोगाने खुलासा केला आहे.    

             आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशप्रमाणपत्रे लिक करणा-या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलीसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उमेदवारांना कळविले असल्याचे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी पत्राद्वारे कळविले आहे.

00000

पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज

 पर्यावरण संवर्धनाबरोबर शाश्वत विकासासाठी इंधन बचत ही काळाची गरज

- मंत्री रवींद्र चव्हाण

‘ सक्षम २०२२’ मध्ये देशात महाराष्ट्राला प्रथम क्रमांक

         मुंबई, दि.२४ : “देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे”, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.  

           नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर व्हावा, यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA), पेट्रोलियम, नैसर्गिक मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३ )चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

           यावेळी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक अनिलकुमार पी, इंडियन ऑइलचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित धक्रास, राजीव श्रेष्टा, एचपीसीएलचे व्यवस्थापक अकेला वि.ऐन.एस. के. लक्ष्मणराव, गेलचे व्यवस्थापक शंतनू बासू, पीसीआरएचे अधिकारी उपस्थित होते.

        मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, ‘सक्षम २०२२’ मध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. इंधन बचत या उपक्रमांतर्गत राज्यात सर्वाधिक कार्यक्रम करून देशात सर्वोच स्थान पटकावले, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करा इंधन बचतीचा संदेश घरोघरी पोहचवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हे देखील घरोघरी पोहोचवले असून याच धर्तीवर ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे या उपक्रमाची राज्यभरात प्रचार व प्रसिध्दी उपक्रम राबवावेत. नव्या पिढीला ही आव्हाने समजली पाहिजेत, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.

इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध नाटिकांचे सादरीकरण यावेळी विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध वादविवाद स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.

        तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक संतोष निवेंदकर म्हणाले, की २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत ‘ऊर्जा संरक्षण नेट झीरोच्या दिशेने’ या टॅग लाईनसह संरक्षण क्षमता महोत्सव ‘सक्षम-२०२३’ चे आयोजन केले असून, सक्षम-२०२३ अंतर्गत राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध १००० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अतिरिक्त संचालक नंदन गजभिये यांनी आभार मानले.      

वृक्षवल्ली आम्हा सोयरे ....पिंपळ....

...पिंपळ....*

...पिंपळ हा एक महान औषधी व्रुक्ष आहे.. हा .. मोरेसि,, म्हणजे .. वट, कुलातिल व्रुक्ष आहे. याचे शास्रिय नाव

,, फायकस रिलिजि ओसा (Ficus religious) आहे.

.... या व्रूक्षाला भरपुर आयुष्य आहे. म्हणून याला..,, अक्षय,, व्रूक्ष म्हणतात... अश्वत्थ,, हे देखिल याचे नाव..

.. पिंपळाचे सर्व अवयव उपयुक्त आहे. पिंपळ हा शीत, कफ- पित्तशामक, रक्तशुद्धिकर व जखम भरून काढणारा आहे..

अश्या या गुणकारी व्रुक्षाचे औषधि महत्व जाणू या...

.१) पिंपळाची ५'१०, फळे रोज खाल्लयाने बद्धकोष्ठ दूर होते.

२) पिंपळाचि पाने दुधात बुडवून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांचे दुखणे कमि होते

३) विषारि साप चावल्यास कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या व त्याचि पाने चावून खा. याने विषाचा असर कमी होतो.

४) पोटदुखि..// पिंपळाच्या २-५ पानांचि पेस्ट बनवून व त्यात ५० ग्रँम गूळ घालुन याच्या गोळ्या बनवा व दिवसातून ३-४ वेळा खा. त्वरित पोटदुखि थांबते..

५) अस्थमा..// पिंपळाच्या झाडाचि साल व पिकलेल्या फळांचि वेगवेगळि पावडर बनवछन ती समप्रमाणात एकत्र करुन हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा समूळ नष्ट होतो.

   ६) मधुमेह..// पिंपळाचि साल पाण्यात उकळवून मग गाळून हे पाणि रोज घेतल्यास हळूहळू रक्तशर्करा नियंत्रित होते..

७) काविळ..// पिंपळाचि पाने ३-४ खडिसाखरेसह बारिक वाटून २५० मिलि पाण्यात मिसळून हे सरबत दिवसातून २ वेळा प्या. ३ दिवसात काविळ बरी होते..

८) खोकला..// पिंपळाचि ५ पाने दूधात उकळवून मग त्यात साखर टाका. व मग दिवसातून दोन वेळा घ्या. कोरडा, ओला, खोकला बरा होतो..

९) ह्रुदयरोग..// पिंपळपाने १५-२० घेउन एक ग्लासपाण्यात उकळवून मग थंड करून हा काढा दर तिन तासाने दिवसभर प्या.याने हार्ट अटँक येत नाही..

१०) रक्तशुद्धि..// वातरक्त..व रक्तविकारावरहि पिंपळसालिचा उपयोग होतो. साधारण ४० मिलि काढा तयार करून त्यात मध मिसळा व घ्या. तसेच पिंपळाच्या बियांचे चूर्ण मधासह रोज घ्या.. रक्तशुद्धि होते..

११) क्षयरोग..// पिंपळमूळ पाण्यात उगाळुन हे पाणि दररोज प्यावे लवकरच टि.बि. बरा होतो..

१३) टायफाँईड..// पिंपळसालिचे चूर्ण बनवून मग हे मधात मिसळून दोन तिनदा खावे. टाफाँईड बरा होतो..

 १४) जुलाब..// पिंपळवेल, धणे, व खडिसाखर समान भागात एकत्र करुन रोज स. सं.. पाच ग्ँम खावे. जुलाब थांबतात..

१५) ज्वर- मुदतिचा ताप..// १०-१२। पिंपळ पाने घेऊन याचा काढा बनवून मग दिवसभर थोडा थोडा घेत राहावे.. याचे सेवन केल्याने ताप उतरण्यास सुरवात होते. पिंपळ हा थंडावा देत असल्याने ताप उतरतो..

१६) दातदुखि.. व हिरड्यांचे आजार...// पिंपळाचि साल उकळून घेउन याने चूळ भरल्यास दातांचे आजार बरे होतात. तसेच पिंपळवेल ताजि घेउन याने दात घासावे दात मजबुत होतात.. हिरड्यांचि सूज निघून जाते.

.... याशिवाय.. पिंपळसाल, व २ ग्रँम काथ, व २ ग्रँम काळि मिरी एकत्र वाटुन या पावडरने दात घासावे. दात वज्रासारखे मजबूत होतात..

१७).पिंपळ सालिचे जाळुन राख करून ति मधातुन चाटण्यास दिल्याने उलटि व उचकि थांबते.

१८) हाडांच्या मजबुतिसाठी पिंपळ उपयुक्त आहे..

.. लाक्षादि गुगुळ. मध्ये याची लाख वापरतात.

१९) पिंपळाच्या सालिचि पूड जखमांवर टाकल्यास जखमा लवकर भरतात.. खाज खररज यावर पिंफळ साल ऊकळवून हे पाणि प्यावे..

२०) पिंपळपाने घेउन याचि भाजि करावी. हि खाल्यास शौचसाफ येते.. त्वचारोग बरा होतो, गर्भाशयाचे रोग बरे होतात..

२१) धातुरोग व मासिक पाळिचे विकार..// सावलीत वाळवलेले पिंपळ फळांचे एक चतुर्थांश चमचा चूर्ण १ ग्लास कोमट दुधात मिसळून रोज प्यायल्याने धातुदौर्बल्य दूर होते. स्रियांचा जुना प्रदर रोग, व मासिक पाळिचि

 अनियमितता दूर होते..

२२) मलावरोध..// पिंपळाचि सुकवलेले फळे, छोटे हिरडे, व बडिशेप समभाग मिसळून वाटून घ्यावे. ३ ते ५ ग्रँम चूर्ण रात्रि कोमट पाण्यातून घेतल्याने मलावरोध दूर होतो..

... हा व्रुक्ष जितका औषधि आहे. तितकाच धार्मिक पण आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या आईने आळंदिला सुवर्णपिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. पिंपळाचि सेवा केलि, त्यांच्या पोटि.. ज्ञानेश्वर जन्माला आले..

....।। पूर्वि तर ,, गुरुकुलात,, मंद बुद्धिच्या मुलांना दर रविवारि पिंपळाच्या पत्रावळि करून त्यावर गरम भात खाउ घालायचे. याने मुलांचि स्म्रूति वाढायचि..

.. गौतम बुद्धानी याच व्रूक्षाखालि तपस्या करून ज्ञान मिळवले म्हणून याला...,, बोधिव्रुक्ष,, असेहि म्हणतात..

.. हा व्रूक्ष वातावरण शुद्ध ठेवतो, आँक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करतो. याच्या झाडाखालि बसल्यास .. दमा.. पुर्ण बरा होतो..

... तेव्हा असा हा वंदनिय व्रुक्ष.. भारतात. भरपुर ठिकाणी आढळतो.. . महान व्रुक्षाला नमन...🌹

 आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.....

*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची

 ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक

     मुंबई, दि. २३- ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

        पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी 

दिल्या.

नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार.

 नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीचे पदग्रहण  

मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.

  येथील सेंटर पाँईट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर , महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाला, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे आदी मंचावर उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकारचेही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू करणार तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले. त्यांनी क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी, श्री फडणवीस यांच्या हस्ते क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारीणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवर्तमान अध्यक्ष विजय दर्गण आणि नवनियुक्त अध्यक्ष गौरव अग्रवाला यांनी उपस्थितांना संबोधित केले.   

000

Featured post

Lakshvedhi