Monday, 24 April 2023

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची

 ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली तातडीची बैठक


     मुंबई, दि. २३- ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


        पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे, परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी 

दिल्या.


नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार.

 नागपूर देशातील सर्वोत्तम शहर बनवणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीचे पदग्रहण  


 


मुंबई, दि.23 : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.


 


  येथील सेंटर पाँईट हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर , महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., क्रेडाई नागपूर मेट्रोचे अध्यक्ष गौरव अग्रवाला, महासचिव एकलव्य वासेकर, कोषाध्यक्ष आशिष लोंढे आदी मंचावर उपस्थित होते.


 


श्री. फडणवीस म्हणाले, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.


 


रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकारचेही या क्षेत्राकडे लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 व्दारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले.


 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्टया सुरू करणार तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे श्री फडणवीस म्हणाले. त्यांनी क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


तत्पूर्वी, श्री फडणवीस यांच्या हस्ते क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारीणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. निवर्तमान अध्यक्ष विजय दर्गण आणि नवनियुक्त अध्यक्ष गौरव अग्रवाला यांनी उपस्थितांना संबोधित केले.   


 


000


 


 


 



मान्सूनच्या स्वागतला केरळला येणार का?

 मान्सूनच्या स्वागतला केरळला येणार का?


मान्सून अर्थात मोसमी वारे ही भारताची ओळख, अगदी हजारो वर्षांपासूनची. हे वारे आणि त्यांच्यासोबत येणारा पाऊस यांनी भारताला विशिष्ट हवामान दिलं, विविधता दिली, जीवनशैली आणि स्वतंत्र ओळख दिली. मान्सून समजून घेणं, अनुभवणं याच्याइतकी रोमांचक दुसरी गोष्ट नाही. आणि हे सारं केरळमध्ये जाऊन अनुभवणं ही तर केवळ धमाल !


मान्सूनचं केरळात आगमन होतं, त्यावेळी त्याला सामोरं जाण्याचं "भवताल" चं नियोजन आहे. मान्सूनचं स्वागत, तो तज्ञांसोबत समजून घेणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं... एक्साइटेड असाल तर, २ जून ते ९ जून या तारखा राखून ठेवा. लवकरच जाहीर करत आहोत.


Welcoming Monsoon @Kerala


-


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com

महागाई नाहीं

 महागाईने त्रस्त नागरिकांची सोने घेण्यासाठी तुफान गर्दी 😀


Sunday, 23 April 2023

आरोग्य संदेश. - बकुळ महत्त्व

 *बकुळ......(Mimasops. Elengi)..*


     दातांच्या रोगांवर बकुळ फार उत्तम औषध आहे. दात हालत असल्यास बकुळीच्या सालिचे चूर्ण लावून दात घासले असता दात घट्ट होतात. बकुळीच्या सालिचे काढ्याने गुळण्या केल्यास म्हणजे वारंवार चुळा भरुन टाकल्यास हिरड्या मजबूत होतात..

.....##धावरे..( सूज) बकुळीची साल गंधासारखी पाण्यात उगाळून त्याचा लेप तिथे दिला असता सूज उतरते. बकुळ थंड आहे. कडकि.... चांगली पिकुन पिवळि झालेली बकुळीची गोड लागणारी फळे नित्यनेमाने १०,१२, खाल्यास थोड्याच दिवसात कडकि, उष्णता कमी होते...


       


      ##बकुळिचे ##सरबत.... युरिन साफ होण्यासाठी, युरिनरी ट्रॅकचे सर्व प्राॅब्लेम दूर करण्यासाठी

..या फळाचे सरबत करून पितात.. क्रुति... चांगलि पिकलेलि बकुळीची फळे २५-३० घेऊन २ कप

  पाण्यात कुस्करून व त्यात ,५० ग्रॅम साखर मिसळून ते गाळून घ्यावे. सरबत प्यायल्यावर तास दोन तासातच युरिन साफ होते.. मूतखड्यात युरिनचि जळजळ होणं थोडि थोडि युरिन होते . अशा वेळी

    हे सरबत फार लागू होते. आणि असे सातत्याने करत राहावे.. मूतखडा विरघळून पडतोच

            बकुळीच्या फुलांचे चूर्ण करून ते तपकिरी सारखं नाकात ओढल्यास डोकेदुखी थांबते..

......

............. आयुर्वेद अभ्यासक....... सुनिता सहस्रबुद्धे...

       

  


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन lakshvedhimm. blogspot.com




स्त्रीला काय हव असतं??

 "स्त्रीला काय हव असतं?? " 💞💞💞💞


  एका विद्वान माणसाला फाशीची सजा सुनावण्यात आली होती.

राजानं त्याला विचारलं, " तुला मी सोडून देईन जर तू माझ्या एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंस तर!"


               प्रश्न असा होता, की ....

   स्त्रीला नेमकं काय हवं असतं?


विद्वान म्हणाला, "राजन, मला या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी मुदत हवी आहे."


  राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली.


        विद्वान बराच फिरला, 

         अनेक लोकांची त्यांनं भेट घेतली,

                पण कुणाकडूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही.

   


      शेवटी कुणीतरी त्याला सुचवलं. म्हणालं, 

    "दूर जंगलात एक हडळ राहाते 

        ती नक्की सांगू शकेल ...

          या प्रश्नाचं उत्तर."


   विद्वान तिच्यापाशी जाऊन पोहोचला, 

     आणि त्यानं आपला प्रश्न तिला विचारला. 

          हडळ म्हणाली ...

      "मी सांगेन या प्रश्नाचे उत्तर,

    पण त्यासाठी तुला माझ्याशी विवाह करावा लागेल."


 विद्वानांनं विचार केला, बरोबर उत्तर मिळालं नाही 

  तर जीव ... राजाच्या हातून जाणारच आहे, 

    म्हणून मग त्यानं विवाहासाठी तिला रुकार दिला. 


   लग्न झाल्यानंतर हडळ म्हणाली,

    "तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं आहे,

    म्हणून मी तुम्हाला खुश करण्याकरता 

         निर्णय घेतला आहे की ...

       १२ तास ... मी हडळ आणि 

 १२ तास सुंदर परी होऊन राहीन.


        आता तुम्ही मला सांगा ...

    दिवसा हडळ होऊन राहू की रात्री ?


           विद्वानांनं विचार केला ... 

      जर ही दिवसा हडळ झाली,

           तर दिवस सरणार नाही, आणि

      रात्री झाली तर रात्र सरणार नाही .


शेवटी तो विद्वान मनुष्य बोलला, 

       "जेव्हा तुला वाटेल तेव्हा

              परी हो, 

  जेव्हा तुला वाटेल तेव्हा हडळ हो.


       त्याचं हे उत्तर ऐकताच हडळ 

  प्रसन्न होऊन म्हणाली, "तुम्ही मला माझ्या मर्जीनं राहाण्याची सूट दिलेली आहे, 

             त्यामुळे मी नेहमीसाठीच 

        परी बनून राहण्याचा निर्णय घेतला आहे.


 आणि हेच ~ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे."


       🙆🏻‍♀️ स्त्रीला नेहमी ....

    आपल्या मर्जीप्रमाणे वागायचं असतं.


  जर स्त्रीला ....

   तिच्या मर्जीनं वागू देण्याचं स्वातंत्र्य दिलंत, तर ती

👉🏽 परी होऊन राहिल, नाहीतर हडळ. 👈🏽


             


     ◆ निर्णय तुमचा आहे ◆ 

       ◆ खुशीही तुमचीच आहे ◆


   सगळ्या विवाहित पुरुषांना समर्पित...🤐😷


        आता प्रामाणिकपणे सांगा बरं,

            कुणाच्या घरी परी आहे ?

                 💃 😉😂😁

उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*

 *उष्माघाताची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; प्रथमोपचारासाठी काय खबरदारी घ्यावी जाणून घ्या.....*


मागील काही दिवसांपासून उष्माघात हा शब्द अनेकवेळा तुमच्या ऐकन्यात आला असेल. त्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा कार्यक्रम भर दुपारी झाल्यामुळे पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित लोकांपैकी १२ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हापासून उष्माघात या शब्दाची चर्चा सुरु आहे.


*उष्माघात नक्की आहे तरी काय? आणि त्याचा त्रास कशामुळे उद्भवतो...* 

उष्माघाताचा त्रास जाणवायला लागल्याची लक्षण काय आणि त्यापासून स्वत:च रक्षण कसं करायचं याबाबतची माहिती अनेकांना नसते. तीच महत्वपुर्ण माहीती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करु शकता. तर उन्हामुळे वाढलेल्या अनेक समस्यांवर डॉ. प्रदीप आवटे यांनी महत्वपुर्ण माहिती दिली आहे. ज्यामध्ये उष्माघाताच्या समस्येचाही समावेश आहे.


*उष्माघात ( हिट स्ट्रोक) लक्षणे...*

उष्माघाताची समस्या उद्भवताच शरीराचे तापमान १०६ डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. तसेच त्वचा गरम आणि कोरडी पडते. नाडीचे ठोके वेगाने आणि जोरात पडतात. घाम न येणे आणि अर्धवट शुध्दीत असणे, ही उष्माघाताची लक्षण आहेत.


*प्रथमोपचार...*

जर एखाद्याला उष्माघाताचा त्रास जाणवायला लागला तर त्या रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. तसेच त्याला थंड जागी / ए सी मध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. तसेच या रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पॉन्जिग करणं आवश्यक आहे. मात्र यावेळी त्याच्या तोंडाने पाणी देऊ नये.


*उष्माघाताने मृत्यू का होतो...?*

उष्माघात ही अत्यंत गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानास १५ मिनिटाकरता राहते तेव्हा त्याचे अत्यंत विपरित परिणाम शरीरावर होतात. शरीराचे सामान्य तापमान नियंत्रण यंत्रणा काम करत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात. विविध प्रकारचे लायपोप्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिडस अस्थिर होतात. शरीरातील पातळ पडद्यामध्ये असणारे मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते आणि विविध अवयवांचे कामकाज ठप्प होऊ लागते. या रुग्णाला वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढवतो.


उष्माघाताच्या समस्येपासून आपला आणि इतरांचा बचाव करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे उष्णतेपासून बचाव करणे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत, त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये या संदर्भातील माहिती असणे आवश्यक आहे.


*उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करु नये...*


*हे करा...*

पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.

हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्रीचा वापर करा.

उन्हात जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.

कष्टाची कामे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ४ नंतर करा.

ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.


*हे करु नका...*

शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा.

कष्टाची कामे उन्हात करु नका.

पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका.

दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

चहा, कॉफी सारखी ड्रिंक्स टाळा.

खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*

Featured post

Lakshvedhi