Sunday, 23 April 2023

दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

 *दमा होण्याची कारणे, लक्षणे आणि उपचार*

आरोग्य समस्या -arogy

*दमा म्हणजे काय ?*


दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास

घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छवासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय

असा आवाज योतो.


*अस्थमाची लक्षणे -*


◼️खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.

खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही. श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ

खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.


◼️दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.


*दम्याचा झटका येणे किंवा अस्थमाचा* *अटॅक येणे म्हणजे काय..?* 


दम्याच्या रुग्णांना वरचेवर दम्याचा झटका येत असतो त्याला अस्थमा अटॅक (Asthma attack) असेही म्हणतात अनेकदा दमा रुग्णास 

धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, हवेतील

प्रदूषित कण व मानसिक ताणामुळेही अस्थमाचा अटॅक येऊ शकतो. अस्थमाचा अटॅक काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो 


*दमा होण्याची कारणे -*


शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमधील विकृती ही दमा रोगास प्रमुख कारण असते. खालील कारणे ही दमा रुग्णांमध्ये दमा अटॅक 

निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.


◼️ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आर्द्र वातावरणामुळे अस्थमा अटॅक

येतो.


◼️धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र

वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात

आल्यामुळे अस्थमा अटॅक येतो,

सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,

शारीरीक अतिश्रमामुळे, अतिव्यायामामुळे, हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे.


◼️वायु प्रदुषणामुळे ताप, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे रोग उत्पन्न झाल्याने,


◼️मानसिक ताणतणावामुळे अस्थमा रुग्णांना अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.


*दम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावची काळजी :* 


◼️अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी

करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

योग्य आहार, विहार आणि योग्य औषधोपचाराद्वारे दम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,

◼️दम्याचा पहिला दौरा आल्यानंतर भविष्यात अशी स्थिती उद्भवू नये म्हणून सतर्क रहावे, धुम्रपान करु नये,

◼️मानसिक ताणतनाव रहित रहावे,

धुळ, धूर, हवेच्या प्रदुषणापासून दूर रहावे,

◼️दमा रुग्णांनी घरात पाळीव प्राणी पाळू नयेत,

◼️पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

◼️प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे,

◼️ थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये, मोकळ्या हवेत फिरावयास जावे, विटामिन A आणि D युक्त आहार घ्यावा, बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

◼️डॉक्टरांनी दिलेले उपचार घ्यावेत.



आरोग्य समस्या -भूक मंदावणे / भूक न लागणे*

 *भूक मंदावणे / भूक न लागणे* 


✅️खरा श्रीमंत कोण तर ज्याला व्यवस्थित भूक लागते व ज्याचे पोट नीट साफ होते तो आयुर्वेदानुसार सर्व प्रकारच्या आजारांची सुरूवात ही 'भूक कमी होणे' यामुळे होते. वरकरणी ही गोष्ट छोटी जरी वाटत असली तरी अनेक गंभीर आजारांना जन्म देत असते.


✅ बऱ्याचदा आपली भूक व्यवस्थित आहे की नाही हे कळायला मार्ग नसतो ! वेळ झाली म्हणून जेवायला बसतो. भूक लागलेली नसताना जेवण करतो. त्यातून पुढे अपचन होतं आणि रोजचं हे दुष्टचक्र असच सुरु राहतं.


✅️सामान्यात: माणसाला दोन वेळचं जेवण पुरेसे असते. सकाळ जेव्हा भूक लागेल तेव्हा पोटभर जेवण करणे व सायंकाळी सूर्य मावळायच्या आत जेवण! ही खरी आदर्श जेवणाची पद्धत म्हणता येईल. या व्यतिरिक्त मध्ये मध्ये सारखं काहीतरी खाण्याची लागेलेली 'चुकीची सवय' ही भूक कमी करायला कारणीभूत ठरत असते.


 _

उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५ फायदे !*

 *उन्हाळ्यात रोज न चुकता खा चमचाभर गुलकंद; शरीराला थंडावा देणारा पदार्थ, ५ फायदे !* 


उन्हाळा हळूहळू वाढायला लागला की आपल्याला उष्णतेचे त्रास भेडसावू लागतात. यामध्ये तोंड येणे, पुरळ येणे, जळजळ होणे, लघवीच्या समस्या अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करतो.


उन्हाळा सुरू झाला की पाणी जास्त पिणे, पाणीदार फळं खाणे, सरबत, दही, ताक यांचा आहारात समावेश करणे असे उपाय केले जातात. यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे गुलकंद. आयुर्वेदातही गुलकंदाला बरेच महत्त्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून केला जाणारा हा गुलकंद अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे लहान मुलेही तो आवडीने खातात. गुलकंद नुसता खाल्ला तरी चालतो. पण तो दूधातून घेतलेला अधिक चांगला. याशिवाय गुलकंदाचा शिरा, लाडू, फालुदा असे गुलकंदाचे काही पदार्थही करता येतात. पाहूयात उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे...


*१. उष्णता कमी करण्यास फायदेशीर :* 


अनेकदा उन्हाळ्यात लघवीला जळजळ होणे,ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवतात.तोंड आलं असल्यास, तोंडात चट्टे, फोडं आली असल्यास गुलकंद खाणं उपयुक्त ठरतं. तसेच गुलकंदामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे व्हिटॅमिन बी ची कमतरता असणाऱ्यांनी गुलकंद नियमित खावा.


*२. बद्धकोष्ठता :* 


ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायला हवा. जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं, यामुळे पचन चांगल होतं आणि बद्धकोष्ठाची समस्याही दूर होते. गुलकंद आपल्या आतड्यांतील उपयुक्त ठरणारा गट बॅक्टेरिया वाढवण्यात मदत करते. ज्यामुळे आपल्याला जेवण पचवणं सोपं होतं. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामधील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देण्यास मदत करते.


*३. स्मरणशक्तीसाठी फायदेशीर :* 


आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहावी असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोगही करत असतो. मुलांना नियमित गुलकंद दिल्यास, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायदा होतो. वास्तविक गुलकंदामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुण हे स्मरणशक्तीची क्षमता वाढविण्यास उपयुक्त असतात.


*४. त्वचा सतेज राहण्यास मदत :* 


गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. दररोज गुलकंद खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि त्वचा उजळते. तसेच गुलकंद खाल्ल्याने ब्लॅकहेड्स, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.


*५. हृदयासाठी फायदेशीर :* 


उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी तयार करण्यात आलेल्या गुलकंदामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेण्यासाठी नियमित गुलकंद खाण्याचा उपयोग होतो.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



मीरा भाईंदर शहरातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 मीरा भाईंदर शहरातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मीरा भाईंदर मधील योजना वेगाने पूर्ण करू

-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 22 : मुंबईच्या जवळ असणाऱ्या मीरा भाईंदर शहराचे स्थान हे वेगळे आहे. या शहराच्या विकासाला, प्रगतीला चालना देण्यासाठी व त्याला नियोजनबद्ध स्वरूप देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. राज्य सरकार मीरा भाईंदर शहराच्या मागे भक्कमपणे उभे राहील. या शहरातील योजना अत्यंत वेगाने पूर्ण करू. तसेच प्रलंबित प्रश्नांवर सर्व विभागाची बैठक घेऊन ते सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.


            आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नाने भाईंदर पश्चिम येथील नागरी सुविधा क्षेत्र भूखंडावर मुलभूत सोई सुविधाचा विकास या योजनेतील निधीतून व विकास हक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यातील महावीर भवन इमारतीचे भूमीपूजन, मिरारोड पूर्व आरक्षण क्र.210/211 या जागेवरील हॉस्पीटल इमारतीचे भूमीपूजन, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील पशु-पक्षी उपचार केंद्राचे लोकार्पण, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्ष लोकार्पण, भारतरत्न उस्ताद बिस्मिला खाँ उर्दू शाळा, मिरागाव इमारत लोकार्पण, काशिमीरा उड्डाणपूला खालील संत रविदास महाराज उद्यानाचे लोकार्पण आदी विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता, राजन सिंग,माजी महापौर डिंपल मेहता, जोत्स्ना हंसनाळे, हसमुख गेहलोत, रवी व्यास, राजू भोईर, महापालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


            मीरा भाईंदर शहरवासियाना अक्षय तृतीया, ईद, महात्मा बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईचा विस्तार होताना ठाण्यासारखे महानगर शेजारी उभे राहिले. त्यातील मीरा भाईंदर सारख्या जुळ्या शहरावर सुद्धा लोकसंख्येचा ताण वाढला. मुंबईतील नागरिक चांगल्या निवासासाठी मीरा भाईंदर, वसई विरार मध्ये येऊ लागले. त्यामुळे वेगाने वाढणाऱ्या या शहरात त्या काळात आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत . मात्र 2014 नंतर आम्ही या शहराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून हे शहर झपाट्याने बदलत आहे. या शहराला आधुनिक स्वरूप देण्याचे काम प्रशासन व लोकप्रतिनिधी करत आहेत.


            आज अनेक प्रकल्प या शहरात सुरू आहेत. मीरा भाईंदर शहरात उभे राहणाऱ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी, रेडिएशन या सारखे उपचार व्हावेत. अतिशय परिपूर्ण हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन देईल. शहरात सीसीटीव्ही उभारणी व इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरसाठी सुद्धा निधी देऊ. सर्व्हेलन्स सेंटर मुळे रस्त्यावर घडणारे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहतुकीचे प्रश्न सुटण्यासही मदत होते. वाहतुकीला शिस्त लागते.


            मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाची इमारत यावर्षी होईल. त्या बरोबरच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान व इतर सुविधाही निर्माण करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


 


या शहराच्या पुढील 25 ते 30 वर्षात वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून त्याला आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रकल्प, योजना सुरू केल्या. सध्या या शहरासाठी पाण्याची अडचण आहे. मात्र सुर्या प्रकल्पामुळे पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेल एवढा पाणी पुरवठा होणार आहे. त्यावेळी 24 तास पाणी शहराला मिळू शकेल. या शहरातील मेट्रो च्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ही मेट्रो आता उत्तन पर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला मेट्रोचा लाभ होईल. एमएमआर रिजनमध्ये वाहतूक सुविधा वाढविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. वाहतुकीची एकात्मिक व्यवस्था उभे करण्यात येत आहे. मीरा भाईंदर शहराला आणखी 50 इलेक्ट्रिक बस देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


            आमदार गीता जैन म्हणाल्या की, राज्य शासनाने अगदी थोडक्या काळात या शहराला भरपूर निधी दिला आहे. या शासनाने सुमारे 2500 कोटींचा निधी या शहरासाठी दिला आहे. हा निधी देण्यात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार आहे. कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. कॅन्सर वर येथे आधुनिक उपचार व्हावेत यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे.


            सूर्या प्रकल्प पूर्ण होईपर्यंत शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालावे. तसेच टोल मुक्त व कचरा मुक्त शहर करण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी मदत करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            माजी आमदार श्री. मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित कामे या शासनाच्या काळात वेगाने पूर्ण होत आहेत. बाकीची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी व त्या कामांना चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यावी, अशी मागणी श्री. मेहता यांनी यावेळी केली.


            प्रास्ताविकात आयुक्त श्री. ढोले यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. मीरा भाईंदर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुर्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून काम वेगाने सुरू आहे. तसेच इलेक्ट्रिक बस व मेट्रो साठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी 884 कोटी रुपये निधी मिळाला असून लवकरच येथील सर्व रस्ते खड्डेमुक्त होतील. शहरात लवकरच 11 आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू होणार असल्याचेही श्री. ढोले यांनी यावेळी सांगितले. 


            आमदार गीता जैन व आयुक्त श्री ढोले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्री. पानपट्टे यांनी आभार मानले.


0000

सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन.

 सक्षम-2023 चे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 24 एप्रिल रोजी होणार उद्घाटन.

            मुंबई, दि.22 : नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर करावा यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023) आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे उद्घाटन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणार आहे.


            या कार्यक्रमात इंधन बचतीवर जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. दिनांक 24 एप्रिल ते 8 मे 2023 या कालावधीत ऊर्जा संरक्षण नेट झीरोकडे च्या दिशेने या टॅग लाईन सह संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-2023 ) चे आयोजन केले आहे. सक्षम-2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) यांच्यामार्फत विविध 1000 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. इंधन आणि तेल संवर्धनासाठी शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तेल उद्योगाचे समन्वयक संतोष निवेंदकर यांनी केले आहे.

मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त"


"मुलांमध्ये विज्ञान शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा, कादंबरी उपयुक्त"


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि.22: विज्ञानकथा व विज्ञान कादंबरी वर्तमानातील चिंता - व्यथा विसरायला लावून त्या वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा व विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.      


            स्तंभलेखिका, ब्लॉगर व आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या 'असेन्डन्स' या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.


            अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर केवळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान व मेधावी विद्यार्थी आले पाहिजे, असे सांगताना विज्ञान शिकविण्यासाठी व त्यात मुलांना गोडी लागण्यासाठी ध्येयवादी व बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांची गरज आहे, असे राज्यपालांनी सांगितले.


            विज्ञान कथा - कादंबरी लेखक हे काल्पनिक सृष्टी निर्माण करणारे 'विश्वकर्मा'च असतात, असे नमूद करून राज्यपालांनी लेखिका डॉ साधना शंकर यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. 'असेन्डन्स' ही कादंबरी हिंदी भाषेत अनुवादित झाली असून तिची मराठी व तेलगू आवृत्ती लवकरच प्रकाशित होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.  


            पुरुष व स्त्री यांना अनेक शतके प्रजा निर्मितीसाठी परस्परांची गरज नसल्यास त्यांच्यातील नातेसंबंध कसे असतील या मुख्य संकल्पनेवर ही वैज्ञानिक कादंबरी आधारलेली असल्याचे लेखिका डॉ साधना शंकर यांनी सांगितले. आगामी काळात या कादंबरीवर आधारित टीव्ही मालिका काढण्याबद्दल विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.    


            कार्यक्रमाला परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी व मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. शेषाद्री चारी, गोवानी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


0000

Maharashtra Governor releases Sci-Fi 'Ascendance'


Maharashtra Governor Ramesh Bais released the new edition of science fiction 'Ascendance' by columnist, blogger and Income Tax Director General Dr Sadhna Shanker at Raj Bhavan Mumbai on Sat (22 April).


Former foreign service officer and Member of Human Rights Commission Dr Dnyaneshwar Mulay, film producer Smita Thackeray, columnist Dr Seshadri Chary, Trustee of Ankibai Ghamandiram Gowani Trust Nidarshana Gowani, senior police officer Vishwas Nangre Patil and invitees from various walks of life were present.


0000

मुंबई पुणे सह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या


मुंबई पुणे सह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्या


आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना


पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक

            पुणे, दि. 22: मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.


            कोविड 19 च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाय योजना बाबत आयोजित केलेल्या विशेष कार्य दलाच्या बैठकीत ते बोलत होते.


            डॉ. सावंत यांनी पुनर्रचित टास्क फोर्सच्या सदस्यांची व्हीसीव्दारे बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते.


            टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.


डॉ. सावंत यांनी कोविड 19 चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कच्या वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.


            यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉल मध्ये समावेश नाही, असे सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.


            कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजन ची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविड ची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.


कोविडच्या चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.


            कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग 15 मे पासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.


0000


 

Featured post

Lakshvedhi