Wednesday, 19 April 2023

खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित

 खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित


- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन


            मुंबई, दि. 19 :- देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.


            राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. आश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे असे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर 2 हजारांहून अधिक व्हेंटिलेटर व आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन करिता ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे. त्याच प्रकारे 2 हजार जम्बो आणि 6 हजार लहान सिलेंडर तयार आहेत.


            प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालयात 30 हजारांहून अधिक कोविड चाचण्या होऊ शकतात. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी प्रत्येक महाविद्यालयात कोविड मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.


            कोविड प्रादूर्भाव व प्रसार रोखण्याकरिता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोविडची लागण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अधिष्ठाता यांनी आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांना मास्क लावून काम करण्यास सांगावे. याशिवाय ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.


            शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.


००००

सावधगिरी बाळगावी


 

गोदंति भस्म..*jipsum

 *गोदंति भस्म..*


.. आयुर्वेद  हे संपन्न आहे वेगवेगळ्या वनस्पती पासून भस्म. काढे. चूर्ण. तयार करण्यात.. आज आपण एक

 महत्वाचे भस्म जाणून घेणार आहोत... गोदंती भस्म.. 👇

.. गोदंती.. हे एक खनिज आहे.. याला गोदंती नाव पडण्याचे कारण हे गायीच्या दातासारखे दिसते,  इंग्रजी मध्ये याला.. जिप्सम म्हणतात..

. गोदंती भस्म तयार करण्यासाठी गोदंतीचे बारीक चूर्ण करून कोरफड रसात घोटले जाते. आणि नंतर मातिच्या भांड्यात ठेऊन एका विशिष्ट तपमानावर याला आच दिली जाते. आणि मग पांढर्‍या रंगाचे.. ##गोदंति##भस्म. तयार होते. आपण याचे फायदे बघू या.


. गोदंती भस्म प्रामुख्याने. सर्व प्रकारचे ज्वर व ताप याकरिता वापरले जाते. पेरासिटामोल सारखे काम करते.

 यात नैसर्गिक कॅल्शियम असल्याने हे हाडाचि कमजोरी दूर करते. हाडांना येणारि सुज,  दूर होते. स्त्रीयांना ल्युकोरिया हा आजार होतो. अशा वेळी हे भस्म दिल्यास आराम पडतो. तोंडात छाले आल्यावर देखील याचा उपयोग होतो.

##टायफाईडवर.. गोदंती ला कडुलिंब रसाची भावना देऊन जे भस्म तयार केले जाते. ते. 500 मिली ग्रँम, प्रवाळ पिष्टि500मिलि ग्रँम,  सितोपलादी चुर्ण 1-5 ग्रँम, व गुळवेल सत्व 250 मिली ग्राम. अशी खुराक बनवून रूग्णास दिली असता. आराम मिळतो.


##हाईपोकैलशिमिया.. शरीरातील कॅल्शियम  वाढवण्यासाठी गोदंती भस्म अतिशय लाभदायक आहे

.. गोदंती भस्म 500 मिली ग्राम.. प्रवाळ पिष्टि 250 मिली ग्राम.. मुक्ता शुकती पिष्टि 250  मिली ग्राम. अशी

 खुराक द्यावी.


##तीव्र ##डोकेदुखि... अर्धशिशी. मस्तकशुळ. मायगरेन. या सर्व विकारावर. गोदंती भस्म 500 मिली ग्राम. गुळवेल सत्व 500 मिली ग्राम.. खडीसाखर चूर्ण 2 ग्राम असे एकत्र करून एक खुराक घ्यावी. यामुळे त्वरित आराम मिळतो.


##श्वेतस्राव.. योनी शोथ... बर्याच महिलांना वरील त्रास होत असतो. यामुळे कमजोरी येते. अशा वेळी. नीम गोदंती भस्म  500 मिली ग्राम.. जीरे पावडर 1 ग्राम.. माजूफळ चूर्ण 500..  मिली ग्राम. सुपारी पाक  2 ग्राम.. असे एकत्र करून. याची खुराक द्यावी... 


##मासिक##पाळीत रक्तस्त्राव जास्त होणे.. यामुळे अशक्तपणा येतो. एनिमिया होतो. तेव्हा अशा वेळी

नीम गोदंती भस्म 500 मिली ग्राम.. आवळा पावडर 2 ग्राम.. इसबगोल पावडर 2 ग्राम.. हे सर्व एकत्र करून याची एक खुराक द्यावी..


##फ्लु. ##खोकला. ## सर्दी... अशा वेळी

गोदंती भस्म + लक्ष्मीविलास रस + मध + खडीसाखर एकत्र करून खावे.. ##मलेरीया... तीव्र तापावर

  गोदंती भस्म + सुदर्शन चूर्ण फांट + सुदर्शन अर्क. एकत्रितपणे करून घ्यावे..


गोदंती भस्म हे आम्लपित्त दूर करते.. कफ काढते.. सुज दूर करते.. वात दोष दूर करते.  उच्च रक्तदाब, सर्व प्रकारचे ज्वर व ताप कणकण दूर होतात

तेव्हा अतिशय महत्त्वाचे असे हे आयुर्वेदिक औषध आपण आपल्या त्रासावर घेऊ रोग मुक्त होऊ शकतो...


 आयुर्वेद अभ्यासक.... सुनिता सहस्रबुद्धे...


*⭕️

उषमा घात जीवघेणा ठरू शकतो


उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी

 उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी


                                             - डॉ. विनायक सावर्डेकर


            मुंबई, दि. 19 : राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी, असे आवाहन सेंट जॉर्ज रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे. 


            जगभरात वातावरणात अनेक बदल होत असून, अचानक येणारी वादळे, पाऊस आणि उन्हाळ्यात उष्णतेची लाट वाढत आहेत. वातावरणीय बदल अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि वारंवारता वाढलेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत असून त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पहावयास मिळत आहे. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कशाप्रकारे जनजागृती करण्यात येत आहे आणि उष्माघात होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी, अशा विविध महत्वपूर्ण विषयांवरील माहिती डॉ. विनायक सावर्डेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत गुरूवार, दि. 20 एप्रिल 2023 सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल. ही मुलाखत वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी घेतली आहे.


            महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हा कार्यक्रम पाहता येईल.


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR


यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे

मुख्यमंत्रीउपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

            मुंबईदि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

            या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकरसहकारइतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेराज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईपर्यटनकौशल्य विकास व उद्योजकतामहिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विधानसभा सदस्य  आणि मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तवसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिकमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांची उपस्थिती होती.

            राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असताततसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने बटवारा होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असूनत्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेचएकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्यानेप्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.

            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशेपुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाहीअसे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.

००००

त्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचेमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

            मुंबई, दि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.


            या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विधानसभा सदस्य आणि मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांची उपस्थिती होती.


            राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने बटवारा होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी ( NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, एकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.


            नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.


००००



Featured post

Lakshvedhi