Friday, 14 April 2023

हृदयाची काळजी घ्या,* *कोलेस्टेरॉल कमी करा*

 *हृदयाची काळजी घ्या,* *कोलेस्टेरॉल कमी करा*


अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाहीत. काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात. आजार कोणताही असू दे शरीराची हानी ही करतोच. हृदयाचेही तसेच आहे. हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी किरकोळ स्वरुपाचा त्रास झाला तरी वैद्यकीय तपासणी करुन घेणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार करुन घेणे हिताचे आहे.


जग वेगाने प्रगती करत आहे, या प्रगतीसोबतच नवनव्या आजारांचा जन्म होत आहे. काही जुने आजार तीव्र स्वरुपात माणसाला त्रास देऊ लागले आहेत. यातच समावेश होतो कोलेस्टेरॉल या आजाराचा. हा आजार अतिशय आरामात शरीरात प्रवेश करतो. एरवी फिट दिसणारे तरुण तरुणीही या आजाराला बळी पडू शकतात. नियमित वैद्यकीय तपासणी करणाऱ्यांना या आजाराचे संकेत लवकर मिळू शकतात. पण इतरांना हा आजार झाल्याचे कळायला वेळ लागतो. 


कोलेस्टेरॉलचा आजार जेवढा गंभीर आहे तेवढाच तो दूर करणेही सोपे आहे. पण त्यासाठी चिकाटी हवी, संयम हवा आणि सातत्य हवे. काही सोपे उपाय नियमित केले तर कोलेस्टेरॉलच्या आजारावर मात करणे शक्य आहे.


*कोलेस्टेरॉल म्हणजे काय?* 


सोप्या भाषेत सांगायचे तर कोलेस्टेरॉल (cholesterol) हा रक्तात असलेला घटक आहे. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहावे वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळावी यासाठी रक्तातील कोलेस्टेरॉलचा वापर होतो. नैसर्गिकरित्या शरीर कोलेस्टेरॉल तयार करते तसेच फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांच्या सेवनामुळे शरीरात कृत्रिम कोलेस्टेरॉल प्रवेश करते. शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्तवाहिन्यांजवळ चिकटून नव्या भिंती, नवे अडथळे निर्माण करते. यामुळे शरारीत सतत सुरू असलेल्या रक्ताभिसरण प्रक्रियेवर परिणाम होतो. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास तब्येत बिघडण्यास सुरुवात होते. शरीरात अतिरिक्त कोलेस्टेरॉलची निर्मिती होणे या आजाराला हायपर कोलेस्ट्रोलेमिया म्हणतात.


शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन LDL आणि जास्त घनतेचे लिपोप्रोटीन HDL कोलेस्टेरॉल शरीरात आढळते. कोलेस्टेरॉलचे शरीरातील प्रमाण वाढण्याची अनेक कारणं आहेत. यातील २ प्रमुख कारणं


आहाराच्या तुलनेत शरीराच्या हालचाली कमी असणे फास्ट फूड, जंक फूड, भरपूर तेलाचा वापर करुन केलेले पदार्थ यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन

जर वजन जास्त असेल तर दोन पैकी किमान एक आणि काही वेळा दोन्ही कारणांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. रक्ताची कोलेस्टेरॉल तपासणी करुन घ्या. यात शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजेल. रक्तात 200 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर चिंतेची गरज नाही. पण रक्तात 200-239 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे हे लक्षात घ्या. जर रक्तात 240 mg/dl कोलेस्टेरॉल असेल तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण हे हाय कोलेस्टेरॉल आहे. ज्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते अशांना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असतो. 


कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्याचे सोपे उपाय


◼️दररोज  गरम पाणी प्या.  


◼️दररोज सकाळी तुळशीची २-४ स्वच्छ धुऊन घेतलेली पाने चावून खा.


 ◼️सकाळी एक ग्लास पाण्यात लेमनग्रास तेलाचे ५ थेंब टाकून ते पाणी प्या. 


◼️लिंबू पाण्याने धुवून घ्या नंतर दोन ग्लास पाणी भांड्यात उकळवत ठेवा. पाणी कोमट असताना त्यात लिंबू पिळा आणि लिंबाच्या साली पाण्यात टाका. लिंबाच्या साली टाकून द्या.  


◼️दररोज सकाळी ब्रश करण्याआधी लसणाच्या (Garlic) २-४ पाकळ्या चावून खा. किंवा लसणाच्या गोळ्या मिळतात त्या खायलाही हरकत नाही.


◼️रोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात लसणाचा वापर करा. नारळाच्या तेलापासून (Coconut oil) तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करा. 


◼️माशापासून तयार केलेल्या तेलाचा (Cod liver oil) खाण्याच्या पदार्थांमध्ये वापर करा आणि त्या पदार्थांचे सेवन करा. ओमेगा-3 च्या गोळ्या घ्यायलाही हरकत नाही.


◼️ज्या पदार्थांमधून ब३, क आणि ई जीवनसत्व (vitamine B3, C, E) मिळतात अशा पदार्थांचे सेवन करा.


 ◼️दररोज दुपारच्या जेवणात एक वाटी दह्याचे सेवन करा. दही पदार्थांच्या पचनासाठी मदत करते. 


◼️फास्ट फूड, जंक फूड, तेलकट पदार्थ यांचे सेवन टाळा. 


◼️साखर आणि मैदा यांचा वापर करुन केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा. 


◼️बेकरी प्रॉडक्ट, चिप्स आणि वेफर्स खाणे टाळा.


◼️गोडव्यासाठी जेवणात साखरेऐवजी गुळाचा वापर करा. 


◼️दररोज किमान एक तास योगासने करा. तसेच चालणे-फिरणेही ठेवा.



डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



जब मन कमजोर होता है;

*_🐾जब मन कमजोर होता है; परिस्थितियां समस्या बन जाती है..._*

*जब मन स्थिर होता है; परिस्थितियां चुनौती बन जाती है,_*

*जब मन मजबूत होता है; परिस्थितियां अवसर बन जाती है*                          

    *🐾**थोडे स्वतःसाठीही जगा, कारण जबाबदारी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही थकल्यावर थोडी विश्रांती घ्या...!*


  *

     🌿🌞 *शुभ सकाळ* 🌞🌿

[

चेंबूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील अशोक स्तंभाचे

 चेंबूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील

 अशोक स्तंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 

        मुंबईदि 13 : चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेखासदार राहुल शेवाळेमाजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

            खासदार राहुल शेवाळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या अशोक स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या लोकार्पणप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल

 मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई उपनगरांतील

 वाहतूक सुधारणा प्रकल्पांचे लोकार्पण

            मुंबईदि. १३:- मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री होणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपूलाचा तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले.

नवी मुंबई ते ठाणे प्रवास सिग्नल फ्री

            मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील १.२३ किमी लांबीच्या दोन पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्द वरून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नल मुक्त होऊन पूर्व द्रुतगती  महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होऊन नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवीमुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत असे. ही वाहतूकोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा वाहतूकीसाठी  खुला करण्यात आला आहे. तसेच आज लोकार्पण करण्यात आलेल्या उड्डाणपूला करिता ८६.३३ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी आणखी गतिमान

            सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोलारझाक जंक्शन पर्यंत ३.०३ किमी लांबीचा उन्नत मार्गाचे लोकार्पण करून आज तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उन्नत मार्गाच्या दोन मार्गीकांचे तसेच एमटीएनएल आर्मचे लोकार्पण केले होते. बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमी चा उन्नत मार्ग असणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत बिकेसीच्या सभोवतालचे रस्ते विकसित करण्यात येत आहेततसेच ते पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडले जात आहेतत्यामुळे मुंबईचे व्यवसाय केंद्र असलेल्या बीकेसी भागात  होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल. तसेच दोन्ही द्रुतगतीमहामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नल विरहित डबल डेक्कर उन्नतमार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.

            मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांची जलद जोडणी करण्याच्या दृष्टीने प्राधिकरण कार्यतत्परने सर्व प्रकल्पांचे  लोकार्पण करत आहे. घाटकोपर येथील छेडानगर हे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक प्रमुख जंक्शन आहे. मानखुर्द घाटकोपर लिंक रोड पूर्ण झाल्यावर पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन येथे नवी मुंबई वरून येणाऱ्या वाहनांमुळे मोठ्याप्रमाणात वाहतूकोंडी होत होती. तसेच ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या  प्रवाशांना सिग्नल वर बराच वेळ थांबावं लागत असे. आज उद्घाटन झालेल्या या उड्डाणपुलामुळे आता ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता विनाव्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ज्याच्यामुळे आता मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहेअशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही.आर श्रीनिवास यांनी दिली.

0000


Thursday, 13 April 2023

आहार धर्म पाळा, तंदुरुस्त ठेवा कुटुंबाला

 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

      *🌹🙏 विरुद्ध आहार 🙏🌹*

     

*डॉ.श्री. नितीन जाधव, संजीवन चिकित्सक. डोंबिवली.*


*विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.


*चहातून चपाती खाणे, केळ्याची शिकरण खाणे, माश्यांचे जेवण झाले असले तरी त्यावर दुधाचे आईस्क्रीम खाणे. याला संयोग विरूद्ध म्हणतात.* 


*दुधाबरोबर कुळीथ, वरी, वाल, मटकी, गुळ, दही, चिंच, जांभूळ किंवा कोणताही आंबट पदार्थ खाऊ नये. लसूण, मुळा, पालेभाज्या पण दुधाबरोबर खाऊ नयेत.*


*तांदुळ आणि मुगाच्या खिचडीत दूध घालून घेऊ नये.*


*दह्याबरोबर गरम पदार्थ, फणस, ताडगोळा, दूध, तेल, केळे, मासे, मांस चिकन, किंवा गुळ खाऊ नये.*


*निरनिराळ्या प्राण्यांचे मांस एकत्र शिजवून खाऊ नये. (मुळात मांसाहार करूच नये)*


*उडदाच्या डाळीबरोबर मुळा खाऊ नये, फणसाचे गरे खाल्यावर विडा खाऊ नये, पालक तीळाच्या तेलात तळून खाल्ल्यास जुलाब होतात. जलचर प्राण्यांचे मांस खाताना भात, मोड आलेली कडधान्ये, उडीद अथवा तीळ यासोबत खाऊ नये. असे बरेच दिवस केल्यास दृष्टीदोष, ऐकू न येणे, कंप सुटणे, उच्चार स्पष्ट न होणे, मानसिक अस्वास्थ्यता क्वचित मृत्यु देखील येतो. असे चरकाचार्यांनी आपल्या ग्रंथात सव्वीसाव्या अध्यायातील श्लोक 87 ते 106 मधे म्हटले आहे. आम्ही वैद्य मंडळी त्याचा अभ्यास करून अनुभव घेत आहोत.*


*केवळ एवढेच नाही तर, आणखीन ही काही विरूद्ध बघायला मिळतात.*


*जे पदार्थ गरम करू नयेत, ते करणे याला पाक विरूद्ध म्हणतात. जसे दही. मध. आज पंजाबी ग्रेव्हीमधे दही घालून शिजवले जाते. गरम सॅण्डवीच वर अॅण्टीऑक्सीडन्ट म्हणून मध लावतात. हे चुक आहे.*


*कोकणात गहू, सफरचंद, द्राक्षे खाणे हे देशविरूद्ध आहे.*


*हिवाळ्यात थंड आणि उन्हाळ्यात उष्ण पदार्थ खाणे, रात्री दही खाणे. हे काल विरूद्ध आहे.*


*पचनशक्ती म्हणजे अग्नि कमी असताना पचायला जड असे, श्रीखंड, पुरणपोळी असे पदार्थ खाणे, हे अग्निविरूद्ध आहे.*


*पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने तिखट, आंबट, खारट पदार्थ खाल्ले की त्रास होणारच. हे प्रकृतीविरूद्ध आहे.*


*एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थ खाल्ला की असात्म्यता निर्माण होते, यालाच अॅलर्जी असे म्हणतात. अंडी खाल्ली की पितांब येणे, आंबोळी खाल्ली की पोटात दुखणे, जुलाब होणे, हे सात्म्यविरूद्ध आहे.*


*दूध आणि मासे दोन्ही पदार्थ गुणांनी कफ वर्धकच असल्यामुळे शरीरात गेल्यावर कफ वाढणारच. हे दोषजवृद्धी विरूद्ध आहे.*


*कल्हई न केलेल्या तांबे किंवा पितळीच्या भांड्यात आंबट पदार्थ ठेवल्यास, तवंग किंवा निळसर रंग येतो, चव बदलते, किंवा अॅल्युमिनीयम, हिंडालियमच्या भांड्यात जेवण करणे, हे पात्र विरूद्ध झाले.*


*गरम आणि गार पदार्थ एकाच वेळी घेणे, जसे गरमागरम जेवणासोबत थंडगार पाणी पिणे हे वीर्य विरूद्ध आहे. (वीर्य म्हणजे केवळ शुक्र नव्हे. तर पदार्थातली शक्ती असा होतो. )*


*शू किंवा शी होत असताना ती रोखून धरून जेवणे हे क्रमविरूद्ध आहे.*


*कच्चे किंवा जळलेले, किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ खाणे, शिळे अन्न परत परत गरम करून खाणे, तेच पाणी किंवा चहा वारंवार तापवून घेणे, हे पाक विरूद्ध आहे.*


*मध तूप तेल प्राण्यांची चरबी समप्रमाणात घेऊ नये. तूप आणि मध एका प्रमाणात एकत्र करून घेऊ नये. याला प्रमाणविरूद्ध म्हणतात.*


*आवडत नसलेले पदार्थ खाल्ले की ते मनाविरुद्ध होतात.*


*विरूद्ध म्हणजे विषवत. पाॅयझन नव्हे. या विरूद्ध आहारामुळे टाॅक्सीन्स तयार होतात, जी शरीराला हितकारक नसतात.  एकदा खाऊन त्रास होईलच असे नाही, पण पंधरा दिवस महिनाभर जर यातील विरूद्ध पोटात जात राहीले तर परिणाम दिसून येतात.*


*त्वचेचे रोग, कोड, पुटकुळ्या येणे, रक्ताल्पता, रक्तस्राव होण्याची प्रवृत्ती वाढणे, तोंडाचे आजार, अपचन, पोटदुखी सारखे पोटाचे विकार, जुलाब, अम्लपित्त, जेवणानंतर लगेचच दोन नंबरला धावावे लागणे, सूज, अशक्तपणा, वजन कमी होणे, आळस, रागीटपणा वाढणे, मानसिक असंतुलन इ  अवस्थांमधे विरूद्ध आहार हे कारण असू शकते.*


*एखाद्या माणसाची पचनशक्ती चांगली असल्यास तो विषही पचवू शकतो, पण ही शक्ती कमी पडल्यास त्याला रोग होण्याचा संभव असतो.*


*हल्ली आधुनिक वैद्यकीय शास्त्रामधे अनेक रोगांची कारणेच सापडत नाही. अशा जीर्ण रोगात या विरूद्ध आहाराचा विचार केल्यास उपचारांना योग्य दिशा नक्कीच मिळते.*


*निरोगी रहाण्याचा राजमार्ग हा आहारातूनच जात असल्याने, आणि बदललेला आहार जर आपल्याला विरूद्ध मार्गावर घेऊन जात असेल तर विरूद्ध म्हणजे अगदी एकशे ऐशी अंशात विरूद्ध यावे लागले तरी चालेल, पण मागे फिरावे आणि योग्य मार्गाचा अवलंब करावा. इथे अहंकार नको, आखीर जिंदगी का सवाल है !*


*डॉ.श्री. नितीन जाधव.संजीवन चिकित्सक. डोंबिवली.*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


*(

दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी

 दिव्यांग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


            मुंबई, दि. 12 : ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकूल योजना तयार करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.


            सह्याद्री अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            यावेळी आमदार श्री. कडू यांनी दिव्यांग तसेच गावोगावी पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी घरकूल योजना असावी, अशी मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वतंत्र घरकूल योजना तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. राज्यात बांधकाम महामंडळाच्या धर्तीवर घरेलू कामगार यांच्यासाठी मंडळ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतमजुरांसाठी योजना करण्याबाबतच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमीहिन शेतमजुरांसाठी योजना करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


            चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक केला जात आहे. त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठकीतूनच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी संवाद साधला आणि या कामाला वन विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळण्याची मागणी केली. या बैठकीत अचलपूर जिल्हा निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, माधान ता. चांदूरबाजार येथे शासकीय सीट्रस इस्टेट करणे, फीन ले मिल पूर्ववत सुरू करणे आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दि

ल्या.


००००


कापूर वडी उन्हाळे थांबावी

 Ha Emportant message aahe tumchya grup la ha message pathava


Featured post

Lakshvedhi