Thursday, 6 April 2023

प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*

प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची बाटली सहज कोणालाही कुठे पण मिळून जाईल. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक ची पिशव्या येतातच, (उदा. तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.) तिच पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता, दररोज पाण्याच्या बाटली मध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खुप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करा. शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात हि चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी हि नम्र विनंती.

*प्लास्टिक नियोजन युक्त भारत.*

किडनि स्टोनः-

 # किडनि स्टोनः- 

१) तुळसः तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशिचि पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटि घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.

२) कुळिथः रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळिथ पाण्यात भिजवून ते सकाळि कुस्करून व गाळून २-३ 

 महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.

३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेलि आणून त्या जाळून त्याचि राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर विरघळतात.

४) काकडिचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून बाहेर पडतात.

५) हळद व एक वर्षापूर्विचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.

६) कडुलिंबाच्या पानाचि राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.

७) जर खडा लहान असेल तर मेहंदि चे साल वाटून चूर्ण करावे व सकाळि अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.

८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.

९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज एक वेळ सकाळि रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.

 त्यानंतर ४-५ तास तोंडाने काहि खाउ पिऊ नये. ..


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


_*(कॉपी पेस्ट)*_

*_आरोग्य आणि समर्थ social foundation च्या मधुमेह मुक्ति व व्यसनमुक्ती कार्याची नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा आम्हाला_🙂*

*_join होण्यासाठी 7875481853 ह्या नंबर वर Join Me असा what's up मेसेज करा_*

*किंवा लिंक वरून join व्हा 👇🏼*


https://chat.whatsapp.com/DKjPsM3QNzeIGlts4Dttzv

साथी हाथ badhana

 


नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार

 नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार


            नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.


            या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल. या मध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ कि.मी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटिव्ह चौक ते कन्हान नदी (१३ कि.मी.). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५कि.मी.). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० कि.मी.) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले

 आहे.


अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार

 अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार


१४ नव्या पदांना मान्यता


            अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            या करिता अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. सध्या या संवर्गात १३८ पदे मंजूर आहेत आणि संस्थानिहाय कमाल विद्यार्थी संख्या १३७ आहे. या निर्णयामुळे मंजूर विद्यार्थी पद संख्या १३७ वरून २०९ इतकी होणार आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालय, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमध्ये ही पदे निर्माण करण्यात येतील.


-----०-----

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार

 देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार

जमिनीच्या आरक्षणात फेरबदल


            मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.


महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ (भाग), मौ. देवनार, देवनार डम्पिंग ग्राऊंड, गोवंडी, मुंबई या जमिनीवरील महापालिका शाळा, इतर शिक्षण , खेळाचे मैदान, विद्यार्थी वसतिगृह व उद्यान/बगीचा ही आरक्षणे वगळून भूखंड भरणी स्थळाचे नामनिर्देशानसह उद्यान, बगिचाचे आरक्षण दाखवणाऱ्या फेरबदलास मान्यता देण्यात आली. याठिकाणच्या खेळाच्या मैदानावरील साधारणतः ३१ हजार २०० चौ.मीटर क्षेत्राचे आरक्षण वगळण्यात आले आहे.


-----०

महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदानप्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित

 महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदानप्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित


 


            नवी दिल्ली, 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर अन्य चार मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.


            राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्मपुरस्कार प्रदान सोहळा झाला. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आदी उपस्थित होते.


            प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ तर गजानन माने, परशुराम खुणे, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. धर हे सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. त्यांना विज्ञानातील प्रतिष्ठेचा जागतिकस्तरावरील बोल्ट्झमन पुरस्कार (Boltzmann Medal) घोषित झाला आहे.


राज्यातील 4 मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान


            गजानन माने यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. माने यांनी कुष्ठ रोग्यांसाठी आपले जीवन समर्पित केले.


            श्री. खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुनर्वास आणि सामाजिक कुप्रथांविषयी लोक जागृती केली.


            अभिनेत्री रविना टंडन या 25 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करीत असून अनेक चित्रपटांमंधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.


            कला क्षेत्रातील कुमी वाडीया कोरल संगीत ‘कंडक्ट’( संचलन) करणाऱ्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात विविध कार्यक्रम सादर केलेले आहेत.


             एकूण 55 पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. 3 मान्यवरांचा पद्मविभूषण, 5 मान्यवरांचा पद्मभूषण आणि 47 मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला.

Featured post

Lakshvedhi