Monday, 27 March 2023

खाद्यतेलाचा पुनर्वापर आरोग्यास हानिकारक !!*

 *खाद्यतेलाचा पुनर्वापर आरोग्यास हानिकारक !!*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*


https://chat.whatsapp.com/J3gm5TqJxhO4Vs619oeA8N


खाद्यतेल अन्नपदार्थांची चव, सुवास तसेच पोत, दर्जा वाढवण्यास मदत करते. तवा तळण प्रकारात कुठलाही अन्नपदार्थ तव्याच्या तळाला तेल लावून भाजला जातो.


उथळ तळण प्रकारात अन्नपदार्थ तळण भांड्याच्या तळाशी चिकटतो, मात्र तेल मात्रा अन्नपदार्थांच्या उंचीच्या अर्ध्यापर्यंत असते. खोल तळण प्रकारात अन्नपदार्थ पूर्णतः तेलात बुडतो. तळल्यानंतर तेलावर तरंगतो. आजच्या काळात खोल तळण प्रकार मोठ्या प्रमाणावर वापरतात. या प्रकारात तळलेल्या अन्नपदार्थामध्ये एक प्रकारचा सुवासिक गंध असणारा घटक तयार होतो, ज्यामुळे तेलाची गुणवत्ता बदलते.


१) तळण्यासाठी ताजे खाद्यतेल वापरले जाते. तळण तळताना विविध रासायनिक प्रक्रिया घडून तळलेल्या पदार्थामध्ये चांगल्या प्रकारचा सुवास, चव व पोत तयार होतो. तळलेल्या पदार्थातील स्निग्ध पदार्थ चांगल्या दर्जाचे असतात.


२) तळण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात व जास्त वेळा करण्यात आली तर या तेलामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक क्रिया होतात.


यामध्ये ऑक्सिडेशन (तेलाचा रंग जास्त गडद किंवा काळा होतो), हायड्रोलिसिस (फेसाळणे), आयसोमरायझेशन (आरोग्यास हानिकारक ट्रान्सफॅट तयार होणे) आणि पॉलिमरायझेशन (तेलाची घनता वाढणे किंवा घट्ट होणे) होते.


या सर्व रासायनिक क्रिया झालेल्या तेलाचा वाईट परिणाम तळलेल्या पदार्थांच्या चव, पोत, सुवास, त्यातील पौष्टिक घटकांचे प्रमाण आणि साठवण क्षमतेवर होतो.


३) रासायनिक प्रक्रियांचा परिणाम म्हणजे विषारी घटक पदार्थांचे तयार होतात. हे घटक तळलेल्या तेलाप्रमाणेच तळलेल्या अन्नपदार्थामध्ये सापडतात, याचा आरोग्याला मोठा प्रमाणावर धोका होतो. अशा अन्नपदार्थांचे सेवन करणे शरीराच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकते.


४) तेलामध्ये तळताना होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया या तेलाचा प्रकार, तेलाचे तापमान, तळण्याची वारंवारता, वापरण्यात येणाऱ्या तेलाची गुणवता, अन्नपदार्थांचा प्रकार, तळण उपकरणांचा वापर व तेलातील अँटिऑक्सिडंटचे प्रमाण आणि प्रकार इत्यादी घटकांवर अवलंबून असतात.


५) तवा तळण प्रकारात अन्नपदार्थात सर्व तेल शोषले जाते. उथळ तळण प्रकारात अन्नपदार्थाने तेल शोषूनसुद्धा थोड्या प्रमाणात तेल उरते. खोल तळण प्रकारात अन्नपदार्थ तळल्यानंतरही मोठ्या प्रमाणात तेल उरते.


अशा उरलेल्या तेलाचा पुन्हा वापर केला जातो. या तेलाचा वारंवार वापर केल्याने त्यामध्ये तयार होणारे आरोग्यास हानिकारक घटक जसे फ्री फॅटी ॲसिड, पॉलिमरिक पदार्थ, फ्री रॅडिकल्ससारखे विषारी घटक तयार होतात.


त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. हे सर्व विषारी घटक शरीरातील चांगल्या पेशींवर हल्ला करतात. त्यामुळे घशाची जळजळ, पित्ताचे विकार, हृदयरोग, अल्झायमर रोग, पार्किंनसन रोग, कर्करोग, हाडांचे विकार होण्याचा धोका वाढवतात.


६) संशोधनात असे आढळले, की सोयाबीन, करडई, सूर्यफूल तेलामध्ये पॉलिअन्सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते, असे तेल वारंवार गरम केल्याने त्यात ४- हायड्रॉक्सीट्रान्स -२-नॉनेनल नावाचा विषारी व आरोग्यास हानिकारक पदार्थ तयार होतो.


संशोधनात या विषारी पदार्थाच्या सेवनामुळे हृदयरोग, पक्षाघात, पार्किन्सरोग, अल्झायमर रोग, यकृत विकार व कर्करोगाचा धोका वाढल्याचे आढळून आले आहे.


४- हायड्रॉक्सिट्रान्स -२-नॉनेनल हा पदार्थ शरीरातील जनुकीय घटक आणि प्रथिनांसोबत प्रक्रिया करून शरीराच्या मूलभूत क्रियांवर वाईट परिणाम करतो.


*खराब झालेले खाद्यतेल (तळलेले) ओळखण्याचे प्रकार ः* 


१) जास्त तापमानावर जास्त वेळ तळण्यामुळे होणारा गडद काळा रंग येतो. तेलाला खराब वास येतो.


२) तेलामध्ये विविध पॉलिमरिक घटक तयार होऊन तेलाची घनता वाढते. तेल घट्ट होते.


३) तळलेल्या अन्नपदार्थांचे तेलाच्या तळाशी जमा होणारे घटकाचे प्रमाण वाढते.


४) तेलामध्ये फ्री फॅटी ॲसिडच्या प्रमाणात वाढ होऊन तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर फेस तयार होतो.


५) तेलाचा स्मोक पॉइंट ः १९० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत आल्यानंतर तेलाची तळण कार्यक्षमता व गुणवत्ता कमी होते.


६) सर्व तेल खराब होण्याची कारणे आणि लक्षणांचा विचार करता या तेलाचा पुनर्वापर केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तळलेल्या तेलाचा वारंवार वापर करणे हितावह ठरणार नाही.


*वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करताना घ्यावयाची काळजी ः* 


१) तळलेले तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर स्वच्छ जाळीदार कपड्याने गाळून घ्यावे. स्वच्छ काचेच्या बाटलीत झाकण लावून फ्रीजमध्ये थंड तापमानाला साठवणूक करावी. यामुळे तेलामध्ये जंतुसंसर्ग न होता त्याला खराब वासदेखील येणार नाही.


२) कमी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असलेले, तेलाचा स्मोक पॉइंट १९० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असलेले, वापरलेले व चांगल्या स्थितीत साठवणूक केलेले तळीव तेल पुनर्वापरासाठी वापरता येते. परंतु जर तळताना धूर किंवा फसाळणे आढळले तर असे तेल वापरू नये.


३) मोठ्या प्रमाणावर पोलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण असणाऱ्या तेलामध्ये ४- हायड्रॉक्सीट्रान्स -२-नॉनेनल सारखा विषारी घटक तयार होतो.


म्हणून शेंगदाणा तेल, तीळ तेल, पाम तेल, राइस ब्रान तेल व मोहरी तेल ज्यामध्ये पोलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण कमी आढळते. अशा तेलाचा तळणासाठी वापर करावा.


जवस तेल, करडई तेल, सोयाबीन तेल व सूर्यफूल तेलामध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. अशा प्रकारचे तेल शक्यतोवर ताजे आणि लगेच वापरावे. अशा तेलाचा (तळीव) पुनर्वापर करणे टाळणे आरोग्यास चांगले ठरते.


४) तेलाचे तळण १९० अंश सेल्सिअस तापमानाच्या वर केल्यास तेलामध्ये ४- हायड्रॉक्सिट्रान्स -२-नॉनेनल सारखे विषारी पदार्थ तयार होण्याचा धोका संभवतो.


त्या कारणाने सामन्यत: १९० अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली किंवा कमी तापमानावर तळणे योग्य ठरते.


५) सामान्यत: रस्त्यावरील अन्नपदार्थ विक्रीचे हातगाडे आणि घरामध्ये देखील अगोदरच्या उरलेल्या तळलेल्या तेलामध्ये पुन्हा ताजे किंवा न वापरलेले तेल मिसळून पुन्हा नवीन अन्नपदार्थ तळण्यासाठी सर्रास वापरले जाते.


ही एक प्रकारची अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे वापरलेल्या तेलातील जळलेले कण, गाळ तसेच विषारी घटक त्यामध्ये मिसळले जातात. हे आरोग्यास घातक आहे.


अन्नपदार्थ तळण्यासाठी नेहमी ताज्या किंवा न वापरलेल्या तेलाचा वापर अतिशय चांगला आणि आरोग्यास हितावह व फायदेशीर पर्याय आहे.


६) तांबे किंवा लोखंडी भांडे किंवा तवा यांसारख्या धातूच्या भांड्याच्या वापराने तळलेल्या तेलाचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा भांड्यांचा वापर टाळणे.


७) अन्नपदार्थ नेहमी (१७० ते १८० अंश सेल्सिअस) तापमानावर किंवा जास्तीत जास्त १९० अंश सेल्सिअस तापमानावर तळणे योग्य राहील.


८) तळण्याची प्रक्रिया झाल्यानंतर लगेच गॅस शेगडी बंद करावी. कारण सतत गरम करण्याने तेलाची गुणवत्ता कमी होते.


*वापरलेल्या तेलाची विल्हेवाट ः* 


१) वापरलेल्या (तळलेल्या) तेलाची योग्य प्रकारे विल्हेवाट किंवा त्याचे व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे. तळलेल्या तेलाच्या पुनर्वापराने होणारे दुष्परिणाम विचार करता अशा तेलाच्या कुठेही फेकल्याने पाइपलाइन बंद होते.


२) तळलेल्या तेलामध्ये आरोग्यास हानिकारक घटक असतात, ते पाइपलाइनद्वारे पाण्याच्या साठ्यात मिसळतात. त्याचा पाण्यावर थर तयार होऊन (तेल पाण्यात हलके असल्याने) पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याचा साठ्याची सुरक्षितता, आरोग्यास अपायकारकता वाढण्याचा धोका वाढतो.


एक लिटर तेल साधारणपणे एक दशलक्ष पाणीसाठा खराब करू शकते. त्यामुळे असे तेल हवाबंद बाटलीत भरून नेहमीच्या कचऱ्यासोबत त्याची विल्हेवाट लावणे हा एक योग्य पर्याय आहे.


३) वापरलेल्या तेलाचा पुर्न:वापर साबण, रंग, वाहनांसाठी वंगणतेल, ग्रीस तयार करण्यासाठी करतात.


४) तेलाचा वापर अखाद्य प्रकारात करता येतो. उदा. दिवा लावणे, ऊर्जास्रोत म्हणून केला जाऊ शकतो.


५) हरित तंत्रज्ञानामध्ये पर्यावरणपूरक इंधनाच्या मागणीत वाढ होत आहे. बायोडिझेल सारख्या पर्यावरणपुरक ऊर्जास्रोताची उपलब्धी महत्त्वाची आहे.


परंतु बायोडिझेलचे फायदे लक्षात घेता ते निर्माण करण्यासाठी आवश्यक साधन सामग्रीची (उदा. फॅटिॲसिड) कमी उपलब्धता ही एक मोठी समस्या आहे.


त्यामुळे तळलेल्या तेलावर ट्रान्सेस्टरिफिकेशन सारख्या रासायनिक प्रक्रिया करून बायोडिझेलच्या निर्मितीस मोठ्या प्रमाणावर वाव आहे.


त्यामुळे सर्व घरातून, हॉटेलमधून रोज तयार होणारे तळलेले तेल एकत्रितरीत्या संकलित करून त्याचा बायोडिझेल निर्मितीसाठी वापर करणे एक अतिशय चांगला पर्याय आहे.


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा.lakshvedhimm@gmail.com ⬇️⬇️⭕️*




_*(

मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला

 मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल

-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

            मुंबईदि. 25 : पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा महामार्गासाठी भूसंपादन करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत त्यांना मोबदला देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

            विधानसभा सदस्य श्रीनिवास वनगा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

            मंत्री श्री.विखे पाटील म्हणालेविद्यावासिनी कॉर्पोरेशन प्रा. लि.या कंपनीस जादा आकारण्यात आलेला मोबदला वसूल करण्यासाठी त्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलाव विक्री करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या बाबतची कार्यवाही पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.या महामार्गासाठी भूसंपादनात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी येत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात येत आहे.

००००

सोलापूर शहर पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक

 सोलापूर शहर पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक

-मंत्री उदय सामंत.

               मुंबई, दि. 25 : सोलापूर शहर पाणीपुरठ्यासंदर्भात कंत्राटदारांना देण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस वारंवार स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.


            सदस्य सुभाष देशमुख यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री. सामंत म्हणाले की, उजनी धरणावरून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी 170 द. ल. लि. उजनी ते सोलापूर थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा प्रकल्पाची योजना सोलापूर स्मार्टसिटी मार्फत तयार करण्यात आलेली आहे. या योजनेत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपिंग स्टेशन व पंपिंग मशिनरी, रायझिंग मेन, बी.पी.टी. ग्रॅ

जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल

 जिगाव प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता पाहून

अतिरिक्त गावांचा लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 25 : जिगाव प्रकल्पात मोठी सिंचन क्षमता तयार करण्यात येत आहे. यामध्ये अधिक सिंचन क्षमता उपलब्धतेचे प्रमाणपत्र प्राप्त झाले तर मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे या लाभक्षेत्रात समाविष्ट करुन त्यांना लाभ देता येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            याबाबत सदस्य संजय सावकारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मलकापूर विधानसभा मतदार संघातील 14 अतिरिक्त गावे लाभक्षेत्राबाहेरील आहेत. या गावांचा समावेश या प्रकल्पात करत असताना अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असणे महत्वाचे आहे. म्हणून पाणीसाठा उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाला निधी देण्यात येईल,त्यानंतर या गावांना लाभक्षेत्रात समावेश करण्यात येईल,असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


000

लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

 लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध

- राज्यपाल रमेश बैस.

            मुंबई, दि. 25 : लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनविण्यात लघु व मध्यम उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना 'एसएमई चेंबर ऑफ इंडिया' या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. २५) मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. 


            कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.


            यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या 'इंडिया एसएमई लीडरशिप समिट' परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग हे असून या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळत असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी सांगितले. 


            लघु मध्यम उद्योग क्षेत्रातील अर्ध्याहून अधिक उद्योग ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे आहे. तसेच उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाय योजना केल्या असल्याचे राज्यपाल यांनी यावेळी सांगितले.


            यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी राज्यातील लघु मध्यम उद्योगांच्या वाटचालीचा आढावा घेतला. देशाला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यात लघु मध्यम उद्योग मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


            राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना 'प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देण्यात आले. 


            युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, उदय अधिकारी, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना 'इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.


००००


 


Maharashtra Governor presents India SME Excellence Awards


 


      Mumbai 25 : Maharashtra Governor Ramesh Bais addressed the India SME leadership Summit and presented the India SME Excellence Awards to successful small and medium entrepreneurs in Mumbai on Sat (25 Mar).


            The Summit and awards function was organised by the SME Chamber of India and the Maharashtra Industry Development Association on the occasion of the 30th Foundation Day of the Chamber.


            Founder Chairman of the SME Chamber of India Chandrakant Salunkhe, Head, Corporate Strategy and Special Projects Anup Sahay and heads of various small and medium entrepreneurs were present.


            The Governor released the Activity Report and launched the initiative of 'Entrepreneurship Development Council' on the occasion.


            The India SME Excellence Awards were presented to Arpit Sidhpura, Lalit Chadha, Jittendra Patel, Yusuf Kagzi, Sonir Shah, Uday Adhikari, Vishal Mehta among 20 others. The Governor also presented the Pride of Maharashtra to Prabhakar Salunke, Dr Seema Saini and Sushama Chordiya on the occasion.


0000



मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

 मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

            मुंबई, दि. 25 : मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्तावित जागेबाबत सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

            याबाबत सदस्य सुनिल राणे, प्रकाश अबिटकर,सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभा सदस्यांची एक समिती गठीत करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या पात्रता यादीचीही छाननी करुन पात्र लोकांची यादी कालमर्यादेत तयार करण्यात येईल. गिरणी कामगारांच्या घरांसाठी आवश्यक असणारी जागा निश्चित करुन या कामाला अधिक गती देऊन प्राधान्य देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


000

कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार

 कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन

आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देणार


                               - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

          मुंबई, दि, 25 : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 12 गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचे फेरनियोजन करुन आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


          याबाबत सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.


          उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या आदिवासी भागातील गावांना कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाच्या जलाशयावरुन शेतीसाठी कळमजाई उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती. त्यानुसार या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. याप्रकल्पासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल आणि उपलब्ध पाणीसाठा याचा अंदाज घेऊन या 12 गावांच्या आदिवासी बांधवांना दिलासा देण्यात येईल.

Featured post

Lakshvedhi