Saturday, 25 March 2023

खपली गहू / Emmer Wheat

 🌱🌱 *खपली गहू / Emmer Wheat*🌱🌱


*खपली गहू हे भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे*


*एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गव्हाची जात.* सध्याच्या काळात बाजारात सहज उपलब्ध नसल्यामुळे ह्या उपयुक्त गव्हाचा वापर कमी झाला आणि विसर पडला आहे. 


*मानवी शरीरासाठी खुप उपयुक्त असा हा खपली गहू* ... ह्या गव्हाच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर *खपली गव्हाची जात ही ५००० हजार वर्षांपूर्वी ची आहे असे आढळते.*


*निसर्गत:च खपलीमध्ये कणखरपणा आहे. खपली गहू मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कॅन्सर, बद्धकोष्ठता इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.* *धारवाड कृषी विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासानुसार खपलीचा आहारात वापर केल्यामुळे मधुमेही रुग्णांच्या Total lipid,Triglycerides and LDL Cholesterol मध्ये लक्षणीय घट झाली.* म्हणजेच या आजारातील धोका बर्‍यापैकी कमी झाला. याशिवाय *परदेशात केलेल्या अशाच संशोधनात Type 2 मधुमेह व वयानुसार कमी होणार्‍या दृष्टिर्‍हासात खपलीचा आहारातील उपयोग चांगला दिसून आला. खेळाडूंच्या दैनंदिन आहारातील खपलीचा उपयोग क्षमता टिकवून धरण्यासाठी उपयोगी पडतो.*


काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या लोकांना पुरणाची पोळीही खपली गव्हाचीच लागते. *सध्या शहरातील रहाणाऱ्या लोकांना ह्या गव्हा बद्दल फारशी ओळख पण नाही ये आणि दुर्दैवाने तो सहज उपलब्ध पण नाही.*


*आयुर्वेद*

*आयुर्वेदात गव्हाचे वर्णन बळ देणारा, विर्य वाढवणारा, बृहण करणारा म्हणजे पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे.* 


🌱 *या गव्हाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पोळीला लालसरपणा असतो आणि ती अधिक चविष्ट लागते. आज मात्र खपली गव्हाचा वापर अतिशय कमी होत चालला आहे.*

🌱 *काही वर्षांनी कदाचित तो मिळायचाच बंद होण्याची भीती आहे.* 


*खपली गव्हा पासून पुरणपोळी,खीर व लापशी सारखे छान पदार्थ बनतात. काळाच्या ओघात तो लुप्त होऊ लागला आहे. आजकाल मधुमेहासाठी डॉ कटाक्षानं खपली गहू खा म्हणून सांगत आहे, हा *गहू प्राचीन भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. गव्हाची ही जात साधारणपणे ५००० वर्षांपूर्वीपासून भारतात होती. असे म्हणतात. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हाच गहू वापरायला सांगतात कारण याने माणसाच्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम होत नाहीत* आणि *मधुमेह व इतर विकार होत नाहीत . मधुमेह असल्यास तो नियंत्रणात येतो.*


*सध्या हा गहू फारच कमी ठिकाणी मिळतो . Hybrid गव्हाची चपाती आणि खपली गव्हाची चपाती यात खूप फरक आहे.*


*खपली गव्हाची काही प्रमुख वैशिष्ट्ये*


*१) खपली गहू प्रामुख्याने पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ति वाढविणारा आहे.*

*२) खपली मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग,बद्धकोष्टता, हाडांची झीज भरून काढणारा, दातांच्या तक्रारी इत्यादी आजारांत आहारासाठी योग्य आहे.*

*३) खपली पचावयास हलका आहे. शेवया, कुरडया, बोटुकली, खीर, रवा, पास्ता इ. पदार्थ बनवले जातात.*

*४) या गव्हापासून बनविलेली चपाती/पोळ्या चवीला इतर गव्हाच्या जातीपेक्षा गोडसर असते.*

*५) या गव्हामध्ये १२ ते १५ टक्के प्रथिने, ७८ ते ८३ टक्के कर्बोदके आणि तंतूचे प्रमाण १६ टक्के आहे.*

 *७) ह्या गव्हात ग्लुटेन ची मात्रा अतिशय कमी, त्यामुळे मधुमेही रुग्णांना उपयुक्त आहे.*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

कलौंजि..आरोग्य संदेश

 💫💫 कलौंजि..


  हा एक असा मसाला आहे कि,, म्रुत्यु शिवाय,, सर्व आजार नामशेष करतो,. हिचा दैंनदिन जीवनात वापर म्हणजे ,, निरोगि,, सुद्रूढ,, आयुष्य.. प्रत्येक भाजित चव तर आणतोच, पण पोटात जाऊन औषधि काम करतो..

     ##* कलौंजि गरम पाण्यासोबत घेतल्यास, अस्थमा बरा होतो. सर्दि, दमा, खोकला, यावर गुणकारि केसांकरता फायदेशिर आहे


##* टक्कल पडत असेल तर, कलौंजि तेल आँलिव्ह तेलात मिसळून लावावे, आळा बसून केस जाण्याचे थांबते,, व नविन केस उगवतात, ,, मधूमेहाचि,, हि शत्रूच आहे,, रोज जेवणानंतर एक चमचा कलौंजि पावडर पाण्यासोबत घेतल्यास शर्करा नियंत्रित राहते,।


##*. कलौंजित, आयर्न, सोडिअम, कँलशिअम, पोटँशिअम, व फायबर विपुल प्रमाणांत असते, एमीनो अँसिड, व प्रोटिन देखिल भरपूर प्रमाणात आहे, तीव्र डोकेदुखिवर कलौंजीचे तेल मस्तकावर चोळल्यास आराम पडतो,. स्म्रूतिभ्रंश, अल्जायमर, होउ देत नाही,.


##* उच्च रक्तदाब, संतूलित राहतो, कोलेस्ट्रोलचे प्रमाण व्यवस्थित राहते,. कलौंजित ,,पोटँशिअम, चे प्रमाण जास्त असल्याने , डायबेटिस, नियंत्रणात राहतो, एक ग्लास द्राक्षांच्या रसात कलौंजि तेल मिसळून घेतल्यास

,, कँसर,, सारखी व्याधि वर विजय मिळवता येतो..



##* दिवसांतून किमान २,३., ग्रँम, कलौंजिचे सेवन करावे,. वजन कमी होते,. टाचांना भेगा आल्यास कलौंजिचे तेल लिंबाच्या रसात मिसळून लावावे, भेगा भरून येतात,. रोग प्रतिकार शक्ती वाढते,. बद्धकोष्ठ, बवासिर, आतड्यांचि दुर्बलता दूर करते..


##* कलौंजि गुणधर्माने उष्ण, तिक्त, आहे,. तेव्हा वात, कफ विकारांवर, फायदेशिर आहे,. विशेषतः हिवाळ्यात याचे सेवन दूधातून तेल टाकून केल्यास रक्ताभिसरण चांगले होते, चरबिची गाठ वितळते,

    कच्चि पपयी,५ ग्रँम, गूळ५ ग्रँम, व ४ थेंब कलौंजि तेल मिसळून घेतल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो,.


##* कर्णदूखिवर कलौंजीचे तेलाचे थेंब कानात टाकल्यास कानाचे दूखणे बरे होते,, , बाळाला दूध पाजणार्या स्रियांनि एक कप दूधात २ थेंब कलौंजि तेल टाकुन घेतल्यास बाळाला भरपुर दूध मिळते,.

  डोक्यांत होणार्या कोंड्यावर ३०० ग्रँम कलौंजि तेल, ३०० ग्रँम, आँलिव्ह आँईल, व ३० ग्रँम मेंदि पावडर घेउन ते शिजवून मग गाळून डोक्याला लावावे.,


##*कलौंजिचे वरिल उत्तम फायदे बघता, रोजच्या आहारात याला स्थान द्यावेच..##*##*##


..... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे....


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_

फू बाई फू

 



माझे जीवन गाणे

 







सूचना

 लक्ष द्या TRAI मोबाइल टॉवर लावण्यासाठी NOC प्रस्तावित करीत नाही.जर कुणी धोक्याने आपणास या प्रकारे पत्रासह संपर्क करीत असेल तर हा विषय संबंधित मोबाइल सेवा प्रदात्याला सूचित केला जाऊ शकतो

सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा

 सिडकोने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीसंदर्भात

30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा


 -मंत्री उदय सामंत


मुंबई दि. 24 : नवी मुंबईतील सिडको महामंडळाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या जमिनीच्या विकसनाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करून बांधकाम व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला 30 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.


            विधान परिषदेत सदस्य निरंजन डावखरे यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, नवी मुंबई शहराचा विकास करण्याकरिता शहरे विकास प्राधिकरण सिडकोची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडको मार्फत विविध प्रयोजनासाठी जमिनीचे विहित पद्धतीने भाडेपट्ट्याद्वारे वाटप करण्यात येते. नियमानुसार करारनामा पासून 4 वर्षाच्या आत बांधकाम पूर्ण न केल्यास त्यापुढील बांधकामाच्या कालावधीसाठी अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकरण्यात येते, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


राज्य शासनाने दि.२७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीस अहवाल सादर करण्यास ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु हा अहवाल सादर करण्यास दि.३0 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीने दिलेल्या निर्देशानुसार माहिती उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माहितीचे विश्लेषण करुन समितीकडून वाढीव मुदतीत अहवाल सादर करण्यात येणार आहे. हा अहवाल विहित वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


या समितीच्या कार्यकक्षेमध्ये सिडकोमार्फत आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त भाडेपट्टा शुल्काच्या दराबाबतचा मुद्दा विचाराधीन असून समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.


00000

सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार

 सातारा जिल्ह्यातील प्रस्तावित औद्योगिक वसाहती जिल्ह्यातच राहणार


- उद्योग मंत्री उदय सामंत


            मुंबई, दि. 24 : सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. येथील प्रस्तावित वसाहती जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.


            सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


            मंत्री श्री.सामंत म्हणाले की, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या धर्तीवर बंगलोर - मुंबई आर्थिक कॉरिडॉरअंतर्गत सातारा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहती विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यानुसार मौजे म्हसवड व धुळदेव येथील क्षेत्राची स्थळ पाहणी करण्यात आली. येथील एकूण ३२४६.७९ हे.आर क्षेत्रास महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्याबाबतची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार भूसंपादन कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जमिनीबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यात औद्योगिक नगरी उभारण्यासाठी कोणतीही जागा केंद्र शासनामार्फत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (एनआयसीडीसी) अंतर्गत केंद्र शासनाच्या समितीने तांत्रिकदृष्ट्या उत्तर कोरेगाव मधील जागा पात्र ठरविली, मात्र येथील मौजे भावेनगर, पिंपाडे बु., सोळशी, नांदवळ, रंदुल्लाबाद या ग्रामपंचायतींनी ठराव पारित करून भूसंपादनास विरोध केल्याचे एनआयसीडीसी विरोधी संघर्ष समितीने लेखी कळविलेले असल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले. तथापि, या गावांची तयारी असल्यास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे सांगून जिल्ह्यातील प्रस्तावित एम आय डी सी जिल्ह्याबाहेर जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.


            या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.


00000

Featured post

Lakshvedhi