Friday, 24 March 2023

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष

 इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा दक्ष


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत


            मुंबई दि. २३ : राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभा व विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.


            आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले की, एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा वाढत्या प्रादुर्भावाचा राज्यातील सर्व स्तरावर सतत आढावा घेण्यात येत आहे. राज्यात सर्व स्तरावर सनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पुर्नप्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहे.


            राज्यात गंभीर आजारी, वृद्ध नागरिक, अतिजोखमीच्या व्यक्ती, गरोदर माता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा व महानगरपालिकांना स्थानिक स्तरावर लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये ९९.७७८ लोकांना लस देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार लस उपलब्ध ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर अनुदान देण्यात आलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.


            राज्यात १ जानेवारी २०२३ पासून २० मार्च २०२३ पर्यंत एच१ एन१ चे एकूण बाधित रुग्ण ४०७ तर एच३एन२ चे बाधित रुग्ण २१७ रुग्ण आढळून आलेले आहेत. या आजारा बाबत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा तसेच रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी ऑसेलटॅमीवीर हे औषध शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. याबरोबरच काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याची आढावा बैठक घेऊन कोविड प्रतिबंधक जीवनशैली बाबत जनतेचे प्रबोधन करण्याचे निदेश दिले आहेत. राज्य शासन कोविड उपचाराबाबत दक्ष आहे. त्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन करण्यात येत असल्याचेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.


०००

आंतरधर्मीय विवाहाबाबत धोरणात्मक निर्णय शासनाच्या विचाराधीन

 आंतरधर्मीय विवाहाबाबत धोरणात्मक निर्णय शासनाच्या विचाराधीन


                                         - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 23 : “राज्यातील वाढत्या धर्मांतर व आंतरधर्मीय विवाहाच्या घटनांबाबत शासन अतिशय गंभीर आहे. याबाबत वेगवेगळ्या राज्यांनी केलेल्या विशेष कायद्याचा अभ्यास करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत शासनाच्या विचाराधीन आहे”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            विधान परिषदेत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात अलीकडे फसवणुकीच्या इराद्याने काही आंतरधर्मीय विवाहाच्या घटना आढळून येत आहेत. याबाबत शासन अतिशय गंभीर आहे. या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पोलीसांनी तत्काळ करावयाच्या कारवाई बाबत पोलीस महासंचालक यांच्यामार्फत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात येतील, वारंवार अशा घटना घडत आहेत, यामागची कारणमीमांसा केली जाईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.



महाराष्ट्र शासनाचे 11 वर्ष मुदतीचे3 हजार कोटींचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे 11 वर्ष मुदतीचे3 हजार कोटींचे रोखे विक्रीस.

            मुंबई, दि. 23 : राज्य शासनाच्या 11 वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.


            या कर्ज उभारणीस केंद्र शासनाची मान्यता घेण्यात आली असून या शासकीय रोख्यांची विक्री ही भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबईद्वारे दि. 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येणार आहे.


            राज्य शासनाच्या सर्वसाधारण अधिसूचनेमधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                     


            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 28 मार्च, 2023 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बीडस् दिनांक 28 मार्च, 2023 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.


            यामध्ये स्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बीडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 29 मार्च, 2023 रोजी करण्यात येईल.          


            यशस्वी झालेल्या बीडर्सकडून दिनांक 29 मार्च, 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्याचा कालावधी 11 वर्षांचा असेल.


            रोख्यांचा कालावधी 29 मार्च, 2023 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 29 मार्च, 2034 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 29 सप्टेंबर व 29 मार्च रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.


            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाच्या 23 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.


००००

हवामान बदल -जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते

 *जुनाट सर्दीदेखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते*


ऋतू बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी. प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो. 


परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते. सर्दीची योग्यवेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात.


*सर्दीची कारणे :*


 थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे, रात्री जागरण, धुळीशी संपर्क येणे, पोट साफ न होणे, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, पचन व्यवस्थित नसणे, दिवसा झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो. 


*सर्दीची लक्षणे*


नाकातून पाणी वाहणे, नाक बंद होणे, वारंवर शिंका येणे, डोके दुखणे किंवा जड होणे, आवाजात बदल होणे, अंग दुखणे, ताप आल्यासारखा वाटणे, दम लागणे अशी अनेक सर्दीच्या रुग्णात सामान्यपणे आढळून येतात. अनेक रुग्णांना तर 2-3 रुमाल घेऊन बाहेर पडावे लागते. नाक सतत गळत असते. अनेकांना एकावेळा 20-20 शिंका येतात. धुळीची अ‍ॅलजी असणा-यांना धुळीशी संपर्क येताच त्रास सुरू होतो. केवळ चादर झटकल्याचे निमित्त होऊन सर्दीचा त्रास सुरू होतो. औषधे घेतल्यास तात्पुरते बरे वाटते, परंतु परत सर्दीचा त्रास सुरू होतो. वीस-वीस वर्षांपासून सर्दीने त्रस्त असलेले अनेक रुग्ण मी प्रॕक्टीसमध्ये पाहिलेले आहेत. 


*सर्दीवरील उपचार :-*


आयुर्वेदीय उपचारांच्या साहाय्याने जुनाट सर्दी देखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते. पंचकर्मापैकी एक असलेले ‘नस्यकर्म’ हे सर्दीच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे. विशिष्ट पद्धतीने औषधी तेल नाकात सोडण्याच्या प्रक्रियेला नस्यकर्म म्हणतात. नस्यकर्मामुळे नासामार्गातील दोष बाहेर पडून सर्दीची लक्षणे त्वरेने कमी होतात. अ‍ॅलर्जीमुळे होणा-या सर्दीमध्ये सुद्धा नस्याचा अतिशय उत्तम उपयोग दिसून येतो. यासोबतच काही आयुर्वेदीय औषधांचे सेवन केल्यास अनेक वर्षांच्या सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो. 

 

*काय करावे* 


◼️कोल्ड्रींक्स, आइस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचे सेवन टाळावे. 

◼️केळी, काकडी, दही, टोमॅटो हे पदार्थ टाळावेत.

◼️गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये.

◼️पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे.

◼️केस धुतल्यानंतर लवकर कोरडे करावेत.

◼️शिंका जास्त येत असल्यास ‘क्षवथु तेल ’ नाकात टाकावे.

◼️रात्री सर्दीचा त्रास अधिक होत असेल तर झोपताना थोडे फुटाणे खावेत, त्यानंतर पाणी पिऊ नये.

◼️भाताचे प्रमाण कमी करावे.

◼️शक्यतो एसीचा वापर टाळावा.


*संकलन-* 


डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*




_*

जीवन गाणे

 *लवकर जाग येणे हे कधीही* *फायद्याचेच असते*--------------

*मग ती झोपेतून असो*-----------

*अहंकारातून असो*--------–-----

*अज्ञानातून असो*---------------

*किंवा गैरसमजातून असो*-------

*आपला दिवस आनंदात जाओ*

जरुरी हो गया है 

मुस्कुराते रहना


लोक दर्द मे देखकर सवाल बहुत करते है !!!

*🪴🙏

प्रसंगवधान 112India अॅप डाउनलोड करून

 #AD_लघुकथा 


#प्रसंगावधान 


आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी अॅनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही. 


आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग अॅप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.


हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर "मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला." असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग अॅपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले. 


तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे. 


थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India अॅप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India अॅप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या अॅपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत अादिती साशंक होती. 


एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India अॅपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.


गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तीला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली. 


अॅपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं. 


तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला एेकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते. 


आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले. 


आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India अॅपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती. 


आदितीने दोघा नराधमां विरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातार जवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.


112India अॅप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. अॅपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर अॅप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.


भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.


पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप विकसित केलेले आहे. अॅपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.


आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.


बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे अॅप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.


अॅपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

विनंती साखर सोडा*

 *विनंती साखर सोडा*


डॉ. म्हणतात लापरवाही वगळता कोणीही कर्करोगाने मरणार नाही. *सर्वप्रथम साखर खाणे कमी करावे शरीरात साखर नसल्यास, कर्करोगाच्या पेशीचा नैसर्गिक मृत्यू होतो.*


साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला.

 "त्याआधी *भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते* आणि कधीही आजारी पडत नव्हते."


*साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...*


(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये *गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला.!*


(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून *एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.*


(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. *कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.*


(४) साखरेमुळे शरीराचे *वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.* 


(५) साखर ही *रक्तदाब वाढवते.*


(६) साखर ही *मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.*


(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. *माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.*


(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये *तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.*


(९) साखर ही *मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.*


(१०) साखर हे *पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.*


(११) साखर ही *शरीरातील ट्राइ ग्लिसराइड* वाढवते.


(१२) साखर हे *अर्धांगवायुचा किंवा पक्षाघात झटका* अथवा *लकवा* होण्याचे एक मुख्य कारण आहे.


(१३) *कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर आजच्या आज करणे सुरू करा.*


*आपण कितीही व्यस्त असलात तरी, कृपया हे वाचण्यासाठी वेळ काढलात त्या बद्दल धन्यवाद.*🙏🌹


*वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.*🙏🌹🧘‍♀️🧘‍♂️😷🇮🇳

Featured post

Lakshvedhi